Wednesday, March 15, 2017

मुलायमसिंग

लठैत शिरोमणी आणि मग्रूर --
मुलायमसिंग - बथ्थडसारखा साळसुद चेहरा आणि तोंडातल्या तोंडात पुटपुटणारे नेते. अनेक डाक्टरांचे अक्षर जसे जाम कळत नाही तसे यांचा एकही उच्चार कळत नाही.
हे गृहस्थ आणि त्यांचा पक्ष म्हणजे सख्ख्या आणि सावत्र नातेवाईकांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. बरं वर नाव मात्र समाजवादी. निव्वळ भंपकपणा. अखिल समाजवादाचा लवलेशही नाही. मला इथे फक्त व्यक्ती अभिप्रेत नसून या वृत्तीविरूद्ध माझी तक्रार आहे.
आईवडीलांनी मोठ्या हौसेने नाव ठेवले मुलायम. पण यांचे बघावे तेव्हा गुरगुरणे आणि पुटपुटणे. राष्ट्रीय नेते असूनही ते काय बोलतात हे त्यांचे त्यांना तरी उगमते की नाही माहित नाही.
चेहर्‍यावर सतत मग्रूर आणि मठ्ठपणाचे पहिलवानी भाव.
असले प्रेम चोप्रा किंवा गब्बरखान टाईप खलनायकी नेते मला अजिबात आवडत नाहीत. असले सगळेच नेते डोक्यात जातात. लोकशाहीला ही वृत्ती अतिशय घातक. हिटलर ज्या पिठाच्या गिरणीतले पीठ खायचा तिथलेच पीठ ही मंडळी खात असणार. यांना मार्दव, कार्यकर्त्यांबद्दलचा जिव्हाळा नावालाही माहित नसतो. जणु हे स्वातंत्र्यपुर्व काळातील चंबळच्या परिसरातील क्रूर संस्थानिकच.
जातीच्या आणि बंदिस्त विचारसरणीच्या व्होटबॅंकेला विकास, शिक्षण, आरोग्य, रोजगार यांच्यापासून कायम वंचित ठेऊन यांनी स्वत:च्या हवेल्या उभारल्या. भावनिक ब्लॅकमेलींग आणि लठैतगिरी हा यांचा युएसपी.
राम मनोहर लोहिया, मधु लिमये आणि जयप्रकाश यांच्यासारख्या चारित्र्यवान आणि बुद्धीमान नेत्यांचे हे म्हणे वारस. वारस कसले ? त्यांच्या नावालाच काळीमा फासणारे करंटे.
आता फेकले गेले पार कोपच्यात. यांना कौटुंबिक भांडणात विशेष रस. जणु उत्तरप्रदेश ही यांची खाजगी जहागिरच.
अशा लोकांनी बहुजन चळवळीचे पार वाटोळे केले. कांशीराम यांनी त्यांना पाठींबा देऊन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री बनवले तर त्यांनी कांशीरामांच्या वारसदार मायावती यांच्यावर खुनी हल्ला केला. असले हे विश्वासघातकी राजकारणी.
नावाला पैलवान. पण मातीशी नातं काडीमात्र नाही. यांनी घडवून आणलेल्या यादवीचा फटकारा सामान्य गरिबाला बसतोय.तो नागवला / फसवला जातोय.
मला हे माहित आहे की ही खरमरीत टिका त्यांच्या अनुयायी/ भक्त / चाहत्यांना आवडणार नाही. मला भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारामुळेच मी हे लिहू शकतो. ही टिका व्यक्तीगत न घेता विभुतीपुजा आणि हुकुमशाहीवृत्ती याविरूद्धची टिका म्हणुन तिच्याकडे बघावे..

No comments:

Post a Comment