Tuesday, January 28, 2014

नाणेघाट--"महारठीनो"











जुन्नरपासून पुढे सुमारे ४७ किलोमिटरवर नाणेघाट आहे. याठिकाणी २२२१ वर्षापुर्वीचा महाप्रचंड शिलालेख आहे. ज्या गुहेत हा शिलालेख कोरलेला आहे ती आकाराने ३०फूट बाय २० फूट बाय ३० फूट एव्हडी मोठी असून शिलालेखही याच आकाराचा आहे. ज्यात मराठी माणसांचा "महारठीनो" असा उल्लेख आहे. हा शिलालेख ब्राम्ही लिपीत आहे. या ठिकाणी सुमारे ४ फूट उंची व रूंदीचा दगडी रांजण आहे. हे स्थळ अतिशय रमणीय आहे.
Naneghata, Near Junnar, "MAHARATHINO" STONE INSCRIPTION.

Monday, January 27, 2014

Poignant images


Poignant images

FRIDAY REVIEW » THEATRE, THE HINDU, 23 JAN.2014,DIWAN SINGH BAJELI

Updated: January 23, 2014 19:26 IST  
http://www.thehindu.com/features/friday-review/theatre/poignant-images/article5609986.ece

A Marathi version of “The Caucasian Chalk Circle” introduced scenes from “Before the Law” to highlight the dichotomy between two great 20th Century thinkers.

Among Bertolt Brecht’s masterpieces his two plays, “The Good Woman of Setzuan” and “The Caucasian Chalk Circle”, are remarkable for vigour and morality with richly drawn dramatic personae. Both have been widely performed in India. At the Bharat Rang Mahotsav we had another opportunity to watch “The Caucasian Chalk Circle”, this time in a Marathi version titled “Ringan”, which was presented by Lalit Kala Kendra University of Pune, Maharashtra, at Shri Ram Centre recently.
The play is directed by Praveen Bhole who has also done the Marathi translation. Within the framework of epic theatre, Bhole has incorporated some innovative features into his production and has created a few characters. He has reduced the number of songs and he attempts to convey irony and the predicament of humanity through puppets and the character of the author. This character remains most of the time on the stage, noting down his observations on the scenes in progress and often speaking briefly. Of course, the chorus is here to demonstrate the contradictions in contemporary society. The director has also made an attempt to juxtapose Franz Kafka’s “Before the Law” with the court scenes of “The Caucasian Chalk Circle” to highlight the fundamental dichotomy between the artistic visions of two great visionaries of the 20th Century. Bhole shows from Kafka’s story a peasant waiting all his life in vain seeking entry to the law through an open door. He juxtaposes it with the court scene in Brecht’s play where Gurusha finally gets justice in the cruel world. Kafka’s story depicts the terrible reality in which humanity is not able to liberate itself from the abyss of exploitation. Brecht offers us an optimistic view of life, affirming the victory of values.
We see a civil war breaking out in a certain country. The rebel forces are determined to arrest the family of the ousted governor. There is chaos in the palace with the rebel forces encircling it. The governor’s wife is more concerned with collecting her costly clothes and belongings and least bothered about the safety of her infant son. A lowly maid Gurusha takes hold of the little baby, risking her life, and manages to disappear before the rebel forces kill the royal scion. The dramatic action shifts from one locale to another, illustrating the vicissitudes Gurusha has to undergo to save the little one. The bloodthirsty soldiers are desperately chasing her. Forgetting her own safety and that of her lover, a soldier, she is ready to go to any extent to protect the child. Brave, dynamic and endowed with common sense, she manages to outwit the soldiers hounding her. At the cost of her honour and the pledge of marriage she has given to her lover, she agrees to marry a man on his deathbed to give the baby a name, social respect and the opportunity to grow in a better condition. Her dilemma intensifies many times when the man appears to be merely feigning illness to escape conscription in the army.
One of the scenes where Gurusha with the baby on her back crosses the badly damaged bridge over a river is very effectively enacted. As soon as she reaches the other bank of the river, the bridge tumbles down with a crash on the swiftly flowing river, with her pursuer watching dismayed from the opposite bank. Similarly, in the scene where she is washing clothes on the riverbank, her long lost lover, back from the army, calls out exultantly from the opposite bank, but suddenly sees the child nearby and leaves, crestfallen. The scene is imbued with irony.
Another important character in the play is Azdak, a rogue whose bizarre sense of justice, helped by the unique device of a chalk circle, helps Gurusha regain her happiness. The costumes are imaginatively designed. For Gurusha and peasant characters, earthy colours are used while the royalty are in gaudy colours with masks to reflect the hypocritical character of the class.
Pramiti Narke’s portrayal of Gurusha is convincing. Her Gurusha is young and dynamic with intense inner motivation to protect the infant. Naresh Dongarwar as Azdak is eccentric and inimitable, springing surprises with his judgements.
MORE IN: Theatre | Friday Review | Delhi | Features

Wednesday, January 22, 2014

पुस्तके



चांगली पुस्तके वाचून संपली तरी मनात कायम घर करून राहतात.पुस्तक वाचण्यापुर्वी आपण जेथे होतो तेथून बरेच पुढे निघून गेल्याचा ,मोठा पल्ला गाठल्याचा प्रत्यय ती देतात.वाचून झाल्यानंतर काही तरी नवे गवसल्याचा आनंदही  ती देतात.जगण्यातली समज वाढते. जगभरच्या माणसाचा पिंड आणि भवताल समजायला ती हातभार लावतात.समाज.पर्यावरण,नियती,नितीमत्ता,समष्टी याबद्दलची आपली इयत्ता अशी पुस्तके उंचावतात.मनाची श्रीमंती काहीतरी नक्कीच वाढते.मानसिक स्थैर्य आणि आकलनाची पृष्ठभुमी भक्कम होते....
गेल्या तिमाहीत वाचलेली काही महत्वाची पुस्तके, जी तुम्ही मित्रांनी अवश्य वाचावीत असे वाटते, .....
१.एका आरंभाचे प्रास्ताविक, रंगनाथ पठारे, शब्दालय, श्रीरामपूर, प्र.आ.जुलै,२०१३
२.मनात, अच्युत गोडबोले, मनोविकास, पुणे, २१ वी आ., आक्टो.२०१३
३.खेळता खेळता आयुष्य.गिरिश कर्नाड,राजहंस,पुणे, दु.आ. मे २०१३
४.श्री गणेश आशियाचे आराध्य दैवत,म.के.ढवळीकर, राजहंस,पुणे, दु.आ.एप्रिल, २०१३
५.मी अल्बर्ट एलीस, अंजली जोशी, शब्द पब्लिकेशन्स, मुंबई, आ.७वी, मे २०१३
६.सह्यगिरीतील गांधी, स्नेहल नेने. पुणे, {सुनिल नेने},प्र.आ.डिसें.२०१३
७.अस्वस्थ वर्तमान, आनंद विनायक जातेगावकर,शब्द पब्लिकेशन्स, मुंबई, प्र.आ.फेब्रु.२०१३
८.शिवार ते संसद, राजू शेट्टी, पद्मगंधा,पुणे, प्र.आ.डिसें.२०१३
९.बाकी शून्य, कमलेश वालावलकर,मेनका,पुणे, तृ.आ.मे२०१३
१०.ज्ञानभाषा मराठी, सदाशिव देव, पद्मगंधा,पुणे, प्र.आ.मार्च २०१३
११.माझा ईश्वर स्त्री आहे, नूर जहीर,मनोविकास, पुणे, प्र.आ.२०१२
१२.फिनिक्सच्या राखेतून उठला मोर, जयंत पवार, लोकवांग्मय,मुंबई, प्र.आ.२०१०
१३.मुसाफीर,अच्युत गोडबोले, मनोविकास, पुणे, २९ वी आ., आक्टो.२०१३
१४.खेळघर, रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ,मनोविकास, पुणे, प्र.आ.मार्च २०१३
१५.तसव्या, अशोक पवार, मनोविकास, पुणे, प्र.आ.आ‘गस्ट. २०१३
१६.वाचणार्‍याची रोजनिशी, सतीश काळसेकर,लोकवांग्मय,मुंबई, प्र.आ.२०११
 ...............................

Friday, January 17, 2014

मनाचा तळ शोधणारे चित्रपट

 






जगभरात दरवर्षी अनेक चित्रपट महोत्सव होतात. त्यातल्या काहींचे स्थान फार प्रतिष्टेचे आणि महत्वाचे असते. अशाच वैशिष्ट्यपुर्ण महोत्सवात अवघ्या १२ वर्षात पुणे आं.चि.महोत्सवाने स्थान पटकावलेले आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आता राज्य सरकारच्या अधिकृत महोत्सवाचा दर्जा मिळाला आहे.जगातला हा असा एकमेव चित्रपट महोत्सव आहे की ज्यात मराठी चित्रपटांचेही परिक्षण जागतिक पातळीवरील अमराठी परिक्षक करतात. यावर्षीच्या महोत्सवात सर्वात गाजलेला चित्रपट होता करमाळ्याच्या नागराज मंजुळे यांचा "फ‘न्ड्री". लोकमान्यता आणि आंतरराष्ट्रीय विद्वत्मान्यता असा मेळ फारसा कधीही जुळून येत नाही.मात्र येथे तो सुवर्णयोग जुळून आला आणि जागतिक परिक्षकांनी दिलेले सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार असे महत्वाचे ४ पुरस्कार आणि प्रेक्षकांच्या पसंतीची सर्वोत्तम पावती मिळालेला पाचवा पुरस्कार असे सगळे पुरस्कार जिंकणारा फ‘न्ड्री एकमेव चित्रपट ठरावा.
शक्तीशाली दलित संवेदना, समकाल आणि सखोल जीवनदर्शन यावरील श्रेष्ठ चित्रपट प्रेक्षकांनीही उचलून धरावा असे बहुधा पहिल्यांदाच होत असावे.आता हा चित्रपट तिकीटबारीवरही यशस्वी होवो हीच शुभेच्छा. मंजुळे यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. सोमनाथ अवघडे ह्या यातल्या नायकाची भुमिका करणार्‍या अभिनेत्याचाही हा पहिलाच चित्रपट आहे. करमाळ्याजवळील केम या लहानशा खेड्यात ज्याचे वडील हलगी वाजवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात अशा घरात जन्मलेल्या आणि स्वत:ही हलगी वाजवणार्‍या या मुलाने हा पुरस्कार मिळवला.तो अवघ्या चौदा वर्षांचा आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार मिळवलेला पोलंडचा "पपुजा "  हा चित्रपट जोना कोस-क्राऊज व क्रायझ्सतोफ क्राऊज यांनी दिद्गर्शित केलेला होता. जिप्सी या भटक्याविमुक्त जमातीतील एका प्रतिभावंत कवयित्रीची ही सत्यकथा काळजाचा ठाव घेणारी होती. महाकवी तुकारामांच्या वाट्याला जे आले तेच जगभरच्या प्रतिभावंतांच्या वाट्याला येत असते. या अंधश्रद्ध, अभावग्रस्त भटक्या समाजाने तिला कविता लिहिते या गुन्ह्यासाठी जातीबहिष्कृत केल्यानंतर तिची झालेली ससेहोलपट,तिला सोसावा लगलेला तुरूंगवास आणि तिची विराट तडफड जगभरातील सगळ्या संवेदनशिल माणसांची प्रातिनिधीक कहाणी बनते.१९१० साली जन्मलेली पपुजा १९८७ साली गेली.तिचे हे प्रदीर्घ आणि असामान्य जीवनचरित्र केवळ एक वृतचित्र न बनता एका  श्रेष्ठ कलाकृतीच्या पातळीवर घेऊन जाण्यात दिद्गर्शक यशस्वी झाले आहेत. २०१३ सालचा हा चित्रपट ब्ल‘क अ‘ण्ड व्हा‘ईट आहे.चित्रपटातील जिप्सी समाजाची भटकंती, संगितमय जगणे, व्यसने, अंधश्रद्धा, गुन्हेगारी, निरक्षरता आणि कुपोषण यांचे संयत चित्रण मनाला आरपार भावणारे. अशा आदिवासीसदृश्य समाजात ही मुलगी जन्माला येते, तरिही अक्षरांचा ध्यास घेते, तिचा एका प्रौढाशी बालविवाह करून दिला जातो, ती पुढे एक प्रतिभावंत कवयित्री बनते.महायुद्धातील हिटलरी छळाला तिला सामोरे जावे लागते.समाज तिला बहिष्कृत करतो. तिला मदत करणार्‍या जर्सी फिकोवस्की या संशोधकाने जिप्सींवर लिहिलेल्या समाजशास्त्रीय ग्रंथामुळे जिप्सींमध्ये अडाणीपणामुळे उठलेले वादळ, त्यापोटी त्याला आणि पपुझाला सोसावा लागणारा छळ सारेच वेदनादायी.ताकदीच्या दिद्गर्शकांनी कथा,पटकथा, संवाद, छायचित्रण, जिप्सी संगित, सशक्त व्यक्तीचित्रण आणि तगडा अभिनय यातून एक जागतिक कलाकृती साकार केलेली आहे. कोणाही संवेदनशील माणसाने चुकवू नये असा हा चित्रपट आहे.
या आठ दिवस चाललेल्या महोत्सवात ९ ते १६ जानेवारीच्या काळात ४८ देशातील २१३ चित्रपटांचे अकरा चित्रपटगृहातून ३०० शो करण्यात आले.  दहा हजार प्रेक्षकांनी रांगा लावून  हे चित्रपट पाहिले. हा तरूणांचा महोत्सव होता. महोत्सवाच्या प्रेक्षकांचे सरासरी वय १९ वर्षे होते.
जागतिक स्पर्धेतील १४ चित्रपट, ग्लोबल सिनेमा या गटातील ८२ चित्रपट, जगातील नामवंत दिद्गर्शकांच्या गौरवार्थ दाखवण्यात आलेले {जगभरातील}  ३६ आणि  ११ {भारतीय} तसेच  एनएफडीसीचे ५ अभिजात चित्रपट, न‘शनल अर्काइव्जमधील ५ जुन्या महान कलाकृती, चौदा मराठी चित्रपट, विविध देशांची वैशिष्ट्ये दाखवणारे ३८ विशेष चित्रपट आणि इतर ८ असे एकुण २१३ चित्रपट ही पुणेकरांसाठी अविस्मरणीय मेजवानी होती. गेल्या आठवडाभरापासून रंगलेल्या "पिफ'चा समारोप मराठमोळ्या वातावरणात चित्रपट व कलावंतांचा गौरव करीत गुरुवारी झाला. "फॅन्ड्री' आणि "पपुजा' ही नावे जाहीर होताच सभागृहात अक्षरश: टाळ्यांचा पाऊस बरसला. चित्रपटाच्या टीमने "फॅन्ड्रीच्या नावानं चांगभलं' अशा घोषणा देत एकच जल्लोष केला.समारोपानंतर "पपुझा" पुन्हा दाखवण्यात आला. मुळची भारतीय असलेली जिप्सी ही जमात आणि त्यातली पपुझा आज जरी पोलंडमध्ये उपेक्षाच्या गर्तेत असली तरी या चित्रपटामुळे आता ती कधीही विसरली जाऊ शकणार नाही.
  उत्कृष्ट दिद्गर्शकाचा आणखी एक पुरस्कार इटलीच्या मिरको लोकॅटल्ली यांना "फॉरेन बॉडीज" या चित्रपटासाठी देण्यात आला. क‘न्सरग्रस्त बालकाचा चिंतीत पिता व दवाखान्यातील अरब पेशंटचा मित्र यांची आगळीवेगळी कहाणी म्हणजे "फॉरेन बॉडीज." जागतिक चित्रपट स्पर्धा विभागातील विशेष पुरस्कार जागतिकीकरणाचे चीनवर झालेले परिणाम टिपणार्‍या "अ टच ऑफ सीन" या चित्रपटासाठी झिया झॅंग-की यांना देण्यात आला.तसेच "हाऊस विथ टुरेट" लाही गौरवण्यात आले.
जर्मनीच्या सिबेल बर्नर यांना  "रोझी" या चित्रपटाच्या नायिकेच्या भुमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्यांनी चित्रपटात प्रथमच काम केले होते.एका मनस्वी म्हातारीचा हा रोल त्यांनी अफलातून सादर केला होता. एक व्यक्ती आणि वल्ली म्हणून स्वत:च्या मनाप्रमाणे जगणारी ही वृद्धा श्रीमती बर्नर यांनी ज्या पद्धतीने उभी केली त्याला खरेच तोड नाही. सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून प्रेक्षकांनी "नाईट ट्रेन टू लिस्बन" या जर्मनीच्या चित्रपटाची निवड केली.
सरहद्द गांधी म्हणजे भारतरत्न खान अब्दूल गफार खान यांच्या जीवनावरील अमेरिकेच्या टेरी म‘क्लुहान यांनी २० वर्षे अपार मेहनत करून बनवलेल्या डाक्युमेंटरीने या महोत्सवाला फार मोठी उंची प्राप्त करून दिली. एखादे वृतचित्र चित्रपटापेक्षाही किती जबरदस्त असू शकते त्याचा चालताबोलता पुरावा म्हणजे ही ९२ मिनिटांची डाक्युमेंटारी होय.अशी महान डाक्युमेंटरी मी आयुष्यात कधीही पाहिलेली नव्हती. अहिंसेच्या या पठाणी पुजार्‍याची ही कहाणी नरेंद्र मोदींच्या चाहत्यांनी आणि विरोधकांनीही अवश्य बघावी.
भारतीय चित्रपट जागतिक पातळीवर तसूभरही कमी नाही याचा प्रत्यय देणारे दोन महान भारतीय चित्रपट म्हणून जोय म‘थ्यू यांच्या मल्याळम भाषेतील "शटर" आणि खुशवंत सिंग यांच्या भारत पाक फाळणीवर आधारित कादंबरीवरून तयार केलेल्या "ट्रेन टु पाकीस्तान" या चित्रपटांचा खास उल्लेख करावा लागेल. मानवी जीवनातील अमाणूस क्रौर्य, अपार करूणा, असीम प्रेम, झुंडीचे मानसशास्त्र आणि धर्मांधता यांचा सुन्न करणारा अनुभव म्हणजे पामेला रूक्स यांचा ट्रेन टू पाकीस्तान.
एका रात्रीची श्वास रोखून धरायला लावणारी कहाणी म्हणजे शटर. जगण्यातली समज वाढवणारी ही कलाकृती.मानवी नात्याची यातली उकल खरेच फार विलक्षण आहे.
चित्रपटाची भाषा जगाला कशी जोडते याचा अनुभव या महोत्सवाने दिला. जगभरचा माणूस भले भाषा, संस्कृती, विचारधारा, धर्म, पर्यावरण,आर्थिक स्थिती यानुसार वेगवेगळा असेल पण माणूस म्हणून त्याचा पिंड मुलत: एकच आहे. जगभर भली माणसे आहेत. कळवळ्याची माणसे आहेत. तशीच दुष्ट आणि क्रुर माणसेही सगळीकडेच आहेत.जगभरचे कलावंत या माणसाचा न संपणारा शोध आपल्या कलाकृतींमधून कसा घेत आहेत त्याचा पुण्यात बसून जगभर मारलेला आजच्या जगाचा फेरफटका या महोत्सवाने घडवलाच, पण जगण्याची समज उंचावली.माणुसकीवरचा विश्वास दृढ झाला. मानवी प्रतिभेची शिखरे बघता आली.आयोजक डा.
जब्बार पटेल आणि त्यांच्या सगळ्या सहकार्‍यांना विशेषत: समर नखाते आणि मित्रांना खूपखूप धन्यवाद.

Tuesday, January 7, 2014

अभिजात मराठीचे ऐतिहासिक स्वरूप

http://www.eprabhat.net/news/46-story.aspx.....
http://epaper.eprabhat.net/208810/Pune-City-Edition/CITY-EDITION#page/4/1

दै.प्रभातच्या श्रीमती वसुधा जोशी यांचा मला फोन आला होता. म्हणाल्या "तुम्ही सादर केलेल्या अभिजात मराठीच्या अहवालाबद्दल माहिती हवी आहे. कधी भेटू?"मी म्हणालो, मीच येतो प्रभातवर.
२५ डिसेंबरला महाराजा यशवंतराव होळकर पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर मी दै.प्रभातच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.त्यांच्याशी दोन तास गप्पा मारल्या. त्यांना दिलेली ही माहिती त्यांनी शब्दांकीत केलेली आहे...साहित्य संमेलनाच्या निमित्ताने "अभिजात मराठीची" चर्चा पुढे जात आहे याचा आनंद आहे.त्यांनी पठारे समितीचा उल्लेख केला याबद्दल आभार. दै.प्रभातला धन्यवाद......by Hari Narke
..........................................
संपादकीय
अभिजात मराठीचे ऐतिहासिक स्वरूप
देशात तमिळ, संस्कृत, तेलगु, कन्नड, मल्याळम् या पाच भाषांना अभिजाततेचा दर्जा मिळाला. मराठीलाही केंद्र सरकारने अभिजाततेचा दर्जा द्यावा, यासाठी रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने २० जुलै २०१३ रोजी अहवाल सादर केला. त्यामुळे मराठीला लवकरच अभिजाततेचा दर्जा मिळेल, अशी आशा आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रंगले असताना मराठीच्या या अभिजाततेची आठवण ठेवणे गरजेचे आहे.
- वसुधा जोशी

एक होता कावळा, एक होती चिमणी. चिमणीचे घर होते मेणाचे... बाळ जन्माला आल्यापासून घराघरांत सांगितली जाणारी ही गोष्ट. लीळा चरित्रात आलेली ही कथा; पण त्यापूर्वी किमान हजार वर्षे लोकपरंपरेत होती. इतका हा जुना वारसा आपण पिढ्यान् पिढ्या चालवत आलो आहोत. मग तो पुढे नेण्याचा वसाही आपणच घेतला पाहिजे. मराठी ही अभिजात भाषा आहे, याविषयी मराठी माणसाच्या मनात कोणताही शंका नाही. ज्ञानोबा-तुकारामांपासून आजपर्यंत मराठीने आपल्याला किती समृद्ध केले आहे, हे आपण जाणतोच; पण मराठीचा इतिहास ज्ञानोबा-तुकारामांच्या संत साहित्यापासून सुरू होत नाही. संत साहित्यात आलेली मराठी पूर्णतः विकसित, शिखरावर असलेली भाषा आहे. मराठीच्या इतिहासाचा शोध घेतला तर त्याची पाळेमुळे दोन हजार वर्षांपूर्वीपेक्षाही आधी जातात. सातवाहन राजा हल यांनी संकलित केलेली ‘गाथासप्तशती’चा काळ सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा आहे. गोदावरी काठच्या पैठणच्या लोकांचे जीवन या गाथेत आले आहे.
तमिळ भाषेत संगम साहित्य हे अत्यंत प्रसिद्ध आहे. त्याचा काळ सुमारे २६०० ते २३०० असा आहे. या साहित्यातही मराठी भाषक लोकांचा उल्लेख आहे. गोदावरी नदीवर धरण बांधण्यासाठी जगभरातून तंत्रज्ञ आले. त्यात मराठीत बोलणारे गवंडी कामात अतिशय प्रवीण आहेत, असे मराठी लोकांबद्दलचे वर्णन आले आहे. याचा अर्थ त्या काळातही या भाषेला मराठी म्हटले जायचे, हे स्पष्ट होते. सातवाहन काळातील एक शिलालेख जुन्नर येथील नाणेघाटात सापडला आहे. सुमारे २२२० वर्षापूर्वींच्या या शिलालेखात लिपी ब्राह्मी आहे. त्यात महारठ्ठो असा उल्लेख आहे. त्याचबरोबर इतर लेण्यांमध्ये महारठ्ठींनो, महारठ्ठीगण, महारठ्ठी असे मराठी भाषक लोकांबद्दल उल्लेख आढळतात. बौद्ध धर्माची पहिली संगिनी बिहार राजगृह येथे झाली. त्यावेळी विनयपिटक पाली भाषेत लिहले. त्यामध्ये महाधम्मरक्षित नावाच्या भन्तेंना अपरांत (कोकण), कुंतल (प. महाराष्ट्र), अश्मक (मध्य महाराष्ट्र) येथे पाठवले असून, ते मराठीत धम्मप्रचार करतात, असा उल्लेख आला आहे. इ. स. दुसर्‍या शतकात वररूची या व्याकरणकाराने ‘प्राकृतप्रकाश’ हा व्याकरण ग्रंथ लिहला. पैशाची, शौरसेनी, मगधी, पाली, महाराष्ट्री या प्रमुख प्राकृत भाषा असून, या सर्वांना महाराष्ट्राचे (मराठीचे) नियम लागू पडतात, असा नियम त्यांनी सांगितला आहे. जम्मू-काश्मीरच्या गुणाढ्य याने बृहतकथा हा ग्रंथ पैशाची भाषामध्ये लिहिला. त्यामध्ये अनेक प्रकरणे मराठीत आहेत. कारण, तो मूळचा वत्सगुल्म म्हणजे वाशिमचा होता. हेमचंद्र हा व्याकरणकारही मराठीचे अनेक दाखले देतो. दीपवंश-महावंश हे पाली भाषेत व सिंहली लिपीतील ग्रंथ आहेत. त्यातही मराठीचे वैभव सांगण्यात आले आहे. जैन लेखक हरिभद्र तसेच, उदयोत्तन सुरी, शुद्रक, कालीदास यांनीही मराठीचे पुरावे दिले आहेत. कालीदासाच्या नाटकातील स्त्री पात्रे मराठीत संवाद साधतात.

मराठीचे आतापर्यंत विविध टप्पे दिसतात. त्यामध्ये महारठ्ठी हा पहिला टप्पा होता. त्यानंतर महाराष्ट्री, अपभ्रंश, देशी हे टप्पे दिसतात. हे टप्पे इ. स. पूर्व ६०० पासून आजपर्यंत म्हणजे २०१३ पर्यंतच्या काळातील आहेत. प्राकृत-अपभ्रंश-मराठी या तीन वेगळ्या भाषा नसून, तीन टप्पे आहेत. लिपीचाही प्रवास विविध टप्प्यात दिसतो. देवनागरी ही सुमारे हजार वर्षे अस्तित्वात आहे. त्यापूर्वी लिपीचा प्रवास ब्राह्मीपासून झाला आहे. मधल्या काळात सुंदर, सकला, मोडी ही धावती लिपी दिसतात. हॉर्वड विद्यापीठातील विट्झेल मिखाईल यांनी ‘ट्रेसिंग द वैदिक डायलेक्ट्स’ हा शोधनिबंध लिहिला. त्यामध्ये संस्कृती ही वैदिक पूर्व बोली भाषेतून जन्माला आली असे सांगितले आहे. मराठी ही अशाच वैदिक पूर्व बोलीभाषेतून जन्माला आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. महामहोपाध्याय राजारामशास्त्री भागवत, श्रीधर व्यं. केतकर, ल. रा. पांगारकर, शं. गो. तुळपुळे, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, इरावती कर्वे अशा अनेकांनी मराठीचा इतिहास वेळोवेळी सिद्ध करून दाखविला आहे. भांडारकर संस्थेत सापडलेले कागदपत्रे, पोथ्या त्याचप्रमाणे विविध ठिकाणचे कोरीव लेख, ताम्रपट यावरून मराठीचे वय दोन हजार वर्षांपेक्षा अधिक असल्याचे पुरावे सापडले आहेत.
मराठीने इतर अनेक भाषांमध्येही आपले योगदान दिले आहे. तसेच इतर भाषांकडूनही तिने अनेक शब्द घेतले आहेत. वैदिकपूर्व बोली भाषा, पाली, शौरसेनी, मगधी, अर्धमागधी, संस्कृत, द्रविड भाषा, पर्शियन मुघल भाषा या सर्वांचा प्रभाव मराठीवर दिसतो. जगातील सर्वच भाषा अशा एकमेंकीकडून घेत-देत विकसित झालेल्या दिसतात. त्याचप्रमाणे मराठीही झाली आहे.

कशावरून ठरणार अभिजातता
केंद्र सरकारने भाषेची अभिजातता ठ़रविण्यासाठी काही निकष जाहीर केले. त्यामध्ये भाषेचे लिखित स्वरूप असलेले सुमारे १५०० ते २ हजार वर्षे इतके जुने पुरावे असणे गरजेचे आहे. भाषा ही दुसर्‍या भाषेचे प्रतिरूप असता कामा नये. भाषा म्हणून तिचे स्वतंत्र अस्तित्व असावे. त्या भाषेत श्रेष्ठ दर्जाचे साहित्य निर्माण झालेले असावे. भाषा प्रवाही असते. त्यामध्ये आजच्या भाषेचे दोन हजार वर्षापूर्वीच्या भाषेशी नाते असावे हे निकष मांडण्यात आले. मराठी हे सर्व निकष पूर्ण करते.
- See more at: http://www.eprabhat.net/news/46-story.aspx#sthash.u9SO7pPT.dpuf