Wednesday, March 15, 2017

नाटककार गडकरी, राजसंन्यास आणि गडकरी पुतळा विटंबना


श्री Mahendra Gadre यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना संक्षिप्त उत्तर :-
तुम्ही म्हणताय, "उत्तरं देणं सोपं नाही." याचा अर्थ उत्तरं नाहीतच असं तुम्ही गृहीतच धरलंय का? की तुमचे प्रश्न इतके बिनतोड आहेत की त्यांची उत्तरेच असू शकत नाहीत? अहो, दुसरी बाजूही असते. ती समजाऊन घेण्यासाठी जागा ठेवत चला.
1. खरं म्हणजे तुम्हाला चर्चेत मुळात रस आहे का?
2. चर्चेसाठी जो खुलेपणा लागतो, तोच मुळात ब्रिगेडच्या नेते/कार्यकर्ते यांच्याकडे आहे का? निदान माझा अनुभव तरी याबाबतीत प्रतिकूलच आहे.
ब्रिगेड मुळात आदेश, शिविगाळ, भावना भडकावणं आणि तोडफोड यावरची शिखर संस्था आहे. चर्चा करायची होती तर ती आधी व्हायला हवी होती. तुम्ही तुमच्या कृतीचं समर्थनच करीत राहणार तर चर्चेचा उपयोग काय? ब्रिगेडच्या या कृतीचा सर्वदूर निषेध झाल्यानं आता चर्चेचं सुचलं काय?
3. तुम्ही वैचारिक मांडणी केली असती तर चर्चा झाली असती. तुम्ही पुतळा तोडल्यानंतर आता चर्चेसाठी अवकाश ठेवलाय कुठे तुम्ही?
4. नाटक, कादंबरी, कथा अशा ललित साहित्यातील निर्मिती कशी वाचायची असते त्याची आधी माहिती घ्या. याची जाण असलेला एक तरी तज्ञ ब्रिगेडमध्ये आहे काय?
5. गडकर्‍यांचे राजसंन्यास हे नाटक 1917 सालचे आहे. ते वाचताना तो काळ, तोवरचं इतिहास संशोधन समजून घेणं गरजेचं आहे.1917 च्या आधी जी ऎतिहासिक मांडणी संभाजीराजे व शिवराय यांच्याबद्दल कृ.अ.केळुसकरांसकट सगळ्या बहुजन इतिहासकारांनी / लेखकांनी केलीय ती वाचा. तुमचे तुम्हाला उत्तर मिळेल.
6. तुम्हाला 21 अपेक्षित प्रश्नांची 21 अपेक्षित उत्तरे द्यायचा मुळात उपयोग काय? आणि मुळात मी नवनीत गाईडवाला नाही.
7. ब्रिगेडने निवडणुका डोळ्यापुढे ठेवून पुतळा तोडला. कृती केल्यानंतर आता चर्चेत काय ठेवलेय?
8. 1917 सालच्या नाटकात खलनायकाच्या तोंडी असलेल्या संवादाद्वारे गडकरी बदनामी करतात असे म्हणायचे असेल तर अशी सुटी वाक्ये [संदर्भ सोडून ] वाचणं योग्य असतं का?
9. गडकरींचे लेखन चिकित्सेसाठी गेले 100 वर्षे उपलब्ध होते/आहे. लिहा ना त्याच्याविरोधात. तुम्हाला कोणी रोखलेय?
10. मला ब्रिगेड सोडून महाराष्ट्रातला असा किमान एकतरी मोठा
ललितलेखक [ नाटककार, कादंबरीकार ] दाखवा ज्यांना गडकरींचा हा मजकूर बदनामीकारक वाटतोय? निदान ब्रिगेडचे डा.आ.ह.साळुंखे, डा.सदानंद मोरे,डा.जयसिंगराव पवार, यांना तरी या नाटकाबद्दल लिहायला सांगा. महाराष्ट्र नक्की दखल घेईल.
11. युगपुरूष मा. मा. मा. पुरूषोत्तम खेडेकर साहेब यांच्या लेखणीची कुवत लोकांना कळून चुकलीय. गडकरींचा प्रतिवाद करता येतो. ब्रिगेड आणि खेडेकर महोदयांचा नाही.
....................... .........
Mahendra Gadre यांनी उपस्थित केलेले मुद्दे :-
प्रश्न : >>>"नरके सर संभाजी ब्रिगेड गडकर्यांचा पुतळा फोडला. निषेध व्यक्त करण्याच्या त्यांच्या पद्धतीचं समर्थन कोणीही करणार नाही.परंतू त्याच्या संतापाची वैचारीक पातळीवर विचारवंतांनी काहीही दखल घेतली नाही.त्यांच्या कृतीला अतिरेकी,झुंडशाही वगैरे म्हणून त्यांचा सर्वांनी निषेध करून गडकरींचा पुतळा पुन्हा सन्मानाने आहे त्या जागी प्रस्थापीत करण्याचीच विचारवंतांपपासून ते नेत्यांपर्यंत सर्वांची धडपड तेवढी दिसली परंतू मुळ जो प्रश्न आहे गडकरींच्या नााटकातील संभाजी विषयीचं लिखान.
ते चुकीचं की बरोबर यावर सविस्तर,खोलवर चर्चा कोणी केलीच नाही.अद्ृाप हे कळलं नाही की गडकरींनी केलेलं लिखान हे आक्षेपार्ह्य आहे की नाही.या प्रकरणात संभाजी ब्रीगेडच्या तरूनाच्या भावनेचीही दखल घेणे हे सामाजिक स्वास्थ्यासाठी वैचारीक व सामाजिक सौहार्दासाठी जरूरी आहे की नाही. यावर नरके सर आपलं मार्गदर्शन अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटतं ते मार्गदर्शन अत्यंत संतुलीतपणे आपणच कराल असा माझा विशंवास आहे.
संभाजी ब्रीगेडच्या तरूणांना त्याच्या आंदोलनाच्या पद्धतीवरून एकसारखं सर्व विचारवंतानी धोपटत राहनं हे फार सोपं असतं.त्यांच्या आक्षेपांना अचूक उतर देनं तेवढं सोपं नाही. असेलच ते सोपं तर खरंच द्या सामाजीक धार्मीक वैचारीक तान त्याने कमी होईल."<<<
.......................

No comments:

Post a Comment