नरुभाऊंचा स्वभाव अतिशय आर्जवी आणि संयमी होता. ते काटेकोर शिस्तीचे होते. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत त्यांच्या तोडीचा उत्तम संघटक दुसरा सापडणं केवळ अशक्य. त्यांची जुन्याजाणत्यांपासून युवा पिढीतील अनेकांशी गट्टी होती. आपल्या विचारांशी ते ठाम असले तरी कोणताही टोकदार मार्ग ते टाळत असत. कायम आपलं म्हणणं अत्यंत विनयपूर्वक, युक्तिवादाच्या आधारे मांडत असत. त्यांच्यासारख्या ऋजू स्वभावाच्या नेत्यावर खुनी हल्ला व्हावा हे भयानक आहे. हादरवणारं, सुन्न करणारं आहे. फुले, शाहू, आंबेडकर, आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात आज कोणीही विवेकी माणूस सुरक्षित आहे असं वाटत नाही.
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे ते एक महत्त्वाचे नेते होते. श्याम मानव यांच्यासोबत काही वर्षं काम केल्यानंतर त्यांनी स्वतंत्रपणे काम सुरू केलं. गेली १८ वर्षं राज्यात अनिष्ट प्रथा आणि जादूटोणाविरोधी विधेयक संमत व्हावं म्हणून दाभोळकर झटत होते. हे विधेयक त्वरित पारित करणं हीच त्यांना आदरांजली ठरेल.
राज्याच्या पुरोगामी चळवळीतील एक खंदा कार्यकर्ता आज आपण गमावला आहे. विवेकवादाचा आवाज दाबण्यासाठी कार्यरत असलेल्या विचारशत्रुंनी ही हत्या केली असावी असं वाटतं. गेली अनेक वर्षं ते ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक होते. त्यांनी या साप्ताहिकाला एक नवं कसदार रूप प्राप्त करून दिलं. ते अतिशय प्रभावी वक्ते आणि लोकप्रिय क्रिडापटू होते. कबड्डी या खेळातील ते राज्यपातळीवरील नामवंत खेळाडू होते. सामाजिक कृतज्ञता निधी आणि महाराष्ट्र फाऊंडेशनचे समन्वयक म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्या जाण्याने आज पुरोगामी चळवळीचा आवाज हरपला आहे.
अंधश्रद्धा निर्मूलनाचा त्यांनी ध्यास घेतलेला होता. ते या चळवळीचे जणू प्रतीकच बनले होते. त्यांची या विषयावरील असंख्य पुस्तकं प्रसिद्ध आहेत. नरुभाऊ हे मुळात सातार्यातील एक नामवंत डॉक्टर. लक्ष्मण माने, वर्षा देशपांडे आदींना सातार्यात आणून सामाजिक कामात उभं करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. समतावादी चळवळीत सक्रिय झाल्यानंतर त्यातच ते इतके गुरफटून गेले की वैद्यकीय व्यवसायासाठी वेळ देणं त्यांना शक्य झालं नाही.
मी शाळकरी वयात त्यांच्या भाषणांचा चाहता होतो. १९८२ साली नामांतर आंदोलनात त्यांच्यासोबत ठाण्याच्या तुरुंगात एकाच कोठडीत असताना त्यांचा मला प्रदीर्घ सहवास लाभला. त्यांच्याशी रात्रंदिवस मारलेल्या गप्पा आजही स्मरणात आहेत. ते आमचे हिरो होते. समता आंदोलन या संघटनेत त्यांच्या नेतृत्वाखाली मी काही वर्षं काम केलं. मी साधनेत अधूनमधून लिहित असे. ते साधनाचे संपादक झाले तेव्हा प्रा. रामकृष्ण मोरे यांनी राज्यात पहिलीपासून इंग्रजी शिकवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्याला प्रचंड विरोध झाला. स्वतः नरुभाऊ त्याच्या जबरदस्त विरोधात होते. मी मात्र या निर्णयाचा समर्थक होतो. त्यांनी साधनेचा एक विशेषांक त्यावर काढला. त्यात दुसरी बाजू यायला हवी म्हणून मी लेख लिहावा किंवा शिक्षण मंत्र्यांची प्रदीर्घ मुलाखत घ्यावी असं नरुभाऊंनी सुचवलं. अवघ्या दोन दिवसांत हे करायचं होतं. त्या मुलाखतीसाठी मी खूप आटापिटा केला होता. पहिल्यांदा मोरेसर मुलाखत द्यायला तयारच नव्हते. साधना हे साप्ताहिक मूठभर लोक वाचतात, त्यात मुलाखत दिली काय नि नाही दिली काय, काय फरक पडतो? असं त्यांचं मत होतं. आज दाभोलकरांनी प्रचंड परिश्रमाने साधनेला मिळवून दिलेली लोकप्रियता आणि उंची बघायला मोरेसर असते तर ते नक्कीच चकित झाले असते. साधना बालदिवाळी अंकाचा लाखभर खप ही मोठी गोष्ट आहे. नरुभाऊंचा एकखांबी तंबू नव्हता. युवा संपादक म्हणून विनोद शिरसाठ या युवकाला नरुभाऊंनी आपल्या तालमीत तयार केलं. तो साधना उत्तम चालवत आहे.
नरुभाऊ तत्त्वनिष्ठ असले तरी अव्यवहारी नव्हते. मीडियाचे ते डार्लिंग होते. सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची किमया त्यांना साधलेली होती. अनेक ख्यातनाम व्यक्तिंशी जुळवून घेण्याची कला त्यांनी आत्मसात केलेली होती. त्यांच्या नाना तर्हा सांभाळण्यात नरुभाऊ वाकबगार होते. एक ना धड भाराभर चिंध्या असं मात्र त्यांनी कधीही केलं नाही. गेली २५ वर्षं चिकाटीने त्यांनी ‘अंनिस’चं काम लावून धरलं. अनेक बाबा, बुवांचे भांडाफोड केले. आम्ही मात्र त्यांना गंमतीने नरेंद्र महाराज दाभोलकर म्हणत असू. औरंगाबादला त्यांच्यावर आणि डॉ. श्रीराम लागूंवर हल्ला झाला तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. त्यावेळी डॉ. लागूंचा हल्लेखोरांपासून बचाव करण्याच्या प्रयत्नात त्यांच्यासोबत चार रट्टे मीही खाल्ले आहेत.
नरुभाऊ फार चाणाक्ष होते. आमच्या चळवळीचे ते चाणक्यच होते. अत्यंत धोरणी आणि हिशेबी. १४ वर्षांपूर्वी राज्यातल्या एका बड्या मुत्सद्दी आणि धूर्त नेत्याच्या सांगण्यावरून त्यांनी सार्वत्रिक निवडणुकांच्या काळात भल्याभल्यांना कामाला लावलं होतं. ‘लोकशाही प्रबोधन व्यासपीठ’ची उभारणी करून लोकशाही, पुरोगामी, धर्मनिरपेक्ष शक्तिंना मतदान करा असं सांगण्यासाठी हा दौरा आखण्यात आला होता. नरुभाऊ आमचे सारथी होते. डॉ. लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर या बड्या ग्लॅमरवाल्या लोकांसोबत एक लिंबूटिंबू म्हणून मीही असायचो. राज्याच्या सर्व प्रमुख शहरातील या सभा फार गाजल्या. पुढे अनेक वर्षं आम्हाला या सभांचा खरा सूत्रधार माहीतच नव्हता. बर्याच वर्षांनी आपल्याला कोणी कामाला लावलं याची निळूभाऊंना कुणकुण लागली. डॉक्टरांचे सगळ्या राजकारण्यांशी मधुर संबंध असत. कोणाला भेटायला जाताना कोणाचा उपयोग करून घ्यायचा याचं त्यांचं गणित अचूक असे. ते राजकारण्यांच्या सोबत असत आणि तरीही त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राखून त्यांच्यावर ते तुटूनही पडत.
सामाजिक कार्यकर्त्यांना दरमहा काही आर्थिक पाठबळ देता यावं या हेतुने ‘सामाजिक कृतज्ञता निधी’ जमा करायचं ठरलं. बाबा आढाव, पुष्पा भावे आदींनी त्यासाठी ‘लग्नाच्या बेडीचा’ दौरा आखला. त्या नाटकात तनुजा, लागू, निळूभाऊ, सुधीर जोशी असे अनेक दिग्गज भूमिका करत होते. दौर्यात या सर्वांची सोय करणं हे सोपं काम नव्हतं. नरुभाऊच ते काम करू जाणोत. नरुभाऊंनी हा ‘साकृनि’ आजवर सांभाळला.
अमेरिकेच्या सुनिल देशमुख यांच्याशी नरुभाऊंची मैत्री होती. महाराष्ट्र फाऊंडेशनचे ते गेली काही वर्षं समन्वयक होते. अनेक संस्थांशी त्यांचा संबंध होता. मात्र सगळ्याच कामात शक्ती खर्च करण्याऐवजी दोन-तीन ठिकाणीच त्यांनी सगळी शक्ती केंद्रित केलेली होती आणि ती कामं चिकाटीने लावून धरलेली होती. त्यामुळे त्या कामांवर ते आपला ठसा उमटवू शकले. त्यांची ही मोहर (मुद्रा) अखंड राहील.
नाशिकच्या एकनाथ कुंभारकरने आंतरजातीय विवाह केलेल्या नऊ महिन्यांच्या गरोदर मुलीची, प्रमिला कांबळेची निर्घृण हत्या केली.जातपंचायतीच्या दहशतीमुळे त्याने हे अघोरी कृत्य केलं. अनेकांनी त्याविरुद्ध आवाज उठवला. नरुभाऊंचं टायमिंग फार अचूक असे. नरुभाऊंनी नाशिकला तातडीने मोर्चा संघटित केला. परिषद लावली. परवा लातूरलाही ‘जातीला मूठमाती द्या’ ही परिषद घेतली. त्यानिमित्ताने मी त्यांच्याशी चर्चा करत होतो. जाती संघटना आणि जात पंचायती यांचे पोशिंदे राजकारणी आहेत, निवडणुकीत जातीचं गठ्ठा मतदान मिळावं म्हणून ते याला रसद पुरवतात, त्यांच्यावरच हल्ला करायला हवा असं माझं मत होतं, आहे. नरुभाऊ म्हणाले, ‘हे करण्याएवढे आपण शक्तिशाली नाही. ते करायचं तर ‘पर्यायी राजकारण’ करावं लागणार. आजतरी तसं करणं मला परवडणारं नाही.’
मध्यंतरी मी संभाजी ब्रिगेडचे सर्वेसर्वा पुरुषोत्तम खेडेकर यांच्या जातिद्वेष पसरवणार्या पुस्तिकांचा साधार पंचनामा करणारे लेख लिहिले. सर्व ब्राह्मण पुरुष जातीय दंगली घडवून, जाळून किंवा कापून मारण्याच्या खेडेकरांच्या भूमिकेचा पर्दाफाश केला. ते लेख मी साधनाकडे पाठवले. मात्र मराठा संघटनांच्या दहशतीमुळे हे लेख प्रसिद्ध झाले नाहीत.
सत्यशोधक समाजाचं अधिवेशन आम्ही नगर जिल्ह्यात लावलं होतं. नरुभाऊंनी शनी शिंगणापुरला घराला कुलुपं नाहीत, चोर्या होत नाहीत या अंधश्रद्धेवर आघात करण्यासाठी, त्याचवेळी ‘चला चोर्या करायला, चला शिंगणापुरला’ अशी मोहीम घोषित केली. आमच्या परिषदेवर संकट आलं. आम्ही चिडलो. ‘त्यांनी हीच वेळ का निवडली? अंधश्रद्धा वाईटच आहेत पण चोर्या करणं नैतिक कसं?’ यावर माझा त्यांचा कडाक्याचा वाद झाला. चळवळीतील अंतर्गत वादावर बहुधा भूमिका न घेण्याचं आणि त्याद्वारे अजातशत्रू राहण्याचं कौशल्य त्यांना साधलेलं होतं.
व्यक्तिची हत्या करून विचारांची हत्या होत नसते. उलट विचार अधिक मजबूत होतात. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर अमर झाले आहेत. अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा तातडीने मंजूर करणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
36 people like this.
ReplyDeleteMahesh Joshi यातुन दोन बाबी अगदी स्पष्ट होतात १ सत्याचा जयघोष करणारे साधनासुद्धा सत्य मांडायला घाबरले व 2 सामाजिक संघटना मग ती कितीही अंधश्रद्धा निर्मूलन करणारी असो त्या राजकीय पक्षांक्या दावनीला असतात
4 hours ago via mobile · Like · 11
Amit Dubey purogamitwacha panchanama....
4 hours ago via mobile · Like
Vivek Ganpule वा: भाऊ,काय टायमिंग आहे, हे कौतुक की टिका हे नरके साहेब सांगतील टार बरे.....
4 hours ago via mobile · Like · 3
Bhalchandra Mahajan आता काय बोलावं..?????????? पळसाला ......
2 hours ago via mobile · Like
Sanjay Kumbhar म्हणजेच डॉ. लागू. निळू फ़ुले इत्यादींना अंधारात ठेवून दाभोळकरांनी त्यांना धुर्त मुत्सद्दी नेते शरद पवार यांच्या निवडणूक प्रचाराला जुंपले होते की सेना भाजपा युतीच्या विरोधात अपप्रचाराला जुंपले होते? धुर्त, चाणाक्ष व लबाड यातला फ़रक नरके सरांनी स्पष्ट केला तर खुप बरे झाले असते.
2 hours ago · Like
Rahul Pawar bhau tumhe lihacch lekh ani fb var post kara amhi tey spred karu,
about an hour ago · Like
Vaibhav Joshi chaan
53 minutes ago · Like
from:facebook of Bhau Torsekar
भाऊ तोरसेकर यांचे फेसबुक:
ReplyDeleteYou, Satish Waghmare, Vaibhav Chhaya, Ramdas Bhujbal and 185 others like this.
Yashwant Gosavi तोरसेकर सर
त्या साठी हरी नरके यांनी देखील पुरोगामी किंवा प्रतिगामी या पैकी कुठल्याही एकाच बाजूने असावे
त्यांच्या भूमिका भुजबळांच्या राजकीय भूमिकेनुसार बदलत असतात याचे काय??
August 22 at 3:21pm · Like · 7
Shivraj Dattagonde samazjivan tikavanyasathi sahid pahije yavar bahutek tv varil lokanacha viswas disto.pan maharastr sarkartar sudharna karnyasathi sahid honyachi vaat pahanar ani to melyavarach karnaar.
August 22 at 3:28pm via mobile · Like
Shashikant Ghaskadbi Dhabolkaranchya chitevar aapapali poli sheknyachi spardhach ya tathakathit vicharvantanmadhye lagali aahe.
August 22 at 3:29pm · Like
अहिल्या सेना महाराष्ट्र sanjay sonavni sarana pan sambhaji briged kadun dhamkya yet astatat
August 22 at 3:34pm · Like
Bhau Torsekar Yashwant Gosavi नरके यांनी कुठल्या बाजूने असावे हा त्यांचा व्यक्तीगत प्रश्न आहे. पण एक भारतीय नागरिक म्हणून त्यांच्या जीविताची सुरक्षितता हा संपुर्ण समाजाचा व देशाचा प्रश्न आहे. एखाद्याच्या भूमिका वा विचारानुसार त्याच्या सुरक्षेचा विषय चर्चिला जाऊ शकत नाही.
August 22 at 3:39pm · Like · 16
Prabodhan Patil कालच्या सवालमध्ये एक मुद्दा आपसूकच प्रकाशात आला. तो म्हणजे शिरीष इनामदारांनी मांडलेला - हिंदूबहुल राष्ट्रात पोलिसांतही हिंदुबहुल आहेत त्यामुळे ते सुद्धा धर्मांध होतात व ९३ च्या दंगलीत आयुक्तांनी ते कबुल केले होते की पोलिस निष्क्रिय झाले होते … कुलाबा परिसराचे उदाहरण. म्हणजे दोष पोलिसांचा होता , त्यावेळेस असलेल्या महाराष्ट्र सरकारचा नव्हे. मग हाच मुद्दा गुजरातमध्ये लागू होत नाही का ? तिथल्या जर ह्या न्यायाने पोलिसच निष्क्रिय असतील तर मोदी सरकारला दोषी का धरले जाते ?
August 22 at 3:45pm · Edited · Like · 7
Yashwant Gosavi नरके सरांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे त्यांना धमक्या आलेल्या नाहीत त्या त्यांना त्यांच्या वैचारिक भूमिकांमुळे आलेल्या आहेत
त्यामुळे त्यांच्या भूमिकांचा सुद्धा विचार झालाच पाहिजे
August 22 at 3:48pm · Like · 1
Bhau Torsekar Yashwant Gosavi सवाल तुम्ही विचारांचा मुकाबला विचारांनी करू इच्छिता की नाही असा आहे. तुम्हाला ते मान्य नसेल तर मग चर्चेला अर्थ नाही..
FROM: BHAU TORSEKAR'S FACEBOOK...
ReplyDeleteAugust 22 at 3:52pm · Like · 4
Yashwant Gosavi त्यांची पाठराखण करायची कुणी पुरोगाम्यांनी कि प्रतीगाम्यानी ??
त्यांच्या भूमिका कशा बदलतात हे पहायचे असेल तर youtube वर चे त्यांचे vidio पहिले तरी समजते
माझे आणि त्यांचे काही वैर नाही पण त्यांच्या सारख्या विचारवंतांच्या उद्या पहिल्या कि आमच्या सारख्या सर्वसामान्याला वाईट वाटते
असो,,,
धन्यवाद
August 22 at 3:53pm · Like · 5
Sanjay Vaze निखिल वटवागळे आणि त्यांच्यासारख्या सर्व समाजवाद्यांच्या "सद्सदविवेकबुद्धीला " ( जी त्यांच्यात थोडीफार होती ती ) भावपूर्ण श्रद्धांजली…
August 22 at 3:55pm · Like · 4
Rohit Shelar Sarkar asha ghatana zalyavarach jage hote
August 22 at 3:56pm · Like
Bharat Hinge Vagale ha tr mala kadhi kadhi khup bhitra watato kadhi kadhi chid yete tyanchi tya kade yevad moth vyaspith asun to kai goshti dabato an he mi mazya dolyani pahilay tehva pasun mi ibn pahanch sodun dilay
August 22 at 4:01pm via mobile · Like
Nageshwar Virkar narake saranchy udy marane asu or vaicharik bhumika badalne asu yancha virodh vicharane kara.
August 22 at 4:09pm · Edited · Like
Prabodhan Patil पण मला राहून राहून वाटते की बीजेपी - शिवसेनावाले आपली बाजू मांडण्यात किंवा डिप्लोमसी मध्ये नेहमीच कमी पडतात. कालच्या सवाल मध्ये प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांनीही ठामपणे सांगितले नाही कि आम्ही विधेयक संमत करू , आम्ही सर्व सूचना विचारात घेऊन त्याप्रमाणे निर्णय घेऊ असे म्हटले आणि वेळ मारून नेली. उत्तर जुजबी होते हे वागळेनेही म्हटले. पण त्याच प्रश्नाचे उत्तर गिरीश बापटांना देत आले नाही. ते म्हणू शकत होते की सार्वमत झाल्यावर आम्ही निश्चितच पाठींबा देऊ आणि तसेही आजकाल एखाद्या नेत्याने बोललेली भूमिका पूर्ण पक्षाची भूमिका ठरत नाही. पण त्यांनी गोंधळलेली भूमिका मांडली. अशाने होते काय , वेळेस काहीही चूक नसताना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहावे लागते . खरी चूक तर त्या सरकारची होती ज्यांनी बहुमत असताना विधेयक संमत केले नाही , पण तो मुद्दा पूर्णतः बाजूला पडला आणि मग काय हिंदुत्वाचे समर्थन करणाऱ्या पक्षावर आगपाखड सुरु झाली.
August 22 at 4:18pm · Edited · Like · 4
Laxmikant Shirke निखिल वागळे हे नेमके कुणाच्या बाजुने असतात हे कळत नाही , सत्याच्या बाजुने निश्चीत नाहीत कारण जेव्हा
August 22 at 4:12pm · Like · 3
Narottam Patel jar samza gandhi vadh hindu mathe firu ne keli ahe.tar gandhini fatka aani fatka hinduna apaya kela hota. mathra dabholakar tar jadu gande yasathi ladat hote. he tar etar dharma pan hote.dabholakar kay fatka hinduci andhashrada mitavayal nighale hote kay?
August 22 at 4:15pm · Like
FROM: BHAU TORSEKAR'S FACEBOOK...
ReplyDeleteRahul Purohit वागळे कुणाच्या बाजूने नसतात. ते "सेक्यूलर" असल्यामुळे हिंदूत्ववाद्यांच्या विरोधात असतात.
August 22 at 4:17pm · Like · 4
Laxmikant Shirke मागे आयबीयन लोकमतचे मालकच भ्रष्टाचार प्रकरणात सापडले तेव्हा सर्व चँनल वर ति बातमी झळकत होती पण आयबीयन साधी पट्टी सुध्दा आली नाही हे स्पष्ट उदाहरण आहे .
August 22 at 4:17pm · Like · 5
Rahul Purohit प्रामाणिक कुत्रा कधी मालकावर भुंकत नसतो
August 22 at 4:18pm · Like · 4
Laxmikant Shirke म्हणजे निखिल हे वागळे नसुन वटवाघुळ आहेत का?
August 22 at 4:22pm · Like
Aparna Lalingkar निखिल वागळे हे फक्त स्वत:च्या बाजूचे आहेत. माझं तर आता असे ठाम मत झाले आहे की दाभोळकरांची हत्या या तथाकथीत पुरोगामी लोकांनीच सुपारी देऊन घडवून आणली आणि त्यामुळे गांधीवधाचे गुर्हाळ लावायला हे लोक मोकळे झाले. माणूस शरीराने जरी मेला तरी त्याच्या विचारांनी तो अमर राहतो. गांधीची शारीरिक हत्या जरी नथुराम गोडसे यांनी केली असली तरी गांधींची खरी हत्या त्यांच्याच या तथाकथीत अनुयायांनी त्यांच्या विचारांची हत्या करून केली आहे........आणि एकदाच नाही तर अनेकदा. हरि नरके यांचा आवाज ह्या गुर्हाळ वाल्यांना कसा ऐकायला येणार?
August 22 at 4:24pm · Like · 8
Rahul Purohit
August 22 at 4:25pm · Like
Rahul Purohit दाभोळकरांचा देव झाला नाही म्हणजे मिळविले..
August 22 at 4:25pm · Like · 5
Aparna Lalingkar दाभोळकरांच्या तथाकथीत मित्रांनीच गेल्या दोन दिवसांत विविकवादाची हत्या करून अप्रत्यक्षपणे दाभोळकरांच्या विचारांची हत्या केली आहे.
August 22 at 4:27pm · Like · 1
Yogesh Kokatay Sir, But I tried to check Mr. Hari Narke's FB timeline immediately , but could not find any such comment. In fact I could not find any status update by Mr. Hari Narke. He should have taken a screen shot and posted it so that people could have seen who is threatening him. I feel someone should call him n inform him to share the screen shot.. If at all he was speaking the truth..
August 22 at 4:28pm via mobile · Like · 1
FROM: BHAU TORSEKAR'S FACEBOOK...
ReplyDeleteBhausaheb Patil अहो भाऊ, एक गोष्ट लक्षात घ्या:- एखाद्याने मारण्याची धमकी दिली हि कांही "बातमी" होऊ शकत नाही, पण त्याच व्यक्तीचा जर खरोखरच खून झाला तर त्यावर आपली पोळी भाजता येते, ती सनसनाटी बातमी होऊ शकते. दिवसभर त्या बातमीचा रतीब घालता येऊ शकतो. आता असा विचार करा: जर दाभोळकरावर फक्त खुनी हल्ला झाला असता तर एक बातमी देण्यापलीकडे कुणीच काही केले नसते आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पाहिले नसते. पुण्याच्या लोकल पोलिसांनी यथासांग सोपस्कार पार पाडले असते आणि सगळे जण कांही घडलेच नाही अशा अविर्भावात वावरले असते.
मिडियाला फक्त स्वार्थ दिसतो, अन्ना हजारेंचे आंदोलन असो अथवा दिल्लीतला चालत्या बसमधला बलात्काराचा प्रकार असो, मिडियाने प्रकरण एका विशिष्ठ मर्यादेपर्यंत ताणले आणि मग सोडून दिले. निखिल हे एक त्यांच्यातले प्रातिनिधिक उदाहरण असे समजायला हरकत नाही.
August 22 at 4:40pm · Like · 9
DrShivajirao Patil He asach chalayache. Prattyekache agende vegle aahet. Boltat matra sarkhach.
August 22 at 4:46pm via mobile · Like
Pravin Deshmukh प्रा. हरी नरके यांच्या विधानांची शासनाने दखल घेवून त्यांना संरक्षण द्यावे.
कै. दाभोळकर गेल्याचे वागळे यांना दु:ख नाही.
या निमित्ताने हिंदूत्वाला कसे झोडपता येईल याचा आसूरी आनंद आहे.
असे त्या चर्चेतून दिसले.
August 22 at 4:47pm · Like · 7
Santosh Parab व्यक्तीशी कसे संभाषण करावे, हाही शिष्टाचार माहीत नसलेले निखिल वागळे समाजाला काय दिशा देणार
August 22 at 4:54pm · Like · 1
Bhalchandra Mahajan ज्या प्रकारे वागळे िगरीश बापटांशी बोलत होता, त्यावरून मला वाटले की दाभोळकरांचे खुनी सापडले आणी वागळे त्यांची खरडपट्टी घेतोय, अरे काय लावल काय साला, हरी नरकेंनी खुप मस्त सांिगतलं, की जस अंधश्रध्देच्या नावाखाली िहंदू धर्मात काही वाईट असेल तर फुले, शाहू, आंबेडकरांच्या नावाखाली सुद्धा अनेक अंधश्रद्धा पसरवल्या जात आहेत. नरके साहेबांच्या या मताला मी खर्या अर्थाने धर्मिनरपेक्ष म्हणेन. बाकी सारा तमाशा आहे नुसता
August 22 at 5:05pm · Like · 14
Yogesh Burke मेलेल्याच्या टाळुवरच लोणी खाणारा वागळे
August 22 at 5:07pm · Like · 2
Bapu Gaikhar स्वत:चा कसा बडेजाव दाखवु या अहमहमिकेत वाहिन्यांचे मुलाखतकार गुरफटलेत , त्यातुन निखिल वागळे तरी अपवाद कसे ?
August 22 at 5:13pm · Like · 2
Ram Methe Bhau u r great. ya vatavrnat suddha he vichar mandtay. salam
August 22 at 5:44pm · Like
Chandrakant Joshi Farach Chan.Maheshji-Vaglyana Apan Ugichach mothe karataahot. Te tynchi Dusryacya angavar Dhaun jayachi Ani Samoril Mansacha Aavaj Band Karayaca Hi Juni Padhat aahe.Bapat sahebana Kahi Mudde sangnyasathi Bolavayache Ani Boluch Dyayche Nahi.
August 22 at 5:47pm · Like · 1
FROM: BHAU TORSEKAR'S FACEBOOK...
ReplyDeleteShreekant Juvekar खरे तर इथेच दाभोळकरांची इतक्या वर्षांची मेहनत वाया गेली. प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक कसोटीवर तपासून मगच विश्वास ठेवा म्हणणारे दाभोळकर कुठे आणि त्यांचे अनुयायी म्हणवणारे किंवा त्यांच्या कार्याची तोंड फाटेस्तोवर स्तुती करणारे लोक, सकृतदर्शनी कुठलाही पुरावा नसताना, हिंदुत्ववादी लोक आणि संघटनांच्या नावाने बोंब मारत सुटले आहेत. सप्तर्षी, वागळे वगैरे प्रभृती साक्षात्कारी आहेत. दाभोळकरांची हत्या झाल्या झाल्या तत्काळ त्यांना समजले कि हत्या कोणी केली आहे ते.
August 22 at 6:21pm · Like · 5
Uttam Shinde एखादा मनुष्याला कैन्सर होऊ राहीला आहे व त्यामुळे त्याचा मृत्यु होऊ शकतो हे माहीत असताना त्याच्यावर उपचार करुन त्याला वाचवायचे सोडुन उलट दुसरा एक मनुष्य कैन्सरमुळे मृत्यु पावलेला आहे त्याच्याविषयी उलट सुलट गप्पा मारुन काय उपयोग जे हातात आहे ते करा ना?
August 22 at 6:36pm · Like · 4
Sudarshan R. Salunke भाऊ आमच्या भावनांना शब्दबध्द केलत तुम्ही
August 22 at 7:12pm · Like · 1
Kiran Sonawane एकदम बरोबर आहे , बऱ्याचदा चेनल वरील चर्चा ह्या अश्या भरकटत जातात, त्यामुळे ह्या चर्चा अतिशय गंभीर आणि नेमकेपणाने होण्याची गरज आहे, तुम्ही अतिशय मर्मावर बोट ठेवलेत
August 22 at 7:29pm · Like · 1
Shivraj Pukale narkena marne etke sope nahi
August 22 at 7:59pm · Like · 1
Narayan Gotekar No one is safe in India , Every one has to take care of himself , do not depend on Government and police , Maharashtra has become worst than Bihar !!!!!!
August 22 at 8:38pm · Like
Dinesh Nanore हरिनरकेयानधमकि देण-याशक्तिचनिशेधकरतो.
August 22 at 9:04pm · Like · 1
Suresh Dhembare Aho pan Narkena kharokhar dhamki milali asa apan khara ka samjava.karan aaj ashi paristhiti ahe ki asha ghatane nantar pratek manus sangto ki mala ashi dhamki milali ,mala asa tras dila gela. Mag te ata paryant shant ka?jya prakare kaal sarva charcha karnare hindu hote asa vagle varanvar sangat hote.te visarle ki he sarva te Pandarpeshi ghatak ahet je secular navacha burkha pangharlele ahet.tyana samanya mansala honara tras kasa samajnar.
August 22 at 10:35pm via mobile · Like
Suresh Dhembare Nikhil vagle he Kon ahet he visrat ahet. Tyani kal Bapatana vicharat hote ki Eka shabdat sanga ki tumhi ya vidheyakala pathimba denar ki nahi.manje bapatancha mat tyana tyancha studio madhe hava hota.te match fixing kelya pramane charcha na karta te vidheyak pas kara asa suchvat hote. Tya charche nantar tyanich ek batmi sangitli ki Vadra che je jaminiche saude zhale tyat ac madhe paise nastana tyani coror cha jamin vyavhar kela. Pan ti batmi tithch sampavli pudhe kadhich to vishay enar nahi.
August 22 at 10:43pm via mobile · Like · 1
Sunny Akkisagar ...असे धमकी देणारे...दहशतिचे वातवरण निर्माण करू पाह्णारे...असे जे कोणी आहेत त्यांचा जाहिर व तीव्र निषेध !
August 22 at 11:21pm · Like
Prashant Nilkund आम्हाला मुडदे हवेत. आम्हाला त्यांच्या टाळूवरले लोणी आवडते. आम्ही काय बी एन, आम्ही झ. टीव्ही, आम्ही आबापी माझा, आणि आम्हीच जय महाराष्ट्र!
August 23 at 1:34am · Like · 2
FROM: BHAU TORSEKAR'S FACEBOOK...
ReplyDeleteMangesh Kadu Hi bab nichitach chintajanak aahe. Narake sir asha dhamkyana nichitach bhik ghalat nasale tari aata gafil rahun chalnar nahi.
August 23 at 8:39am · Like
Vishal Firodiya media fkt paise kamavinyasthi aple dukaan mandun basliye.aaplya jivala dhoka asel tr police station mdhe jatat,he Hari Narke sarkhya suuudn(?) vyaktina shikvave lagel ka?
August 23 at 8:59am · Like
Jayant Nikam आजच्या विज्ञान तंत्रज्ञान युगात त्या धमकी देणाऱ्याचा शोध सहज लागु शकतो. त्यांना खरोखरचं धमकी आली असेल तर त्यांनी पोलिसात तक्रार करायला हवी होती. उगाच टिव्ही समोर हिरोगिरी करुन काय फायदा.
August 24 at 12:09am · Like · 1
Kavita Dalvi Fb var takli mhane. Dobholkaranna dhamkya Khup alya pan tyanchya tyanni Kadhi gajavaja kela nahi Hyavarunach te siddha hote ki the kiti sayammi hote hyanna Ek dhamki ti suddha khare ki khote sangateh he tyannach tavuk Tyacha kiti gajavaja. Ashya futlak goshtikade Nikhil vagle kay koni suddha baghnar nahi
August 24 at 12:26am via mobile · Like · 1
https://www.facebook.com/bhau.torsekar?fref=ts
ReplyDelete
ReplyDeleteby facebook messege:
Arun Ghoderao:
कलमनामा घेतला. आपली आदरान्जली फारच नेटकी नेमकी भावुक ह्रदयस्पर्शी आहे.