Monday, September 2, 2013

८० न्यायाधिशांच्या समवेत एक दिवस.


मित्रहो, कालचा दिवस {रविवार, दि.१ सप्टे. २०१३} राज्यातील सर्व प्रमुख अशा ८० जिल्हा न्यायाधिशांच्या समवेत खुप छान गेला. ठाणे जिल्ह्यातील उत्तन येथे {गोराई बीचजवळ, एस्सेल वर्ल्ड शेजारी} " महाराष्ट्र ज्युडीशियल अकादमी" आहे.परिसर अतिशय देखणा,निसर्गरम्य आणि शांत आहे.कोणत्याही कार्पोरेट संस्थेला लाजविल अशी अप्रतिम वास्तू आणि खोल शांतता हे अकादमीचे वैभव आहे. अकादमी आणि डा. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. "मानवी अधिकार आणि क्षमता वृद्धी" या विषयावरील कार्यशाळेला राज्याचे सर्व जिल्हा न्यायाधिश  उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमुर्ती श्री.कानडे यांच्याहस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. अकादमीचे सहसंचालक श्री.बोरा आणि बार्टीचे महासंचालक श्री.परिहार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा रंगला. मा. कुर्‍हेकर आणि मा. गनेडीवाला यांनी सुत्रसंचालन व आभार व्यक्त केले. कार्यशाळेत ज्येष्ट आयपीएस अधिकारी श्री.सुधाकर सुराडकर, न्या. तावरे, न्या. धरणे, न्या.चावरे यांचीही भाषणे झाली. पहिले भाषण राज्याचे निवृत मुख्य सचिव आणि विद्यमान मुख्य माहिती आयुक्त श्री.रत्नाकर गायकवाड यांचे झाले. त्यांनतर मी दीड तास बोललो. "राज्यातील सामाजिक वातावरण,जातीवास्तव आणि मानवी अधिकार" या विषयावरील माझ्या मांडणीला उपस्थित सर्व मा. न्यायमुर्तींकडून मिळालेली दाद मला अनपेक्षित होती.जेवताना अनेक न्यायमुर्तींनी स्वता:हून केलेल्या चर्चांनी मी भारावून गेलो. माझ्या भाषणावर  एक मान्यवर म्हणाले, "राज्यात जादूटोणाविरोधी कायदा लागू झालेला आहे. प्रा. हरी नरके यांचे हे भाषण ऎकून माझे असे मत झाले आहे की प्रा. नरके यांना हा कायदा लागू करावा." त्यांच्या या अभिप्रायावर प्रचंड हशा उसळला. मा. न्यायमुर्तींकडून अशी दिलखुलास दाद मिळेल असे मला वाटले नव्हते. हा अनुभव  तुमच्याशी शेयर करण्याचा मोह आवरला नाही...सर्वांचे आभार.

No comments:

Post a Comment