Sunday, July 21, 2013

समर्पित विदुषी: शर्मिला रेगे
मृत्यू ही फार अतार्कीक गोष्ट आहे.जन्माला आलेला प्रत्येकजण एक ना एक दिवस मरणार आहे हे माहित असलं तरी जवळच्या व्यक्तीचा मॄत्यू धक्का देतोच.विशेषत: चांगली माणसं जेव्हा लौकर जातात तेव्हा कडा कोसळावा, ढगफुटी व्हावी असं काहीतरी होतं.४८ वर्षे हे काही जाण्याचे वय नाही.प्रा.शर्मिला रेगे फारच अकाली गेल्या. जबरदस्त चटका लाऊन गेल्या. बाई मोठ्या धीराच्या. शरीर कर्करोगाने पोखरले तरी शेवटपर्यंत त्या आजाराशी झुंजत राहिल्या. सदैव हसत, खेळत, कामात, लेखनात व्यग्र राहिल्या. कधीही भेटल्या की अत्यंत जिव्हाळ्याने बोलायच्या. अभिजात नम्रता, ऋजुता, सौजन्यशीलता आणि ज्ञानमग्नता ही शर्मिलाताईंची खरी ओळख! सतत हसतमुख आणि स्वागतशील.शर्मिला रेगे म्हणजे अहोरात्र ज्ञाननिर्मिती करण्यात बुडून गेलेली विदुषी.एक मिशनरी झील असलेली शिक्षिका.
दलित स्त्रीवादाचे सिद्धांतन, दलित स्त्रीवादी भूमीदृष्टी यांच्या तात्विक मांडणीचा मजबूत पाया त्यांनी घातला. विद्यापिठीय अभ्यासात हा विषय यावा यासाठी त्या झटल्या.देशातील अनेक विद्यापिठात तो त्यांच्यामुळे शिकवला जाऊ लागला.त्यांनीच तो ऎरणीवर आणून देशभर पोचवला.
पुणे विद्यापिठातील कर्मचार्‍यांच्या लहान मुलामुलींसाठी त्यांनी विद्यापिठाला पाळणाघर सुरू करायला लावले. त्याची निगुतीने काळजी घेतली.ते उत्तमरित्या सांभाळले.
त्या समाजशास्त्राच्या एम.ए., एम.फिल.पीएच.डी. होत्या.त्यांनी आपले पीएच.डी.चे संशोधन   " फ्रा‘म ए मेनस्ट्रीम सोशिओलोजी टू ए जेंडर सेंसेटिव्ह सोशिओलोजी" या विषयावर केलेले होते. त्यांचे ‘अगेंस्ट द मॅडनेस ऑफ मनू : बी. आर. आंबेडकर्स रायटिंग ऑन ब्राह्मनिकल पॅट्रिअ‍ॅर्ची’,  " रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर,रिडींग दलित वुमेन्स टेस्टोमोनिज",                 "सोशिओलोजी आ‘फ जेंडर : दि च‘लेंज ओफ फेमिनिस्ट सोशिओलोजिकल नोलेज" हे ग्रंथ विद्वतमान्य ठरले होते.ही संशोधनात्मक पुस्तके व जातीव्यवस्था आणि लिंगभाव या विषयांवर त्यांनी वेळोवेळी लिहिलेले अनेक शोधनिबंध अभ्यासक, विचारवंत, पुरोगामी कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांसाठी अनमोल खजिना आहे. त्यांच्या दलित महिलाविषयक संशोधनाच्या गौरवार्थ त्यांना चेन्नई येथील राष्ट्रीय पातळीवरील "माल्कम आदिशेशैय" पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. त्यांनी पुणे विद्यापीठात आणि त्याआधी विविध महाविद्यालयात तसेच आय.आय.टी.पवई, येथे विविध पदांवर अध्यापनाचे सुमारे २३ वर्षे काम केले. त्यांचा जन्म ७ आक्टोबर १९६४ चा.
त्या पुणे विद्यापिठाच्या समाजशास्त्र विभागात प्राध्यापक आणि  प्रमुख होत्या. हा विषय त्यांच्या अपार जिव्हाळ्याचा आणि आवडीचा होता.विभागात त्या रमल्या होत्या. सावित्रीबाई आणि महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांच्या  विचारांवर बाईंची अपार निष्ठा. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालक प्रा. विद्युत भागवत निवृत झाल्यावर त्या केंद्राची उभारणी करण्यात त्यांच्यासोबत सदैव पुढे असलेल्या शर्मिलाताईंनी काय करावे? मला वाटत नाही, त्यांनी जे काही केले तसे उदाहरण संपूर्ण देशात दुसरे असेल म्हणून! त्यांनी त्या पदासाठी आपल्या प्राध्यापक पदाच्या पगारावर पाणी सोडले, पदाचा राजीनामा दिला  आणि त्या चक्क डिमोशन{पदावनती} स्विकारून रिडर{संचालक} बनल्या. आपल्या दरमहाच्या हजारो रूपयांच्या वेतनावर तळमळ आणि बांधिलकी असल्याशिवाय कोण सहजासहजी असे पाणी सोडील? विद्यापिठीय वर्तुळात मला तरी असे दुसरे उदाहरण माहित नाही.
जेएनयूचे प्रो.विवेककुमार यांना बाईंनी व्याख्यानासाठी निमंत्रित केले होते.त्यांची ओळख करून देताना  प्रास्ताविकात बाई त्यांच्या फुले आंबेडकरी आकलनावर  भरभरून बोलल्या. अशी दाद कोण देतो? ज्याचे मन मोठे आणि निर्मळ असते तोच. शर्मिलाताईंनी दुसर्‍याला दाद देताना कधीही हात आखडता घेतला नाही.एव्हढा जिंदादिलपणा विदुषी असूनही त्यांच्यात कुठून आला असावा?
जातीनिर्मुलनाचा विषय निघाला की, उठताबसता उच्चवर्णियांचा उद्धार करण्याची फेशन आजकाल जोरात आहे. विशेषत: ब्राह्मणांना चारदोन शिव्या हासडल्याशिवाय ह्या विषयावर बोलताच येत नाही अशी बहुतेकांची ठाम समजूत आहे. अर्थात तिथून सुरूवात करायची आणि पुढे तिथेच बैलाच्या घाण्यासारखे फिरत राहायचे, शेवटही तिथेच करायचा असे आजचे सामाजिक वास्तव आहे.रेगे ताई सारस्वत ब्राह्मण होत्या.त्यांनी अनुसुचित जाती,जमाती, भटके विमुक्त आणि ओबीसी मुलामुलींना स्वत:च्या पगारातून जेव्हढी आर्थिक मदत केली तेव्हढी संपुर्ण विद्यापिठातील आणखी कोणीही केली नसेल. भटकया विमुक्त चळवळीतील लेखक प्रा. वैजनाथ कळसे रत्नागिरीच्या त्यांच्या महाविद्यालयातून जातीय आकसातून निलंबित केले गेले. त्यांच्या मुलीच्या शिक्षणाचा सगळा भार बाईंनी उचलला.अशी असंख्य उदाहरणे सांगता येतील.ही कळकळ कुठून येते?
बाईंनी आंतरजातीय विवाह केलेला होता. बाई हाडाची शिक्षिका, वक्ता आणि लेखिका. मजबूत समाजशास्त्रज्ञ! सच्चा अकादमीशियन.शास्त्रशुद्ध अभ्यासात बाईंची चूक काढणे केवळ अशक्यच. सामाजिक चळवळींवर बाईंची अपार माया.दलित लेखिकांच्या संमेलनात प्रत्येकीच्या स्वागतात आणि मैत्रीत बाई त्यांच्या सखी-आप्तच झालेल्या.उर्मिला पवार, प्रज्ञा दया पवार, हिरा बनसोड, हिरा पवार सार्‍यांना बाईंचे असे अचानक जाणे चटका लावणारे.समकालीन स्त्रीवादाचा ज्ञानकोश म्हणजे शर्मिला.स्त्रीवादावर भक्कम मांड असूनही किंचितही पुरूषद्वेष्टी नसलेली, बहिणपणा आणि भाऊपणाचे प्रतिक असलेली शर्मिला! त्या माझ्या मित्र-तत्वज्ञ आणि मार्गदर्शक होत्या.
एन.सी.इ.आर.टी.ने त्यांचे २१ जानेवारी २००९ ला"सावित्रीबाई फुले मेमोरियल लेक्चर" या मालिकेत व्याख्यान ठेवले होते.त्या "एज्युकेशन अ‘ज तृतीय रत्न: टूवर्डस फुले आंबेडकराईट फेमिनिस्ट पेडागोजिकल प्राक्टीस’ या विषयावर छान बोलल्या.त्यांचे भाषण अभ्यासपूर्ण आणि तळमळीचे होते. एन.सी.इ.आर.टी प्रथेप्रमाणे त्याचे पुस्तक प्रकाशित करणार होते.संस्थेने त्या पुस्तकात समाविष्ट करण्यासाठी त्यांना सावित्रीबाईंचे चरित्र लिहायला सांगितले. त्यांचा सावित्रीबाईंवर खूप व्यासंग होता. तरिही त्या माझ्याकडे आल्या. म्हणाल्या, सर हे चरित्र तुम्ही लिहा." मी संकोचून गेलो. त्या विद्यापिठात मला सिनियर होत्या. मी हे प्रथेला सोडून असल्याचे सांगताच त्या म्हणाल्या या विषयातील तुमचा अधिकार मला माहित आहे. मी तुमची कोणतीही सबब ऎकून घेणार नाही." मी लिहिलेल्या सावित्रीबाईंच्या चरित्रासह त्त्यांचे हे पुस्तक एन.सी.इ.आर.टी.ने प्रकाशित केले. अशारितीने मला त्यांनी सहलेखक करून घेतले.
सावित्रीबाईंच्या या लेकीला, अखेरचा निरोप देताना डोळ्यात आज आसवं आहेत.आज माझ्या नात्यातले, कुटुंबातले खूप जवळचे कुणीतरी गेल्याची उदासी मनात साकळून आलीय. स्त्रीवाद आणि जातीव्यवस्था यांची मुलभूत मांडणी करणार्‍या या ज्ञानमार्गी विदुषीला.सामाजिक समतेचा  आणि स्त्रीवादाचा अस्सल उद्गार असणार्‍या शर्मिलाताईंना मानाचा मुजरा.स्वत:ची जात सोडून बाहेर पडणे ही फार कठीण गोष्ट.खूपच  मोजक्या लोकांना हे जमले. देशातील "डीकास्ट" झालेल्या विनायकराव कुलकर्णी,  प्रा. राम बापट, प्रा. गं. बा. सरदार, भा.ल.भोळे  या ज्ञानवंतांच्या अभिमानास्पद मालिकेत त्यांच्या पंक्तीत बसणार्‍या शर्मिलाताई अशा अचानक जाव्यात हा निसर्गाचा फार मोठा अन्याय आहे.
  .
..............................................

Thursday, July 18, 2013

समर्पित विदुषी: शर्मिला रेगेमृत्यू ही फार अतार्कीक गोष्ट आहे.जन्माला आलेला प्रत्येकजण एक ना एक दिवस मरणार आहे हे माहित असलं तरी जवळच्या व्यक्तीचा मॄत्यू धक्का देतोच.विशेषत: चांगली माणसं जेव्हा लौकर जातात तेव्हा कडा कोसळावा, ढगफुटी व्हावी असं काहीतरी होतं.४८ वर्षे हे काही जाण्याचे वय नाही.प्रा.शर्मिला रेगे फारच अकाली गेल्या. जबरदस्त चटका लाऊन गेल्या. बाई मोठ्या धीराच्या. शरीर कर्करोगाने पोखरले तरी शेवटपर्यंत त्या आजाराशी झुंजत राहिल्या. सदैव हसत, खेळत, कामात, लेखनात व्यग्र राहिल्या. कधीही भेटल्या की अत्यंत जिव्हाळ्याने बोलायच्या. अभिजात नम्रता, ऋजुता, सौजन्यशीलता आणि ज्ञानमग्नता ही शर्मिलाताईंची खरी ओळख! सतत हसतमुख आणि स्वागतशील.शर्मिला रेगे म्हणजे अहोरात्र ज्ञाननिर्मिती करण्यात बुडून गेलेली विदुषी.एक मिशनरी झील असलेली शिक्षिका.
दलित स्त्रीवादाचे सिद्धांतन, दलित स्त्रीवादी भूमीदृष्टी यांच्या तात्विक मांडणीचा मजबूत पाया त्यांनी घातला. विद्यापिठीय अभ्यासात हा विषय यावा यासाठी त्या झटल्या.देशातील अनेक विद्यापिठात तो त्यांच्यामुळे शिकवला जाऊ लागला.त्यांनीच तो ऎरणीवर आणून देशभर पोचवला.
पुणे विद्यापिठातील कर्मचार्‍यांच्या लहान मुलामुलींसाठी त्यांनी विद्यापिठाला पाळणाघर सुरू करायला लावले. त्याची निगुतीने काळजी घेतली.ते उत्तमरित्या सांभाळले.
त्या समाजशास्त्राच्या एम.ए., एम.फिल.पीएच.डी. होत्या.त्यांनी आपले पीएच.डी.चे संशोधन   " फ्रा‘म ए मेनस्ट्रीम सोशिओलोजी टू ए जेंडर सेंसेटिव्ह सोशिओलोजी" या विषयावर केलेले होते. त्यांचे ‘अगेंस्ट द मॅडनेस ऑफ मनू : बी. आर. आंबेडकर्स रायटिंग ऑन ब्राह्मनिकल पॅट्रिअ‍ॅर्ची’,  " रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर,रिडींग दलित वुमेन्स टेस्टोमोनिज",                 "सोशिओलोजी आ‘फ जेंडर : दि च‘लेंज ओफ फेमिनिस्ट सोशिओलोजिकल नोलेज" हे ग्रंथ विद्वतमान्य ठरले होते.ही संशोधनात्मक पुस्तके व जातीव्यवस्था आणि लिंगभाव या विषयांवर त्यांनी वेळोवेळी लिहिलेले अनेक शोधनिबंध अभ्यासक, विचारवंत, पुरोगामी कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांसाठी अनमोल खजिना आहे. त्यांच्या दलित महिलाविषयक संशोधनाच्या गौरवार्थ त्यांना चेन्नई येथील राष्ट्रीय पातळीवरील "माल्कम आदिशेशैय" पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. त्यांनी पुणे विद्यापीठात आणि त्याआधी विविध महाविद्यालयात तसेच आय.आय.टी.पवई, येथे विविध पदांवर अध्यापनाचे सुमारे २३ वर्षे काम केले. त्यांचा जन्म ७ आक्टोबर १९६४ चा.
त्या पुणे विद्यापिठाच्या समाजशास्त्र विभागात प्राध्यापक आणि  प्रमुख होत्या. हा विषय त्यांच्या अपार जिव्हाळ्याचा आणि आवडीचा होता.विभागात त्या रमल्या होत्या. सावित्रीबाई आणि महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांच्या  विचारांवर बाईंची अपार निष्ठा. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालक प्रा. विद्युत भागवत निवृत झाल्यावर त्या केंद्राची उभारणी करण्यात त्यांच्यासोबत सदैव पुढे असलेल्या शर्मिलाताईंनी काय करावे? मला वाटत नाही, त्यांनी जे काही केले तसे उदाहरण संपूर्ण देशात दुसरे असेल म्हणून! त्यांनी त्या पदासाठी आपल्या प्राध्यापक पदाच्या पगारावर पाणी सोडले, पदाचा राजीनामा दिला  आणि त्या चक्क डिमोशन{पदावनती} स्विकारून रिडर{संचालक} बनल्या. आपल्या दरमहाच्या हजारो रूपयांच्या वेतनावर तळमळ आणि बांधिलकी असल्याशिवाय कोण सहजासहजी असे पाणी सोडील? विद्यापिठीय वर्तुळात मला तरी असे दुसरे उदाहरण माहित नाही.
जेएनयूचे प्रो.विवेककुमार यांना बाईंनी व्याख्यानासाठी निमंत्रित केले होते.त्यांची ओळख करून देताना  प्रास्ताविकात बाई त्यांच्या फुले आंबेडकरी आकलनावर  भरभरून बोलल्या. अशी दाद कोण देतो? ज्याचे मन मोठे आणि निर्मळ असते तोच. शर्मिलाताईंनी दुसर्‍याला दाद देताना कधीही हात आखडता घेतला नाही.एव्हढा जिंदादिलपणा विदुषी असूनही त्यांच्यात कुठून आला असावा?
जातीनिर्मुलनाचा विषय निघाला की, उठताबसता उच्चवर्णियांचा उद्धार करण्याची फेशन आजकाल जोरात आहे. विशेषत: ब्राह्मणांना चारदोन शिव्या हासडल्याशिवाय ह्या विषयावर बोलताच येत नाही अशी बहुतेकांची ठाम समजूत आहे. अर्थात तिथून सुरूवात करायची आणि पुढे तिथेच बैलाच्या घाण्यासारखे फिरत राहायचे, शेवटही तिथेच करायचा असे आजचे सामाजिक वास्तव आहे.रेगे ताई सारस्वत ब्राह्मण होत्या.त्यांनी अनुसुचित जाती,जमाती, भटके विमुक्त आणि ओबीसी मुलामुलींना स्वत:च्या पगारातून जेव्हढी आर्थिक मदत केली तेव्हढी संपुर्ण विद्यापिठातील आणखी कोणीही केली नसेल. भटकया विमुक्त चळवळीतील लेखक प्रा. वैजनाथ कळसे रत्नागिरीच्या त्यांच्या महाविद्यालयातून जातीय आकसातून निलंबित केले गेले. त्यांच्या मुलीच्या शिक्षणाचा सगळा भार बाईंनी उचलला.अशी असंख्य उदाहरणे सांगता येतील.ही कळकळ कुठून येते?
बाईंनी आंतरजातीय विवाह केलेला होता. बाई हाडाची शिक्षिका, वक्ता आणि लेखिका. मजबूत समाजशास्त्रज्ञ! सच्चा अकादमीशियन.शास्त्रशुद्ध अभ्यासात बाईंची चूक काढणे केवळ अशक्यच. सामाजिक चळवळींवर बाईंची अपार माया.दलित लेखिकांच्या संमेलनात प्रत्येकीच्या स्वागतात आणि मैत्रीत बाई त्यांच्या सखी-आप्तच झालेल्या.उर्मिला पवार, प्रज्ञा दया पवार, हिरा बनसोड, हिरा पवार सार्‍यांना बाईंचे असे अचानक जाणे चटका लावणारे.समकालीन स्त्रीवादाचा ज्ञानकोश म्हणजे शर्मिला.स्त्रीवादावर भक्कम मांड असूनही किंचितही पुरूषद्वेष्टी नसलेली, बहिणपणा आणि भाऊपणाचे प्रतिक असलेली शर्मिला! त्या माझ्या मित्र-तत्वज्ञ आणि मार्गदर्शक होत्या.
एन.सी.इ.आर.टी.ने त्यांचे २१ जानेवारी २००९ ला"सावित्रीबाई फुले मेमोरियल लेक्चर" या मालिकेत व्याख्यान ठेवले होते.त्या "एज्युकेशन अ‘ज तृतीय रत्न: टूवर्डस फुले आंबेडकराईट फेमिनिस्ट पेडागोजिकल प्राक्टीस’ या विषयावर छान बोलल्या.त्यांचे भाषण अभ्यासपूर्ण आणि तळमळीचे होते. एन.सी.इ.आर.टी प्रथेप्रमाणे त्याचे पुस्तक प्रकाशित करणार होते.संस्थेने त्या पुस्तकात समाविष्ट करण्यासाठी त्यांना सावित्रीबाईंचे चरित्र लिहायला सांगितले. त्यांचा सावित्रीबाईंवर खूप व्यासंग होता. तरिही त्या माझ्याकडे आल्या. म्हणाल्या, सर हे चरित्र तुम्ही लिहा." मी संकोचून गेलो. त्या विद्यापिठात मला सिनियर होत्या. मी हे प्रथेला सोडून असल्याचे सांगताच त्या म्हणाल्या या विषयातील तुमचा अधिकार मला माहित आहे. मी तुमची कोणतीही सबब ऎकून घेणार नाही." मी लिहिलेल्या सावित्रीबाईंच्या चरित्रासह त्त्यांचे हे पुस्तक एन.सी.इ.आर.टी.ने प्रकाशित केले. अशारितीने मला त्यांनी सहलेखक करून घेतले.
सावित्रीबाईंच्या या लेकीला, अखेरचा निरोप देताना डोळ्यात आज आसवं आहेत.आज माझ्या नात्यातले, कुटुंबातले खूप जवळचे कुणीतरी गेल्याची उदासी मनात साकळून आलीय. स्त्रीवाद आणि जातीव्यवस्था यांची मुलभूत मांडणी करणार्‍या या ज्ञानमार्गी विदुषीला.सामाजिक समतेचा  आणि स्त्रीवादाचा अस्सल उद्गार असणार्‍या शर्मिलाताईंना मानाचा मुजरा.स्वत:ची जात सोडून बाहेर पडणे ही फार कठीण गोष्ट.खूपच  मोजक्या लोकांना हे जमले. देशातील "डीकास्ट" झालेल्या विनायकराव कुलकर्णी,  प्रा. राम बापट, प्रा. गं. बा. सरदार, भा.ल.भोळे  या ज्ञानवंतांच्या अभिमानास्पद मालिकेत त्यांच्या पंक्तीत बसणार्‍या शर्मिलाताई अशा अचानक जाव्यात हा निसर्गाचा फार मोठा अन्याय आहे.
  .
..............................................

Wednesday, July 17, 2013

डान्सबार: ’सर्वोच्च’ चपराकडान्सबार: ’सर्वोच्च’ चपराक
अखेर सर्वोच्च न्यायालयानं डान्स बारवरची बंदी ऊठवली. खरंतर मुंबई उच्च न्यायालयानं ती सात वर्षांपुर्वीच उठवली होती.सरकारनं त्यासाठी केलेली बा‘म्बे पोलीस कायद्यातील दुरूस्ती या न्यायालयानं फेटाळून लावली होती. त्यावर सरकारनं सर्वोच्च न्यायालयात अपिल केलेलं होतं.हा कायदाच मुळात अतिशय विसंगत, कमकुवत आणि पक्षपाती होता. तो न्यायालयात टिकणार नाही हे सरकारलाही चांगलं माहित होतं.या कायद्याला विधानसभा आणि विधान परिषदेतील सर्व पक्षांचा एकमुखी पाठींबा होता. तरिही ही चपराक का बसली? कारण हा कायदा उघड उघड पक्षपाती होता. सरकारनं जिथं श्रीमंत लोकं जातात त्या थ्री स्टार आणि फाऊव्ह स्टार हाटेलात आणि तत्सम ठिकाणी डान्सबार चालवायला परवानगी दिली होती पण त्यापेक्षा लहान हाटेलात मात्र बंदी घातली होती. असला हा भेदभाव होता.कायद्यापुढे सगळे समान असतात हे मुलभूत तत्वच पायदळी तुडवण्यात आलेलं होतं. घटनेच्या १५ मधील समतेच्या तत्वाचा हा भंग असल्यानं सरकार हरणार ही काळ्या दगडावरची रेघ होती.त्यामुळं आता उर बडवण्यात काहीही अर्थ नाही. सरकार म्हणे आता रिव्ह्यू पिटीशन करणार आहे. फेरविचारासाठी असा कोणता नवा मुद्दा आहे की जो न्यायालयानं विचारात घेतलेला नव्हता किंवा असा कोणता कायद्याचा अर्थ न्यायालयानं चुकीचा लावलेला आहे? तेव्हा फेरविचार याचिका करणे म्हणजे आणखी नाचक्की ओढवून घेणे होय.
डान्सबारमुळं तरूण पिढी बिघडते, गुन्हेगारी वाढते, बारबालांचं लैंगिक शोषण होतं, असे आक्षेप घेतले जातात.ह्यात तथ्यही आहेच.पण प्रश्न एव्हढाच नाही आणि तो इतका सरळही नाही.संविधानाने सर्वांना व्यवसाय स्वातंत्र्य दिलेलं आहे.या व्यवसायात सुमारे ७५ हजार बारबाला गुंतलेल्या आहेत. शिवाय लेडीज सिंगर, लेडीज वेटर तसेच  कुक आणि व्यवस्थापक म्हणून मिळून सुमारे दीड लाख लोकांना रोजगार मिळतो.या बारचं अर्थकारण फार अवाढव्य असतं. एका डान्सबारची वार्षिक उलाढाल सुमारे 20 कोटी रूपये होती. राज्यात सुमारे अडीच हजार बार होते.एकट्या मुंबई परिसरात 1250 डान्स बार होते. डान्स बारमध्ये प्रामुख्याने राजस्थान, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल मधील मुली काम करीत होत्या.त्या बहुधा  सर्वच्या सर्व लोककलाकार जातीतल्या मागासवर्गीय घटकातून आलेल्या आहेत.सगळं कुटुंब त्या पोसतात.गाजलेल्या बारबाला तरन्नूमची एका रात्रीची कमाई 90 लाख रूपये असायची असं सांगितलं जातं.प्रत्येक बारबालेची दररोजची कमाई किमान दोन हजार रूपये असायची. या मुलींच्या रोजगारावर कुर्‍हाडच कोसळली. त्या बेकायदेशीर व्यवसायात ढकलल्या गेल्या. त्यांची वाताहत झाली. त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी सरकारने झटकून टाकली. त्यांना पर्यायी रोजगार देण्याची गरज होती. त्यांना सन्मानाच्या व्यवसायाचं प्रशिक्षण देणं, त्यांचे बचतगट स्थापन करून त्यांना पर्यायी रोजंदारी मिळवून देणं हे या नैतिकतेच्या ठेकेदारांना गरजेचं वाटलं नाही.त्याच्यामतॆ ह्या मुली म्हणजे खलनायिका.तुमची मुलं बिघडू नयेत म्हणून यांचा जगण्याचा हक्क हिरावून घ्यायचा?
दुसरं म्हणजे, आयपीएल मध्ये ज्या चीअर गर्लस नाचतात ते नैतिक असतं? अनेक धार्मिक आणि सार्वजनिक कार्यक्रमात तरूणतरूणी जो हैदोस घालतात तो केवळ सभ्य असतो? तिथं नटनट्यांना नाचवणं प्रतिष्ठेचं कसं असतं? आर्केष्ट्रा बारच्या नावावर सद्ध्या जे काही चालूय ते सोज्वळ आहे?
तिसरी गोष्ट बारमधला डान्स बंद झाला तरी सगळे बार मात्र चालूच राहिले. देशी आणि विदेशी दारूची अधिकृत आणि अनधिकृत दुकानं, पब, थ्री आणि फाऊव्ह स्टार हाटेलं यात तरूण आणि बुजुर्ग पिढीचं जे काही वर्तन असतं त्यामुळं संस्कृती संवर्धनाला  हातभार लागतो? चौथी गोष्ट कला केंद्र, तमाशा, आर्केष्ट्रा, वाहिन्यांवरील रियालिटी शोज यातून जे चालतं त्यात आक्षेपार्ह काहीच नसतं का?
राज्याच्या संस्कृतीला न शोभणार्‍या, तरुणाईला चुकीच्या मार्गावर नेणार्‍या आणि कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचे कारण देऊन महाराष्ट्र सरकारने २००५ मध्ये "डान्स बार'वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी 'बॉम्बे पोलिस ऍक्‍ट'मध्ये बदल करण्यात आला होता. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या या धाडसी निर्णयाचं त्या वेळी सर्व थरांतून स्वागत करण्यात आलं होतं. या बंदीला "रेस्टॉरंट आणि बार' चालकांच्या संघटनेनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारचा निर्णय रद्दबातल ठरविला होता. या निर्णयाला राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. राज्य सरकारची याचिका दाखल करून घेताना सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या निर्णयाला तात्पुरती  स्थगितीही दिलेली होती. 'डान्स बार'च्या नावाखाली वेश्‍याव्यवसायाचं रॅकेट चालविलं जातं, तिथं होणारी बीभत्स नृत्यं समाजाच्या र्‍हासाला कारणीभूत आहेत, असा युक्तिवाद सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला होता; तसंच राज्यात परवाने असलेले 345 डान्स बार आहेत, तर 2500 डान्स बार हे अनधिकृतपणे चालत आहेत, अशीही माहिती सरकारनं न्यायालयात दिली होती. "डान्स बार'चालकांच्या वतीनं अनेक संघटनांनी न्यायालयात बाजू मांडली. "बॉम्बे पोलिस ऍक्‍ट'मधील दुरुस्ती बेकायदा असल्याचे उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे; तसंच लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्याचे कार्यक्रम करण्यास परवानगी असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलं आहे, असा युक्तिवाद "डान्स बार'चालकांच्या वतीनं करण्यात आला होता. "डान्स बारमध्ये सुमारे ७५ हजार बारबाला काम करतात. बंदीमुळ निर्माण झालेल्या आर्थिक चणचणीमुळं अनेक बारबालांनी आत्महत्या केली आहे. या महिलांपैकी 72 टक्के महिला विवाहित असून, 68 टक्के महिला या त्यांच्या घरातील एकमेव कमावत्या व्यक्ती आहेत. राज्य सरकारच्या निर्णयामुळे या सर्वांच्या पोटावर पाय देण्यात आला आहे,'' असाही युक्तिवाद बारचालकांद्वारे सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला.
या प्रकरणाच्या सर्व बाजूंचा अभ्यास करून डान्स बारवरील बंदी बेकायदा असल्याचं सरन्यायाधीश अल्तमस कबीर आणि न्या. एस. एस. निज्जर यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिलेला आहे. राज्य सरकारकडून परवाने घेऊन आता पुन्हा डान्स बार सुरू करता येणार आहेत.
"बारमध्ये मुली उदरनिर्वाहासाठी नाचत होत्या. बारवर बंदी आणल्यानं त्यांच्या रोजगाराच्या हक्‍कावरच गदा आणली होती. बारमध्ये नाचण्याचा पर्याय मुली का स्वीकारतात, यावर विचार करून मार्ग न काढता बारबंदीचा सरधोपट निर्णय घेण्यात आला होता असं बारगर्ल असोसिएशनच्या अध्यक्ष, वर्षा काळे यांचं म्हणणं आहे.
वेश्या व्यवसाय, दारूची दुकानं, गल्लाभरू उद्योग, हे सगळे फार गुंतागुंतीचे विषय आहेत. त्याची सरधोपट, उथळ आणि सोपी उत्तरं नेहमीच चकवा देतात. आपल्याला लोककलेचा फार मोठा वारसा आहे.त्याच्यावर कोट्यावधी लोकांचा उदरनिर्वाह चालतो. बारला ज्यांनी परवाने दिले त्यांनी सरकारला त्यातून महसूल मिळतो याचा विचार केला असणार. त्यातून पोलिस यंत्रणेला आणि राज्यकर्त्यांना मिळणार्‍या रसदीच्या वाटणीतून उद्भवलेल्या वादातून तर या कायद्याचा जन्म झाला नाहीना? त्यालाच नैतिकचा मुखवटा चिकटवून त्याचा गाजावाजा केला नाहीना? जर खरंच डान्सबार बंद करायचे होते तर कायद्यात अशी उघड विसंगती का ठेवली गेली?
ही बंदी आणता यावी यासाठी मुंबई पोलिस कायद्यात दुरूस्ती करण्यात आली.या कायद्याच्या कलम ३३ मध्ये अ आणि ब या पोटकलमांची २१जुलै २००५ रोजी भर घालण्यात आली.
कलम ३३ (अ) "सरकारकडे रेस्टॉरंट , परमीट रूम अथवा बीअर बार यांच्यातील डान्स प्रकारांबद्दल आलेल्या तक्रारींतून अशा ठिकाणी महिलांची प्रतिष्ठा व सार्वजनिक नीतिमत्ता यांचे हनन होत आहे. त्यामुळे अशा ठिकाणी डान्सला प्रतिबंध करण्यात येत आहे. त्याचे उल्लंघन केल्यास दोन लाख रुपये दंड अथवा तीन महिने शिक्षा अथवा दोन्ही शिक्षा देण्यात येतील."
कलम३३(ब)  "कलम ३३(अ) मधील प्रतिबंधात्मक तरतुदी ज्या ठिकाणी "एलिट" {प्रतिष्ठीत} लोक जातात त्या ड्रामा थिएटर, सिनेमा थिएटर,सभागृह,स्पोर्टस् क्लब अथवा जिमखाना, थ्री स्टार अथवा त्याहून अधिक दर्जाची हॉटेल्स,किंवा अन्य सांस्कृतिक उपक्रम यांना लागू नाहीत."
१५ आगस्ट २००५ पासून ही डान्सबार बंदी लागू झाली.१२ एप्रिल, २००६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. एफ. आय. रिबेलो व न्या. रोशन दळवी यांच्या खंडपीठानं राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे "डान्सबारवर बंदी व थ्रीस्टार हॉटेलात मात्र डान्सला अनुमती देण्याचा प्रकार भेदभाव करणारा" असल्याचे स्पष्ट करीत डान्सबारवरील बंदी बेकायदा ठरविली.
सरकारला लहान वयाच्या मुलींना या बारमध्ये नाचण्याला प्रतिबंध करण्यासाठी ज्युवेनाईल जस्टीस आक्ट वापरता आला असता. त्याठिकाणी वेश्या व्यवसाय चालत असेल तर विद्यमान अनैतिक मानवी व्यापार कायद्याअंतर्गत कारवाई करता आली असती.एव्हढे कायदे असताना एक नविन आणि तोही विसंगत कायदा करण्याची खरंच गरज होती का?
मात्र सरकार जर प्रस्थापित कायद्यांची अंमलबजावणी करायला  असमर्थ असेल तर मग सरकारनं कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामाचंही खाजगीकरण करायला काय हरकत आहे? नाहीतरी डान्सबार हे खाजगीकरणाचंच अपत्य आहे.त्यातून आलेली संपन्नता, चंगळवाद आणि चैनीच्या भ्रामक कल्पना यातून ह्या उद्योगाची भरभराट झालेली आहे.
खरंतर डान्सबारवर अधिक कठोर बंधनं घालून त्यांची आचारसंहिता लागू करता आली असती. मुळात बंदी हा उपाय सगळीकडेच चालतो की त्याचं कठोर नियमन करणं हा उपाय असतो? जगात हजारो वर्षे वेश्याव्यवसाय, मद्याचा व्यापार आणि कोठ्या आहेत.त्यावर बंदी आणून त्यांचा निपटारा करणं हे मानवी इतिहासात कधीही, कोणत्याही शासनसत्तेला शक्य झालेलं नाही. होणारही नाही.
डान्सबार चालवणं किंवा डान्सबार पुन्हा सुरू करणं हे काहीतरी समाजकार्य असल्याचा तोरा निरर्थक आहे. न्यायालयानं "डान्स बार'वरची बंदी उठवून काही उपकारक पाऊल उचललय असंही नाही. डान्स, दारू,चीयरगर्ल्स आणि वेश्याव्यवसाय यांचा सुटा विचार करून हा प्रश्न सोडवता येणार नाही एव्हढंच.
................................................................

Sunday, July 14, 2013

ज्ञानमार्गी - प्रा.शर्मिला रेगे

ज्ञानमार्गी
४८ वर्षे हे काही जाण्याचे वय नाही.प्रा.शर्मिला रेगे फारच अकाली गेल्या. जबरदस्त चटका लाऊन गेल्या. बाई मोठ्या धीराच्या. केन्सरने शरीर पोखरले तरी शेवटपर्यंत आजाराशी झुंजत राहिल्या. सदैव हसत, खेळत, कामात, लेखनात व्यग्र राहिल्या. कधीही भेटल्या की अत्यंत जिव्हाळ्याने बोलायच्या. अभिजात नम्रता, ऋजुता, सौजन्यशीलता आणि ज्ञानमग्नता ही शर्मिलाताईंची खरी ओळख! सतत हसतमुख आणि स्वागतशील.शर्मिला रेगे म्हणजे अहोरात्र ज्ञाननिर्मिती करण्यात बुडून गेलेली विदुषी.एक मिशनरी झील असलेली शिक्षिका.
दलित स्त्रीवादाचे सिद्धांतन, दलित स्त्रीवादी भूमीदृष्टी यांच्या तात्विक मांडणीचा मजबूत पाया त्यांनी घातला. विद्यापिठीय अभ्यासात हा विषय यावा यासाठी त्या झटल्या.देशातील अनेक विद्यापिठात तो त्यांच्यामुळे शिकवला जाऊ लागला.त्यांनीच तो ऎरणीवर आणून देशभर पोचवला.
पुणे विद्यापिठातील कर्मचार्‍यांच्या लहान मुलामुलींसाठी त्यांनी विद्यापिठाला पाळणाघर सुरू करायला लावले. त्याची निगुतीने काळजी घेतली.ते उत्तमरित्या सांभाळले.
त्या समाजशास्त्राच्या एम.ए., एम.फिल.पीएच.डी. होत्या.त्यांनी आपले पीएच.डी.चे संशोधन   " फ्रा‘म ए मेनस्ट्रीम सोशिओलोजी टू ए जेंडर सेंसेटिव्ह सोशिओलोजी" या विषयावर केलेले होते. त्यांचे " रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर,रिडींग दलित वुमेन्स टेस्टोमोनिज",                 "सोशिओलोजी आ‘फ जेंडर : दि च‘लेंज ओफ फेमिनिस्ट सोशिओलोजिकल नोलेज" हे ग्रंथ विद्वतमान्य ठरले होते. त्यांच्या दलित महिलाविषयक संशोधनाच्या गौरवार्थ त्यांना चेन्नई येथील राष्ट्रीय पातळीवरील "माल्कम आदिशेशैय" पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. त्यांनी पुणे विद्यापीठात आणि त्याआधी विविध महाविद्यालयात तसेच आय.आय.टी.पवई, येथे विविध पदांवर अध्यापनाचे सुमारे २३ वर्षे काम केले. त्यांचा जन्म ७ आक्टोबर १९६४ चा.
त्या पुणे विद्यापिठाच्या समाजशास्त्र विभागात प्राध्यापक आणि  प्रमुख होत्या. हा विषय त्यांच्या अपार जिव्हाळ्याचा आणि आवडीचा होता.विभागात त्या रमल्या होत्या. सावित्रीबाई आणि महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांच्या  विचारांवर बाईंची अपार निष्ठा. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालक प्रा. विद्युत भागवत निवृत झाल्यावर त्या केंद्राची उभारणी करण्यात त्यांच्यासोबत सदैव पुढे असलेल्या शर्मिलाताईंनी काय करावे? मला वाटत नाही, त्यांनी जे काही केले तसे उदाहरण संपूर्ण देशात दुसरे असेल म्हणून! त्यांनी त्या पदासाठी आपल्या प्राध्यापक पदाच्या पगारावर पाणी सोडले, पदाचा राजीनामा दिला  आणि त्या चक्क डिमोशन{पदावनती} स्विकारून रिडर{संचालक} बनल्या. आपल्या दरमहाच्या हजारो रूपयांच्या वेतनावर तळमळ आणि बांधिलकी असल्याशिवाय कोण सहजासहजी असे पाणी सोडील? विद्यापिठीय वर्तुळात मला तरी असे दुसरे उदाहरण माहित नाही.
जेएनयूचे प्रो.विवेककुमार यांना बाईंनी व्याख्यानासाठी निमंत्रित केले होते.त्यांची ओळख करून देताना  प्रास्ताविकात बाई त्यांच्या फुले आंबेडकरी आकलनावर  भरभरून बोलल्या. अशी दाद कोण देतो? ज्याचे मन मोठे आणि निर्मळ असते तोच. शर्मिलाताईंनी दुसर्‍याला दाद देताना कधीही हात आखडता घेतला नाही.एव्हढा जिंदादिलपणा विदुषी असूनही त्यांच्यात कुठून आला असावा?
जातीनिर्मुलनाचा विषय निघाला की, उठताबसता उच्चवर्णियांचा उद्धार करण्याची फेशन आजकाल जोरात आहे. विशेषत: ब्राह्मणांना चारदोन शिव्या हासडल्याशिवाय ह्या विषयावर बोलताच येत नाही अशी बहुतेकांची ठाम समजूत आहे. अर्थात तिथून सुरूवात करायची आणि पुढे तिथेच बैलाच्या घाण्यासारखे फिरत राहायचे, शेवटही तिथेच करायचा असे आजचे सामाजिक वास्तव आहे.रेगे ताई सारस्वत ब्राह्मण होत्या.त्यांनी अनुसुचित जाती,जमाती, भटके विमुक्त आणि ओबीसी मुलामुलींना स्वत:च्या पगारातून जेव्हढी आर्थिक मदत केली तेव्हढी संपुर्ण विद्यापिठातील आणखी कोणीही केली नसेल. भटकया विमुक्त चळवळीतील लेखक प्रा. वैजनाथ कळसे रत्नागिरीच्या त्यांच्या महाविद्यालयातून जातीय आकसातून निलंबित केले गेले. त्यांच्या मुलीच्या शिक्षणाचा सगळा भार बाईंनी उचलला.अशी असंख्य उदाहरणे सांगता येतील.ही कळकळ कुठून येते?
बाईंनी आंतरजातीय विवाह केलेला होता. बाई हाडाची शिक्षिका, वक्ता आणि लेखिका. मजबूत समाजशास्त्रज्ञ! सच्चा अकादमीशियन.शास्त्रशुद्ध अभ्यासात बाईंची चूक काढणे केवळ अशक्यच. सामाजिक चळवळींवर बाईंची अपार माया.दलित लेखिकांच्या संमेलनात प्रत्येकीच्या स्वागतात आणि मैत्रीत बाई त्यांच्या सखी-आप्तच झालेल्या.उर्मिला पवार, प्रज्ञा दया पवार, हिरा बनसोड, हिरा पवार सार्‍यांना बाईंचे असे अचानक जाणे चटका लावणारे.समकालीन स्त्रीवादाचा ज्ञानकोश म्हणजे शर्मिला.स्त्रीवादावर भक्कम मांड असूनही किंचितही पुरूषद्वेष्टी नसलेली, बहिणपणा आणि भाऊपणाचे प्रतिक असलेली शर्मिला! त्या माझ्या मित्र-तत्वज्ञ आणि मार्गदर्शक होत्या.
एन.सी.इ.आर.टी.ने त्यांचे २१ जानेवारी २००९ ला"सावित्रीबाई फुले मेमोरियल लेक्चर" या मालिकेत व्याख्यान ठेवले होते.त्या "एज्युकेशन अ‘ज तृतीय रत्न: टूवर्डस फुले आंबेडकराईट फेमिनिस्ट पेडागोजिकल प्राक्टीस’ या विषयावर छान बोलल्या.त्यांचे भाषण अभ्यासपूर्ण आणि तळमळीचे होते. एन.सी.इ.आर.टी प्रथेप्रमाणे त्याचे पुस्तक प्रकाशित करणार होते.संस्थेने त्या पुस्तकात समाविष्ट करण्यासाठी त्यांना सावित्रीबाईंचे चरित्र लिहायला सांगितले. त्यांचा सावित्रीबाईंवर खूप व्यासंग होता. तरिही त्या माझ्याकडे आल्या. म्हणाल्या, सर हे चरित्र तुम्ही लिहा." मी संकोचून गेलो. त्या विद्यापिठात मला सिनियर होत्या. मी हे प्रथेला सोडून असल्याचे सांगताच त्या म्हणाल्या या विषयातील तुमचा अधिकार मला माहित आहे. मी तुमची कोणतीही सबब ऎकून घेणार नाही." मी लिहिलेल्या सावित्रीबाईंच्या चरित्रासह त्त्यांचे हे पुस्तक एन.सी.इ.आर.टी.ने प्रकाशित केले. अशारितीने मला त्यांनी सहलेखक करून घेतले.
स्वत:ची जात सोडून बाहेर पडणे ही फार कठीण गोष्ट.खूपच  मोजक्या लोकांना हे जमले. देशातील "डीकास्ट" झालेल्या विनायकराव कुलकर्णी,  प्रा. राम बापट, प्रा. गं. बा. सरदार, भा.ल.भोळे  या ज्ञानवंतांच्या अभिमानास्पद मालिकेत त्यांच्या पंक्तीत बसणार्‍या शर्मिलाताई अशा अचानक जाव्यात हा निसर्गाचा फार मोठा अन्याय आहे.आज माझ्या नात्यातले, खूप जवळचे कुणीतरी गेल्याची उदासी मनात साकळून आलीय.
  सावित्रीबाईंच्या या लेकीला, त्यांचा वारसा पुढे चालवणार्‍या शर्मिलाताईंना अखेरचा निरोप देताना डोळ्यात आज आसवं आहेत. स्त्रीवाद आणि जातीव्यवस्था यांची मुलभूत मांडणी करणार्‍या या ज्ञानमार्गी विदुषीला मानाचा मुजरा. सामाजिक समतेचा  आणि स्त्रीवादाचा अस्सल उद्गार असणार्‍या शर्मिलाताईंना शोकग्रस्त मनाने विनम्र आदरांजली.
..............................................

Saturday, July 13, 2013

मी हिंदू राष्ट्रवादी"होय! मी हिंदू राष्ट्रवादी आहे!" या नरेंद्र मोदींच्या स्फोटक वक्तव्यांवर-मुलाखतीवर बरेच वादंग माजलेले आहे. ज्यांना गाडीखाली आलेल्या कुत्र्याच्या मृत्यूचे दु:ख आहे, त्यांना दंगलीत मारल्या गेलेल्या हजारो माणसांच्या हत्येबद्दल मात्र खेद नाही,खंत नाही हे फार दुर्दैवी आहे.मोदींनी देशातील हिंदू मतदारांचे दृवीकरण घडवून आणण्यासाठी या मुलाखतीचा चाणाक्षपणे वापर केलेला आहे.
मात्र विद्यमान सत्ताधारी आणि भाजप यांच्या आर्थिक,सामाजिक आणि धार्मिक दृष्टीकोनात मुलत: फारसा फरक नाही. दोघांची भाषा वेगळी असली तरी कृती एकच आहे.संघ परिवार उघड हिंदुत्ववादी आहे आणि सत्ताधारी छुपे! सत्ताधारी ज्या अल्पसंख्यांक मतदारांच्या व्होट बांकेसाठी सर्वधर्म समभावाचे तुणतुणे वाजवतात ते त्यांच्या विकासासाठी काय करतात? हिंदुत्ववादी हिंदू असलेल्या अनुसुचित जाती,जमाती, इमाव यांच्याप्रति कोणती बांधिलकी दाखवतात? सारेच दिखाऊ, सारेच दांभिक! मतांसाठी हिशोब करून तोंडाळपणा करणारे...लबाड आणि धूर्त! मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर हा यांचा सनातन खेळ! हे जनता कधी ओळखणार?

Wednesday, July 3, 2013

संगिता....

     पत्नीबद्दल काही लिहिणे ही लेखनातील फार कसोटीची जागा असते.मामला नाजूक असतो. संवेदनशील असतो. बर्‍याचवेळा खोटेखोटे कौतुक करून वेळ मारून नेली जाते. "मी आज जो काही आहे तो तिच्यामुळे आहे", असे म्हणायची पद्धत पूर्वसुरींनी पाडून ठेवलेली असते. "तिने घर सांभाळले म्हणून मी हे सारे करू शकलो," अशा शब्दांत जे सांगितले जाते ते खरेही असते. तथापि ते खूप औपचारिक असते. अपुरे असते.
      लष्कराच्या भाकरी भाजणारे आम्ही भाषणाळू "वाणी समाजाचे" नवरेलोक बाहेर जोरदार राणा भीमदेवी भाषणे ठोकू, पण बायकोच्या अपार काबाडकष्टाचे, तिच्या अजोड मेहनतीचे वर्णन करायची वेळ आली की आम्हाला शब्दच सापडत नाहीत. ते कुठे पळून जातात ते काही समजत नाही. बायको समविचारी असेल, समर्थपणे घर उभे करणारी असेल, सामाजिक कामांबद्दल तिची कूरकूर नसेल उलट तिला त्याचे कौतुकच असेल तर त्यामुळे किती उर्जा मिळते, ती कृतज्ञता  नेमक्या शब्दात व्यक्त करणे सोपे नाही.
आमचा आंतरजातीय प्रेमविवाह.लग्न झाले तेव्हा संगिता शिकत होती. मी टेल्कोत पूर्णवेळ नोकरी करून विद्यापिठात शिकत होतो.त्याचवेळी सामाजिक चळवळीत गर्क होतो.लेखन,मोर्चे,भाषणे सारे कसे जोषात होते.नाना उद्योग चालू असायचे. स्वत:च्या आजच्या या धडपडीचे/ यशाचे आणि  पुरस्कारांचे श्रेय संगिताला मन:पुर्वक देताना असे असंख्य प्रसंग आठवतात.
     सुमारे २० वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. पुण्यातील गंजपेठ परिसरातील महात्मा फुले यांच्या राहत्या घराची अतिशय दुरावस्था झालेली होती. २०वर्षे अनेक प्रयत्न करूनही फक्त कोरड्या आश्वासनापलीकडे काहीही घडत नव्हते.शिवसेनेतून नुकतेच सत्ताधारी कांग्रेस पक्षात प्रवेश करून मंत्री झालेल्या छगन भुजबळ यांची मी फुलेवाड्याला भेट घडवून आणली. आणि चमत्कार झाला. वर्षानुवर्षे रखडलेल्या कामांना त्यांनी गती दिली. फुलेवाड्या्च्या परिसराचा कायापालट करून त्याचे "राष्ट्रीय स्मारक" विकसित करण्याच्या निर्धाराने ते कामाला लागले. पुण्यातील आम्हा मंडळींवर देखरेखीच्या आणि पुणे मनपा, जिल्हा प्रशासन आणि पुरातत्व विभाग यांच्या समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. रात्रंदिवस काम चालू होते. राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी राष्ट्रार्पण समारंभाला यायचे मान्य केले होते. वेळ थोडा आणि कामे अनंत होती.
आमच्या मुलीचा, प्रमितीचा नुकताच जन्म झालेला होता.मी रात्रंदिवस वाड्यावर आणि कार्यक्रमाच्या धावपळीत अडकलेलो होतो. समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते माझ्या "महात्मा फुले :साहित्य और विचार" या ग्रंथाचे प्रकाशन व्हायचे होते. छपाईची लगीनघाई चालू होती. घरात संगिता आणि प्रमितीला मी वेळच देऊ शकत नव्हतो. एके दिवशी दुपारी मुलीसाठी दूध आणायला संगिता स्वयंपाकघरात चाललेली असताना ओल्या फरशीवरून तिची स्लीपर घसरली आणि आणि ती पडली. तिच्या मांडीचे हाड मोडल्याने तिला उठताही येत नव्हते.खूप कळा येत होत्या. घरात मदतीसाठी कोणीही नव्हते. त्याकाळात मोबाईल नव्हते. सुदैवाने घरात फोन होता. आणि तो तिच्या हाताजवळच होता.तिने आमचे फ‘मिली डा‘क्टर संभूस यांना फोन केला.त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने धाव घेतली. आमच्या घराची एक किल्ली शेजार्‍यांकडॆ असायची. त्यांच्याकडून ती घेवून डा‘क्टरांनी फ्ल‘टचा दरवाजा उघडला. अपघात खूप गंभीर होता. त्यांनी तातडीने रूग्णवाहीका मागवली आणि संगिताला दवाखान्यात नेले. मांडीच्या हाडाचा चुरा झालेला होता. तात्काळ उपचार सुरू झाले. घटना घडल्यापासून पुढे २४ तास झाले तरी मला याचा पत्ताच नव्हता.
  प्रमिती ३ महिन्यांचीही नव्हती. स्कूटरवरून तिला संगिताकडे दूध प्यायला दवाखान्यात नेणे आणणे फार त्रासदायक होते. दवाखना छोटा असल्याने तेथे बाळाला ठेवण्याची सोयही नव्हती. या काळात संगिता शारिरीक वेदना,एकटेपणा,प्रमितीची उपासमार  या सार्‍या मानसिक कळा सोशित होती.मला पेशंटकडे आणि बाळाकडे बघायला वेळच नव्ह्ता.
राष्ट्रपतींचा फुलेवाड्याचा कार्यक्रम होईपर्यंत सुमारे आठवडाभर मी बाहेरच होतो.कार्यक्रम डोळ्याचे पारणे फेडणारा झाला.
   संगिताची फार मोठी शस्त्रक्रिया करावी लागली.आजाराचे निदान झालेच नाही. साधे पडल्याचे निमित्त होऊन हाडाचा चुरा कसा झला याचा उलगडा डा‘क्टरांना झालाच नाही.दरम्यान पुढे लवकरच आणखी दोन वेळा हाडे मोडण्याची  पुनरावृती झाली. हाडांची शस्त्रक्रिया आधीच तापदायक, सक्तीची बेडरेस्ट, घरात लहान बाळ, आणि या सगळ्या काळात मदतीसाठी नवर्‍याचा घरात पत्ता नाही, असे दिवस संगिताने कसे काढले ते तिचे तिला माहित.
   मी सामाजिक चळवळीचे काम, टेल्कोची नोकरी आणि लेखन यात व्यस्त होतो. जंगजंग पछाडूनही आजाराचे कारण मात्र समजत नव्हते. सुप्रसिद्ध अस्थीरोगतज्ञ डा‘. नारायणराव कर्णे यांनी देशविदेशातील तज्ञांचा सल्ला घेऊन शेवटी आम्हाला मुंबईला के.ई.एम.मध्ये डा‘.मेनन आणि डा‘.रवी बापट यांच्याकडे पाठवले. बापटसरांनी मात्र हाडे सतत मोडण्याचे कारण तात्काळ शोधून काढले आणि शस्त्रक्रिया करून संगिताला या आजारातून बरे केले.
    डा‘.रवी बापट माझ्या पुस्तकांचे/ साहित्याचे वाचक होते. त्यांच्याकडून माझ्या लेखनाचे कौतुक ऎकताना संगिताचा माझ्यावरचा आजारपणातला राग काहीसा निवळला असावा....

                                                                                                                            क्रमश:......
                                                                                                                         
मराठी भाषेचे पुढील २५ वर्षांचे धोरण काय असावे?

गेले दोन दिवस पुण्यात राज्य शासनाच्या " मराठी भाषा सल्लागार समितीच्या " बैठका झाल्या.प्रा. नागनाथ कोत्तापल्ले अध्यक्षस्थानी होते. बैठकीला प्रा. सदानंद मोरे, लक्ष्मीकांत तांबोळी, विश्वनाथ शिंदे, प्रल्हाद लुलेकर,श्रीकांत तिडके, अनिल गोरे, दादा गोरे, संजय गवाणे, प्रमोद मूनघाटे,सतिष काळसेकर आदी मान्यवर साहित्यिक उपस्थित होते. बैठका सकाळी ११ते सायंकाळी ६ अशा चालल्या.सरकारने पुढील २५ वर्षांचे मराठीच्या विकासाबाबतचे धोरण ठरविण्यासाठी शिफारशी करण्याचे महत्वाचे काम या समितीकडे सोपवले आहे.समितीला ३वर्षांपुर्वी हे काम सरकारने सोपवले होते.सुरुवातीची २ वर्षे काही कारणांमुळे समितीचे कामकाज बंद होते. गेले वर्षभर कोत्तापल्लेसरांकडे समितीचे अध्यक्षपद आल्यानंतर कामाला गती आली.आज समितीचा शेवटचा दिवस होता. 
समितीने मार्च ते जून महिन्यात राज्यातील प्रमुख भाषातज्ञ, साहित्यिक, साहित्य संस्था आणि मराठीप्रेमी वाचक यांच्याशी याबाबत संवाद साधण्यासाठी राज्यभरात ६ बैठका घेतल्या होत्या. मुंबई, नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद आणि पुण्यात झालेल्या या संवाद सभांना सुमारे ३५०ते ४०० जाणकारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून अनेक सुचना,उपाययोजना आणि उपक्रम सुचवले. अनेकांनी लेखी निवेदनांद्वारे आपले म्हणणे सादर केले. काही फार उत्तम शोधनिबंध यानिमित्ताने समितीकडे आले. या सगळ्यांची तपशीलवार चर्चा करून त्याची वर्गवारी आणि नोंद बैठकीत करण्यात आली.आलेल्या सर्व माहितीच्या आधारे एक मसूदा {अहवाल} तयार करण्यासाठी एका मसूदा उपसमितीकडे जबाबादारी सोपविण्यात आली.या उपसमितीत स्वत: श्री. कोत्तापल्ले, वसंत आबाजी डहाके, माधवी वैद्य,विलास खोले, विश्वनाथ शिंदे,दत्ता भगत या मान्यवरांसोबत काम करण्याची संधी मला देण्यात आल्याचा आनंद आहे.
मराठी भाषा संकटात असताना तिचा र्‍हास थांबवण्यासाठी भाषातज्ञ, मराठी भाषक आणि सरकार यांनी काय करायला हवे याबाबत च्या आपल्या सुचना आम्हाला हव्या आहेत. आपला भाषक भूतकाळ. वर्तमानातील समस्या,अतिक्रमणे आणि भविष्यातील मराठीपुढील आव्हाने पेलण्यासाठी करावयाच्या तरतुदी, धोरणे आणि संकल्पांबाबतची आपली मते अवश्य कळवावीत.......प्रतिक्षेत...

: बालभारती : अवघे १९ कोटी..

दरवर्षी शाळा सुरू होताना बालभारती आणि पाठ्यपुस्तके यावर चर्चा रंगते. काही चर्चा विधायक आणि पथदर्शक असते.पाठ्यपुस्तकातील गंभीर चुका दाखवून देणारांचे अभिनंदन. मात्र अनेकदा पुस्तकात कायकाय असायला हवे होते त्याबद्दलच्या अपेक्षा व्यक्त केल्या जातात. अपेक्षा म्हणजे चुका किंवा उणीवा नव्हेत. सर्वांचे समाधान करणे हे अशक्यप्राय होय. बालभारतीच्या कामाचे जगड्व्याळ स्वरूप माहित नसल्यानेही अज्ञानातून टिका केली जाते.मिठमसाला लाऊन वादंग रंगवले जाते. उबवले नी वाढवले जाते. 
मधुकरराव चौधरी हे शिक्षणमंत्री असताना बालभारतीची स्थापना करण्यात आली. त्यापुर्वी शालेय पाठ्यपुस्तके लिहून घेणे आणि प्रकाशित करणे हा सगळा व्यवसाय खाजगी प्रकाशकांच्या ताब्यात होता. त्यात चांगले उत्पन्न असल्याने हे सगळे लोक नाराज होणे स्वाभाविक होय.आजही पुन्हा हे उत्पन्न देणारे काम त्यांना मिळावे असे वाटणे, त्यासाठी त्यांनी प्रयत्न करणे हे समजून घेतले पाहिजे. हा जिव्हाळ्याचा आणि संवेदनशील विषय असल्याने माध्यमांनाही यात विशेष रस असणे स्वाभाविकच होय.
सद्ध्या दरवर्षी बालभारती किती पुस्तके छापते? आपल्याला काय वाटते?
फक्त १९ कोटी {एकोणीस कोटी}
यात ८ भाषांची सुमारे ९५० वेगवेगळी टायटल्स असतात. एव्हढी पुस्तके छापताना एखाद्या पुस्तकात {प्रतीमध्ये} बांधणी,छपाई,आदींमध्ये दोष राहणे याचा जेव्हा बाऊ केला जातो तेव्हा वाईट वाटते. विधायक टिकेचे स्वागतच केले पाहिजे.मात्र वितंडवाद आणि हितसंबंधाचे राजकारण आपण टाळायला नको का?
आपली ही पुस्तके देशातील आणि देशाबाहेरीलही काही संस्था वापरतात.
यावर्षी तिसरी,पाचवी आणि सातवी यांचा अभ्यासक्रम बदण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या महिन्यात हे काम सुरू झाले. जून २०१४ मध्ये ही नवी पुस्तके अभ्यासक्रमात शिकवायला सुरूवात होईल.
इतिहासाची ही नवी पाठ्यपुस्तके तयार करण्याच्या गटात आ.ह.साळुंखे, सदानंद मोरे,गोविंद पानसरे, संभाजी भगत,अ.का.मुकादम, प्रशांत सुरूडकर, गणेश राऊत आदींच्या सोबत काम करण्याची मलाही संधी मिळालेली आहे. काम वेगाने सुरू आहे.
नमुना पुस्तक तयार झाल्यावर ते वेबसाईट वर टाकले जाईल आणि नागरिकांच्या सुचना मागवल्या जातील.
आपण जर पालक, शिक्षक किंवा शिक्षणप्रेमी असाल आणि आपल्याला या विषयात रस असेल तर, सातवीच्या "मध्ययुगीन भारताचा इतिहास " या नव्या पुस्तकासाठीच्या आपल्या अभ्यासपूर्ण सुचनांचे स्वागत आहे....