Sunday, January 15, 2017

बंडखोर कविंचे फॅसिस्ट शक्तीविरूद्ध / हुकुमशाहीविरूद्धचे बंड


पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव.. 3..

Correspondences, Dir. Rita Azevendo Gomes, Portugal, 2016, w.c.

पोर्तुगालमधील फॅसिस्ट सरकारने Jorge de Sena या बंडखोर प्रतिभावंताला देश सोडून जाण्याची शिक्षा सुनावली. सुरूवातीला तो ब्राझिलमध्ये आणि नंतर अमेरिकेत जाऊन लेखन करीत राहिला. तो आपले स्वातंत्र्यवादी विचार आपल्या कविता आणि पत्राद्वारे आपल्या कवयित्री मैत्रीणीला Sophia de Mello Breyner Andresen ला  [1957 78] पाठवित राहिला.

त्याचा स्वातंत्र्याचा प्रत्येक उद्गार जगातील फॅसिस्ट शक्तींवर आसूड उगारीत राहिला.

मानवी जीवनातले सौंदर्य, मैत्रीचे अमुल्य वरदान, निसर्ग, मानवी जीवनाचे इप्सित, पंच महातत्वे आणि  नियती या सा‍र्‍यांबद्दलचे वैश्विक विचार या कवितांमधून व्यक्त होतात.

हुकुमशहा संपतात पण ते स्वातंत्र्याची असीम चाहत नष्ट करू शकत नाहीत.

दोन प्रतिभावंत मित्र आपल्या लेखणीच्या तलवारीने या बलाढ्य अशा फॅसिस्ट राजसत्तेविरूद्ध जो असाधारण लढा देतात त्याचे अत्यंत काव्यमय चित्रण करणारा Rita Azevendo Gomes यांचा काव्यमैफीलीसारखा अनुभव देणारा हा चित्रपट आहे.

पुण्यात संपन्न अभिरूचिचे अनेक प्रेक्षक राहत असल्याने या महोत्सवातील विविध मूडस आणि प्रयोग सादर करणार्‍या चित्रपटांना अलोट गर्दी लोटते. मात्र या हळूवार चित्रपटाच्या वेळी अनेक प्रेक्षक मध्येच उठून गेले याचं वाईट वाटलं.. हे वाढत्या आप्पलपोट्या मानसिकतेचे लक्षण मानायचे की पैसे देवून डोक्याला ताप देणारं काही कशाला बघायचं या वृत्तीचं लक्षण मानायचं? की वाढत्या भारतीय समकालीन अनास्थेचं, असहिष्णुतेचं प्रतिक मानायचं???