Saturday, May 14, 2011

विकासासाठी सक्तीचे मोफत शिक्षण आवश्‍यक - हरी नरके

कोल्हापूर - एकेकाळी ज्यांनी सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला, त्या राजर्षी शाहू महाराजांचा केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणात उल्लेखही नसावा, ही शरमेची बाब आहे. देशाच्या विकासासाठी सक्तीचे मोफत शिक्षण आवश्‍यक आहे, प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. हरी नरके यांनी केले. महावीर महाविद्यालयाच्या वतीने गुणगौरव समारंभाच्या निमित्ताने आयोजिलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. "शिक्षण विषयक कायदा आणि फुले, शाहू, आंबेडकर यांचे शैक्षणिक योगदान' असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. आचार्य विद्याभवनात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड. के. ए. कापसे होते.   सरकारच्या शिक्षण हक्क कायद्यात फुले, शाहू, आंबेडकरांचे शैक्षणिक योगदानाचा उल्लेख दिसत नाही, अशी खंत व्यक्त करून नरके म्हणाले, ""आंबेडकरांनी 14 वर्षापर्यंतच्या मुलांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण देण्याचा कायदा केला. परंतु या कायद्याला कोणी विचारतच नाही. भटक्‍या व विमुक्त जातीच्या शिक्षणाकडे सरकारचे लक्ष नाही. यामुळे त्यांची ताकदही देशाला मिळत नाही. सध्या देशात 65 तर महाराष्ट्रात 76 टक्के साक्षर आहेत.