Tuesday, August 20, 2013

महाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर









चार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. "हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा?" अशी सुरुवात करून बराच वेळ बोलत होते. बार्टीच्या वतीने  {डा. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण  संस्था, पुणे}" महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मुलन विचाराची वाटचाल" या विषयावरील पुस्तक ते संपादीत करीत होते.त्यासाठी मी "सावित्रीबाई फुले आणि सत्यशोधक चळवळीचे अंधश्रद्धा निर्मुलनातील योगदान " हा लेख द्यायचे कबूल केलेले होते. गेल्या दोन महिन्यात पाठपुराव्यासाठी त्यांची पत्रे आणि फोन आले होते.
नरूभाऊंचा स्वभाव  अतिशय आर्जवी आणि संयमी होता. ते  काटेकोर शिस्तीचे होते. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत त्यांच्या तोडीचा उत्तम संघटक दुसरा सापडणे केवळ अशक्य.त्यांची जुन्याजाणत्यांपासून युवा पिढीतील अनेकांशी गट्टी होती.आपल्या विचारांशी ते ठाम असले तरी कोणताही टोकदार मार्ग ते टाळत असत. कायम आपले म्हणणे अत्यंत विनयपुर्वक, युक्तीवादाच्या आधारे मांडीत असत. त्यांच्यासारख्या ऋजु स्वभावाच्या नेत्यावर खुनी हल्ला व्हावा हे भयानक आहे. हादरवणारे, सुन्न करणारे आहे. फुले, शाहू. आंबेडकर, आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात आज कोणीही विवेकी माणूस सुरक्षित आहे असे वाटत नाही.
अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीचे ते एक महत्वाचे नेते  होते. शाम मानव यांच्यासोबत काही वर्षे काम केल्यानंतर त्यांनी स्वतंत्रपणे काम सुरू केले. गेली १८ वर्षे राज्यात अनिष्ट प्रथा आणि जादूटोणा विरोधी विधेयक संमत व्हावे म्हणून दाभोळकर झटत होते. हे विधेयक त्वरित पारित करणे हीच त्यांना आदरांजली ठरेल.
राज्याच्या पुरोगामी चळवळीतील एक खंदा कार्यकर्ता आज आपण गमावला आहे. विवेकवादाचा आवाज दाबण्यासाठी कार्यरत असलेल्या विचारशत्रूंनी ही हत्त्या केली असावी असे वाटते. गेली अनेक वर्षे ते "साधना" साप्ताहिकाचे संपादक होते. त्यांनी या साप्ताहिकाला एक नवे कलदार आणि कसदार रूप प्राप्त करून दिले. ते अतिशय प्रभावी वक्ते आणि लोकप्रिय क्रिडापटू होते. कबड्डी या खेळातील ते राज्यपातळीवरील नामवंत खेळाडू होते. सामाजिक कृतज्ञता निधी आणि महाराष्ट्र फौंडेशनचे समन्वयक म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्या जाण्याने आज पुरोगामी चळवळीचा आवाज हरपला आहे.
अंधश्रद्धा निर्मुलनाचा त्यांनी ध्यास घेतलेला होता.ते या चळवळीचे जणू प्रतिकच बनले होते. त्यांची या विषयावरील असंख्य पुस्तके प्रसिद्ध आहेत. नरूभाऊ हे मुळात सातार्‍यातील एक नामवंत डाक्टर. लक्ष्मण माने, वर्षा देशपांडे आदींना सातार्‍यात आणून सामाजिक कामात उभे करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.समतावादी चळवळीत सक्रीय झाल्यानंतर त्यातच ते इतके गुरफटून गेले की वैद्यकीय व्यवसायासाठी वेळ देणे त्यांना शक्य झाले नाही.
मी शाळकरी वयात त्यांच्या भाषणांचा चाहता होतो.१९८२ साली नामांतर आंदोलनात  त्यांच्यासोबत ठाण्याच्या तुरुंगात  एकाच कोठडीत असताना त्यांचा मला प्रदीर्घ सहवास लाभला.त्यांच्याशी रात्रंदिवस मारलेल्या गप्पा आजही स्मरणात आहेत. ते आमचे हिरो होते. समता आंदोलन या संघटनेत त्यांच्या नेतृत्वाखाली मी काही वर्षे काम केले.मी साधनेत अधूनमधून लिहित असे.ते साधनाचे संपादक झाले तेव्हा प्रा. रामकृष्ण मोरे यांनी राज्यात पहिलीपासून इंग्रजी शिकवण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेतला.त्याला प्रचंड विरोध झाला.स्वत: नरूभाऊ त्याच्या जबरदस्त विरोधात होते. मी मात्र या निर्णयाचा समर्थक होतो. त्यांनी साधनेचा एक विशेषांक त्यावर काढला. त्यात दुसरी बाजू यायला हवी म्हणून मी लेख लिहावा किंवा शिक्षण मंत्र्यांची प्रदीर्घ मुलाखत घ्यावी असे नरूभाऊंनी सुचवले. अवघ्या दोन दिवसात हे करायचे होते.त्या मुलाखतीसाठी मी खूप आटापिटा केला होता. मी घेतलेली मोरेसरांची मुलाखत पुढे अत्यंत गाजली.पहिल्यांदा मोरेसर मुलाखत द्यायला तयारच नव्हते. साधना हे साप्ताहिक  मूठभर लोक वाचतात, त्यात मुलाखत दिली काय नी नाही दिली काय, काय फरक पडतो? असे त्यांचे मत होते. आज दाभोळकरांनी प्रचंड परिश्रमाने साधनेला मिळवून दिलेली लोकप्रियता आणि उंची बघायला मोरेसर असते तर ते नक्कीच चकीत झाले असते.साधना बालदिवाळी अंकाचा लाखभर खप ही मोठी गोष्ट आहे. . नरूभाऊंचा एकखांबी तंबू नव्हता. युवा संपादक म्हणून विनोद शिरसाठ या युवकाला नरुभाऊंनी आपल्या तालमीत तयार केले. तो साधना उत्तम चालवित आहे.
नरूभाऊ तत्वनिष्ठ असले तरी अव्यवहारी नव्हते. मिडीयाचे ते डार्लिंग होते. सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची किमया त्यांना साधलेली होती.अनेक ख्यातनाम व्यक्तींशी जुळवून घेण्याची कला त्यांनी आत्मसात केलेली होती. त्यांच्या नाना तर्‍हा सांभाळण्यात नरूभाऊ वाकबगार होते. एक ना धड भाराभर चिंध्या असे मात्र त्यांनी कधीही केले नाही. गेली २५ वर्षे चिकाटीने त्यांनी "अनिस"चे काम लावून धरले. अनेक बाबा,बुवांचे भंडाफोड केले.आम्ही मात्र त्यांना गमतीने नरेंद्र महाराज दाभोळकर म्हणत असू. औरंगाबादला  त्यांच्यावर आणि डा.श्रीराम लागूंवर हल्ला झाला तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. त्यावेळी डा. लागूंचा हल्लेखोरांपासून बचाव करण्याच्या प्रयत्नात त्यांच्यासोबत चार रट्टे मीही खाल्ले आहेत.
नरूभाऊ फार चाणाक्ष होते. आमच्या चळवळीचे ते चाणक्यच होते. अत्यंत धोरणी आणि हिशोबी. १४ वर्षांपुर्वी राज्यातल्या एका बड्या मुत्सद्दी आणि धूर्त नेत्यांच्या सांगण्यावरून त्यांनी सार्वत्रिक निवडणुकांच्या  काळात भल्याभल्यांना कामाला लावले होते. "लोकशाही प्रबोधन व्यासपीठ" ची उभारणी करून लोकशाही, पुरोगामी, धर्मनिरपेक्ष शक्तींना मतदान करा असे सांगण्यासाठी हा दौरा आखण्यात आला होता. नरूभाऊ आमचे सारथी होते. डा.लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर या बड्या ग्ल‘मरवाल्या लोकांसोबत एक लिंबूटिंबू म्हणून मीही असायचो. राज्याच्या सर्व प्रमुख शहरातील  ह्या सभा फार गाजल्या. पुढे अनेक वर्षे आम्हाला या सभांचा खरा सूत्रधार माहितच नव्हता. बर्‍याच वर्षांनी आपल्याला कोणी कामाला लावले याची निळूभाऊंना कुणकूण लागली. डाक्टरांचे सगळ्या राजकारण्यांशी मधुर संबंध असत. कोणाला भेटायला जाताना कोणाचा उपयोग करून घ्यायचा याचे त्यांचे गणित अचूक असे. ते राजकारण्यांच्या सोबत असत. आणि तरीही त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राखून त्यांच्यावर ते तुटूनही पडत.
सामाजिक कार्यकर्त्यांना दरमहा काही आर्थिक पाठबळ देता यावे या हेतूने "सामाजिक कृतज्ञता निधी" जमा करायचे ठरले. बाबा आढाव, पुष्पा भावे आदींनी त्यासाठी "लग्नाच्या बेडीचा" दौरा आखला. त्या नाटकात तनुजा, लागू, निळूभाऊ, सुधीर जोशी असे अनेक दिग्गज भुमिका करीत होते. दौर्‍यात या सर्वांची सोय करणे हे सोपे काम नव्हते. नरूभाऊच ते काम करू जाणेत.नरूभाऊंनी हा "साकृनि"आजवर सांभाळला.
अमेरिकेच्या सुनिल देशमुख यांच्याशी नरूभाऊंची मैत्री होती.  महाराष्ट्र फौंडॆशनचे ते गेली काही वर्षे समन्वयक होते. अनेक संस्थांशी त्यांचा संबंध होता. मात्र सगळ्याच कामात शक्ती खर्च करण्याऎवजी दोनतीन ठिकाणीच त्यांनी सगळी शक्ती केंद्रीत केलेली होती.आणि ती कामे चिकाटीने लाऊन धरलेली होती.त्यामुळे त्या कामांवर ते आपला ठसा उमटवू शकले. त्यांची ही मोहर{मुद्रा} अखंड राहील.
नाशिकच्या एकनाथ कुंभारकरने आंतरजातीय विवाह केलेल्या नऊ महिन्यांच्या गरोदर मुलीची,प्रमिला कांबळेची निर्घृण हत्त्या केली.जातपंचायतीच्या दहशतीमुळे त्याने हे अघोरी कृत्य केले. अनेकांनी त्याविरुद्ध आवाज उठवला.नरुभाऊंचे टायमिंग फार अचुक असे. नरुभाऊंनी नाशिकला तातडीने मोर्चा संघटित केला. परिषद लावली.परवा लातुरलाही "जातीला मूठमाती द्या" ही परिषद घेतली. त्यानिमित्ताने मी त्यांच्याशी चर्चा करीत होतो. जाती संघटना आणि जात पंचायती यांचे पोशिंदे राजकारणी आहेत, निवडणुकीत जातीचे गठ्ठा मतदान मिळावे म्हणून ते याला रसद पुरवतात, त्यांच्यावरच हल्ला करायला हवा असे माझे मत होते, आहे.नरूभाऊ म्हणाले, "हे करण्याएव्हढे आपण शक्तीशाली नाही.ते करायचे तर "पर्यायी राजकारण" करावे लागणार.आजतरी तसे करणे मला परवडणारे नाही."
मध्यंतरी मी संभाजी ब्रिगेडचे सर्वेसर्वा पुरुषोत्तम खेडॆकर यांच्या जातीद्वेश पसरवणार्‍या पुस्तिकांचा साधार पंचनामा करणारे लेख लिहिले. सर्व ब्राह्मण पुरुष जातीय दंगली घडवून जाळून किंवा कापून मारण्याच्या खेडॆकरांच्या भुमिकेचा पर्दाफास केला.ते लेख मी साधनाकडे पाठवले.सतत सावधचित्त असणार्‍या नरूभाऊंनी मराठा संघटनांच्या दहशतीमुळे हे लेख छापायला चक्क नकार दिला.नरुभाऊ धाडशी होते,पण ते धाडस हिशोबी होते हे मला कळून चुकले. त्यांची आज हत्त्या व्हावी हे चिंताजनक आहे. निषेधार्य आहे.
सत्यशोधक समाजाचे अधिवेशन आम्ही नगर जिल्ह्यात लावले होते. नरुभाऊंनी शनी शिंगणापुरला घराला कुलुपे नाहीत,चोर्‍या होत नाहीत या अंधश्रद्धेवर आघात करण्यासाठी, त्याचवेळी "चला चोर्‍या करायला, चला शिंगणापुरला" अशी मोहीम घोषित केली. आमच्या परिषदेवर संकट आले.आम्ही चिडलो. "त्यांनी हीच वेळ का निवडली? अंधश्रद्धा वाईटच आहेत पण चोर्‍या करणे नैतिक कसे?" यावर माझा त्यांचा कडाक्याचा वाद झाला.चळवळीतील अंतर्गत वादावर बहुधा भुमिका न घेण्याचे व त्याद्वारे अजातशत्रू राहण्याचे कौशल्य त्यांना साधलेले होते.
व्यक्तीची हत्या करून विचारांची हत्त्या होत नसते.उलट विचार अधिक मजबूत होतात.शहीद डा. नरेंद्र दाभोळकर अमर झाले आहेत. अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा तातडीने मंजूर करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
..................................................................









8 comments:

  1. निषेध!
    निषेध!
    निषेध!
    डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा निर्घुण खून करणाऱ्या भ्याड गोडसेवादी, सनातनवादी प्रवृत्तीचा जाहीर निषेध!

    ReplyDelete
  2. Smita Thorat :"आपल्या विचारांशी ते ठाम असले तरी कोणताही टोकदार मार्ग ते टाळत असत. कायम आपले म्हणणे अत्यंत विनयपुर्वक, युक्तीवादाच्या आधारे मांडीत असत. त्यांच्यासारख्या ऋजु स्वभावाच्या नेत्यावर खुनी हल्ला व्हावा हे भयानक आहे. हादरवणारे, सुन्न करणारे आहे. फुले, शाहू. आंबेडकर, आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात आज कोणीही विवेकी माणूस सुरक्षित आहे असे वाटत नाही." I agree compleletly, sir..!!

    from: facebook page..Krushival Group..

    ReplyDelete
  3. Minal Renke, Gautam Meshram, Sunil Dibrito and 69 others like this.

    Gajanan Girhe Rip
    August 20 at 6:32pm via mobile · Unlike · 2

    Balasaheb Magade एक जिद्दी कार्यकर्ता, मार्गदर्शक बापमाणूस आपण हरवून बसलो आहोत... आता दाभोलकरांना श्रद्धांजली वाहून गप्प बसून चालणार नाही....त्यांचे हे कार्य पुढे नेण्याची शपथ घेऊया...
    August 20 at 6:33pm · Unlike · 3

    Balmohan Adlinge नरेंद्र-दाभोळकराना-हार्दीक-
    अभिवादन
    August 20 at 7:00pm · Unlike · 1

    Bapu Barve Vinambra Abhivadan
    August 20 at 7:39pm · Unlike · 1

    Jaydip Kulkarni Narake sir - You might have heard CM's statement today , any views from your end
    August 20 at 7:58pm via mobile · Unlike · 1

    Deep Deogade ....N I S H E D.... N I S H E D .......SHAME ON RADICAL HINDU CAST SYSTEM..THIS OLD MENTALITY KILLED DR. DABOLKAR...
    August 20 at 8:57pm · Unlike · 1

    Sculptor Vijay Burhade Shilpkar nishedh
    August 20 at 10:40pm · Unlike · 1

    Sculptor Vijay Burhade Shilpkar भावपुर्ण श्रद्धांजली
    August 20 at 11:23pm · Like

    Yuvaraj Pharande भावपुर्ण श्रद्धांजली
    August 21 at 9:47am · Unlike · 1

    Digambar Girme Ativ vedna zalya kaal manala sir....khup khup vide vatle...pn ata vide vatun kahi honar nahi...vel ahe dabholkar siranchya vichar janmansat rujvaychi...
    August 21 at 9:54am via mobile · Unlike · 1

    Chandrakant Puri khup chan lihilet aapan Hari Narke sir. Dr. Dabholkaranchya hatyechi batmi eiklyapasun kashatach man lagat nahi......
    August 21 at 12:32pm · Unlike · 1

    Satish Sirsath भावपुर्ण श्रद्धांजली
    August 21 at 3:29pm · Unlike · 1

    Deep Deogade ..." NAWAS..BALI..PUJA..YAGYA..JADU "...ARE NOT EFFECTIVE THAT'S WHY THEY HAVE TO USE 'GUN'... TO KILL DR.DABOLKAR..
    August 21 at 8:06pm · Unlike · 1

    Dinesh Nanore भावपुर्ण श्रद्धांजली
    August 21 at 9:11pm · Unlike · 1

    Deep Deogade SIR,WELL SAID@ IBN LOKMAT..ABT BAMSEF..
    August 22 at 4:57pm via mobile · Like

    from:facebook of Hari Narke

    ReplyDelete
  4. Dilip Dharurkar, Mrunal Dholepatil, Minal Renke and 89 others like this.

    Anant Bhat विवेक वादाची हत्या!
    August 20 at 10:55am via mobile · Unlike · 1

    Rationalist Rajendra Gadgil Rationalist Rajendra Gadgil

    डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची हत्या म्हणजे भारतीय लोकशाही ,सहिष्णुता,धर्मनिरपेक्षता ,विज्ञाननिष्ठता यांचा खून
    August 20 at 10:56am · Unlike · 2

    वसंत इभाड .
    वसंत इभाड's photo.
    August 20 at 11:02am · Unlike · 1

    Hanamant Atkare तीव्र जाहिर निषेध.
    August 20 at 11:05am · Unlike · 1

    Rajendra Londhe जाहिर निषेध.
    August 20 at 11:06am · Unlike · 1

    Niteen Phirke vidynan vivekbuddhivadi haravala
    August 20 at 11:08am · Unlike · 1

    Hemant Bhosale manus sampavla tari vichar sampavta yet nastat.....tanchya vicharanche aamchya sarkhe lakho lok tanchi chalval pudhe chalu thevu......vicharanchi ladhai vicharane ladhavi ase sangnarech yat sahabhagi asnar...nusta nishedh karun chalnar nahi....
    August 20 at 11:11am · Unlike · 2

    Rationalist Rajendra Gadgil Rationalist Rajendra Gadgil जादूटोणा विरोधी विधायक मंजूर करणे हीच खरी डॉ.नरेंद्र दाभोलकर यांना आदरांजली होईल.
    August 20 at 11:17am · Unlike · 3

    Padmakar Shirsat खरच महाराष्ट्राच्या विवेक बुद्धीवर हा हल्ला आहे! निषेध !
    August 20 at 11:30am · Unlike · 1

    Vikas Deshmukh दाभोळकर आपल्यासाठी शहीद झाले…. धर्मांधाना घाबरणा-या भेकडानो आता तरी जादूटोणा विरोधी विधयक मंजूर करा !
    August 20 at 11:32am · Unlike · 3

    Sunil Makare Completely Agree... Lokshahi margane andolan karnaryanvar bhandavadi lokancha byad halla... Yala dubalepanache lakshan mhantat... Garib-dubalya lokanche shoshan krnarayancha nishedh.... Ek dabholkar marun chalval sampavata yet nahi....
    August 20 at 11:40am · Unlike · 1

    Balasaheb Magade महाराष्ट्राच्या विवेक बुद्धीवर हा हल्ला आहे
    August 20 at 11:45am · Unlike · 1

    Ravi Baviskar http://www.loksatta.com/maharashtra-news/secret-modi-agenda-in-state-narendra-dabholkar-149858/

    secret modi agenda in state-narendra dabholkar | Loksatta
    www.loksatta.com
    राजकीय पातळीवर ‘मोदी अजेंडा’ छुपेपणाने महाराष्ट्रात पसरवण्याचा प्रयत्न होत असल्य...See More
    August 20 at 11:46am · Unlike · 1 · Remove Preview

    Prabhu Rajgadkar nishedh....dr.dabholkar yanchi hatya ha konacha parabhav.hallekhor kon asavet.te nakki kontya vicharane prabhavit asel he sarvanch changle mahiti aahe.nishedh....
    August 20 at 11:53am · Unlike · 1

    Balasaheb Magade परिवर्तनवादी विचारांची हत्या...डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करून बदलाचा, परिवर्तनचा,सामाजिक सुधारणेचा विचारच संपवू असे ठरवूनच जणू हल्लेखोरांनी ही भ्याड हत्या केली असावी.. पण विवेकवादी, पुरोगामी चळवळ संपणार नाही...ह्या दुर्देवी घटनेमुळे समाज निदान शंभर वर्षे तरी मागे गेला आहे... एक जिद्दी कार्यकर्ता, मार्गदर्शक बापमाणूस आपण हरवून बसलो आहोत... आता दाभोलकरांना श्रद्धांजली वाहून गप्प बसून चालणार नाही....त्यांचे हे कार्य पुढे नेण्याची शपथ घेऊया...
    August 20 at 12:05pm · Unlike · 1

    Mandar Waghmare some people are against parivartan and development....rip dr.dabholkar...his movement will be alive...
    August 20 at 12:19pm · Unlike · 2

    Gurudeo Shankar Mhatre Laj watate mala ya maharashtrachi, Dabholkar Siranchya vicharanchi hatya kadhihi hou naye hich shradhanjali
    August 20 at 12:44pm via mobile · Unlike · 2

    Balmohan Adlinge ही भ्याड हत्त्या म्हणजे महाराष्ट्रातील दुसरा गांधी------वध आहे. एखाद्याचे विचार पटत नसतील तरीही न पटणा-या विचाराचे खंडन विचारानेच करायचे असते, विचाराचा मुकाबला विचारानेच करायचा असतो,ही महराष्ट्राची संस्कृती आहे. पण ज्यांच्याकडे विचारच नाहीत अशा काहीं संघटना अलिकडे आम्ही म्हणू तेच खरे, आम्ही ठरवू तोच इतिहास, आम्ही सांगू तोच कायदा असे वागून इतर दुर्बल घटकांची गळचेपी करीत आहेत. धन-दांडगा, जात-दांडगा, सत्ता दांडगा ह्या हत्त्यारांचा दुरूपयोग करून महाराष्ट्राच्या समाज कारणात आणि राजकारणात गुंडागर्दी निर्माण करून दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न काहीं संघटना करीत आहेत , त्याचाच हा परिपाक आहे. परिवर्तन वादी विचार संघटनानी याचा विचाराने प्रतिवाद करून अशा दहशतवादी संघटनेचा बुरखा फाडून त्यांचे खरे रूप जनतेसमोर आणले पाहीजे.
    August 20 at 1:36pm · Unlike · 1

    Prasad Sankpal really this is bad day for we Indians
    August 20 at 1:44pm · Unlike · 1

    Milind Hiwarale BhavPurn aadaranjali...
    August 20 at 2:41pm · Unlike · 1


    FROM:FACEBOOK of Hari Narke

    ReplyDelete
  5. Lata Prama It is so shocking and disturbing to here the news of Dr. Narendra Dabholkar's murder. so many of us were working with him in ANS. There are so many memories where I got a chance to share the platform and put my views. it is an alarm to understand that how difficult the fight will be against such fanatics and fundamentalists.
    Fanaticism is always coward and not rational to discuss openly.
    But the legacy of rationalism will continue without fear..
    It will be real tribute to Dr. Narendra Dabholkar and justice to his efforts by pressurizing to pass the bill against superstition in central..
    Here I am sharing the news I read on net, the following words in press conference in first week of August 2013 by Dr. Dabholkar, shows a patience to continue this long battlestruggle against religious fundamentalists by democratic means.
    Dr. Dabholkar of ANiS said in press conference that ‘it took 40 years for Pune Municipal Corporation to install statue of Jyotiba Phule; I am ready to wait for getting this Act passed. Managing Committee of ANIS will decide the further course of action in the matter’.
    August 20 at 3:12pm · Unlike · 2

    Padmakar Borode अशाच प्रकारे परिवर्तनवादी विचारवंतांच्या खुनाची परंपरा सुरु राहीली तर .....खरेच आम्ही कोणत्या परंपरेच्या स्तरावर पोहोचलो. याचा विचार करणे गरजेचे झाले आहे.
    August 20 at 3:41pm · Unlike · 2

    Navnath Waghmare dr.narendra dabholkar yanna jalna jilha mahatma fule samta parishdechya vatine bhavpurna shradhanjali.
    August 20 at 3:50pm · Unlike · 1

    Shrirang Kamble Shocking!
    August 20 at 6:07pm · Unlike · 1

    Raju Desale lal salam
    August 21 at 9:54am · Unlike · 1

    Chandrakant Kabade very shoking
    August 21 at 11:49am · Unlike · 1

    Sculptor Vijay Burhade Shilpkar Nishedh
    August 21 at 5:14pm via mobile · Unlike · 1

    Dinesh Nanore गांधीवादी विचारसरणीचे ज्येष्ठ विचारवंत, नरेंद्र दाभोळकर गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात जादुटोणा विरोधी विधेयक मंजूर करण्यात यावे, यासाठी लढत आहे
    August 21 at 9:38pm · Unlike · 1


    from:facebook hari narke

    ReplyDelete
  6. Dilip Talekar, Sunil Dibrito, Vilas Mohitepatil and 40 others like this.

    Bhairawnath Wakale SATYSHOSHAK SAMAJACHE ADHIVESHAN lavale hote tyach veli dabholkaranni shinganapurache andolan suru kele....hi mahiti navinach milali Bhau.aapale dhanyavad.mi suddha satyshodhak ahe.satyshodhakanni sajag rahile pahije.
    August 20 at 8:14pm via mobile · Like



    Boost Post
    2,813 people saw this post

    From: Hari Narke Page

    ReplyDelete
  7. Sunil Dibrito, Vilas Mohitepatil, Savita Mohite and 31 others like this.
    View 8 more comments

    Usman Ilai Bagwan bhavpurn aadrangali A B Mahatama fule samata parishad solapur mahanagar wa samast samata saynik
    August 21 at 1:23am · Unlike · 1

    Ajit Sawant नरेंद्रदींच्या जाण्याने न भरून येणारे नुकसान झाले हे खरे, परंतु प्रत्येक काळ्या ढगाला रूपेरी किनार असते तसेच काहीसे घडताना दिसत आहे. नरेंद्रजी जाता जाता अंधश्रध्देविरूध्दच्या लढ्याला मोठेच बळ देऊन गेले आहेत. पुन्हा नवी जागृती, नवी चेतना निर्माण होताना ...See More
    August 21 at 12:24pm via mobile · Unlike · 4



    Boost Post
    2,928 people saw this post


    from:hari narke's page

    ReplyDelete
  8. kuldeep ambekar
    22:07 (10 hours ago)
    Reply
    to me
    sir,namaskar me tumcha kalamnama madhil lekh vachala ahe kup
    nice,vichar karayala launay joga ahe..ek ques.ahe sir kharch apan
    purogame ata rahilot ka ? Ka asay sanatani apalay doky var kadatat.
    ?apan fule,ambedakari vicharwadani ky karave asay tumala vat tay ?.jay
    joyti .jay bhim.

    ReplyDelete