Showing posts with label PIFF. Show all posts
Showing posts with label PIFF. Show all posts

Thursday, January 17, 2019

Girls of the Sun सर्वोत्कृष्ठ चित्रपट








पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इव्हा हुसेनचा Girls of the Sun सर्वोत्कृष्ठ चित्रपट
श्रेष्ठ चित्रभाषेद्वारे Women, Life, Liberty चा कलात्मक वेध- प्रा.हरी नरके

जागतिक पातळीवरील महत्वाच्या महिला दिग्दर्शक इव्हा हुसेन यांच्या Girls of the Sun या चित्रपटाने सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे. अतिरेक्यांच्या तावडीतून कुर्दीस्तानातील आपले गाव मुक्त करण्यासाठी लढणार्‍या कमांडर बहार या विरांगनेची आणि तिच्या महिला सहकार्‍यांची जबरदस्त लढत टिपणारा हा चित्रपट म्हणजे श्रेष्ठ चित्रभाषेद्वारे Women, Life, Liberty चा घेतलेला अस्सल कलात्मक अनुभव होय.

फ्रेंच पत्रकार Mathilde च्या नजरेतून प्रेक्षकांपुढे हा पट उलगडत जातो. कमांडर बहार जिचा पती अतिरेक्यांकडून मारला गेलेला आहे, जिचा लहानगा मुलगा अतिरेक्यांच्या कब्ज्यात आहे अशा स्थितीत ही उच्चशिक्षित युवती शस्त्र हाती घेते. स्त्रियांमध्ये मनोबल निर्माण करते. स्वातंत्र्याच्या शोधात निघालेली ही फौज निव्वळ आशावादाच्या जोरावर कशी आणि किती झेप घेते त्याचा हेलपाटून टाकणारा हा अनुभव म्हणजे स्वातंत्र्याच्या वैश्विक मूल्याचे महाकाव्यच होय.

श्रेष्ठ कथा,पटकथा, बहार [Golshifteh Farahani] आणि  पत्रकार Mathilde [ Emmanuelle Bercot] यांचा दर्जेदार अभिनय, जिवंत छायाचित्रण, हटके एडिटिंग आणि उच्च पातळीवरील दिग्दर्शनाचा अनुभव घ्यायचा असेल तर खिळवून ठेवणारा आणि अस्वस्थ करणारा हा चित्रपट चुकवू नका.


Girls of the Sun 2018 (Official) movie trailer
Original Name: Les Filles Du Soleil
English Name: Girls Of The Sun
Year: 2018
Run time: 115'
Language: French, English, Arabic, Kurdish
Type (Colour/ Black & white): Colour
Country: France
Director: Eva Husson
Producer: Didar Domehri
Cast: Golshifteh Farahani, Emmanuelle Bercot
Screenplay: Eva Husson
Cinematographer: Mattias Troelstrup
Editor: Emilie Orsini
Sound Designer: Olivier Le Vacon, Alexis Place, Emmanuel de Boissieu
Music Composer: Morgan Kibby
Costume Designer: Marine Galliano
Production Designer: David Bersanetti
Production Company: Maneki Films


Festivals:
Cannes IFF 2018
TIFF 2018
BFI London FF 2018
Selected Filmography:
Hope to Die (short) 2004
Those for Whom It’s Always Complicated 2013
Bang Gang (A Modern Love Story) 2015

Director's Biography:
Eva Husson was born and raised in France. She began working as an actress in theatre, and films at very young age. She went to prestigious American Film Institute where she received MFA. Her thesis short film Hope to Die went on to get screening at many festivals across the globe. Her second short was Those for Whom It’s Always Complicated. She directed her debut feature Bang Gang (A Modern Love Story) in 2015. Her recent film Girls Of The Sun was selected to compete for Palm d'Or.

प्रा.हरी नरके, १७ जाने. २०१९

Tuesday, January 23, 2018

जेव्हा डेव्हीडच गोलिथ बनतो-



स्वित्झरलंड एक सुंदर, निसर्गसंपन्न देश. सुखी माणसाचा सदरा घातलेले लोक.
तिथलं डेव्हीड आणि जेसी हे अतिशय गोड असं तरूण जोडपं.
सुखात. मजेत. प्रेमात डुंबलेलं.
जेसी गरोदर असल्याचं समजल्यावर एक जबाबदार आणि जगातला सर्वोत्कृष्ठ बाप होण्याच्या स्वप्नांनं डेव्हीडला झपाटून टाकलंय.
एकदा रेल्वेतून प्रवास करीत असताना एक गुंड जेसीवर हल्ला करतो. डेव्हीड त्याला रोखतो. पण तो आडदांड गुंड त्या दोघांनाही मारहाण करतो. आपण जेसीचं संरक्षण करू शकलो नाही या अपराधभावानं डेव्हीड घायाळ होतो. खिन्नसा राहू लागतो.
आपण शक्तीमान व्हायला हवं, आपल्या पत्नीला आणि जन्माला येणार्‍या बाळाला संरक्षण पुरवू शकलो पाहिजे या ध्यासापोटी तो व्यायामशाळेत जाऊ लागतो. खूप व्यायाम करू लागतो आणि त्याचबरोबर स्टीरॅाइड घेऊ लागतो. त्याची ताकद वाढत जाते. गमावलेला आत्मविश्वास परत येतो.
मात्र शरिरातली रग वाढू लागताच ती बाहेर पडण्यासाठी रस्ता शोधू लागते.
छोट्याछोट्या गोष्टींमुळे त्याचा क्षोभ होऊ लागतो. त्याचे स्वत:वरचे नियंत्रण हरवू लागते.
जेसीच्या हे परिवर्तन लक्षात येते. ती त्याला त्या जाळ्यातून प्रेमाने सोडवते.
परंतु पुन्हा एक निमित्त घडते आणि तो येरे माझ्या मागल्या करू लागतो.
बायबलमध्ये डेव्हीड हा एक भला माणूस आहे तर गोलिथ एक दुर्जन.
आजच्या काळात डेव्हीड या एका भल्या माणसाचंच रूपांतर सदहेतूपोटी आणि समकालीन परिस्थितीमुळे गोलीथमध्ये होतंय का?
ज्या बायको-मुलासाठी डेव्हीडला शक्तीमान बनायचं असतं, तेच त्याला दुरावतात काय?
त्याची आक्रमकता, संतापीपण त्याच्यात पाशवी, अमानवी असं काही तरी भरू लागतात, ते त्याला नकोय.
सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तीतला संघर्श हा चित्रपटातला सरधोपट मार्ग सोडून दिग्दर्शक इथे नवा मार्ग हाताळतो.
जेव्हा सज्जन, प्रसन्न आणि गोड अशा डेव्हीडला बायको-मुलाच्या संरक्षणापुरतीच ताकद हवी आहे.
मात्र शक्तीच्या आराधनेतून डेव्हीड इच्छा नसतानाही दुष्टाव्याला कसा बळी पडत जातो हे बघताना आपल्या मनाला वेदना होतात. खरा प्रश्न निर्माण होतो तो इथेच.
हा ताण, हा नैतिक पेच सुटतो का? असल्यास कसा? नसल्यास का नाही?
डॉमिनिक लोचेर हे ताज्या दमाचे अतिशय ताकदीचे दिग्दर्शक आहेत.
त्यांनी कथा, पटकथा, संवाद यांचं सादरीकरण आणि दिग्दर्शन अशा प्रतिभेनं, जाणतेपणानं व उर्जेनं केलंय की हा चित्रपट खर्‍या अर्थानं जागतिक भाषेतला बनून जातो.
त्याला सबटायटलची गरजच राहत नाही. लोचेर यांनीच पटकथा लिहिलीय.
ही कथा केवळ जेसी-डेव्हीडची न राहता जगातल्या तमाम भल्या लोकांची कथा बनून जाते.
छायाचित्रण इतके सुंदर आणि ताकदीचे आहे की प्रत्येक फ्रेम बोलत जाते. चित्रभाषाच सगळा आशय सांगून जाते.
Sven Schelker डेव्हीड आणि Jasna_Bauer जेसी यांचा अभिनय जबरदस्त गारूड करतो.
एक अविस्मरणीय चित्रपट. खर्‍या अर्थानं जागतिक चित्रपट.
Sven Schelker डेव्हीड आणि Jasna Bauer जेसी यांचा अभिनय जबरदस्त गारूड करतो.
एक अविस्मरणीय चित्रपट. खर्‍या अर्थानं जागतिक चित्रपट.
गोलिथ, दिग्दर्शक- डॉमनिक लोचेर, स्वित्झरलॅंड.
Goliath, Directed by  Dominik Locher, Switzerland.
धन्यवाद डॉमिनिक लोचेर.
-प्रा.हरी नरके

कलंदर गायिकेचा बहारदार प्रवास - जॅम








कान्स चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळवलेले गुणी फ्रेंच दिग्दर्शक टोनी गॅटलीफ हे सर्वोत्तम संगितमय चित्रपटांसाठी विख्यात आहेत. त्यांचा प्रसन्न शैलीतला, दर्जेदार गितांची बहार उडवून देणारा ताजा आणि धमाल चित्रपट आहे "जॅम."
जॅम ही एक हसरी ग्रीक युवती आहे. तिला देखणा गळा लाभलेला आहे. तिची आई उत्तम गायिका होती. ही मुलगी जिथे जाते तिथे आनंद निर्माण करते. सतत हसतखेळत जगणार्‍या या तरूणीवर एक कामगिरी सोपवली जाते. इस्तंबूलला जाऊन जहाजाचा एक तुटलेला पार्ट तिला नव्यानं बनवून आणायचा असतो.
प्रवासात तिला अ‍ॅव्हरिल ही 19 वर्षीय उदास, दु:खी, अडचणीत सापडलेली मुलगी भेटते. ती निर्वासीत आहे. फ्रान्सवरून आलीय. तिच्याकडे पैसे नसतात आणि तुर्कस्थानात तिच्या ओळखीचेही कोणी नसते, जॅम तिला सोबत घेते. दोघींची सहजच मैत्री जमते.
दोघींचा हा प्रवास म्हणजे अडचणी, संकंटं, धावपळ आणि केवळ धमाल.
 जॅमनं अनेक कठीण प्रसंगांवर मात करण्यासाठी वेळोवेळी केलेला संगिताचा वापर, तिचा हजरजबाबीपणा, तिच्या नकला, नृत्य, गमतीजमती हा अखंड सुखाचा वर्षाव असतो. मानवी जीवनप्रवासाचं अफलातून प्रतिक म्हणजे हा बहारदार चित्रपट.
लोकसंगितावर आधारलेली यातली सुमधूर गाणी ही भारतीयांसाठी मेजवानीच होय.
जॅमची भुमिका करताना अभिनेत्री डेफनी पटाकिया हिनं अभिनयगुणांची जी उंची गाठलीय ती थक्क करणारी आहे.
या भुमिकेला अनंत शेड्स आहेत. त्यातल्या प्रत्येकात ती समरसून काम करते.
चार्ली चॅप्लीनच्या तोडीची आजच्या काळातली ही मुलगी आहे. तिला उज्ज्वल भवितव्य आहे.
ती बंडखोर आहे आणि प्रसंगी शत्रूशी दोन हात करणारीही.
तिच्यावर सोपवलेली कामगिरी ती फत्ते करते का?
तिच्या मैत्रिणीचं रहस्य काय असतं?
जॅमच्या हुकुमशाहीवृत्तीच्या आजोबांनी जॅमच्या आईला गायला बंदी घातलेली असते. ती आजोबांचा सूड कसा घेते?
पिफमध्ये मी पाहिलेला सर्वाधिक प्रसन्न चित्रपट जॅम.
अनेक महोत्सवांमध्ये हा चित्रपट गाजतोय. पिफमध्येही हा पुरस्कारांमध्ये बाजी मारेल अशी आशा होती.
तिच्याबरोबर गप्पा मारणं हा मस्त अनुभव होता. मुलगी खूपच टॅलेंटेड आहे. खुप पुढे जाईल.
निर्मितीमुल्ये अर्थातच एकदम भारी.
आयुष्य कसं जगावं याचा वस्तूपाठ देणारा हा भारीच सिनेमा आहे. संधी मिळाली तर पाह्यल्याशिवाय राहू नका.
"जॅम," दिग्दर्शक- टोनी गॅटलिफ, फ्रान्स, Djam, Directed by Tony Gatlif, France, 2017. 97 Minutes.
-प्रा.हरी नरके

Sunday, January 21, 2018

कत्तलखाण्यात बहरलेले प्रेम-




ही कल्पना ज्यांना सुचली असेल त्यांना सॅल्युट. एक आधुनिक पद्धतीचा कत्तलखाणा आहे. तिथे काम करणारे दोघेजण काही आजारपणांनी, अपंगत्वाने ग्रस्त आहेत.
त्यांना दररोज रात्री सारखीच स्वप्नं पडतात.
एका गर्द जंगलात एक हरीण जोडपे काही तरी शोधत फिरते आहे. प्रेम करते आहे.
कत्तलखाण्यातल्या या दोघांना मानसोपचारतज्ञांचे उपचार घेताना हे समजते. दोघांना एकत्र आणणारी एकच जागा स्वप्नभुमी.
एक नितांतसुंदर, अभिजात प्रेमकथा.
विषय स्थानिक असूनही जागतिक, हाताळणी अगदी अभिनव, कथा,पटकथा अगदी बांधीव, संवाद मोजके पण अर्थपुर्ण, अभिनय वास्तववादी तरीही कमालीचा संयत, दिग्दर्शन हळुवार, काव्यमय, प्रेक्षकांना बिटवीन दि लाईन आणि बियाँड दि लाईन दाखवणारे, कॅमेरा अफलातून, असं सारं जुळून आलेली भन्नाट अनुभव देणारी कहाणी, "ऑन बॉडी अ‍ॅंड सोल,"
प्रत्येकानं अवश्य पाहावा असा श्रेष्ठ चित्रपट. On Body and Soul, Director- Lidiko Enyedi, Hungary,
"ऑन बॉडी अ‍ॅंड सोल," दिग्दर्शक- लिडीको एनेडी, हंगेरी.
-प्रा.हरी नरके

ऑस्कर पुरस्कार-चित्रपट



ज्या चित्रपटाला Academy Awards Best Foreign Language Film, USA ऑस्कर पुरस्कार मिळाला तो "दि सिक्रेट इन देयर आईज,"
आणि ऑस्कर मानांकन मिळाले तो "वाईल्ड टेल्स," हे गाजलेले चित्रपट यावर्षीच्या Piff मध्ये दाखवण्यात आले.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यशस्वी
Pune International Film Festival successful
या महोत्सवासाठी जगभरातून आलेल्या 1008 चित्रपटांमधून निवड केलेल्या 14 चित्रपटांचा समावेश जागतिक स्पर्धा विभागात केलेला होता.
याशिवाय विविध विभागात आणखी 130 चित्रपट दाखवण्यात आले.
या महोत्सवाला सुमारे सात हजार चित्रपट रसिक आठवडाभर उपस्थित असल्याची माहिती महोत्सवाचे प्रमुख डॉ.जब्बार पटेल यांनी दिली.
विविध माध्यमांचे प्रतिनिधी, निमंत्रित, प्रायोजक, चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक, कलावंत व इतर सदस्य, हेही उपस्थित होते.
या महोत्सवासाठी पुण्यातील विविध ठिकाणच्या 10 थिएटर्समध्ये चित्रपट दाखवण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. प्रत्येक ठिकाणी दररोज चार चित्रपट दाखवण्यात आले.
या दहा थिएटर्सची एकुण आसन संख्या 2897 इतकी आहे. प्रत्येकाने दररोज चार चित्रपट पाहिले असे समजले तरी आठ दिवसात मिळून एकुण सुमारे ऎंशी हजार प्रेक्षकांनी जागतिक चित्रपटांचा आनंद लुटला.
जगातल्या सुमारे 110 देशातील चित्रपट या महोत्सवात असतात असे सांगितले गेले.
2016-17 याकाळात निर्माण झालेले, जगातल्या 25 देशातील उत्कृष्ठ चित्रपट हा महोत्सव प्रत्येक रसिकाला दाखवायची सोय करतो.
मला स्वत:ला 21 देशातले ताजे चित्रपट बघता आले.

यात ज्या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार Academy Awards Best Foreign Language Film, USA, मिळालाय तो "दि सिक्रेट इन देयर आईज," दिग्दर्शक- जाॅन जोसे, अर्जेंटिना, हा चित्रपट होता.
तसेच ऑस्कर मानांकन मिळवलेला "वाईल्ड टेल्स," दिग्दर्शक- डॅमियन झिफ्रान, अर्जेंटिना, हाही चित्रपट होता.
जगभरातील अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवडले गेलेले आणि पुरस्कार मिळवलेले उत्तम चित्रपट पिफमध्ये दाखवले गेले.
कान्स, बर्लिन, व्हेनिस, झ्युरिच, शारजा, हॅंबर्ग, लोकार्नो, युरोपियन, मिलान, टोरॅंटो, म्युनिक, टोकियो, मामी, इफ्फी व इतर अनेक जगप्रसिद्ध चित्रपट महोत्सवातील चित्रपट यात होते.

जगभरातील प्रतिभावंत दिग्दर्शक-निर्माते गेले दोनेक वर्षे नेमके कोणते चित्रपट निर्माण करीत होते त्याचा आलेख यातून आपल्याला मिळतो.
भारतीय चित्रपट आणि जगभरचे चित्रपट यांची तुलना करता येते.
नवे प्रयोग बघता येतात.
जागतिक चित्रभाषेची अभिरूची समजते.

या महोत्सवातून प्रेक्षकांच्या अभिरूचीचा दर्जा उंचावला जातो.

या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी अनेकजण वर्षभर राबत असतात.
त्यात प्रामुख्याने डॉ.जब्बार पटेल, प्रा.समर नखाते, मकरंद साठे,Makarand Sathe प्रा.सतिष आळेकर, अभिजित रणदिवे, श्रीनिवास संथानम व इतरांचा मोलाचा वाटा असतो.Abhijeet Ranadive,Satish Alekar,Samar Nakhate

महिला चळवळीवरचे प्रभावी चित्रपट








पिफमध्ये महिला चळवळीवरचे अतिशय प्रभावी चित्रपट-
डॉ. दाभोळकर, कॉं. पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचे संदर्भ-
या वर्षीच्या पिफमध्ये चळवळीवरचे अतिशय प्रभावी असे विविध चित्रपट बघता आले.
विशेष म्हणजे यातले काही चित्रपट तर जागतिक चित्रपट स्पर्धेत होते.
120 बीट्स पर मिनिट, दिग्दर्शक- रॉबीन कॅंपिलो, फ्रान्स,
दि आर्ट ऑफ लव्हिंग, दिग्दर्शक- मारिया साडोव्हस्का, पोलंड,
नॉक्टरनल टाइम्स, दिग्दर्शक- प्रियनंदनन, केरळ, भारत,
या तीन चित्रपटांवर आपण आज बोलूयात.

1990 च्या ज्या काळात गे, एच.आय.व्ही., एड्स, एलजीबीटी यासारख्या विषयावर बोलणे निषिद्ध मानले जात होते त्याकाळात पॅरिसमध्ये "अ‍ॅक्ट अप" नावाचा एक गट या विषयावर कायदे व्हावेत, औषद कंपन्यांनी औषदे निर्माण करावीत, लोकप्रबोधन व्हावे, म्हणून प्रखरपणे लढत होता.
त्याची थेट आणि आक्रमक कहाणी हा चित्रपट मांडतो. या चित्रपटाला गोव्यात इफ्फीमध्ये सुवर्णकमळ पुरस्कारही मिळाला होता.
अतिशय महत्वाचा विषय, आक्रमकपणे मांडणारा हा चित्रपट काहीसा पथनाट्याच्या अंगाने जातो. खुप जास्त बोलतो.
शेवटची 20 मिनिटे मात्र अतिशय हृद्य आहेत.

दिग्दर्शक- मारिया साडोव्हस्का यांचा " दि आर्ट ऑफ लव्हिंग," हा पोलंडचा चित्रपट भन्नाट आहे.
मिशलीन विश्लोका या पोलंडच्या बंडखोर महिला लेखिकेच्या जीवनावर तो आधारित आहे.
तिने महिला हक्कांसाठी चर्च आणि सरकारशी फार चिवटपणे झुंज दिली.
महिलांचे सुखी लैंगिक जीवन, शारिरिक सुख, ऑरगॅझम, आजार, कौटुंबिक हिंसा, कुटुंब नियोजन यासाठी ही महिला लढत राहिली.
तिने याबद्दल लिहिलेले पुस्तक छापायला सरकार परवानगी देत नव्हते. ती नानाप्रकारे प्रयत्न करीत राहिली.
तिने या सेन्सॉरशिपवर कशी मात केली आणि तिच्या या पुस्तकाने देशात कशी क्रांती घडवून आणली याची रंगतदार कहाणी हा चित्रपट सादर करतो.
मिशलीन विश्लोका एकाला विचारतात, "तुम्ही कुठून आलात?"
त्यावर तो आपल्या गावाचं नाव सांगतो.
त्या तडफेने सुनावतात, "विसरू नका, तुम्ही आईच्या योनीतून आलेले आहात."

मळ्याळममधले प्रतिभावंत दिग्दर्शक प्रियनंदनन यांचा चित्रपट "नॉक्टरनल टाइम्स," हा तर थेट डॉ. दाभोळकर, कॉं. पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्यापर्यंत प्रेक्षकाला नेऊन भिडवतो.
जो चित्रपट महाराष्ट्र किंवा कर्नाटकात तयार व्हायला हवा होता तो केरळमध्ये तयार झालाय.
अतिशय गुंतवून ठेवणारी थरारकथा हा चित्रपट उलगडत जातो.
सरकार व पोलीसांचे क्रौर्य, दमनशक्ती, जंगलांची कत्तल, निसर्गाचा विनाश, आदिवासींचे भीषण शोषन, जाती व धर्माच्या नावाने घडवल्या जाणार्‍या दंगली,कत्तली आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून होणारी गावकर्‍यांची पिळवणूक यांची सुन्न करणारी कथा ज्या कलात्मक आणि थरारक पद्धतीने या चित्रपटात समोर येते त्यातून गलबलायला होते.
हिंदु-मुस्लीम दंगली, वैरं, सरकार-पोलीस यांच्याकडून आदिवासींवर होणारे अन्याय, कोला कंपन्यांकडून होणारी पाण्याची अमाप लूट हा दिग्दर्शक कोणताही आडपडदा न ठेवता स्पष्टपणे चित्रभाषेत मांडतो. हा चित्रपट भेदक आहे. सुन्न करणारा आहे.
अंगावर येणारा इतका थेटपणा अनेकांना पेलवत नाही. काहींना तो प्रचारी वाटू शकतो. मला मात्र तो खूपच भावला. आरपार भिडला.

सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते, मराठी नाटक, सिनेमा, साहित्य क्षेत्रातील मंडळींनी हा चित्रपट बघायलाच हवा. त्यावर चर्चा व्हायला हवी. मौनाचा कट उधळायला हवा.
- प्रा. हरी नरके- Prof Hari Narke
PIFF 2018-7
Dr. Jabbar Patel
Makarand Sathe
Abhijeet Ranadive
Satish Alekar
Samar Nakhate

समृद्ध चित्रभाषा




समृद्ध चित्रभाषा,ताजेपणा, समकालीन विषय आणि जागतिक दर्ज्याची निर्मितीमुल्ये
आवडलेले चित्रपट- Pune International Film Festival- Piff 2018
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव [पिफ] 2018

 या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये जागतिक चित्रपट स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळवलेला,
1. Free and Easy, Dir. Geng Jun, China,
"फ्री अ‍ॅंड इझी," दिग्दर्शक श्री जेंग जून, चीन, या श्रेष्ठ चिनी चित्रपटासह
अतिशय दर्जेदार आणि श्रेष्ठ चित्रपट
2. The Longing, Dir. Joram Lursen, Netherland,
"दि लॉन्गिंग," दिग्दर्शक - जोरम ल्युर्सेन, नेदरलॅंड,
3. Goliath, Dir. Dominik Locher, Switzerland,
"गोलिथ," दिग्दर्शक- डॉमनिक लोचेर, स्वित्झरलॅंड,
4. The Nothing Factory, Dir. Pedro Pinho, Portugal,
"दि नथिंग फॅक्टरी," दिग्दर्शक- पेद्रो पिन्हो,पोर्तुगाल,
5. More, Dir. Onur Saylak, Turkey,
"मोर," दिग्दर्शक- ओनुर सायलॅक, तुर्कस्थान,
6. Zama, Dir. Lucresia Martel, Argentina,
"झामा," दिग्दर्शक- लुक्रेशिया मार्टेल, अर्जेंटिना,
7. Djam, Dir. Tony Gatlif, France,
"दिजाम," दिग्दर्शक- टोनी गॅटलिफ, फ्रान्स,
8. Women of the Weeping River, Dir. Sheron Deyoc, Philippines,
"वुमेन ऑफ दि विपिंग रिव्हर," दिग्दर्शक- शेरॉन डेयोक, फिलिपाईन्स,
9. Nacturnal Times, Dir. Priyanandanan, Keral, India,
"नॉक्टरनल टाइम्स," दिग्दर्शक- प्रियनंदन, केरळ, भारत,
10. The Quartette, Dir. Miroslav Krobot, Check Republic,
"दि क्वार्टेट," दिग्दर्शक- मिरोस्लाव क्रोबोट, झेक रिपब्लिक,
11. I'm A Killer,  Maciej Pleprzyca, Poland, 
"आय एम अ किलर," दिग्दर्शक- मॅसिज प्लेप्रझिका,पोलंड,
पाहण्याची संधी मला मिळाली.

उद्घाटनाची फिल्म 12. Men Don't Cry,Dir. Alen Drlijevic, Bosnia,
"मेन डोंट क्राय," दिग्दर्शक- अलेन डरलिजेविक, बोस्निया,
यांसह जागतिक सिनेमातील खालील उत्तम चित्रपट मला मनापासून आवडले.

13.The Square, Dir. Ruben Ostlund, Sweden,
"दि स्क्वेयर," दिग्दर्शक- रूबेन ओस्टलुंड, स्विडन,
14. The Son of Snow, Dir. Robert Wichrowski, Poland,
"दि सन ऑफ स्नो," दिग्दर्शक- रॉबर्ट विचरोव्हस्की, पोलंड,
15. Burning Birds, Dir. Sanjieeva Pushpakumara, Shrilanka,
"बर्निंग बर्डस," दिग्दर्शक- संजीव पुष्पकुमार, श्रीलंका,
16. On Body and Soul, Dir. Lidiko Enyedi, Hungary,
"ऑन बॉडी अ‍ॅंड सोल," दिग्दर्शक- लिडीको एनेडी, हंगेरी,
17.Secret Ingredient, Dir. Gjorce Stavreski, Macedonia,
"सिक्रेट इनग्रेडीएंट," दिग्दर्शक- गोर्स स्टावरेस्की, मॅसेडोनिया,
18. Paradise, Dir. Andrei Konchalovsky, Russia,
"पॅराडाईज," दिग्दर्शक- आंद्रे कोचालोव्हस्की, रशिया,
19. Claire's Camera, Sangsoo Hong, Korea [South]
"क्लेयर्स कॅमेरा," दिग्दर्शक- सॅंगसू होंग, दक्षिण कोरिया, 
20. The Art of Loving, Dir. Maria Sadowska, Poland,
" दि आर्ट ऑफ लव्हिंग," दिग्दर्शक- मारिया साडोव्हस्का, पोलंड,
21. Asphyxia, Dir. Fereydoun Jeyrani, Iran,
"अस्फिक्षिया," दिग्दर्शक- फेरेदोन जयरानी, इराण,
22. Gabriel and the Mountain, Dir. Felipe Barbosa, Brazil,
"गॅब्रियल अ‍ॅंड दि माऊंटन," दिग्दर्शक- फिलिप बारबोझा, ब्राझिल,
23. The Day After, Dir.Sangsoo Hong, Korea [South]
 "दि डे आफ्टर," दिग्दर्शक- सॅंगसू होंग, दक्षिण कोरिया, 
24. 120 Beats Per Minute, Dir. Robin Campillo, France,
"120 बीट्स पर मिनिट," दिग्दर्शक- रॉबीन कॅंपिलो, फ्रान्स,
25. Wild Tales, Dir. Damian Szifron, Argentina,
"वाईल्ड टेल्स," दिग्दर्शक- डॅमियन झिफ्रान, अर्जेंटिना,
26. Spoor, Dir. Agnieszka, Holland,
"स्पूर," दिग्दर्शक- अग्नीस्का, हॉलंड,
27. The Secret in Their Eyes, Dir. Juan Jose Campanella, Argentina,
"दि सिक्रेट इन देयर आईज," दिग्दर्शक- जाॅन जोसे कॅंपानेला, अर्जेंटिना,
28. Ciao Ciao, Dir. Song Chuan, China,
" सिया सिया," दिग्दर्शक- सांग चुआन, चिन,
....................

Free and Easy



 
चिनमध्ये अतिशय कडक सेन्सॉरशिप असल्यानं सरकारविरूद्ध ब्र शब्दही उच्चारता येत नाही. अशा स्थितीत ज्या सुचकपणाने "फ्री अ‍ॅंड इझी" हा चित्रपट कम्युनिस्ट सरकारचा बुरखा फाडतो त्याला तोड नाही.


चिनी राजसत्ता, अर्थसत्ता आणि धर्मसत्ता मिळून तिथल्या सामान्य माणसांचे अपार शोषन कसे करतात,तिथली खेडी कशी ओस पडलेली आहेत, ग्रामीण भागातले कारखाने कसे उद्ध्वस्त झालेले आहेत याची अतिशय दर्जेदार कथा हा चित्रपट दाखवतो. यातली सगळी पात्रं लो टोनमध्ये बोलतात. अतिशय संथ, एखाद्या प्रायोगिक नाटकासारखा हा चित्रपट अप्रतिमरित्या सादर केलेला आहे.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव [पिफ] 2018 चा सर्वोत्कृष्ठ आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार The Best International Film Award in PIFF-2018 
"फ्री अ‍ॅंड इझी" या श्रेष्ठ चिनी चित्रपटाचे दिग्दर्शक श्री जेंग जून यांच्यासोबत 
World Competition The Best Film Award " Free and Easy," China, 
with Director - Geng Jun

Saturday, January 21, 2017

'लॉस्ट ईन म्यूनिख' आणि 'लेथ जोशी' पंधराव्या 'पिफ'मध्ये सर्वोत्कृष्ट

गेला आठवडाभर तमाम चित्रपटप्रेमींच्या गर्दीत सुरू असलेला जगभरातल्या उत्तमोत्तम चित्रपटांचा महोत्सव आज संपला. कोथरुडातल्या सिटिप्राईड चित्रपटगृहात आज समारोप व बक्षीससमारंभ रंगला. समारोप समारंभाचं मुख्य आकर्षण होतं महोत्सवाच्या स्पर्धाविभागाचा निकाल. मराठी स्पर्धाविभागाचे परीक्षक होते श्री. गोरान पास्कलयेव्हिक, श्रीमती नर्गेस अब्यार आणि श्री. बेनेट रत्नायके. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटासाठी महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा 'संत तुकाराम' पुरस्कार यावर्षी 'लेथ जोशी' या चित्रपटाला देण्यात आला. सन्मानचिन्ह आणि रु. पाच लाख असं या बक्षिसाचं स्वरूप आहे. दिग्दर्शक श्री. मंगेश जोशी आणि निर्माते सोनल जोशी - मंगेश जोशी यांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला. अ. भा. चित्रपट महामंडळातर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट दिग्दर्शकासाठीचा रोख २५ हजार रुपयाचा पुरस्कार 'दशक्रिया' चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप भालचंद्र पाटील यांना मिळाला. अ. भा. चित्रपट महामंडळातर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा रोख २५ हजार रुपयाचा पुरस्कार 'दशक्रिया' या चित्रपटातील भूमिकेबद्दल आर्य आढाव यांना जाहीर करण्यात आला. 'पिफ'मध्ये हा पुरस्कार मिळवणारे ते वयानं सर्वांत लहान अभिनेते आहेत. आर्य आढाव यांचं वय आठ वर्षं आहे. अ. भा. चित्रपट महामंडळातर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा रोख २५ हजार रुपयाचा पुरस्कार 'डॉक्टर रखमाबाई' या चित्रपटातील भूमिकेबद्दल तनिष्ठा चटर्जी यांना जाहीर करण्यात आला. अ. भा. चित्रपट महामंडळातर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट पटकथेसाठीचा रोख २५ हजार रुपयाचा पुरस्कार 'व्हेंटिलेटर' या चित्रपटासाठी राजेश मापुसकर यांना देण्यात आला. अ. भा. चित्रपट महामंडळातर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट छायालेखनासाठीचा रोख २५ हजार रुपयाचा पुरस्कार 'लेथ जोशी' या चित्रपटासाठी सत्यजीत शोभा श्रीराम यांना जाहीर झाला. 'नदी वाहते' या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सावंत यांना दिग्दर्शनासाठी परीक्षकांचा विशेष पुरस्कार देण्यात आला. 'लेथ जोशी' या चित्रपटातल्या भूमिकेसाठी सेवा चौहान आणि 'एक ते चार बंद' या चित्रपटातल्या अभिनयासाठी पद्मनाभ भिंड यांना परीक्षकांचे विशेष पुरस्कार जाहीर झाले. आंतरराष्ट्रीय स्पर्धाविभागाचे निकाल पुढीलप्रमाणे (कंसात परीक्षकांचं मत नोंदवलं आहे) - १. महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा 'प्रभात' सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - 'लॉस्ट ईन म्यूनिख' (For its re-reading of a tragic chapter of Czechoslovakian history in an effective, humorous and zany manner, the award for BEST FILM goes to the film scripted and directed by Petr Zelenka, produced by David Ondrícek - Lost in Munich) २. महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा 'प्रभात' सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शक पुरस्कार - किरील सेरेब्रेनिकोव्ह (द स्टुडन्ट) ('For its innovative lighting design and cinematography, brilliant mise en scene and acting, and its commentary on the growing religious intolerance across the world today, the award for BEST DIRECTION goes to the Russian film THE STUDENT, scripted and directed by Kirill Serebrennikov) ३. परीक्षकांचा विशेष पुरस्कार - 'लेडी ऑफ द लेक' (भारत) (For its metaphoric depiction of how modern developmental projects endanger human existence, the JURY PRIZE goes to the Indian film directed by Haobam Paban Kumar, LADY OF THE LAKE ४. परीक्षकांचा विशेष पुरस्कार - 'झूलॉजी' (रशिया) (For its incisive presentation of superstition and cruelty directed by society towards anyone perceived as abnormal, the JURY PRIZE goes to the Russian film directed by Ivan I. Tverdovsky, ZOOLOGY) ५. परीक्षकांचा विशेष पुरस्कार - 'लेझ'इनाँसाँ' या फ्रेंच / पोलिश चित्रपटातील भूमिकेसाठी अ‍ॅगता ब्यूझेक (For her convincing and charismatic interpretation of Maria in the French / Polish film The Innocents, AGATA BUZEK receives special mention for Best Actor. ६. परीक्षकांचा विशेष पुरस्कार - 'लॅण्ड ऑफ द एनलायटण्ड' या चित्रपटातल्या छायालेखनासाठी पीटर-जां द प्यू. (For its spectacular and evocative visuals where the camera finds a distinctive style of operation in The Land of the Enlightened, the director and cinematographer of the film PIETER-JAN DE PUE, receives special mention for BEST CINEMATOGRAPHY.) *** यंदा दरवर्षीपेक्षा प्रेक्षकांची नोंदणी कमी झाली. इफ्फी, केरळ महोत्सव, कोलकाता महोत्सव यांनाही या वर्षी असा अनुभव आल्यानं पुढच्या वर्षी प्रेक्षकांचा अधिक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा करूया. यंदा उद्घाटनाचा सोहळा फारसा रंगतदार झाला नव्हता. अपर्णा सेन, सीमा देव, उ. झाकीर हुसेन असे दिग्गज मंचावर असूनही टाळ्यांचा कडकडाट झाला नाही. समारोपाचा समारंभ मात्र तरुण प्रेक्षकांच्या उपस्थितीमुळे कमालीचा बहारदार झाला. प्रत्येक निकाल जाहीर झाल्यावर प्रेक्षकांनी अत्यंत उत्साहात विजेत्यांचं कौतुक केलं. अर्थात सालाबादप्रमाणे याही वर्षी सर्वाधिक टाळ्या, शिट्ट्या यांचा गजर समर नखाते मंचावर सत्कार स्वीकारायला गेले, तेव्हा झाला. महोत्सवातले सातही दिवस नखातेसर प्रेक्षकांच्या गराड्यात असतात. सतत तरुण प्रेक्षकांशी, विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतात. संपूर्ण भारतभर त्यांचे विद्यार्थी आहेत. आज त्यांचं नाव पुकारल्याक्षणी सार्‍या प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे उभं राहून त्यांना मानवंदना दिली, ही त्यांच्या फार मोठ्या कामाची पावती आहे. नखातेसर केवळ महोत्सवातल्या चित्रपटांची निवडच करत नाहीत, तर संपूर्ण चित्रपटभर ते अनेकांशी चित्रपटांबद्दल सतत संवाद साधत असतात. आज नखातेसरांमुळे चित्रपटांकडे डोळसपणे बघणारे देशभर अनेक आहेत. चित्रपट-साक्षरता वाढीस लागावी यासाठी नखातेसर आणि 'पिफ'चे आयोजक धडपडत असतात. कमालीची आर्थिक चणचण असूनही महोत्सव दणक्यात साजरा होतो. प्रत्येक महोत्सवात काही अडथळे येतातच. यंदा सिटिप्राईड (सातारा रस्ता) इथे एक खेळ रद्द झाला. चित्रपटाचे वेगवेगळे, नवनवे फॉर्मॅट महोत्सवाच्या आयोजकांकडे येत असल्यानं ऐनवेळी अडचणी येणं साहजिक आहे. बहुसंख्य महोत्सवांमध्ये हे घडतं. वर्तमानपत्रांत या अडचणींची बातमी आल्यावर समाजमाध्यमांतून कुत्सित शेरेबाजी होणं, हे म्हणूनच क्लेशकारक आहे. 'पिफ'च्या वातावरणाचा अजिबात अनुभव न घेता, आयोजकांच्या अडचणी (आर्थिक व इतर) लक्षात न घेता (न घडलेल्या घटनांवर) टीका होणं योग्य नाही. 'पिफ'च्या एकंदर व्यवस्थापनात काही सुधारणा मात्र जरूर व्हायला हव्यात. उद्घाटन आणि समारोप यांचे सोहळे अधिक नेटके असावेत. मंचावर डॉ. जब्बार पटेलांनी निवेदकांना सूचना देणं, निवेदकानं मान्यवरांची नावं चुकवणं, सत्कारमूर्ती मंचावर आले तरी त्यांचं बक्षीस अजून विंगेतच असणं हे प्रकार दरवर्षी न चुकता घडत असतात. ते यापुढे कमी होतील, अशी अपेक्षा आहे. हे सोहळे वेळेवर सुरू व्हावेत. यंदा उद्घाटनाचा चित्रपट वेळेआधी सुरू करण्यात आला. असं यापुढे होऊ नये. कार्यक्रम मोकळाढाकळा असला तरी तो शिस्तबद्ध असावा. जगभरातून येणार्‍या पाहुण्यांसमोर ढिसाळ वर्तणूक शोभत नाही. यंदा चित्रपटांच्या खेळांची संख्या कमी करण्यात आली. ती पुढच्या वर्षी वाढेल, अशी अपेक्षा करूया. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे राज्य शासनानं आणि पुणे महानगरपालिकेनं महोत्सवासाठीचा निधी वाढवायला हवा. इफ्फी, मामि, केरळ, चेन्नई, कोलकाता इथल्या महोत्सवांचं बजेट 'पिफ'च्या बजेटापेक्षा कितीतरी जास्त असतं. 'पिफ' हा महाराष्ट्र शासनाचा अधिकृत चित्रपटमहोत्सव आहे. त्याला शासनानं उचित महत्त्व द्यायला हवं. पुढचा 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' ११ ते १८ जानेवारी, २०१८ या काळात आयोजित होणार आहे. महोत्सवातले पुरस्कारप्राप्त आणि इतर अनेक दर्जेदार चित्रपट मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि सोलापूर या शहरांमधल्या 'पिफ'च्या सॅटेलाईट महोत्सवांमध्ये पाहायला मिळतील. या शहरांमधल्या प्रेक्षकांनी आवर्जून या महोत्सवांना हजेरी लावावी. वर्षभर या महोत्सवाची वाट पाहणारे अनेक आहेत. केवळ महोत्सवादरम्यान भेटून वर्षभर न भेटणारे असंख्य प्रेक्षक दरवर्षी ओळखी जपतात, रोज चार-पाच चित्रपट बघून ताजेतवाने होतात. थेटरातला अंधार, पडद्यावरची हलती चित्रं आणि आवाज कितीजणांना ऊर्जा देतात, कोणास ठाऊक! म्हणून 'पिफ'सारखे महोत्सव कायम नांदते राहणं अत्यावश्यक आहे. पुढची भेट ११ जानेवारी, २०१८ रोजी. कोथरुडातल्या सिटिप्राइडात. Submitted by चिनूक्स on 19 January, 2017 - 13:52 पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ..................................................... सौजन्य :- http://www.maayboli.com/node/61461

Tuesday, January 17, 2017

धर्मवेड,धर्मांधता आणि तरूणाईचा विनाश यांची रशियन कथा.

धर्मवेड,धर्मांधता आणि तरूणाईचा विनाश यांची रशियन कथा.
The Student, Dir. Kiril Serebrennikov,Russia,2016, WC.
Veniamin हा शाळकरी मुलगा अचानक कट्टर धार्मिक बनतो. मुलींनी पोहताना बिकिनी घालू नये, स्त्रियांनी पुर्ण पोशाखच घातला पाहिजे, शाळेत लैंगिक शिक्षण दिले जाऊ नये, वर्गात उत्क्रांतीचा सिद्धांत शिकवू नये अशी भुमिका तो हट्टाने रेटू लागतो. एरवी रशियातील कम्युनिष्ट विचारसरणीमुळे सेक्युलर असलेल्या त्याच्या आई, प्राचार्या, वर्गशिक्षिका, मित्र, मैत्रिणी
यांच्याशी तो वाद घालू लागतो. त्याचे हे धर्मवेड अतिशय टोकाला जाते. एलेना या त्याच्या जिवशास्त्राच्या शिक्षिकेचा आपल्या या विद्यार्थ्यावर जीव असतो. ती विज्ञाननिष्ठेपोटी या मुलाला या वेडातून मुक्त करण्यासाठी झटते. त्याच्या आईलाही मुलाची काळजी वाटू लागते. तो आईलाही तिचा घटस्फोटीत नवरा [व्हेनिमिनाचा बाप] जुळवून घेण्याबद्दल आग्रह धरतो. उठसूठ बोलताना तो बायबलचा सोयिस्कर संदर्भ देत असतो. 2000 वर्षांपुर्वीच्या या धार्मिक विचारांचा आदर जरूर करावा पण त्याला समकालीन आयुष्यात प्रमाण मानून जगू नये असा त्याच्या शिक्षिकेचा आग्रह असतो. तो शिक्षिकेवरच आरोप करू लागतो.ती ज्यू असल्याने ती या धर्माचा तिरस्कार करते असा बिनबुडाचा आरोप तो वारंवार करू लागतो. हळूहळू आजुबाजूचे सारेच त्याच्या प्रभावाखाली कसे येतात आणि या विज्ञाननिष्ठ, ध्येयवादी शिक्षिकेला कसे एकटे पाडतात, तिला वेडे ठरवतात, याची वैश्विक कहाणी हा चित्रपट मांडतो. शेवटी एकटी पडलेली ही शिक्षिका आरोपांना कंटाळून धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास करते आणि सप्रमाण प्रतिवाद करते, मात्र हा धर्मांध मुलगा तिच्यावर अतिप्रसंग केल्याचा धादांत खोटाच आरोप करतो, आणि तिला ठार मारण्याचा कट रचतो. सारेच लोक तिच्याविरूद्ध जातात, त्यामुळे त्या शिक्षिकेवर कोणती वेळ येते त्याची रशियन की भारतीयही? कथा सांगून हा चित्रपट सुन्न करतो.
The Student, Dir. Kiril Serebrennikov,Russia,2016, WC.
....................................
सेवाभाव जगण्याचे बळ वाढवतो..
Home Care, Dir. Slavek Horak, Czech Republic,2015, G.C.
व्लास्ता ही एक समर्पित नर्स आहे. घरोघर जाऊन ती वृद्ध नागरिकांच्या आजारपणात त्यांची मनोभावे सेवा करते. तिच्या या कामातून ती थकली तरी तिला या जगण्यातून अपार आनंद आणि उर्जा मिळत असते. तिचा नवरा लाडा आणि तिची तरूण मुलगी असे हे अतिशय सुखी कुटुंब असते.
अचानक एके दिवस व्लास्ताला असाध्य आजाराने गाठल्याचे आणि ही आजाराची अंतिम अवस्था असल्याचे आढळून येते. सारे कुटूंबच हादरून जाते. व्लास्ताला अवघे सहा महिनेच आहेत असे डाक्टर सांगतात. ही सेवाभावी बाई याही परिस्थितीला धिराने कशी सामोरी जाते, तिला आवडणारे नृत्य शिकायचे कामाच्या धबडग्यात राहून गेलेले असते. ती त्याही स्थितीत नृत्य शिकते. अत्यंत  वेदना सोसूनही ती सेवाकार्य चालूच ठेवते. निसर्ग, प्राणी, पक्षी या सार्‍यांवर तिचा विलक्षण जीव असतो.
विधायक कामांची पुण्याई तिच्या वेदना कमी करू शकत नसली तरी तिची प्रबळ इच्छाशक्ती आणि असाधारण उमेद यांच्या जोरावर व्लास्ता आजारावर कशी मात करते याची सुंदर आणि प्रेरक कथा सांगणारा सहजसुंदर चित्रपट. दर्जेदार दिग्दर्शन, श्रेष्ठ अभिनय, उत्तम पटकथा, मानवी आयुष्याचे अनेकविध आयाम खुले करणारी कहाणी. सेवाभावी, समर्पित जगण्याच्या उर्जेचा विधायक परिणाम आणि निसर्गाची आस यांचा परिणामकारक गोफ.
...................
The Tip of the Iceberg, Dir. David Canovas, Spain, 2016, Social Awareness,
सोफिया ही एका मल्टीनॅशनल कंपनीतली उच्च पदावरील कार्यक्षम अधिकारी असते. तिच्या कंपनीतील दुसर्‍या शहरातील युनिटमधील तीन अधिकार्‍यांनी लागोपाठ आत्महत्त्या केल्याने कंपनी अडचणीत येते. या आत्महत्त्यांच्या कारणांचा शोध घेऊन अंतर्गत अहवाल तयार करण्याचे काम सोफियाकडे सोपवले जाते.
सोफिया संबंधित अधिकारी,कर्मचारी, सहकारी यांना भेटून सखोल चौकशी करते.
नफा,नफा, त्यासाठी सगळे मार्ग वापरण्याची कार्यपद्धती असलेल्या मल्टीनॅशनल मॅनेजमेंटच्या गंभीर चुकाच या आत्महत्त्यांना कारणीभूत असल्याचे तिला आढळून येते.
तिने खरा अहवाल न देता थातूरमातूर अहवाल दिल्यास तिला बढती आणि इतर लाभ दिले जातील अशी लालूच तिला दाखवली जाते. उच्चपदस्थ तिच्यावर दबावही आणतात. पण ती निर्भयपणाने सत्यशोधन करते आणि मॅनेजमेंटला धैर्याने सामोरी जाते. परिणामी तिची हकालपट्टी केली जाते.
अशावेळी ही धाडसी महिला अधिकारी दांभिक मल्टीनॅशनल मॅनेजमेंटची लक्तरे कशी वेशीवर टांगते याची वेधक कथा हा चित्रपट सांगतो.
जगभरचे राजकारणी असोत की भांडवलदार हे सगळे किती क्रूर, दांभिक आणि लबाड असतात, थंड डोक्याने ते कशी कटकारस्थाने करतात, दु्र्घटना झाल्यावर चौकशी समिती नेमणे वगैरे हे कसे फार्स असतात याची वैश्विक कथा हा चित्रपट उलगडतो
अतिशय प्रभावी मांडणी, सुंदर टेकिंग, अप्रतिम अभिनय, भव्य चित्रण. औद्योगिक जगतातील ताणतणाव बारकाईने टिपणारा आणि वरवर समाजहिताचा घोष करून आर्थिक लूट करण्यातली भांडवलदारांची क्रूरता सप्रमाण सांगणारा उत्तम चित्रपट.
.......................
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव..5..
PIFF, 15th Edition, [12 to 19 Jan. 2017] पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव [12 जाने. ते 19 जाने. 2017]
......................

Monday, January 16, 2017

बापमुलीच्या निखळ नातेबंधाची वैश्विक उंचीवर जाणारी कथा



Daughter, Dir. Reza Mirkarimi, Iran, 2016,Social Awareness,
अनेक इराणी चित्रपट उत्तम असतात याचा प्रत्यय पुन्हापुन्हा येत असतो. खरं तर तिथे अतिशय जाचक सेन्सारशिप असतानाही काही दिग्दर्शक सातत्याने उत्तमोत्तम कलाकृती सादर करीत असतात. Reza Mirkarimi यांच्या Daughter या चित्रपटाचा समावेश Social Awareness विभागात करण्यात आला होता.

सितारा ही एक अत्यंत गुणी, आज्ञाधारक आणि सुसंस्कृत मुलगी आपल्या अजिझी या पित्याविरूद्ध बंड करते त्याची चटका लावणारी अत्यंत प्रभावी चित्रकथा या चित्रपटातून उलगडत जाते. अगदी पहिल्या मिनिटापासून शेवटपर्यंत एखाद्या थरारकथेच्या अंगाने जाणारा हा चित्रपट, चित्रभाषा, सादरीकरण, कलाकारांचा अभिनय, दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद या सार्‍याच बाजूंनी दर्जेदार आहे. निखळ, नितळ मानवी नात्यांची उब आणि जिव्हाळा यांनी ओतप्रोत असलेल्या कुटुंबात बाप एकाधिकारशाही गाजवू लागल्याने निर्माण झालेले ताण आणि एकारलेल्या नातेसंबंधातील मानसिकता यांचे कलात्मक दर्शन हा चित्रपट देऊन जातो. एखाद्या एरवी सनातनी वाटणार्‍या कुटुंबातही नात्यांचे बंध किती घट्ट असतात ते यातून दिसते.

सिताराला तिच्या महाविद्यालयीन मैत्रिणीने तेहरान येथे निरोपाच्या पार्टीला बोलावलेले असते. वडील तिला पाठवायला नकार देतात. ती बंड करून विमानाने जाते. वडील घरी यायच्या आत ती विमानाने परतणार असते. पण ऎनवेळी खराब हवामानामुळे विमानाचे उड्डाण रद्द होते. वडीलांकडे तिचे बिंग फुटते. वडील संतापाच्या भरात कार काढतात आणि रात्रभर प्रवास करून सिताराला घ्यायला तेहरानला पोचतात.

तिला घेऊन येताना रस्त्यात एक अपघात होतो. त्या गडबडीत सितारा गायब होते. सिताराचे काय होते?
वडीलांना ती परत सापडते का? असल्यास कुठे सापडते?

या सार्‍या शोधात अजिझीतला सच्चा पिता कशाप्रकारे जागा होतो? लहानपणी आपल्या मुलींशी मित्राप्रमाणे वागणारा अजिझी, पण मुली मोठ्या होताच त्याचे अचानक एका सनातनी, हुकुमशाही करणार्‍या पित्यात का आणि कसे रूपांतर झालेले असते?

त्याचा भुतकाळ काय असतो? त्याचे वडील, त्याची प्रेमळ बहीण यांच्याशी घट्ट नाते असलेला अजिझी कशामुळे कोरडा आणि करडा झालेला असतो?

निखळ नातेबंधाची वैश्विक उंचीवर जाणारी कथा.

या चित्रपटाला गोवा महोत्सवात पुरस्कार मिळाल्याचे समजते.

मुळात सज्जन आणि प्रेमळ असलेला अजिझी, त्याची सुसंस्कारित मुलगी सितारा यांची ही कथा काळजाला स्पर्शून जाते.

Daughter, Dir. Reza Mirkarimi, Iran, 2016,Social Awareness,
......................
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव..4..
PIFF, 15th Edition, [12 to 19 Jan. 2017] पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव [12 जाने. ते 19 जाने. 2017]

Sunday, January 15, 2017

बंडखोर कविंचे फॅसिस्ट शक्तीविरूद्ध / हुकुमशाहीविरूद्धचे बंड


पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव.. 3..

Correspondences, Dir. Rita Azevendo Gomes, Portugal, 2016, w.c.

पोर्तुगालमधील फॅसिस्ट सरकारने Jorge de Sena या बंडखोर प्रतिभावंताला देश सोडून जाण्याची शिक्षा सुनावली. सुरूवातीला तो ब्राझिलमध्ये आणि नंतर अमेरिकेत जाऊन लेखन करीत राहिला. तो आपले स्वातंत्र्यवादी विचार आपल्या कविता आणि पत्राद्वारे आपल्या कवयित्री मैत्रीणीला Sophia de Mello Breyner Andresen ला  [1957 78] पाठवित राहिला.

त्याचा स्वातंत्र्याचा प्रत्येक उद्गार जगातील फॅसिस्ट शक्तींवर आसूड उगारीत राहिला.

मानवी जीवनातले सौंदर्य, मैत्रीचे अमुल्य वरदान, निसर्ग, मानवी जीवनाचे इप्सित, पंच महातत्वे आणि  नियती या सा‍र्‍यांबद्दलचे वैश्विक विचार या कवितांमधून व्यक्त होतात.

हुकुमशहा संपतात पण ते स्वातंत्र्याची असीम चाहत नष्ट करू शकत नाहीत.

दोन प्रतिभावंत मित्र आपल्या लेखणीच्या तलवारीने या बलाढ्य अशा फॅसिस्ट राजसत्तेविरूद्ध जो असाधारण लढा देतात त्याचे अत्यंत काव्यमय चित्रण करणारा Rita Azevendo Gomes यांचा काव्यमैफीलीसारखा अनुभव देणारा हा चित्रपट आहे.

पुण्यात संपन्न अभिरूचिचे अनेक प्रेक्षक राहत असल्याने या महोत्सवातील विविध मूडस आणि प्रयोग सादर करणार्‍या चित्रपटांना अलोट गर्दी लोटते. मात्र या हळूवार चित्रपटाच्या वेळी अनेक प्रेक्षक मध्येच उठून गेले याचं वाईट वाटलं.. हे वाढत्या आप्पलपोट्या मानसिकतेचे लक्षण मानायचे की पैसे देवून डोक्याला ताप देणारं काही कशाला बघायचं या वृत्तीचं लक्षण मानायचं? की वाढत्या भारतीय समकालीन अनास्थेचं, असहिष्णुतेचं प्रतिक मानायचं???

Saturday, January 14, 2017

एकतर्फी प्रेमाच्या अमानुषतेची प्रभावी कहाणी

Lantouri, Dir. Reza Dormishian,Persian, Iran,2016.
एकतर्फी प्रेमाच्या अमानुषतेची प्रभावी कहाणी
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव.. 2..

PIFF, 15th Edition, 12 to 19 Jan. 2017, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव [12 जाने. ते 19 जाने. 2017]

लॅंटोरी या इराणी चित्रपटाने महोत्सवाचा 3 रा दिवस गाजवला. रझा डोर्मिशियन या तरूणाचा हा तिसराच चित्रपट आहे. त्याच्या आधीच्या दोन्हींप्रमाणे तो अनेक फिल्म फेस्टीवलमध्ये गाजतोय.

एकतर्फी प्रेमातून तरूणींच्या चेहर्‍यावर/अंगावर अ‍ॅसिड हल्ला केल्याच्या रानटी कहाण्या आपण अनेकदा ऎकतो/वाचतो. या चित्रपटातून ज्या भयानक कौर्याची कहाणी आपण पाहतो, ती अक्षरश: हादरवून टाकणारी आहे. मरियम ही एक सामाजिक कार्यकर्ती आहे. तिने "हिंसेला नकार द्या" अशी मोहीम चालवलेली असते. तात्कालीक रागातून गुन्हा घडलेल्या कैद्यांना शिक्षेतून सूट मिळवून देण्यासाठी ती झटत असते. त्यासाठी त्या गुन्ह्यांमध्ये बळी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना भेटून त्यांनी गुन्हेगाराला माफ केल्यास कायद्याप्रमाणे शिक्षेत सूट मिळण्याची तरतूद असते.

तेहरानमध्ये लॅंटोरी ही टोळी खंडण्या वसूल करणे, गाड्या चोरणे, पर्स पळवणे अशा गुन्ह्यांसाठी कुख्यात असते. पाशा आणि त्याचे दोन मित्र व एक तरूणी त्या गॅंगमध्ये सक्रीय असतात.
एकदा पाशा मरियमची पर्स पळवतो. तो तिला ती परत करतो. कारण तो तिच्या प्रेमात पडलेला असतो. मात्र हे प्रेम एकतर्फी असते.

तिचे एका तरूणावर प्रेम असल्याच्या संशयातून ही टोळी त्याला मारपीट करून तिच्यापासून दूर पळवून लावते.

पाशाच्या प्रेमाला मरियम होकार देत नाही म्हणून संतापातिरेकाने तो तिच्या चेहर्‍यावर तेजाब शिडकतो.
तिचा सुंदर चेहरा जळून विद्रूप होतो. तिचे डोळे जातात.

इअतरांना माफी मिळवून देणारी मरियम मात्र जेव्हा तिच्यावर बेतते तेव्हा सूडाने पेटते. इस्लामिक कायद्याप्रमाणे डोळ्याच्या बदल्यात डोळा नष्ट करण्याची तरतूद असल्याने ती पाशाचे डोळे अ‍ॅसिड टाकून जाळण्याची मागणी करते.

शिक्षेची अंमलबजावणी तिच्यासमोर होते.

हा चित्रपट अंगावर येणारा आहे. मरियमचा विद्रूप झालेला चेहरा, तिचे गेलेले डोळे हे सारे बघताना प्रेक्षक हादरून जातात.पाशाला शिक्षा दिली जात असताना सूडाचे समाधान मिळवणारी मरियमही खूप सतावून जाते.
अगदी शेवटच्या क्षणाला एक टर्निंग पोईंटही आहे.

या चित्रपटाचे टेकींग जबरदस्त आहे. अकिरो कुरासावाच्या राशोमनच्या पद्धतीने प्रत्येकजण आपल्याला जाणवले ते सांगत जातो. त्यातली तफावत नाट्य वाढवित जाते. अनेक नविन प्रयोग केलेले असल्याने चित्रपट महत्वाचा ठरतो.

Lantouri, Dir. Reza Dormishian,Persian, Iran,2016.

या चित्रपटाला विलक्षण प्रबोधनमुल्य आहे. मोठे शिक्षणमुल्यही आहे. स्त्रीपुरूष समतेच्या आणि लिंगभावाच्या चळवळीतील कोणीही चुकवू नये असा हा चित्रपट आहे.
................................

Friday, January 13, 2017

मानवी भावभावनांची प्रभावी गुंफन करणारा चित्रपट महोत्सव

1..........

PIFF, 15th Edition, 12 to 19 Jan. 2017
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, 12 जाने. ते 19 जाने. 2017
जगभरातले दर्जेदार असे ताजे [ 2015/2016 सालातले ] निवडक चित्रपट पाहण्याची सुवर्णसंधी म्हणजे हा चित्रपट महोत्सव असतो.
या वर्षीच्या महोत्सवाची सुरूवात "Thank You for Bombing" दिग्दर्शक Barbara Eder, Switzerland या चित्रपटाने झाली. प्रसिद्ध पत्रकार होण्याची तीव्र इच्छा असलेली लाना ही टिव्ही चॅनलसाठी काबूलमधून अफगाणिस्थानच्या युद्धाचे वार्तांकन करीत असते. इवाल्ड आणि काल या दोन पुरूष पत्रकारांनाही तिथे काम करण्याची संधी मिळते. हे तिघे तीन वेगवेगळ्या साहसातून जाताना त्यांच्यावर ओढवलेली जीवघेणी परिस्थिती चित्रित करणारा हा चित्रपट अंगावर काटा आणणारा आहे. अफगाणी अतिरेकी उन्मादाचे आणि युद्धजन्य संहाराचे जे चित्रण या चित्रपटात येते ते युद्धाविषयी घृणा निर्माण करणारे आहे. वाहिन्यांमधली जीवघेणी स्पर्धा आणि त्यासाठी लढवल्या जाणार्‍या क्लूप्त्या यांचे चित्रण करताना या तीन पत्रकारांना ज्या भीषण अनुभवांना सामोरे जावे लागते ते प्रत्यक्ष अनुभवायला लावणारा अतिशय दर्जेदार चित्रपट.

1. Rauf, Dir.Boris Kaya & Soner Caner, Turkey, कोवळ्या वयातल्या पहिल्या प्रेमाची हळूवार कहाणी मांडणारा अतिशय गोड सिनेमा. 11 वर्षाचा रौफ त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या [20 वर्षे] वयाच्या झानाच्या प्रेमात पडलाय. ती त्याच्या मालकाची मुलगी आहे. तो तिथे कोफीन बनवण्याचे काम करत असतो. झानाला पिंक कलरचा स्कार्फ त्याला भेट द्यायचा असतो. त्यासाठी गावचा अख्खा बाजार तो पालथा घालतो. त्याला तसा स्कार्फ मिळत नाही. त्याची आजी त्याला सांगते, दूर एका डोंगरावर पिंक रंगाची सुंदर फुले असतात. या हळुवार प्रेमकहाणीचा शेवट शोकांत आहे. झानाचा मृत्यू झाल्यावर हा पोरगा जिवाच्या कराराने डोंगरावर जातो आणि गाडीभर फुलं आणून तिच्या कोफीनवर उधळतो. फॅंड्रीचा अगदी वेगळा पण तरल अनुभव.

2. Playground, Dir.Bartosz M Kowalski, Poland, तीन वेगवेगळया कौटुंबिक पार्श्वभुमीवरील 3 मुले एकत्र शिकत असतात. एकजण आपल्या आजारी आणि पंगु वडीलांची मनोभावे सेवा करणारा आहे,पण त्याच्या मनात हिंसा भरून राहिलेली आहे. दुसरा मुलगा आपल्या धाकट्या भावाला अतिशय क्रुरपणे वागवणारा आहे. मुलगी मात्र अतिशय आत्ममग्न आहे. भित्री आहे. हे दोघे तिचे जे भयानक रॅगिंग करतात ते अंगावर येणारे आहे. त्यांच्या पदवी शिक्षणाच्या शेवटच्या दिवशी या मुलांमधली आक्रमकता, हिंसा आणि गुन्हेगारीची मानसिकता यांचा स्फोट होताना दिसतो. पाश्चात्य जगातील तरूणाईतली हिंसकता कल्पकतेने आणि प्रतिकात्मतेने  मांडणारा एक महत्वाचा चित्रपट.

3. The Innocents, Dir. Anne Fontaine,France, दुसर्‍या महायुद्धात रशियन सैनिकांनी एका चर्चमधील अनेक नन्सवर बलात्कार केलेले असतात. त्या गरोदर असतात. रेडक्रासमध्ये काम करणारी एक नर्स या नन्सची बाळंतपणे करते. धार्मिक गैरसमजुतींमुळे मुख्य नन्स त्या नवजात बालकांची उघड्यावर त्यांना सोडून देऊन एकप्रकारे हत्त्या करते. कोवळ्या बाळांपासून ताटातूट झालेल्या या नन्सची कुतरओढ, नर्सचे धैर्य आणि माणुसकी याचा भव्य पट उलगडत जातो. शेवटी त्या नर्सच्या प्रयत्नाने गावातल्या सगळ्या बेवारस मुलांना नन्सच्यारूपाने आया मिळतात. लादलेले मातृत्व, धार्मिक संस्कार आणि माणुसकी यांची हळूवार गुंफन करणारा उत्तम चित्रपट. एका सत्यकथेवर आधारलेला हा चित्रपट काळजाला हात घालतो.

4. Godless, Dir. Ralitza Petrova, Bulgaria, बल्गेरिया या पाश्चात्य देशामध्ये सिनियर सिटीजन्ससाठी शासनाने त्यांची सामाजिक सुरक्षा बघण्यासाठी नेमलेली एक नर्स ड्रगच्या आहारी गेलेली असल्याने ती सिनियर सिटीझन्सची आयकार्डे चोरून त्याचा गैरवापर करीत असते. तिचे वागणे चारित्र्यहीन असते. ती सुखाच्या शोधात अनेक चुकीची पावले टाकीत जाते. गुन्हेगारीच्या रस्त्यावर तिची होणारी घसरण, ह्या मार्गावर कधीही शांतता आणि सुख असू शकत नाही यांची प्रतिकात्मक कथा प्रभावीपणे सांगणारा सुंदर चित्रपट.
...........................

Tuesday, January 26, 2016

पिफ - मानवी भावभावनांचे श्रेष्ठ दर्शन --2.



1. Immortal, Iran, Hadi Mohaghegh -
 गेल्या वर्षात जगभरात तयार करण्यात आलेल्या बहुतेक सर्व दर्जेदार चित्रपटांमधून मानवी भावभावनांचे सखोल दर्शन पाहायला मिळाले.
’सुख जवापाडे, दु:ख पर्वताएव्हढे” असे संत तुकाराम सांगून गेलेत. जगणे म्हणजे अपार दु:खाचा प्रवास असतो असे सांगणारा Iran चा Hadi Mohaghegh यांचा Immortal हा चित्रपट अगदी थेट होता. चित्रपटाची सुरूवात होते ती, डोंगराची तीव्र चढण असलेला कठीण रस्ता आणि त्यावरून बंद पडलेली मोटर सायकल ढकलत चाललेला नायक इब्राहिम, यादृश्याने. त्याचे आजोबा अयाझ अपराधभावाने ग्रस्त आहेत. ते बस चालक आहेत. त्यांच्या हातून नातेवाईकांच्या लग्नाहून परतताना झालेल्या अपघातात कुटुंबातील सगळे लोक ठार झालेत. ही बोच इतकी जबरदस्त आहे की अयाझची जगण्याची इच्छाच मेलीय. सगळी कार्यप्रेरणा नष्ट झाल्याने तो पुन्हापुन्हा आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न करतोय. हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी इब्राहिम झटतोय. दरम्यान अयाझला झालेला पायाचा आजार, त्याच्या अपार वेदना यांच्या खिळऊन टाकणार्‍या थेट चित्रणाने हा चित्रपट अंगावर येतो.

2. Enclave, Serbia, Gorana Radovanovica -
ताजा विषय. अप्रतिम मांडणी, नेत्रदिपक छायाचित्रण, गोळीबंद पटकथा, तगडा अभिनय आणि कलात्मक दिग्दर्शन यांचा श्रेष्ठ अविष्कार म्हणजे Enclave हा चित्रपट होय.
सर्बियामधील कोसोवातील मुस्लीम आणि ख्रिश्चन समुदायातील वैर सर्वदूर परिचित आहे. पहाडी मुलखात, सैन्याच्या निगराणीखाली राहणारे एक ख्रिश्चन कुटुंब असते.शेती करणारे वडील आणि मरनासन्न अवस्थेत असलेले आजोबा. त्यातला दहा वर्षाचा लहान मुलगा नेनाद हा शाळेत शिकतोय. मिलीट्रीच्या संरक्षणात त्यांच्या वाहनातून दररोज त्याला शाळेत यावेजावे लागते. वर्गात तो एकटाच शिकतोय. त्याच्या वर्गशिक्षिकेला अचानक गाव सोडावे लागते. आजोबांचा मृत्य़ू झालाय. त्यांच्या अंत्यविधीसाठी धर्मगुरूंना बोलवायला गेलेला नेनाद त्याचे काही मुस्लीम मित्र आणि विरोधक यांच्या कच्याटात सापडतो. त्यातून उद्भवलेल्या संकटात त्याचा जीव धोक्यात सापडतो. इकडे वडीलांना स्वसंरक्षणार्थ बेकायदा शस्त्र बाळगल्याच्या आरोपावरून पोलीस पकडतात. नेनादची आत्या तिच्या मुलीसह तिच्या वडीलांना भेटायला आलीये. वडीलांचे प्रेत बघून ती अंत्यविधीसाठी जिवाच्या कराराने धडपडतेय. इकडे मुस्लीम मुलाने भितीपोटी  घरच्यांना खोटे सांगितल्याने मुस्लीम समुदाय सूडाने पेटून ख्रिश्चन स्मशान उद्ध्वस्त करून टाकतो. त्या जाळपोळीत नेनादचा जीव आणखीन धोक्यात येतो. श्वास रोखून धरायला लावणारी कथा अनेक वळणे घेत पुढे सरकते. शेवटी नेनाद वाचतो की मरतो? त्याच्या आजोबांचा दफनविधी होतो की नाही? धार्मिक शत्रुत्व, नैसर्गिक मैत्री आणि कोवळी माणुसकी यांच्या संघर्शातून अखेर काय जिंकते? काळजाची पकड घेणारी महान कथा. मनाचा कोपरा कायमचा व्यापून टाकणारी एक श्रेष्ठ निर्मिती.

3. Absolution, Finland, Petri Kotwica -
मुळात सज्जन असलेली माणसे जेव्हा नैतिक पेचात सापडतात तेव्हा त्यांचे वर्तन कसे असते याची विलक्षण कहाणी म्हणजे हा जागतिक दर्जाचा श्रेष्ठ चित्रपट होय.
अस्सल कथा, नैसर्गिक अभिनय, महान सादरीकरण आणि नितांतसुंदर दिग्दर्शन यातून किती थोर कलाकृती जन्माला येते त्याचा वस्तुपाठ म्हणजे फिनलंडचा Petri Kotwica यांचा
Absolution हा चित्रपट होय.
किया ही 34 आठवड्यांची गरोदर महिला रात्रीच्या घनघोर अंधारात कार चालवताना तिला अचानक कळा सुरू होतात. तिला जीवघेणी कळ येते आणि तिच्या कारची धडक कशाला तरी बसते. ती तिच्या धर्मगुरू असलेल्या पतीला, लौरीला कोण जखमी झाले ते बघून यायला सांगते. त्याच्या पत्नीचा आधीच्या वेळी तीन वर्षांपुर्वी अकाली गर्भपात झालेला असल्याने पत्नीला अतितात्काळ दवाखान्यात नेण्यासाठी तो बहुधा तिच्याशी खोटे बोलतो. कोणी माणूस जखमी झालेला नसून ते बहुधा हरीण असावे असे तो तिला सांगतो. दवाखान्यात पोचल्यावर किया एका गोंडस बाळाला जन्म देते. दवाखान्यातून घरी येताना तिची हनाशी भेट होते. हनाचा नवरा अपघातात जखमी होऊन कोमात गेलेला असतो. कियाच्या लक्षात येते की बहुधा तिनेच धडक दिल्याने हनाचा नवरा जखमी झालेला असावा. ती हनाला परोपरीने मदत करायचा प्रयत्न करते. हना तिला देवदूत समजत असते. पोलीस तपासातून हनाच्या हे लक्षात येतेकी कियाच्या नवर्‍याने धडक दिल्यानेच तिचा नवरा आज मरणासन्न अवस्थेत आहे. खूप प्रयत्न करूनही तिचा नवरा वाचत नाही. पुढे थंड डोक्याने ती कट रचते आणि कियाच्या नवर्‍याचा  लौरीचा सूड घेते का? कसा?  किया मात्र अतिशय धीरोदात्तपणे या सार्‍या संकटाला कशी सामोरी जाते? अपार करूणा, अपराधभाव, सत्याची चाड, नैसर्गिक पेच आणि दुसरीकडे सूडबुद्धीची कठोर कृती यातून रंगणारे विलक्षण मनोहारी नाट्य यांचे दर्शन घडवणारा हा चित्रपट अतिशय श्रेष्ठ चित्रपट होय.
क्रमश:
...............

Monday, January 25, 2016

दर्जेदार जागतिक चित्रपटांची मेजवानी PIFF,



Pune International Film Festival, 14-21 Jan. 2016 (PIFF)
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, 14-21 जाने. 2016
Pune Film Foundation आणि Government of Maharashtra यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 14 व्या PIFF मध्ये यावर्षी
104 देशांतून आलेल्या 986 चित्रपटांमधून निवडलेले जागतिक वैशिष्ट्ये असलेले 14 चित्रपट जागतिक स्पर्धा विभागात दाखवण्यात आले. या आठ दिवसात याशिवाय आणखीही सुमारे
280 चित्रपटांचे 350 शो आयोजित करण्यात आले.
 City Pride Kothrud,3 थिएटर्स, City Pride Satara road, 2 थिएटर्स, City Pride RDeccan, Mangala multiplex,2 थिएटर्स, INOX Camp, 2 थिएटर्स, National Films Archives of India (Law college road), अशा अकरा थिएटर्समधून हे 350 शो दाखवण्यात आले. सुमारे दहा हजार रसिकांनी PIFF चा आनंद घेतला. या अकरा ठिकाणी एकावेळी
2902 आसनांची व्यवस्था होती. शिवाय अनेकांनी पायर्‍यांवर खाली बसून चित्रपट पाहिले. प्रत्येकाने सरासरी 25 ते 30 चित्रपट पाहिल्याचे लक्षात घेता सुमारे 2 लाख 50 हजार प्रेक्षकांनी हा महोत्सव अनुभवला असेही म्हणता येईल.
यावर्षी जागतिक स्पर्धा विभागातील प्रथम पुरस्कार इराणच्या Immortal ने पटकावला. हा चित्रपट Hadi Mohaghegh यांनी दिग्दर्शित केला होता.
खरं तर याच तोडीचे बरेच चित्रपट या महोत्सवात होते.
 उद्घाटनात दाखवण्यात आलेला मेक्शिकोच्या [ Mexico] केल्सो आर. गार्सिया [Celso R. Garsia] दिग्दर्शित "दि थीन यलो लाईन " [The Thin  Yellow Line ] हा चित्रपट नितांतसुंदर होता.
** Immortal, Iran, Hadi Mohaghegh
1. Enclave, Serbia, Gorana Radovanovica,
2. Absolution, Finland, Petri Kotwica,
3. Dearest, China, Peter Ho-Sun Chan,
4. Don't Tell Me The Boy Was Mad, France, Robert Guediguian,
5. Perfect Obedience, Mexico, Luis Urquiza,
6. Money Buddies, Italy, Daniel Cipri,
7. Thithi, USA, Ram Reddy हा भारतीय तरूण दिग्दर्शकाने केलेला कन्नड चित्रपट,
हे आठही चित्रपट अतिशय दर्जेदार होते. पुरस्कारासाठी एकाची निवड करताना परिक्षकांचा फार कस लागला असणार.
जागतिक स्पर्धा विभागातील ---
1. Picadero,Spain, Ben Sharrock,
2. Bopem, Kazakhstan,Zhannalssab ayeva,
हे चित्रपटही उल्लेखनीय होते.
Global Cinema या विभागात दाखवण्यात आलेले पुढील चित्रपट अव्वल दर्ज्याचे होते.
1.Taxi, Iran, Jafar Panahi,
2. Embrace of the Serpent, Colombia,Ciro Guerra,
3. My Mother, France, Nanni Moretti,
4. Theeb, UAE, Naji  Abu Nowar,
5. Journey to Rome, Poland, Tomasz Mielnik,
6. Sivas, Turkey, Kaan Mujdeci,
7.Mountains May Depart, China, Jiazhangke,
8. Risk of Acid Rain, Iran, Behtash Sanaeeha,
आणखीही काही उत्तम चित्रपटांची नोंद घेणे गरजेचे आहे.
क्रमश:
.............................