Monday, April 4, 2011

सम्यक साहित्य संम्मेलन आणि बामसेफचा (वामन मेश्राम गट) दहशतवाद!१-३ एप्रिल २०११ रोजी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरामद्धे सम्यक साहित्य सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते. आर. पी. आय. (आठवले गट) नेते परशुराम वाडेकर हे या सम्मेलनाचे स्वागताध्यक्ष होते. डा. बाबासाहेब आंबेडकर सांस्क्रुतीक महोत्सव समितीच्या वतीने या सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
सम्मेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी नामदेव ढसाळ होते. उद्घाटक म्हणुन जागतीक किर्तीचे हिंदी लेखक उदय प्रकाश उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाच्या तोडीस तोड असे देखणे आणि भव्य आयोजन करण्यात आले होते. मंचाची सजावट ख्यातनाम कलावंत श्याम भुतकर यांनी कलात्मक पद्धतीने केली होती. कार्यक्रमाला तीनही दिवस भरगच्च जनसमुदाय उपस्थित होता. या सम्मेलनामद्धे राज्यातील सर्व प्रमुख साहित्यिक, कवी, वक्ते, पत्रकार, यांनी हजेरी लावली. ग्रंथ दालनांना वाचकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.
सम्मेलनाध्यक्ष नामदेव ढसाळ यांनी केलेले भाषण छापील स्वरूपात उपस्थितांना उपलब्ध करुन देण्यात आले. या भाषणामद्धे त्यांनी आंबेडकरी साहित्याचा उगम, वाटचाल आणि भवितव्य यावर प्रकाश-झोत टाकला आहे. त्यांचे चिंतन आणि त्यांनी उपस्थित केलेले महत्वपुर्ण मुद्दे याचा प्रभाव सम्मेलनावर तिन्ही दिवस टिकला. उदय प्रकाश यांचे भाषण गोळीबंद आणि भाषा व संस्क्रुती यांच्या संदर्भात नवी दिशा देणारे ठरले.
या सम्मेलनामद्धे अनेक परिसंवाद, कविसम्मेलने, चर्चासत्रे व वाड्मयीन कार्यक्रमांची रेलचेल होती. महाराष्ट्रातील परिवर्तनवादी विचारांचे एवढे साहित्त्यिक ब-याच वर्षांनी प्रथमच एकत्र भेटले. पहिला परिसंवाद गाजला. "सांस्क्रुतीक दहशतवाद" या विषयावरील या परिसंवादाचे अध्यक्षस्थान ख्यातनाम विचारवंत डा. आ.ह. साळुंखे भुषविणार होते. सकाळीच मला आणि प्रा. विलास वाघ यांना बामसेफचे वाघमारे यांनी ८६०५७५४३५६ या मोबाईल क्रमांकावरुन गलिछ्छ शिवीगाळ करत धमक्या दिल्या. आम्ही कार्यक्रमात गडबड करणार, कार्यक्रम उधळुन लावणार, वक्त्यांच्या तोंडाला काळे फासणार असे त्यांनी सांगितले. त्यामुळे कार्यक्रमावर या धमक्यांचे सावट पडले होते व वाडेकर यांनी उद्घाटकीय भाषणात त्याची दखलही घेतली होती.
डा. साळुंखे साता-यावरुन पुण्यात येवुनही कार्यक्रमाला मात्र आले नाहीत. त्यामुळे त्यांनाही धमक्या आल्या असाव्यात असा हितचिंतकांचा समज झाला. डा. साळुंखे यांच्याशी रात्री संजय सोनवणी संपर्क साधला असता ते दु:खी व तणावाखाली असल्याचे जानवले होते. अर्थात त्यांना धम्क्या आल्या नव्हत्या असे त्यांनी दुस-या दिवशी स्पष्ट केले. कोम्रेड शरद पाटील यांच्या पुस्तक प्रकाशन सोहोळ्यासाठी अलीकडेच डा. साळुंखे पुण्यात आले होते तेंव्हा मात्र त्यांना धमक्या आल्या होत्या. साळुंखे यांच्या धमक्यांचे चर्वित-चर्वण करणा-या ब्रिगेड व बामसेफ़च्या कार्यकर्त्यांनी मात्र प्रा वाघ व मला आलेल्या धमक्यांवर मौन पाळुन एक प्रकारे धमक्यांचे समर्थनच केले. फुले आंबेडकरी चळवळीतले हे लोक आता धमक्यांच्या पातळीवर उतरुन चळवळ पुढे नेण्याची स्वप्ने पहात आहेत. महाराष्ट्रातील अनेक साहित्यिकांनी व्यक्तिगत भेटीत या धमक्यांचा निषेध केला आणि त्याचे सार्वत्रीक निषेधाचे पडसाद सर्व स्तरांत उमटु लागले आहेत. मी या सर्वच धाडसी साहित्त्यिक-विचारवंतांचे व फुले-आंबेडकरवादी चळवळीवर जीवापाड प्रेम करणा-या असंख्य कार्यकर्त्यांचे जाहीर आभार मानतो.
मुलनिवासी नायक या दोन पाणी वर्तमानपत्राने (?) सलग दोन दिवस या सम्मेलनातील साहित्यिकांबद्दल अवमानकारक मजकुर प्रकाशित केला होता. नामदेव ढसाळ हे वीराचे नाव आहे कि गाढवाचे, आणि सर्व आंबेडकरवादी साहित्यिक हे Intelectual prostitute आहेत असे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली. कमरेखालची गलिछ्छ भाषा वापरून गेली दीड वर्षे बामसेफचे हे वर्तमानपत्र फुले-आंबेडकरी चळवळीचा चेहरा शिवराळ, असभ्य, अश्लील आणि माथेफिरुपणाचा बनवत आहे. चळवळीतील आघाडीचे विचारवंत डा. रावसाहेब कसबे, डा. भालचंद्र मुणगेकर, डा. सुखदेव थोरात, को. शरद पाटील, प्रा. दत्ता भगत, प्रा. नागनाथ कोतापल्ले, डा. नरेन्द्र जाधव, उत्तम कांबळे, प्रा विलास वाघ आदिंवर बदनामीकारक अश्लाघ्य मजकुर वारंवार प्रकाशित केला जात आहे. हे वर्तमानपत्र राज्यातील एकाही स्टालवर विकत मिळत नाही. आपल्यात भांडणे नकोत म्हणुन संयम बाळगणारे हे विचारवंत एका भस्मासुराला जन्म देत आहेत. हे दुर्लक्ष्य चळवळीला फार महागात पडणार आहे. ही बामसेफिय मंडळी फुले-आंबेडकरी चळवळीचे ठेकेदार बनून दररोज शिव्यांचा रतीब घालत आहेत. ब्ल्याकमेलींग आणि दहशतीच्या जोरावर यांनी हैदोस घातला आहे.
सांस्क्रुतीक दहशतवाद या परिसंवादात श्रीमती विद्या बाळ, श्री मुकुंद टांकसाळे, प्रा. जयदेव डोळे, प्रा. सुधाकर यादव यांची भाषणे झाली. प्रत्येक वक्त्याला २० मिनिटे देण्यात आली होती. या परिसंवादाच्या सुरुवातीचा फलंदाज मी होतो. मनुस्म्रुतीने स्त्रीया आणि शुद्रातिशुद्र यांचे मानवी अधिकार नाकारुन व त्रैवर्णिकांना विशेषाधिकार देवुन दहशतवादाचा पाया घातला. बाळ गांगल यांनी केलेली महात्मा फुले यांची बदनामी, मराठा महासंघाने डा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिडल्स विरुद्ध केलेला कांगावा आणि विरोध, ग्याझीटियर मद्धे राजर्षि शाहू छत्रपती यांची करण्यात आलेली बदनामी, सनातन प्रभातने महात्मा फुले यांच्याविरुद्ध उघडलेली आघाडी यांचा परामर्श घेउन मी या सर्व बाबतीत दिलेले अल्प-स्वल्प योगदान याबाबत बोललो. सध्या चळवळीच्या नावावर श्री वामन मेश्राम व श्री पुरुषोत्तम खेडेकर हे करीत असलेले लेखन व वक्तव्य यांची माहिती मी उपस्थितांना दिली. यावेळी सभाग्रुहात दस्तुरखुद्द पुरुषोत्तम खेडेकर त्यांच्या कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. त्यांच्या "शिवरायांच्या बदनामीची केंद्रे" या ग्रंथात त्यांनी सुनियोजित दंगली घडवुन सर्व ब्राह्मणांची कत्तल करण्याची चिथावणी दिल्याचा पान नं ५४-५५ वरील मजकुर वाचुन दाखवला. श्री खेडेकर यांना भाषणाची संधी नसल्याने त्यावर अधिक भाष्य वा टिका टिप्पणी करणार नसल्याचे मी नमुद केले. त्यांच्या वर्तमानपत्रात गेली सहा महिने ते माझ्या विषयी धादांत खोटा आणि चितावणीखोर मजकुर प्रकाशित करतात आणि माझ्या खुलाश्याची मात्र एक ओळही छापत नसले तरी मी मात्र फुले-आंबेदकरी मुल्य पाळणारा कार्यकर्ता असल्याचे स्पष्ट केले. श्री खेडेकर यांनी संपुर्ण कार्यक्रमभर मौन पाळुन त्यांच्या पुस्तकातील लेखनाचे पुन:समर्थनच केले.
श्री टांकसाळे यांनी संभाजी ब्रिगेडच्या प्रवक्त्याने हरी नरके यांच्या आईची बदनामी केल्याबद्दल निषेध नोंदवला. श्री. डोळे यांनी श्री खेडेकर व तत्सम मंडळी भडक भाषेचा आणि बेजबाबदार वक्तव्यांचा वापर झटपट प्रसिद्धीसाठी करत असल्याचे सांगितले. स्श्री यादव यांनी कलेच्या क्षेत्रातील हिंदुत्ववांद्यांच्या दहशतवादाचा परामर्श ( एम. एफ. हुसेन यांच्या संदर्भात...) घेतला. श्रीमती बाळ यांनी पुरुषसत्ताक व्यवस्थेने स्त्रीवर्गावर लादलेल्या दहशतीचा समाचार घेतला.
मुलनिवासी नायक ने मात्र दि. ३ एप्रिलच्या अंकात पानभर धादांत खोटा आणि विक्रुत व्रुत्तांत प्रकाशित करुन आपली घ्रुणास्पद कर्तुत्व पुन्हा एकदा दाखवुन दिली आहे. जिद्न्यासुंनी क्रुपया www.mulnivasinayak.com या वेबसाइटवर जावुन हा अंक पहावा किंवा पुढील लिंकला भेट द्यावी. http://www.mulnivasinayak.com/pages/2011/Apr/03/news/1_1.jpg