Wednesday, July 3, 2013

संगिता....






     पत्नीबद्दल काही लिहिणे ही लेखनातील फार कसोटीची जागा असते.मामला नाजूक असतो. संवेदनशील असतो. बर्‍याचवेळा खोटेखोटे कौतुक करून वेळ मारून नेली जाते. "मी आज जो काही आहे तो तिच्यामुळे आहे", असे म्हणायची पद्धत पूर्वसुरींनी पाडून ठेवलेली असते. "तिने घर सांभाळले म्हणून मी हे सारे करू शकलो," अशा शब्दांत जे सांगितले जाते ते खरेही असते. तथापि ते खूप औपचारिक असते. अपुरे असते.
      लष्कराच्या भाकरी भाजणारे आम्ही भाषणाळू "वाणी समाजाचे" नवरेलोक बाहेर जोरदार राणा भीमदेवी भाषणे ठोकू, पण बायकोच्या अपार काबाडकष्टाचे, तिच्या अजोड मेहनतीचे वर्णन करायची वेळ आली की आम्हाला शब्दच सापडत नाहीत. ते कुठे पळून जातात ते काही समजत नाही. बायको समविचारी असेल, समर्थपणे घर उभे करणारी असेल, सामाजिक कामांबद्दल तिची कूरकूर नसेल उलट तिला त्याचे कौतुकच असेल तर त्यामुळे किती उर्जा मिळते, ती कृतज्ञता  नेमक्या शब्दात व्यक्त करणे सोपे नाही.
आमचा आंतरजातीय प्रेमविवाह.लग्न झाले तेव्हा संगिता शिकत होती. मी टेल्कोत पूर्णवेळ नोकरी करून विद्यापिठात शिकत होतो.त्याचवेळी सामाजिक चळवळीत गर्क होतो.लेखन,मोर्चे,भाषणे सारे कसे जोषात होते.नाना उद्योग चालू असायचे. स्वत:च्या आजच्या या धडपडीचे/ यशाचे आणि  पुरस्कारांचे श्रेय संगिताला मन:पुर्वक देताना असे असंख्य प्रसंग आठवतात.
     सुमारे २० वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. पुण्यातील गंजपेठ परिसरातील महात्मा फुले यांच्या राहत्या घराची अतिशय दुरावस्था झालेली होती. २०वर्षे अनेक प्रयत्न करूनही फक्त कोरड्या आश्वासनापलीकडे काहीही घडत नव्हते.शिवसेनेतून नुकतेच सत्ताधारी कांग्रेस पक्षात प्रवेश करून मंत्री झालेल्या छगन भुजबळ यांची मी फुलेवाड्याला भेट घडवून आणली. आणि चमत्कार झाला. वर्षानुवर्षे रखडलेल्या कामांना त्यांनी गती दिली. फुलेवाड्या्च्या परिसराचा कायापालट करून त्याचे "राष्ट्रीय स्मारक" विकसित करण्याच्या निर्धाराने ते कामाला लागले. पुण्यातील आम्हा मंडळींवर देखरेखीच्या आणि पुणे मनपा, जिल्हा प्रशासन आणि पुरातत्व विभाग यांच्या समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. रात्रंदिवस काम चालू होते. राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी राष्ट्रार्पण समारंभाला यायचे मान्य केले होते. वेळ थोडा आणि कामे अनंत होती.
आमच्या मुलीचा, प्रमितीचा नुकताच जन्म झालेला होता.मी रात्रंदिवस वाड्यावर आणि कार्यक्रमाच्या धावपळीत अडकलेलो होतो. समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते माझ्या "महात्मा फुले :साहित्य और विचार" या ग्रंथाचे प्रकाशन व्हायचे होते. छपाईची लगीनघाई चालू होती. घरात संगिता आणि प्रमितीला मी वेळच देऊ शकत नव्हतो. एके दिवशी दुपारी मुलीसाठी दूध आणायला संगिता स्वयंपाकघरात चाललेली असताना ओल्या फरशीवरून तिची स्लीपर घसरली आणि आणि ती पडली. तिच्या मांडीचे हाड मोडल्याने तिला उठताही येत नव्हते.खूप कळा येत होत्या. घरात मदतीसाठी कोणीही नव्हते. त्याकाळात मोबाईल नव्हते. सुदैवाने घरात फोन होता. आणि तो तिच्या हाताजवळच होता.तिने आमचे फ‘मिली डा‘क्टर संभूस यांना फोन केला.त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने धाव घेतली. आमच्या घराची एक किल्ली शेजार्‍यांकडॆ असायची. त्यांच्याकडून ती घेवून डा‘क्टरांनी फ्ल‘टचा दरवाजा उघडला. अपघात खूप गंभीर होता. त्यांनी तातडीने रूग्णवाहीका मागवली आणि संगिताला दवाखान्यात नेले. मांडीच्या हाडाचा चुरा झालेला होता. तात्काळ उपचार सुरू झाले. घटना घडल्यापासून पुढे २४ तास झाले तरी मला याचा पत्ताच नव्हता.
  प्रमिती ३ महिन्यांचीही नव्हती. स्कूटरवरून तिला संगिताकडे दूध प्यायला दवाखान्यात नेणे आणणे फार त्रासदायक होते. दवाखना छोटा असल्याने तेथे बाळाला ठेवण्याची सोयही नव्हती. या काळात संगिता शारिरीक वेदना,एकटेपणा,प्रमितीची उपासमार  या सार्‍या मानसिक कळा सोशित होती.मला पेशंटकडे आणि बाळाकडे बघायला वेळच नव्ह्ता.
राष्ट्रपतींचा फुलेवाड्याचा कार्यक्रम होईपर्यंत सुमारे आठवडाभर मी बाहेरच होतो.कार्यक्रम डोळ्याचे पारणे फेडणारा झाला.
   संगिताची फार मोठी शस्त्रक्रिया करावी लागली.आजाराचे निदान झालेच नाही. साधे पडल्याचे निमित्त होऊन हाडाचा चुरा कसा झला याचा उलगडा डा‘क्टरांना झालाच नाही.दरम्यान पुढे लवकरच आणखी दोन वेळा हाडे मोडण्याची  पुनरावृती झाली. हाडांची शस्त्रक्रिया आधीच तापदायक, सक्तीची बेडरेस्ट, घरात लहान बाळ, आणि या सगळ्या काळात मदतीसाठी नवर्‍याचा घरात पत्ता नाही, असे दिवस संगिताने कसे काढले ते तिचे तिला माहित.
   मी सामाजिक चळवळीचे काम, टेल्कोची नोकरी आणि लेखन यात व्यस्त होतो. जंगजंग पछाडूनही आजाराचे कारण मात्र समजत नव्हते. सुप्रसिद्ध अस्थीरोगतज्ञ डा‘. नारायणराव कर्णे यांनी देशविदेशातील तज्ञांचा सल्ला घेऊन शेवटी आम्हाला मुंबईला के.ई.एम.मध्ये डा‘.मेनन आणि डा‘.रवी बापट यांच्याकडे पाठवले. बापटसरांनी मात्र हाडे सतत मोडण्याचे कारण तात्काळ शोधून काढले आणि शस्त्रक्रिया करून संगिताला या आजारातून बरे केले.
    डा‘.रवी बापट माझ्या पुस्तकांचे/ साहित्याचे वाचक होते. त्यांच्याकडून माझ्या लेखनाचे कौतुक ऎकताना संगिताचा माझ्यावरचा आजारपणातला राग काहीसा निवळला असावा....

                                                                                                                            क्रमश:......
                                                                                                                         

14 comments:

  1. जयभीम सर,
    ही लेखमालिका चालू केल्या बद्दल धन्यवाद.
    आता पुढचा भाग लवकर टाका.
    उत्सूकता वाढली आहे.
    वहिनीना सलाम!

    ReplyDelete
  2. FROM: FACEBOOK...

    Nitin Gaikwad, Savita Kulkarni, Chandrashekhar Kharde Patil and 89 others like this.

    Sunita Nimse : सर तुमच्या शब्दांना (आणि वहिनींना) तोड नाही!!!!!!!
    17 hours ago via mobile · like · 8

    Prerna Tambay Ubhayatancha manapasun koutuk aahe.....
    17 hours ago via mobile · Unlike · 7

    Balraj Shinde : Sir u both of example for todays generation!!!!!!!
    17 hours ago · like · 7

    Ajay Sonawane : nice n happy family
    16 hours ago · like · 7

    S.p. Kamble : सर,बर झाल वेळातवेळ काढून वहिनींच्याबद्दल लिहिलातसमाजाला समजू दे,अन्यथा सारे काही अलबेल आहेअसे वाटते
    12 hours ago via mobile · like · 8

    S.p. Kamble : Vahini, We Proud of U !
    12 hours ago via mobile · like · 7

    Prabhakar Harkal : हि नाण्याची दुसरी बाजू आमच्या समोर येऊ द्या ...आपणावर प्रेम करणाऱ्यांना कळू द्या काय असते समाज कार्य..आणि किती मोलाची असते सावित्रीची भूमिका
    10 hours ago · like · 8

    Ishwar Kudale : Vahini is Great
    6 hours ago · like · 7

    M.d. Ramteke : सर वेळात वेळ काढून आपण वहिनींबद्दल लिहताय त्या साठी मी आभारी आहे. पुढचा भाग लवकर येऊ द्या.
    5 hours ago · like · 4

    Meher Gadekar : Congrats. Look fwd to more articles on this subject.
    4 hours ago · like · 4

    Pramitee Narke : i am so lucky to have you both.... as parents as well as idols..... love you.. proud to be your daughter..
    2 hours ago · like · 3

    Nathpanthi Dawari Gosavi Samaj : We Proud of U & Ur Family.....!
    2 hours ago · like · 2

    Archana Tatkar: sir, apratim!
    2 hours ago · like · 2

    Vishal Gaikwad : Gr8 thoughts for a Gr8 family.....

    FROM: FACEBOOK.....

    ReplyDelete
  3. FROM: FACEBOOK2

    Chandrashekhar Bhujbal, Balkrishna Renake, Sanjay Sonawani and 4 others like this.

    Sanjay Sonawani : Vahini...Jay ho...Haribhaunni "vel" kadhun ha bhavsparshi lekh lihilyabaddal.
    6 hours ago · like · 8

    Pradeep Niphadkar : mast
    6 hours ago · like · 7

    FROM: FACEBOOK 2

    ReplyDelete
  4. FROM: FACEBOOK.....

    Chandrakant Puri, Balkrishna Renake, Sharada Renake and 2 others like this.

    Chandrakant Puri : खूप छान लिखाण आहे....मास्तर आता स्वतः विषयीही लिहा आणि आम्हाला वाचण्याची संधी दया...
    about an hour ago · Like · 3

    FROM: FACEBOOK..

    ReplyDelete
  5. FROM:FACEBOOK...

    Balkrishna Renake, Sanjay Sonawani, Sharada Renake and 2 others like this.

    Savita Mohite : Congrats sangitatai.We r proud of u..
    6 hours ago · like · 3

    FROM:FACEBOOK..

    ReplyDelete

  6. FROM: GROUP PAGE
    Seen by 8
    स्मिता पाटील and Alok Jatratkar like this.

    Alok Jatratkar: ये जोडी हमेशा सलामत रहे।
    4 hours ago · like · 1

    ReplyDelete

  7. FROM: GROUP PAGE..

    Seen by 8
    स्मिता पाटील, Ashwini Satav-Doke, Alok Jatratkar and 2 others like this.

    Priyadarshini Hinge : खर आहे सर आणि या दोन कौतुकांच्या शब्दाशिवाय जास्त काही बायकोला नको असत. ते शब्दच तीला खुप मोलाचे असतात. यालाच सहजिवन म्हणतात.
    5 hours ago · like · 1

    ReplyDelete
  8. FROM: HARI NARKE'S PAGE...

    8 people like this.

    Sagar Deshpande: Nice
    6 hours ago · Like · 2

    Mahesh Kale :nice picture,Sir!!!
    5 hours ago · like · 3

    Rakesh Patil : "जावे त्याच्या वंशा, तेव्हा कळे!" असे काही म्हणतात , ते उगाच नाही!
    4 hours ago · like · 3

    Sarang Bhoirkar : apratim
    4 hours ago · like · 3

    Shahaji Patodekar : Congrats ! Happy family ..
    2 hours ago via mobile · Like · 1


    Boost Post
    104 people saw this post

    FROM: HARI NARKE'S PAGE

    ReplyDelete
  9. प्रिय हरी,
    लेख लगेच वाचला.अप्रतिम आहे .पण फार अपुरा आहे.संगीता आणि तुझ्या नात्यासंबंधाने आणि त्याच्या निमित्ताने लिहिण्यासारखे तुझ्याजवळ खूप आहे याची जाणीव प्रकर्षाने हे वाचताना होते.लिहिणे थांबवू नको.या निमित्ताने खूप गोष्टींवर प्रकाश पडू शकतो.तुमच्यातले नाते अशा शोधाचे फक्त केवळ निमित्त असेल.
    रंगनाथ पठारे

    BY: EMAIL, Dated 13July 2013

    ReplyDelete
  10. FROM: Email...
    gautam ambhore
    14:40 (3 hours ago)
    Reply
    to me
    Hon'ble sir, and Vhini Jaybhim.
    vhininchya aajarpnatle anubhav vachlya nantr tyanni te divas kse
    kadhle astil yachi klpana suddha krvat nahi. Dr. Karne aani Dr. Bapt
    yanna khrach purna shrey dile pahije. sir, aamhi tumchyakde mage
    bhetnyasathi aalo hoto tenvha tumche v vhininchi understanding khupch
    aamhala bhavli. tumhi sangitlela anubhav ha vhininchya dhairyacha ek
    pailu aahe. Tumchya smajsevetil yogdan he nirvivad shreshtha aahe.
    Prmiti aata kontya varshala aahe?

    Tumchya doghanchya pudhil bhrbhratis khup khup shubhechya.


    Jybhim.

    ReplyDelete

    ReplyDelete
  11. kailaskamod1@gmail.com
    09:16 (5 hours ago)
    Reply
    to me
    लेख चांगला आहें .पण एकुणच सार्वजनिक जीवनातील व्यक्ति , लेखक आदी लोक आत्मकेंद्री असतात त्यामुळे इतरांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते अथवा होते़ अगदी कुटूंबीयांच्यासुध्दा़। तेव्हां अशा घटना आयुष्यासाठी धडा ठरतात..
    BY:EMAIL

    ReplyDelete
  12. Hello sir, good afternoon, my request is to you that, i am student of M.Phil at central university of Gujarat. and i am going to work on 'Mahatma Jotirao Phule's contrubution towards women emancipation' relance of today. it will comparative study between contemporories social reformer and why we need to do study on phule' relavance of today's women's edauctional ,social, economical condition. it's an little bit try on Mahatma Phule in one paradigm. please sir can joine your study center for my research work.
    Regard,
    Mangala Tayade
    M.Phil,
    school of social sciences,
    programme Gandhian thought and peace studies,
    Central university of Gujarat,
    Gandhingar-382030.
    Thank you sir.

    ReplyDelete
  13. most of the time successful person is supported by woman, not giving trouble is also sometime support....

    ReplyDelete