प्रक्रिया पुर्ण,
प्रतिक्षा संपली..
घोषणा फक्त बाकी...
प्रतिक्षा संपली..
घोषणा फक्त बाकी...
गेली तीन वर्षे चालू असलेल्या आपल्या प्रयत्नांना ९९% यश मिळाले असून आता एका पावलावर हा दर्जा येऊन ठेपला आहे.
काल भारत सरकारच्या साहित्य अकादमीच्या देश विदेशातील सर्व भाषातज्ञांनी आपला अहवाल एकमताने मान्य केला असून हा दर्जा देण्याची शिफारस त्यांनी काल केंद्र सरकारला केली आहे.
आता केंद्र सरकार याबाबतचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेऊन ती घोषणा येत्या आठपंधरा दिवसात करील असा मला विश्वास वाटतो.
आमचे अध्यक्ष प्रा.रंगनाथ पठारे, प्रा.मैत्रेयी देशपांडे,प्रा.सुहास बहुलकर,प्रा. कल्याण काळे आणि प्रा.आनंद उबाळे या माझ्या सहकार्यांना याचे श्रेय जाते.
या अहवालाचे हे सुंदर आणि कलात्मक मुखपृष्ठ तयार केले आहे चंद्रमोहन कुलकर्णी यांनी....
या समितीचा समन्वयक म्हणुन काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद वाटतो...
No comments:
Post a Comment