Friday, November 15, 2013

दिवाळी अंक : अलिबाबाची गुहा





दिवाळी अंक हे मराठी भाषा आणि संस्कृतीचे एक वैभव आहे.मराठीला दिवाळीअंकांची एक शतकाहून जुनी परंपरा आहे. आज आपल्या भाषेत सुमारे ४५० ते ५०० दिवाळीअंक प्रकाशित होतात. सरासरी २०० पृष्ठांचा एक अंक म्हटला तरी ५०० गुणिले २०० म्हणजे सुमारे एक लाख पानांचा नवा मजकूर दिवाळीनिमित्त प्रकाशित होतो.यातले सुमारे निम्मे अंक तालुकापातळीवर हौसेखातर किंवा केवळ जाहिरातींच्या उत्पन्नांसाठी काढले जातात, त्यांचे पुणे-मुंबई-नागपूर-औरंगाबाद-नाशिक-कोल्हापूरला फारसे वितरण होत नसते.पण जे२५० अंक सगळीकडे पोचतात त्यावर एक धावती नजर टाकली तर काय दिसते?
काही संपादक मित्रांनी दिवाळी अंक अगत्यपुर्वक भेट पाठवल्याने, काहींचा मी वर्गणीदार  असल्याने, तर काही अंक माझे स्नेही श्री.धनंजय झुरूंगे यांच्या सौजन्याने उपलब्ध झाले. शाळकरी वयापासून वाचन हे पहिले प्रेम असल्याने दर्जेदार दिवाळी अंक विकत घेणे, संग्रही ठेवणे, वाचणे, त्यावर चर्चा करणे यात मला मनापासून रस आहे. यावर्षी असंख्य दिवाळी अंकांच्या सहवासात दिवाळी फार सुखात गेली.वाचनात दिवस कसे भुरकन उडून गेले.
काही वर्तमान पत्रांमध्ये दिवाळी अंकांची संक्षिप्त [ओळख} समिक्षा प्रकाशित होत असते.मराठी वाचकांचा कौल सांगतो, की मराठीत विनोदी, ज्योतिष, भविष्य आणि महिला विषयक अंकांचा खप मोठा असतो.वैचारिक अंकानाही चांगली मागणी असते.यावर्षी दिवाळी अंकांच्या किंमती १०० रुपये ते २५० रुपये या दरम्यान आहेत.बहुतांश अंकांनी आपल्या किमती रुपये १२०,१५० आणि २०० ठेवलेल्या आहेत.काही संपादक दिवाळी अंकांवर खास मेहनत घेतात. ती पानापानांवर दिसूनही येते.काही अंकांचे बाजारात नाव झालेले असले तरी त्यांनी यावर्षी घणघोर निराशा केलेली आहे. काही अंक मात्र फारच उत्कृष्ट आहेत.
कागद, छपाई, निर्मितीमुल्ये याबाबतीत एकुणच दिवाळी अंकांचा दर्जा उत्तम आहे. बर्‍याच अंकांबाबत मात्र बोलण्याजोगे {नोंद घ्यावे असे} एव्हढेच आहे.
यावर्षी मी महिनाभरात पुढील दिवाळी अंक बहुअंशी वाचले. माझी आवड ही व्यक्तीगत असल्याने तिला मर्यादा आहेत.त्यामुळे माझी मते ही प्रातिनिधीक मानता येणार नाहीत. प्रत्येकाची आवडनिवड, दृष्टी वेगवेगळी असू शकते. मी वाचलेल्या अंकांमध्ये विनोदी, महिला  विषयक अंक कमी असून, भविष्य-ज्योतिष विषयक अंक तर अजिबातच नाहीत. अनेक अंकांमध्ये भविष्य दिलेले असते. मी ते वाचत नाही. मला त्याचे अंगच नसल्याने मी तिकडे वळलो नाही.

अ गट]
१]अंतर्नाद, २]पद्मगंधा, ३]मुक्तशब्द, ४]महा अनुभव, ५]मौज, ६]ऋतुरंग, ७]लोकमत दिपोत्सव, ८]इत्यादी, ९]दीपावली, १०]संवाद,

ब गट]
१]साधना, २]मिळून सार्‍याजणी, ३]साप्ता.सकाळ, ४]लोकसत्ता, ५]महाराष्ट्र टाइम्स, ६]पुरूष उवाच, ७]पुरूष स्पंदन, ८] अक्षर, ९}पुण्यभूषण, १०]कलामनामा, ११]श्री दीपलक्ष्मी, १२]विशाखा, १३]शब्ददीप, १४]अर्थपूर्ण, १५]धनंजय, १६]चंद्रकांत, १७]आवाज, १८]जत्रा, १९]पालकनिती, २०]प्रपंच, २१]मेनका, २२]माहेर, २३] कालनिर्णय सांस्कृतिक, २४]जगावेगळी मुशाफिरी, २५]गोवादूत

क गट]
१]हंस, २]रसिक, ३]नवल, ४]श्री व सौ, ५] चारचौघी, ६]सत्याग्रही विचारधारा, ७]किस्त्रीम, ८]मोहिनी, ९]आपले छंद, १०]दक्षता, ११]उत्तम कथा, १२]कथाश्री, १३]मानिनी, १४]तनिष्का, १५]विमर्श, १६]माळी वैभव, १७]समाज जागरण, १८]माळी आवाज, १९]चिंतन आदेश, २०]युनिक बुलेटिन,

क्रमश:.....

No comments:

Post a Comment