Thursday, August 28, 2014

पुणे मनपातर्फे उत्कृष्ठ ग्रंथांना पुरस्कार देणार


....................................
महाराष्ट्र टाइम्स, पुणे, दि.२८ ओ‘गष्ट, २०१४
पालिका करणार साहित्यिकांचा सन्मान
पुणे मनपातर्फे उत्कृष्ठ ग्रंथांना पुरस्कार देणार
पुणे: दि.२७ओ‘गष्ट- पुणे महानगरपालिकेच्या वतीने यावर्षीपासून मराठी भाषा समृद्ध करणार्‍या सहा साहित्यिकांचा विशेष करण्यात येणार आहे. सहा वाड;मय प्रकारातील उत्कृष्ठ ग्रंथांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. पुणे मनपाच्या हद्दीत राहणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यासाठी हे पुरस्कार देण्याचा उपक्रम सुरू करावा अशी सुचना आज झालेल्या मनपाच्या मराठी भाषा संवर्धन समितीच्या बैठकीत प्रा. हरी नरके यांनी केली. तिला सर्वानुमते मान्यता देण्यात आली. वैचारिक साहित्य, कादंबरी, नाटक, कविता, बालवाड;मय, युवा साहित्यिकांचे लेखन असे सहा पुरस्कार दरवर्षी दिले जातील. पुरस्कारात प्रत्येकी रूपये पंचवीस हजार, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र आदींचा समावेश असेल.यासाठी त्रिसदस्यीय निवड समिती स्थापन करण्यात करण्यात आली आहे. या समितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख प्रा. हरी नरके, डो‘.विद्यागौरी टिळक आणि अनिल गोरे यांचा समावेश आहे. पहिला पुरस्कार वितरण सोहळा  मराठी भाषा गौरवदिनी येत्या २७ फेब्रुवारीला होईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर चंचला कोद्रे होत्या. बैठकीला स्थायी समितीचे अध्यक्ष बापूराव कर्णे, सभागृह नेते सुभाष जगताप, साहित्यिक प्रदीप निफाडकर, विद्यागौरी टिळक, अनिल गोरे, शाम भुर्के, शिक्षण अधिकारी दौंडकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
..............................................