बिमल डे या जगप्रसिद्ध साहसी प्रवाशाचे "महातीर्थाचा अखेरचा यात्रिक" हे भन्नाट प्रवासवर्णन वाचतोय. वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी ते घर सोडून पळाले. बौद्ध भिक्षूंच्या एका गटाबरोबर मौनी बाबा बनून त्यांनी तिबेटचा पायी प्रवास केला. १९५६ साली जेव्हा परदेशी लोकांसाठी तिबेटचे दरवाजे बंद होते, ह्याच काळात तिबेटने भारताबरोबरचे आपले राजकीय संबंध पूर्णपणे तोडलेले होते, अशाकाळात हा बंगाली मुलगा तिबेटला गेला. ल्हासापर्यंत आपल्या बौद्ध गुरूजी "गेशे रेपतेन" यांच्यासोबत त्याने हा कष्टाचा सहप्रवास केला. नंतर तो एकटाच कैलास पर्वताकडे निघाला. अनंत अडचणींना सामोरे जात, मानवी जगाची आणि निसर्गाची, मनोहारी हिमालयाची नानाविध रुपे न्याहाळीत त्यांनी केलेला हा प्रवास अतिशय गूढ , अद्भुत व रोमांचकारी आहे.चित्रशैलीतील हे कथन प्रवाही,पारदर्शक आणि मनाची पकड घेणारे आहे. या "एका भिक्षुकाची दैनंदिनी " चे उत्तम मराठी भाषांतर केलेय, विजय हरिपंत शिंदे यांनी. या पुस्तकाचे दर्जेदार प्रकाशन केलेय, अरूण जाखडे यांच्या पद्मगंधा प्रकाशनाने. ४००पृष्ठांच्या या पुस्तकाची किंमत आहे, रुपये ४००/- { पद्मगंधा प्रकाशन, १९६६, सदाशिव पेठ, माडीवाले को‘लनी, पुणे, ३०, प्रथमावृत्ती, १९ मार्च, २०१४, दूरध्वनी: २४४५०२६०}
Tuesday, September 9, 2014
महातीर्थ के अंतिम यात्री - एका भिक्षुकाची दैनंदिनी

No comments:
Post a Comment