माणूस हा उत्सवप्रिय प्राणी आहे. तो अतिशय आशावादी आणि चिवटही आहे.जगण्याचा उत्सव साजरा करताना नववर्षाचे जल्लोशात स्वागत करण्याची आपली परंपरा आहे. अशावेळी २०१३ च्या कडूगोड आठवणी जागवत २०१४ ला सामोरं जाताना ....
२०१३:
महापुरूष मंडेला गेले.
जादूटोणा विरोधी कायदा राज्यात लागू झाला...
त्यासाठी डा. नरेंद्र दाभोलकरांना शहीद व्हावे लागले..
त्यांचे मारेकरी साडेचार महिने झाले तरी सापडलेले नाहीत.
तेलंगणाची घोषणा झाली.
"आदर्श" अहवाल आला...फेटाळला...फेरविचाराचा सल्ला मानला जाणार का?
महिला सुरक्षा कायदे कडक झाले.
लक्ष्मण माने अडकले की अडकवले गेले?
अरुषी हत्याकांड शिक्षा सुनावली गेली.
निर्भया केस दिल्लीचा निकाल आला.
गांगुली, तेजपाल यांच्यावर आरोप झाले.
मिडीया ट्रायल होऊन गेली...न्यायदानाची नवी पद्धत लागू झाली.
ओबीसी म्हणतात, दोनवर्षे झाली जातवार जनगणना सुरू होऊन..२०१४ ला तरी ती पुर्ण होणार का?
नरेंद्र मोदींचा अश्वमेध ५ राज्यांच्या निकालाच्या पार्श्वभुमीवर सुसाट सुटणार असे संकेत मिळत आहेत.
दिल्लीत केजरीवालांचे सरकार आलेय. आता जादूची कांडी फिरणार.भ्रष्टाचार आता छूमंतर होणार. १२५ कोटी भारतीयांनी आता दिल्लीत राहायला जाऊया.पाणी,वीज मोफत. कुठेही राहा, सरकार घर बांधून देईल. कांदा मोफत.भाजीपाला मोफत.आणखी काय हवे?
हा देश म्हणजे परस्परविरोधी हितसंबंधाचे महागाठोडे आहे.
जात, वर्ग, धर्म, भाषा. प्रांत, लिंग अशा परस्परांना छेद देणार्या हितसंबंधाना सामोरं जाण्याऎवजी समस्यांचे सपाटीकरण {सुलभीकरण करा. देशात फक्त एकच प्रश्न आहे असे सांगत राहा.
केजरीवाल म्हणणार भ्रष्टाचार संपला की देशात रामराज्य येणार.
मोदी म्हणणार, कोंग्रेस संपली की नमोराज्य येणार.
मेटे आणि युवराज{छत्रपती} म्हणणार मराठा आरक्षण आले की देश सुखी होणार.
मेधा पाटकर म्हणणार, नर्मदा,लवासा यात सगळी कीड आहे.
अण्णा हजारे म्हणणार लोकपाल आले की अण्णाराज्य येणार.
.........
देशात आज दहशतवाद, प्रदुषण, भ्रष्टाचार,दलित-महिला-गरिबांवरचे अत्याचार, महागाई, शेतकरी आत्महत्त्या, बेकारी, वाढती गुन्हेगारी, वाढती लोकसंख्या,परमेश्वराला पर्याय जागतिकीकरणाचे गारूड,...असे डोंगरभर प्रश्न आहेत.
२०१४ मध्ये त्यावर मंथन होणार? प्रश्न सोडवण्याच्या दिशेने पावले पडणार?
की निवडणुक वर्ष असल्याने अस्मिता, गर्जना, सपाटीकरण, मतदारांचे ध्रूवीकरण होणार?
देशाचा पंतप्रधान मोदी ? राहूल गांधी ? शरद पवार ? की अन्य कोणी?
उत्तरे यथावकाश मिळतीलच.
तोवर शुद्धीत राहून मावळत्याला निरोप देऊया आणि उगवत्याचे स्वागत करूया.
बधीर होणे, बेहोश होणे टाळूया.
टीआरपीच्या सुनामीत वाहून जाण्याऎवजी विवेक जागा ठेवूया..
मध्यममार्ग स्विकारूया..
रंगनाथ पठारे सरांची नवी कादंबरी " एका आरंभाचे प्रास्ताविक " नुकतीच वाचली.जबरदस्त आहे. समृद्ध अडगळीसह कसे जगायचे याची इनसाईट हा लेखक आपल्याला देतो.
२०१४ चे प्रास्ताविक करताना आपापली "पणती" जपून ठेऊया.....
चला नववर्षाचे स्वागत करूया...