ज्ञानमार्गी
४८ वर्षे हे काही जाण्याचे वय नाही.प्रा.शर्मिला रेगे फारच अकाली गेल्या. जबरदस्त चटका लाऊन गेल्या. बाई मोठ्या धीराच्या. केन्सरने शरीर पोखरले तरी शेवटपर्यंत आजाराशी झुंजत राहिल्या. सदैव हसत, खेळत, कामात, लेखनात व्यग्र राहिल्या. कधीही भेटल्या की अत्यंत जिव्हाळ्याने बोलायच्या. अभिजात नम्रता, ऋजुता, सौजन्यशीलता आणि ज्ञानमग्नता ही शर्मिलाताईंची खरी ओळख! सतत हसतमुख आणि स्वागतशील.शर्मिला रेगे म्हणजे अहोरात्र ज्ञाननिर्मिती करण्यात बुडून गेलेली विदुषी.एक मिशनरी झील असलेली शिक्षिका.
दलित स्त्रीवादाचे सिद्धांतन, दलित स्त्रीवादी भूमीदृष्टी यांच्या तात्विक मांडणीचा मजबूत पाया त्यांनी घातला. विद्यापिठीय अभ्यासात हा विषय यावा यासाठी त्या झटल्या.देशातील अनेक विद्यापिठात तो त्यांच्यामुळे शिकवला जाऊ लागला.त्यांनीच तो ऎरणीवर आणून देशभर पोचवला.
पुणे विद्यापिठातील कर्मचार्यांच्या लहान मुलामुलींसाठी त्यांनी विद्यापिठाला पाळणाघर सुरू करायला लावले. त्याची निगुतीने काळजी घेतली.ते उत्तमरित्या सांभाळले.
त्या समाजशास्त्राच्या एम.ए., एम.फिल.पीएच.डी. होत्या.त्यांनी आपले पीएच.डी.चे संशोधन " फ्रा‘म ए मेनस्ट्रीम सोशिओलोजी टू ए जेंडर सेंसेटिव्ह सोशिओलोजी" या विषयावर केलेले होते. त्यांचे " रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर,रिडींग दलित वुमेन्स टेस्टोमोनिज", "सोशिओलोजी आ‘फ जेंडर : दि च‘लेंज ओफ फेमिनिस्ट सोशिओलोजिकल नोलेज" हे ग्रंथ विद्वतमान्य ठरले होते. त्यांच्या दलित महिलाविषयक संशोधनाच्या गौरवार्थ त्यांना चेन्नई येथील राष्ट्रीय पातळीवरील "माल्कम आदिशेशैय" पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. त्यांनी पुणे विद्यापीठात आणि त्याआधी विविध महाविद्यालयात तसेच आय.आय.टी.पवई, येथे विविध पदांवर अध्यापनाचे सुमारे २३ वर्षे काम केले. त्यांचा जन्म ७ आक्टोबर १९६४ चा.
त्या पुणे विद्यापिठाच्या समाजशास्त्र विभागात प्राध्यापक आणि प्रमुख होत्या. हा विषय त्यांच्या अपार जिव्हाळ्याचा आणि आवडीचा होता.विभागात त्या रमल्या होत्या. सावित्रीबाई आणि महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर बाईंची अपार निष्ठा. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालक प्रा. विद्युत भागवत निवृत झाल्यावर त्या केंद्राची उभारणी करण्यात त्यांच्यासोबत सदैव पुढे असलेल्या शर्मिलाताईंनी काय करावे? मला वाटत नाही, त्यांनी जे काही केले तसे उदाहरण संपूर्ण देशात दुसरे असेल म्हणून! त्यांनी त्या पदासाठी आपल्या प्राध्यापक पदाच्या पगारावर पाणी सोडले, पदाचा राजीनामा दिला आणि त्या चक्क डिमोशन{पदावनती} स्विकारून रिडर{संचालक} बनल्या. आपल्या दरमहाच्या हजारो रूपयांच्या वेतनावर तळमळ आणि बांधिलकी असल्याशिवाय कोण सहजासहजी असे पाणी सोडील? विद्यापिठीय वर्तुळात मला तरी असे दुसरे उदाहरण माहित नाही.
जेएनयूचे प्रो.विवेककुमार यांना बाईंनी व्याख्यानासाठी निमंत्रित केले होते.त्यांची ओळख करून देताना प्रास्ताविकात बाई त्यांच्या फुले आंबेडकरी आकलनावर भरभरून बोलल्या. अशी दाद कोण देतो? ज्याचे मन मोठे आणि निर्मळ असते तोच. शर्मिलाताईंनी दुसर्याला दाद देताना कधीही हात आखडता घेतला नाही.एव्हढा जिंदादिलपणा विदुषी असूनही त्यांच्यात कुठून आला असावा?
जातीनिर्मुलनाचा विषय निघाला की, उठताबसता उच्चवर्णियांचा उद्धार करण्याची फेशन आजकाल जोरात आहे. विशेषत: ब्राह्मणांना चारदोन शिव्या हासडल्याशिवाय ह्या विषयावर बोलताच येत नाही अशी बहुतेकांची ठाम समजूत आहे. अर्थात तिथून सुरूवात करायची आणि पुढे तिथेच बैलाच्या घाण्यासारखे फिरत राहायचे, शेवटही तिथेच करायचा असे आजचे सामाजिक वास्तव आहे.रेगे ताई सारस्वत ब्राह्मण होत्या.त्यांनी अनुसुचित जाती,जमाती, भटके विमुक्त आणि ओबीसी मुलामुलींना स्वत:च्या पगारातून जेव्हढी आर्थिक मदत केली तेव्हढी संपुर्ण विद्यापिठातील आणखी कोणीही केली नसेल. भटकया विमुक्त चळवळीतील लेखक प्रा. वैजनाथ कळसे रत्नागिरीच्या त्यांच्या महाविद्यालयातून जातीय आकसातून निलंबित केले गेले. त्यांच्या मुलीच्या शिक्षणाचा सगळा भार बाईंनी उचलला.अशी असंख्य उदाहरणे सांगता येतील.ही कळकळ कुठून येते?
बाईंनी आंतरजातीय विवाह केलेला होता. बाई हाडाची शिक्षिका, वक्ता आणि लेखिका. मजबूत समाजशास्त्रज्ञ! सच्चा अकादमीशियन.शास्त्रशुद्ध अभ्यासात बाईंची चूक काढणे केवळ अशक्यच. सामाजिक चळवळींवर बाईंची अपार माया.दलित लेखिकांच्या संमेलनात प्रत्येकीच्या स्वागतात आणि मैत्रीत बाई त्यांच्या सखी-आप्तच झालेल्या.उर्मिला पवार, प्रज्ञा दया पवार, हिरा बनसोड, हिरा पवार सार्यांना बाईंचे असे अचानक जाणे चटका लावणारे.समकालीन स्त्रीवादाचा ज्ञानकोश म्हणजे शर्मिला.स्त्रीवादावर भक्कम मांड असूनही किंचितही पुरूषद्वेष्टी नसलेली, बहिणपणा आणि भाऊपणाचे प्रतिक असलेली शर्मिला! त्या माझ्या मित्र-तत्वज्ञ आणि मार्गदर्शक होत्या.
एन.सी.इ.आर.टी.ने त्यांचे २१ जानेवारी २००९ ला"सावित्रीबाई फुले मेमोरियल लेक्चर" या मालिकेत व्याख्यान ठेवले होते.त्या "एज्युकेशन अ‘ज तृतीय रत्न: टूवर्डस फुले आंबेडकराईट फेमिनिस्ट पेडागोजिकल प्राक्टीस’ या विषयावर छान बोलल्या.त्यांचे भाषण अभ्यासपूर्ण आणि तळमळीचे होते. एन.सी.इ.आर.टी प्रथेप्रमाणे त्याचे पुस्तक प्रकाशित करणार होते.संस्थेने त्या पुस्तकात समाविष्ट करण्यासाठी त्यांना सावित्रीबाईंचे चरित्र लिहायला सांगितले. त्यांचा सावित्रीबाईंवर खूप व्यासंग होता. तरिही त्या माझ्याकडे आल्या. म्हणाल्या, सर हे चरित्र तुम्ही लिहा." मी संकोचून गेलो. त्या विद्यापिठात मला सिनियर होत्या. मी हे प्रथेला सोडून असल्याचे सांगताच त्या म्हणाल्या या विषयातील तुमचा अधिकार मला माहित आहे. मी तुमची कोणतीही सबब ऎकून घेणार नाही." मी लिहिलेल्या सावित्रीबाईंच्या चरित्रासह त्त्यांचे हे पुस्तक एन.सी.इ.आर.टी.ने प्रकाशित केले. अशारितीने मला त्यांनी सहलेखक करून घेतले.
स्वत:ची जात सोडून बाहेर पडणे ही फार कठीण गोष्ट.खूपच मोजक्या लोकांना हे जमले. देशातील "डीकास्ट" झालेल्या विनायकराव कुलकर्णी, प्रा. राम बापट, प्रा. गं. बा. सरदार, भा.ल.भोळे या ज्ञानवंतांच्या अभिमानास्पद मालिकेत त्यांच्या पंक्तीत बसणार्या शर्मिलाताई अशा अचानक जाव्यात हा निसर्गाचा फार मोठा अन्याय आहे.आज माझ्या नात्यातले, खूप जवळचे कुणीतरी गेल्याची उदासी मनात साकळून आलीय.
सावित्रीबाईंच्या या लेकीला, त्यांचा वारसा पुढे चालवणार्या शर्मिलाताईंना अखेरचा निरोप देताना डोळ्यात आज आसवं आहेत. स्त्रीवाद आणि जातीव्यवस्था यांची मुलभूत मांडणी करणार्या या ज्ञानमार्गी विदुषीला मानाचा मुजरा. सामाजिक समतेचा आणि स्त्रीवादाचा अस्सल उद्गार असणार्या शर्मिलाताईंना शोकग्रस्त मनाने विनम्र आदरांजली.
..............................................
आदरणीय सर, खूप हृदयस्पर्शी लेखन.. रेगे मॅडमच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष पैलू आपण अगदी नेमक्या शब्दांत मांडले आहेत. मॅडमविषयी इतकी सविस्तर माहिती खरंच मला नव्हती. आपल्यामुळं ती झाली.. पण आता खूप उशीर झालाय.. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
ReplyDeleteFROM: FACEBOOK............
ReplyDeleteChandrakant Puri
डॉ. शर्मिला रेगे यांच्या निधनाची बातमी खूपच दुख:दायक आहे. एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या 'Centre for Study of Social Exclusion and Inclusive Policy' चा संस्थापक संचालक म्हणून काम करत असताना डॉ. रेगे यांचा माझा संपर्क झाला. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या प्रतिनिधी म्हणून सल्लागार समितीवर त्यांची नियुक्ती झाल्या नन्तर मी लगेच त्यांना फोन करून अभिनंदन केले आणि त्यानंतर सदर केंद्राचे नवीन अभ्यास क्रम असो वा महत्वाचे निर्णय, आमचा संवाद सुरूच होता. एकदा प्रत्यक्ष भेट व्हावी म्हणून टी आय एस.एस. च्या डॉ.आंबेडकर स्मृती व्याख्यान मालेत त्यांना भेटायला गेलो आणि त्यांचे भाषण ऐकून खूप प्रभावित झालो. स्त्रीवाद असो किवा आंबेडकर वाद -दोन्हीवर सारखाच प्रभाव असणाऱ्या त्या 'दुर्मिळ विचारवंत होत्या'. अशा तरुण स्त्री विचारवंताचा अकाली मृत्यू दुर्दैवी म्हणावा लागेल. त्यांच्या कार्यास आणि स्मृतीस माझी श्रद्धांजली. डॉ. चंद्रकांत पुरी, अध्यासन प्राध्यापक, राजीव गांधी समकालीन अध्ययन केंद्र, मुंबई विद्यापीठ. chandrakant.puri@gmail.com
Ashwini Satav-Doke, Prabhakar Jadhav, Bhushan Lokmitra and 28 others like this.
ReplyDeleteSanjay Jadhav आदरांजली !!!!!!
Yesterday at 7:52am · Like
Bsp Gbnagar aadaranjali......
Yesterday at 8:44am · Like
Hanamant Atkare From we too.
Yesterday at 9:04am · Like
Shyam Tarke आदरांजली !!!!!
Yesterday at 9:20am · Like
Ravindra Khanande भावपूर्ण श्रद्धांजली....
Yesterday at 9:46am · Like
Keshav Tupe Rege madam yanni samajik shassranmadhe khup mahattvapurna kam kele. Aani ajunahi barech mulbhut kam tyanchya hatun zale aste. Parantu kal tyanna khup lavakar gheun gela.
Yesterday at 9:57am via mobile · Like
Vilas Tekale शर्मिला रेगे यांना भावपूर्ण आदरांजली !!!!!!
Yesterday at 10:35am · Like
Sachin Dhaije its too sad.to pay homage
Yesterday at 10:36am · Like
Suniti Dharwadkar Bhavpourna adaranjalee!
Yesterday at 11:06am · Like
Sunil Dabade Shradhanjali.......
Yesterday at 11:39am · Like
Vasant Dahake very sad news
Yesterday at 12:27pm · Like
Pankaj Panachand Gandhi Aadaranjali!
Yesterday at 12:31pm · Like
Susan Elizabeth Dhavle Please carry on her work, which is the best tribute to her.....a great Ambedkarite....
Yesterday at 2:20pm via mobile · Like
Vijay Tunte it is very bad news ,she was good author of Maharashtara
Yesterday at 3:18pm · Like
Balaji Raut May her soul rest in peace
Yesterday at 3:38pm · Like
Shridhar Kolhe Good author lost by Maharashtra.
Yesterday at 5:14pm · Like
Harshad Kolwankar rip
23 hours ago · Like
Sandeep Bansode LOST MAHARASHRTA A GOOD AUTHOR, ITS A BAD FOR US
23 hours ago · Like
Chandrakant Baviskar When we loose such a special person in our life, time seems to stop.
22 hours ago · Like
Vidya Ingole भावपूर्ण आदरांजली ....
22 hours ago · Like
Avinash Shinde Realy lost such a gr8 author
21 hours ago · Edited · Like
Vijay Thakur bhavpurn shradhanjali
21 hours ago · Like
Suresh Bhusari we lost great scholar of our time. Very untimely death.
21 hours ago · Like
Bhagwan Kesbhat Its Sad demise, RIP
20 hours ago · Like
Shekhar Ghungarwar इनकि हमें याद हामेशा आती रहेंगी
हामारा आखरी सलाम
20 hours ago via mobile · Like
Ganesh Pitekar मॅडम, खूप काही तुम्ही आम्हा विद्यार्थ्यांना शिकवले.
20 hours ago · Like
Priyraj Maheshkar very sad news
20 hours ago · Like
Rajashree Pagare sabbe asta sukhi hontu
19 hours ago · Like
Unmesh Ekanath Amrute shraddhanjali........
19 hours ago · Like
Bhavana Dhabre Great women .... shrddhanjali .
17 hours ago · Like
Motiram Katare Bhavpunra adaranjali
10 hours ago · Like
Rahul Kosambi Bhavpurna Aadaranjali.
7 hours ago · Like
Rajeev Sadan no words to legend lady...
7 hours ago · Like
Ravindra R Pandharinath Untimely and extremely sad...
6 hours ago · Like
Mohan Deshpande We really needed her for a much longer time as a fellow traveler.. on the path of the struggle.
6 hours ago · Like
Amit Wadekar This is to inform all that a meeting will be held in the memory of Dr. Sharmila Rege at the Namdev Sabha Griha of Pune University on Monday, 15th July (today) at 4:00 PM, organized by the University of Pune.
4 hours ago · Like
Satish Sirsath, Sculptor Vijay Burhade Shilpkar, Madhavi Kamble and 27 others like this.
ReplyDeletePratima Joshi अकाली आणि अनपेक्षित मृत्यू
Saturday at 8:42pm · Like
Prakash Dandge Yes ! You are right ! I remember her teaching sociology of women ! Way back in 1990-1992 !!! She even gave book marks as parting gifts to students! With warm regards...
Saturday at 8:46pm via mobile · Like
Santishree Pandit It is indeed a great loss, her death has left a void.
Saturday at 8:49pm · Like
Prakash Dandge Shocking.... after writing earlier post came to know about her passing away.... she was a balanced and mature personality. ..a good human being. ...a calm and composed soul...well studied and in depth in teaching.... rest in peace. ..sharmila mam....you will remain in our hearts ......forever...
Saturday at 9:10pm via mobile · Like · 3
Vijay Dattatraya Mandake Anpekshit ghadale. Bhavpurn aadranjali.
Saturday at 10:16pm · Like · 1
Daya Wagh RIP
Saturday at 10:42pm · Like
Yogesh Wagh RIP
Saturday at 11:16pm via mobile · Like
Subodh Wagle Great Loss for All of Us !
Saturday at 11:43pm · Like · 1
Amogh Gaikwad RIP
Yesterday at 1:08am · Like
Anand Pawar Lost a feminist scholer..a great human being..a loving friend
Yesterday at 2:12am via mobile · Like · 2
Satish Sirsath RIP
7 hours ago · Like
Sadhana Shrinivas Khati We all miss you,its a great lost of women's movement.
4 hours ago · Like
Suresh Khole, Balkrishna Renake and 2 others like this.
ReplyDeleteAvinash Pandit R I P
Yesterday at 9:45am · Like
Amogh Gaikwad R I P
Yesterday at 9:59am · Like
Balkrishna Renake Shraddhanjalee
Yesterday at 2:42pm · Like
Swarup Jankar, Nikhil Bhalerao, Suraj Pawar and 11 others like this.
ReplyDeleteSanjay Sonawani RIP
Yesterday at 9:31am · Like
Sanjay Samant RIP
Yesterday at 10:21am via mobile · Like
Arvind Poharkar श्रद्धांजली
Yesterday at 10:23am · Like
Vinay Kate RIP
Yesterday at 10:30am · Like
Sandesh Wagh So sad
Yesterday at 10:58am via mobile · Like
Sanjay Kadam RIP
Yesterday at 11:16am · Like
Sunil Dabade Shradhanjali.......
Yesterday at 11:37am · Like
Shrinivas Kakade श्रद्धाम्जली.
Yesterday at 12:29pm · Like
Vijaykumar Ladkat So Sad! Khud Vait Vatle.
Yesterday at 1:45pm · Like
AP Arun भावपूर्ण श्रद्धांजली.................
Yesterday at 1:49pm · Like
Balkrishna Renake Abhivadan..
Yesterday at 2:42pm · Like
Chhaya Khobragade So sad news.
Yesterday at 6:07pm · Like
Kunal Shirsathe http://glocalmanus.blogspot.in/2013/07/blog-post.html
परिघावरचा ग्लोकल माणूस....!: प्रिय शर्मिला,
glocalmanus.blogspot.com
21 hours ago · Like · Remove Preview
Sanjay Dabhade Aadaraanjali......
20 hours ago · Like
Raju Desale lal salam
20 hours ago · Like
Chandrakant Puri, Sunil Lokmitra, Chandrashekhar T. Khairnar and 33 others like this.
ReplyDeleteSunita Mudaliar She must have been a really dedicated and sincere Academician - your eulogy is really touching. I had asked before, I am asking again - where can one buy her books??
Yesterday at 5:46pm · Like · 1
Hari Narke at:- Dnyanjyotee Savitribai Phule Stree Abhyasa kendra ,uni of Pune
Yesterday at 5:48pm · Like
Sunita Mudaliar Aren't they available commerically in any book depots? Or online...?
23 hours ago · Like
Vivek Keshav Garud r i p
23 hours ago · Like
Ashok Moti Rip
22 hours ago · Like
Priya Tayde Its a very sad news!!! I still remember our meet and her eye opener speech at Ambedkar Memorial Lecture, 2010 in TISS on Dr. Ambedkar on women emancipation. it was an awesome experience to hear her.
21 hours ago · Like
Kunal Shirsathe http://glocalmanus.blogspot.in/2013/07/blog-post.htmlजात आणि लिंगभाव संबंधांना एकत्रित उजागर करताना, त्यांना क्रांतीकारकत्व बहाल करताना ज्यांच्याविषयी मौनाचा कट केलेला आहे... तो कट तू उधळवून लावलास... तुझी पुस्तक फार बोलकी होती... मी अन्जेला डेविस फारशी वाचली नाहीये पण का कुणास ठावूक जेवढी वाचली ना त्यातून मला तू आमची अन्जेला डेविस वाटायचीस....
21 hours ago · Like
Raju Desale lal salam
21 hours ago · Like
Sanjay Chakane bhavpurn adaranjali. .
20 hours ago via mobile · Like
Jaywant Khadtale भावपूर्ण आदरांजली !
18 hours ago · Like
Balasaheb Kale aadarniy dr. sharmila rege madam yanna bhavpurn shradhanjali...
11 hours ago via mobile · Like
Yogesh Kane Rest in peace
10 hours ago · Like
Shankar Kharat salute to great commitment!
6 hours ago · Like · 1
Nilesh Shinde RIP
5 hours ago · Like
Alok Jatratkar सर, खूप हृदयस्पर्शी लेखन.. रेगे मॅडमविषयी इतकी सविस्तर माहिती खरंच नव्हती मला. आपल्यामुळं झाली... पण खूप उशिरा.. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
3 hours ago · Like
Hiralal Pagdal deep condolance
3 hours ago · Like
नीतीन केळकर भावपूर्ण आदरांजली !
FROM: FACEBOOK...
ReplyDeleteBharat Vitkar, Gajoo Tayde, डॉ.प्रभंजन चव्हाण and 13 others like this.
Vijay Dattatraya Mandake: Pro. Sharmila Rege Yana Adranjali vahatana tyanchi ek athvan. Dr. Bharat Patankaryani Indoli (KARAD) yethe REGE MADAM YANCHE bhashan Swatantry sainik Dinkararav nikam yanche Smrutyrth bhashan ayojit kele hote.adhyaksh mhanun mi hoto. tyancha loksanskruticha gadha abhyas hota. barech lihita yeil pan .........................................
Vishwadeep Karanjikar, सदानंद रविंद्र घायाळ, Bhagwan Thorat and 21 others like this.
ReplyDeleteAshutoshraje Bhosale she is vry gud Writer,teacher and Human being.....tainch lekhan bavishat khup lokana margdarskh asel
R.I.P.
19 hours ago · Unlike · 1
Roshan Kamble · Friends with Rajan Khan and 38 others
विनम्र आदरांजली.
19 hours ago · Like
Padmakar Borode दु:खद घटना आहे.वाईट झाले. विनम्र आदरांजली.
19 hours ago · Like · 1
Sandhya Rege Nadkarni · 3 mutual friends
Thank you for posting this beautiful photo and article of my sister.
18 hours ago · Unlike · 2
Vaibhav More RIP
17 hours ago · Like
Satish Waghmare विनम्र श्रध्दांजली...
17 hours ago · Like
Prasad Potdar Heartfelt condolence
17 hours ago · Like
Gautam Sohoni · Friends with Sharmila Rege
May her soul rest in peace.
15 hours ago via mobile · Like
Debjani Chakravarty · Friends with Sharmila Rege
One of the most beautiful human beings I have ever known.
14 hours ago · Unlike · 1
Medha Kulkarni shared डॉ. विलास उजवणे's photo.
ReplyDeleteYesterday
RIP
विदूषी
भारतीय स्त्रीवाद आणि समाजशास्त्राच्या अभ्यासक, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अध्यासनाच्या संचालिका डॉ. शर्मिला रेगे यांचे कर्करोगाने वयाच्या ४८व्या वर्षी पुण्यात निधन झाले. लिंगभाव व जातीवरील संशोधनाने डॉ. रेगे यांना आंतरराष्ट्रीय बहुमान मिळवून दिला. त्यांनी केलेले दलित स्त्रीवादावरचे सिद्धांकन हे भारतीय स्त्रीवादी चळवळी व अभ्यासकांसाठी मैलाचा दगड ठरणारे आहे. पुरुषसत्ताक समाज आणि जातिव्यवस्थेतील स्त्रीचे स्थान या दोन्हीकडे स्त्री ही शोषणाची कशी बळी ठरते, यावर डॉ. रेगे यांच्या संशोधनाने नव्याने प्रकाश टाकला. ‘रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर : रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनियल्स’ आणि ‘अगेंस्ट द मॅडनेस ऑफ मनू : बी. आर. आंबेडकर्स रायटिंग ऑन ब्राह्मनिकल पॅट्रिअॅर्ची’ ही संशोधनात्मक पुस्तके व जातीव्यवस्था आणि लिंगभाव या विषयांवर त्यांनी वेळोवेळी लिहिलेले निबंध अभ्यासक, विचारवंत, पुरोगामी कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांसाठी अनमोल खजिना आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर अपार निष्ठा असणा-या डॉ. रेगे तळमळीच्या शिक्षिका, वक्त्या आणि लेखिका म्हणूनही परिचित होत्या. फक्त बोलून, लिहून न थांबता वेळोवेळी सकारात्मक कृतीच्या माध्यमातून रेगे यांनी अनुसूचित जाती-जमाती ओबीसी, भकटे-विमुक्त असलेल्या समाजातील होतकरू व युवक-युवतींना पगारातून आर्थिक मदत करीत राहिल्या. ‘अगेंस्ट द मॅडनेस ऑफ मनू..’ या पुस्तकामध्ये रेगे यांनी डॉ. आंबेडकर यांना भारतीय स्त्रीमुक्तीचे उद्गाते असे स्थान दिले आहे. बाबासाहेबांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. ‘शिका, चळवळी उभारा आणि संघटित व्हा. कोणतीही गोष्ट पूर्ण करण्यासाठी स्वत:वर विश्वास ठेवा,’ असा सल्ला ते विद्यार्थ्यांना नेहमीच देत असत. ‘अगेंस्ट द मॅडनेस ऑफ मनू..’ हे पुस्तक लिहून झाल्यावर ‘आता मी शांतपणे मरायला मोकळी झाले,’ असे आपल्या एका मित्राला बोलून दाखवले होते. त्या वेळी तर त्यांना मोठया आतडयाचा कर्करोग झाल्याचे निदानही झाले नव्हते. मात्र, नियतीने त्यांना पूर्वसूचना दिली असावी, असेच म्हटले पाहिजे. विकासात्मक संशोधनामध्ये दिलेल्या बहुमोल योगदानासाठी २००६ मध्ये ‘मद्रास इन्स्टिटयूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडिज’ या संस्थेने डॉ. रेगे यांना ‘मॅलकोम अॅदेसेसिह’ पुरस्काराने गौरवले होते. अत्यंत मनमिळाऊ, नम्र असणा-या डॉ. रेगे विद्यार्थी आणि देशभराच्या अभ्यासकांमध्ये परिचित होत्या. भारतीय स्त्रीवादाचा किंबहुना समकालीन स्त्रीवादाचे चालते-बोलते विद्यापीठ म्हणून डॉ. रेगे यांच्याकडे पाहिले जायचे. अलीकडे त्या लोकप्रिय संस्कृती, लिंगभाव व सर्वसमावेशक शिकणे, शिकवण्याच्या पद्धतींवर संशोधन करीत होत्या. त्यांच्या अकाली जाण्याने स्त्रीमुक्तीचा विचार मांडणारी चळवळ व स्त्री आणि शुद्रातिशुद्रांच्या हक्कांसाठी त्यांचा ‘आवाज’ होणारी, राजकीय भूमिका घेणारी एक विदूषी हरपली आहे. त्यांचे लिखाण संशोधन आणि कार्य नेहमीच सर्वाना प्रेरणा देत .
Asim Sarode
ReplyDeleteDr Sharmila Rege rest in peace. She was one of the initiators who started the Women studies Centre at Pune University. She was such a wonderful person and thoughtful feminist. She was guide to many. It was not her age to leave the world. Her death saddened many.