Wednesday, January 22, 2014

पुस्तकेचांगली पुस्तके वाचून संपली तरी मनात कायम घर करून राहतात.पुस्तक वाचण्यापुर्वी आपण जेथे होतो तेथून बरेच पुढे निघून गेल्याचा ,मोठा पल्ला गाठल्याचा प्रत्यय ती देतात.वाचून झाल्यानंतर काही तरी नवे गवसल्याचा आनंदही  ती देतात.जगण्यातली समज वाढते. जगभरच्या माणसाचा पिंड आणि भवताल समजायला ती हातभार लावतात.समाज.पर्यावरण,नियती,नितीमत्ता,समष्टी याबद्दलची आपली इयत्ता अशी पुस्तके उंचावतात.मनाची श्रीमंती काहीतरी नक्कीच वाढते.मानसिक स्थैर्य आणि आकलनाची पृष्ठभुमी भक्कम होते....
गेल्या तिमाहीत वाचलेली काही महत्वाची पुस्तके, जी तुम्ही मित्रांनी अवश्य वाचावीत असे वाटते, .....
१.एका आरंभाचे प्रास्ताविक, रंगनाथ पठारे, शब्दालय, श्रीरामपूर, प्र.आ.जुलै,२०१३
२.मनात, अच्युत गोडबोले, मनोविकास, पुणे, २१ वी आ., आक्टो.२०१३
३.खेळता खेळता आयुष्य.गिरिश कर्नाड,राजहंस,पुणे, दु.आ. मे २०१३
४.श्री गणेश आशियाचे आराध्य दैवत,म.के.ढवळीकर, राजहंस,पुणे, दु.आ.एप्रिल, २०१३
५.मी अल्बर्ट एलीस, अंजली जोशी, शब्द पब्लिकेशन्स, मुंबई, आ.७वी, मे २०१३
६.सह्यगिरीतील गांधी, स्नेहल नेने. पुणे, {सुनिल नेने},प्र.आ.डिसें.२०१३
७.अस्वस्थ वर्तमान, आनंद विनायक जातेगावकर,शब्द पब्लिकेशन्स, मुंबई, प्र.आ.फेब्रु.२०१३
८.शिवार ते संसद, राजू शेट्टी, पद्मगंधा,पुणे, प्र.आ.डिसें.२०१३
९.बाकी शून्य, कमलेश वालावलकर,मेनका,पुणे, तृ.आ.मे२०१३
१०.ज्ञानभाषा मराठी, सदाशिव देव, पद्मगंधा,पुणे, प्र.आ.मार्च २०१३
११.माझा ईश्वर स्त्री आहे, नूर जहीर,मनोविकास, पुणे, प्र.आ.२०१२
१२.फिनिक्सच्या राखेतून उठला मोर, जयंत पवार, लोकवांग्मय,मुंबई, प्र.आ.२०१०
१३.मुसाफीर,अच्युत गोडबोले, मनोविकास, पुणे, २९ वी आ., आक्टो.२०१३
१४.खेळघर, रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ,मनोविकास, पुणे, प्र.आ.मार्च २०१३
१५.तसव्या, अशोक पवार, मनोविकास, पुणे, प्र.आ.आ‘गस्ट. २०१३
१६.वाचणार्‍याची रोजनिशी, सतीश काळसेकर,लोकवांग्मय,मुंबई, प्र.आ.२०११
 ...............................

No comments:

Post a Comment