अ.भा. महात्मा फुले समता परिषद, पुणे व पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे जिल्हा शाखा आयोजित, हो‘टेल सेंट्रल पार्क, डेक्कन जिमखाना, पुणे ४११००४ येथील युवक -युवती प्रबोधन शिबिराला आज तरूणांचा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळी १०:३० वाजता सुरू झालेल्या या शिबिराचे उद्घाटन सकाळचे सहयोगी संपादक श्री. सुनिल माळी यांच्या हस्ते झाले. त्यांनी, "
युवकांनी आपला व्यासंग वाढवला पाहिजे आणि स्पर्धेच्या जगात अभ्यासाच्या जोरावर स्वत:ची ओळख निर्माण करायला हवी "असे उद्बोधक प्रतिपादन केले.यावेळी कृष्णकांत कुदळे, प्रितेश गवळी, मंजिरी धाडगे, सोमनाथ भुजबळ, शांतारामबापू घुमटकर, विजय लडकत हे उपस्थित होते.
त्यानंतर हरी नरके, रेणु गावसकर, संजय आवटे यांची भाषणे झाली.गावस्करांचे भाषण संवादी आणि सुश्राव झाले, तर आवटे यांचे भाषण तडाखेबंद झाले.त्यांनी युवकांनी १००% राजकारण करावे, ८०% सामाजिक नी २०% राजकीय असले "टक्केवारीचे" उद्योग करू नयेत असा सल्ला दिला. अराजकीय असणे म्हणजे अराजकवादी असणे होय या त्यांच्या प्रतिपादनाला युवकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला. महाराष्ट्र टाइम्सचे पराग करंदीकर यांनी शिबिराचा समारोप केला.त्यांनी येणार्या वर्षभरात भारतात ४जी चा जमाना आल्यानंतर राजकीय जीवनात कसे आणि किती झपाट्याने बदल होतील त्याचे हुबेहुब चित्रण केले. उपस्थित युवकांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी प्रत्येक व्याख्यानानंतरची प्रश्नोत्तरे विशेष रंगली.
....................................................
........छायाचित्रे: सौजन्य: श्री महेश जांभुळकर...........
No comments:
Post a Comment