Saturday, May 14, 2011

हरी नरके व डॉ. कांबळेंची नियुक्ती

हरी नरके व डॉ. हर्षदीप कांबळे यांची नियुक्ती


>> म. टा. विशेष प्रतिनिधी। नवी दिल्ली

केंदीय नियोजन आयोगाने आपल्या इतर मागासवगीर्य आणि अनुसूचित जाती अधिकारिता गट उपसमितीच्या सल्लागार समितीवर उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे उपसचिव डॉ. हर्षदीप कांबळे व महात्मा फुले साहित्याचे अभ्यासक प्रा. हरी नरके यांची नियुक्ती केली आहे.

नियोजन आयोगाने अकराव्या पंचवाषिर्क योजनेच्या फेररचनेचे काम सुरू केले असून, अनुसूचित जाती व इतर मागासवगीर्य अधिकारिता गटासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांमधे दुरुस्त्या व सुधारणा सुचवणे, विशिष्ट योजनांसाठी आथिर्क तरतुदीचा आढावा घेणे, इत्यादी बाबींसाठी एक सल्लागार उपसमितीची नियुक्ती केली आहे. या समितीवर नुकतीच निवड करण्यात आलेल्या कांबळे व नरके यांनी आयोगाच्या पहिल्याच बैठकीला गुरुवारी हजेरी लावली. या गटाला लोकसंख्येच्या आधारावर निधी मिळावा यासाठी आम्ही आग्रही राहू, असे बैठकीनंतर नरके म्हणाले.

डॉ. हर्षदीप कांबळे भारतीय प्रशासकीय सेवेतले ज्येष्ठ सनदी अधिकारी आहेत. तसेच, प्रा. हरी नरके हे राज्यातील लेखक असून महात्मा फुले यांच्या जीवनकार्याचे अभ्यासक आहेत. या विषयावर त्यांची अनेक पुस्तकेही यापूवीर् प्रकाशित झाली आहेत.

1 comment: