Saturday, November 16, 2013

महापूरदेशात सध्या सचिनभक्तीचा महापूर आलेला आहे.मिडीयात क्रिकेटचा उन्माद इतका भयंकर आहे की सचिनला चक्क देवच बनवून टाकण्यात आलेय. मिडीयाचा तोंडपुंजेपणा आणि प्रेक्षकशरण लाचारी बघून शरम आणि किळस वाटते.

"जिकडे तिकडे चोहीकडे अतिरेकच अतिरेक सापडे!
घरापासून संसदेपर्यंत फक्त आणि फक्त सचिन बागडे!"

लोटांगण संस्कृतीतले सचिनप्रेमी आणि या क्रिकेट हिस्टेरियाचा तिरस्कार असणारे अशा दोन गटात देश सध्या विभागला गेला आहे.सचिनची निवृत्ती म्हणजे जणुकाही जगबुडी असे माणणारे लोक सध्या देशावर राज्य करीत आहेत. क्रिकेटला विरोध करणे म्हणजे जणू राष्ट्रद्रोह करण्याचा गुन्हा असे मानणारांची सध्या चलती आहे.
मान्यय की सचिन हा एक गुणी खेळाडू आहे.त्याने क्रिकेट प्रेमींना खेळाचा खूप आनंद दिलाय.त्याची निवृत्ती ही नक्कीच मोठी घटना आहे. त्याच्याबद्दल कृतज्ञता बाळगणे छानच आहे.त्याचा उत्सव व्हावा अशीच ही घटना आहे. ज्यांना क्रिकेट आवडत नसेल त्यांनीही हा जल्लोश शांतपणे समजून घेतला पाहिजे.त्याचा आदर केला पाहिजे.
पण या सगळ्यात विवेकबुद्धी गहाण टाकून सद्ध्या जे चालूय ते उबग आणणारे आहे.
या तमाशामागे कोण आहे?हा भुलभुलय्या कोणी उभा केलाय? नफाखोर मार्केट्फोर्सेस, गल्लाभरू माध्यमे, ४० कोटी नवश्रीमंत आणि नवौच्च मध्यमवर्गीयांची पलायनवादी मानसिकता आणि बाजारू सत्ताधारी चलाखी! सद्ध्या सगळा टिआरपी "नमो" खात असतील तर त्यावरचा सत्ताधारी "उतारा" सचिन हा आहे.
हा सगळा चक्क खेळाचा बाजार मांडण्याचे राजकारण आहे. अशा या म‘च फिक्सिंगला आणि प्रायोजित जादूच्या खेळाला दुनिया भुलतेय हे किती छानय...
भारत हा महाभक्तांचा आणि उन्मादी अनुयायांचा महान देश आहे. आणि त्याला पर्याय नाही.राजेहो, हे निवडणूक वर्ष असल्याने हे सारे अटळ आहे.यातून सुटका नाही.