ही कल्पना ज्यांना सुचली असेल त्यांना सॅल्युट. एक आधुनिक पद्धतीचा कत्तलखाणा आहे. तिथे काम करणारे दोघेजण काही आजारपणांनी, अपंगत्वाने ग्रस्त आहेत.
त्यांना दररोज रात्री सारखीच स्वप्नं पडतात.
एका गर्द जंगलात एक हरीण जोडपे काही तरी शोधत फिरते आहे. प्रेम करते आहे.
कत्तलखाण्यातल्या या दोघांना मानसोपचारतज्ञांचे उपचार घेताना हे समजते. दोघांना एकत्र आणणारी एकच जागा स्वप्नभुमी.
एक नितांतसुंदर, अभिजात प्रेमकथा.
विषय स्थानिक असूनही जागतिक, हाताळणी अगदी अभिनव, कथा,पटकथा अगदी बांधीव, संवाद मोजके पण अर्थपुर्ण, अभिनय वास्तववादी तरीही कमालीचा संयत, दिग्दर्शन हळुवार, काव्यमय, प्रेक्षकांना बिटवीन दि लाईन आणि बियाँड दि लाईन दाखवणारे, कॅमेरा अफलातून, असं सारं जुळून आलेली भन्नाट अनुभव देणारी कहाणी, "ऑन बॉडी अॅंड सोल,"
प्रत्येकानं अवश्य पाहावा असा श्रेष्ठ चित्रपट. On Body and Soul, Director- Lidiko Enyedi, Hungary,
"ऑन बॉडी अॅंड सोल," दिग्दर्शक- लिडीको एनेडी, हंगेरी.
-प्रा.हरी नरके
No comments:
Post a Comment