ओबीसींना अर्थसंकल्पात वेगळा निधी
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, April 19, 2011 AT 12:30 AM (IST)
अमरावती - येत्या जून महिन्यात ओबीसींची जनगणना केली जाणार असून, जनगणनेनंतर ओबीसींकरिता अर्थसंकल्पात स्वतंत्र निधीची तरतूद केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय नियोजन आयोगाचे सल्लागार सदस्य प्रा. हरी नरके यांनी दिली.
श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात महात्मा फुले सेवा संघाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय ओबीसी परिषदेत ते बोलत होते. परिषदेला प्रमुख पाहुणे माजी आमदार डॉ. पांडुरंग ढोले, सत्यशोधक कीर्तनकार अरविंद माळी, सेवा संघाचे सरचिटणीस लक्ष्मीधर मुळे, सुभाष सातव, ज्ञानेश्वर बोबडे, प्रवीण पेटकर, मनोज अंबाडकर, श्रीधर देशमुख, माजी उपमहापौर रामा सोळंके आदी उपस्थित होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई विधानसभेत 1939 मध्ये पहिल्यांदा ओबीसींच्या जनगणनेची मागणी केली होती. त्यानंतर राज्यघटनेत 340 व्या कलमानुसार तशी तरतूददेखील करण्यात आली. त्यानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीत ही जनगणना होणार असून, हा ओबीसींचा पहिला विजय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ओबीसींना मिळालेले आरक्षण पळविण्याचा घाट घातला जात असल्याचे प्रा. हरी नरके यांनी लक्षात आणून दिले.
OBC JAGE ZALYASHIVAY DESHAT PHULE-AMBEDKARI CHALVAL JOR DHARU SHAKNAR NAHI.SIR, DHANYAVAD.
ReplyDelete