चिनमध्ये अतिशय कडक सेन्सॉरशिप असल्यानं सरकारविरूद्ध ब्र शब्दही उच्चारता येत नाही. अशा स्थितीत ज्या सुचकपणाने "फ्री अॅंड इझी" हा चित्रपट कम्युनिस्ट सरकारचा बुरखा फाडतो त्याला तोड नाही.
चिनी राजसत्ता, अर्थसत्ता आणि धर्मसत्ता मिळून तिथल्या सामान्य माणसांचे अपार शोषन कसे करतात,तिथली खेडी कशी ओस पडलेली आहेत, ग्रामीण भागातले कारखाने कसे उद्ध्वस्त झालेले आहेत याची अतिशय दर्जेदार कथा हा चित्रपट दाखवतो. यातली सगळी पात्रं लो टोनमध्ये बोलतात. अतिशय संथ, एखाद्या प्रायोगिक नाटकासारखा हा चित्रपट अप्रतिमरित्या सादर केलेला आहे.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव [पिफ] 2018 चा सर्वोत्कृष्ठ आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार The Best International Film Award in PIFF-2018
"फ्री अॅंड इझी" या श्रेष्ठ चिनी चित्रपटाचे दिग्दर्शक श्री जेंग जून यांच्यासोबत
World Competition The Best Film Award " Free and Easy," China,
with Director - Geng Jun
No comments:
Post a Comment