"होय! मी हिंदू राष्ट्रवादी आहे!" या नरेंद्र मोदींच्या स्फोटक वक्तव्यांवर-मुलाखतीवर बरेच वादंग माजलेले आहे. ज्यांना गाडीखाली आलेल्या कुत्र्याच्या मृत्यूचे दु:ख आहे, त्यांना दंगलीत मारल्या गेलेल्या हजारो माणसांच्या हत्येबद्दल मात्र खेद नाही,खंत नाही हे फार दुर्दैवी आहे.मोदींनी देशातील हिंदू मतदारांचे दृवीकरण घडवून आणण्यासाठी या मुलाखतीचा चाणाक्षपणे वापर केलेला आहे.
मात्र विद्यमान सत्ताधारी आणि भाजप यांच्या आर्थिक,सामाजिक आणि धार्मिक दृष्टीकोनात मुलत: फारसा फरक नाही. दोघांची भाषा वेगळी असली तरी कृती एकच आहे.संघ परिवार उघड हिंदुत्ववादी आहे आणि सत्ताधारी छुपे! सत्ताधारी ज्या अल्पसंख्यांक मतदारांच्या व्होट बांकेसाठी सर्वधर्म समभावाचे तुणतुणे वाजवतात ते त्यांच्या विकासासाठी काय करतात? हिंदुत्ववादी हिंदू असलेल्या अनुसुचित जाती,जमाती, इमाव यांच्याप्रति कोणती बांधिलकी दाखवतात? सारेच दिखाऊ, सारेच दांभिक! मतांसाठी हिशोब करून तोंडाळपणा करणारे...लबाड आणि धूर्त! मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर हा यांचा सनातन खेळ! हे जनता कधी ओळखणार?
ho sir aagdi khare ahe
ReplyDelete