Monday, April 4, 2011

सम्यक साहित्य संम्मेलन आणि बामसेफचा (वामन मेश्राम गट) दहशतवाद!



१-३ एप्रिल २०११ रोजी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरामद्धे सम्यक साहित्य सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते. आर. पी. आय. (आठवले गट) नेते परशुराम वाडेकर हे या सम्मेलनाचे स्वागताध्यक्ष होते. डा. बाबासाहेब आंबेडकर सांस्क्रुतीक महोत्सव समितीच्या वतीने या सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
सम्मेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी नामदेव ढसाळ होते. उद्घाटक म्हणुन जागतीक किर्तीचे हिंदी लेखक उदय प्रकाश उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाच्या तोडीस तोड असे देखणे आणि भव्य आयोजन करण्यात आले होते. मंचाची सजावट ख्यातनाम कलावंत श्याम भुतकर यांनी कलात्मक पद्धतीने केली होती. कार्यक्रमाला तीनही दिवस भरगच्च जनसमुदाय उपस्थित होता. या सम्मेलनामद्धे राज्यातील सर्व प्रमुख साहित्यिक, कवी, वक्ते, पत्रकार, यांनी हजेरी लावली. ग्रंथ दालनांना वाचकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.
सम्मेलनाध्यक्ष नामदेव ढसाळ यांनी केलेले भाषण छापील स्वरूपात उपस्थितांना उपलब्ध करुन देण्यात आले. या भाषणामद्धे त्यांनी आंबेडकरी साहित्याचा उगम, वाटचाल आणि भवितव्य यावर प्रकाश-झोत टाकला आहे. त्यांचे चिंतन आणि त्यांनी उपस्थित केलेले महत्वपुर्ण मुद्दे याचा प्रभाव सम्मेलनावर तिन्ही दिवस टिकला. उदय प्रकाश यांचे भाषण गोळीबंद आणि भाषा व संस्क्रुती यांच्या संदर्भात नवी दिशा देणारे ठरले.
या सम्मेलनामद्धे अनेक परिसंवाद, कविसम्मेलने, चर्चासत्रे व वाड्मयीन कार्यक्रमांची रेलचेल होती. महाराष्ट्रातील परिवर्तनवादी विचारांचे एवढे साहित्त्यिक ब-याच वर्षांनी प्रथमच एकत्र भेटले. पहिला परिसंवाद गाजला. "सांस्क्रुतीक दहशतवाद" या विषयावरील या परिसंवादाचे अध्यक्षस्थान ख्यातनाम विचारवंत डा. आ.ह. साळुंखे भुषविणार होते. सकाळीच मला आणि प्रा. विलास वाघ यांना बामसेफचे वाघमारे यांनी ८६०५७५४३५६ या मोबाईल क्रमांकावरुन गलिछ्छ शिवीगाळ करत धमक्या दिल्या. आम्ही कार्यक्रमात गडबड करणार, कार्यक्रम उधळुन लावणार, वक्त्यांच्या तोंडाला काळे फासणार असे त्यांनी सांगितले. त्यामुळे कार्यक्रमावर या धमक्यांचे सावट पडले होते व वाडेकर यांनी उद्घाटकीय भाषणात त्याची दखलही घेतली होती.
डा. साळुंखे साता-यावरुन पुण्यात येवुनही कार्यक्रमाला मात्र आले नाहीत. त्यामुळे त्यांनाही धमक्या आल्या असाव्यात असा हितचिंतकांचा समज झाला. डा. साळुंखे यांच्याशी रात्री संजय सोनवणी संपर्क साधला असता ते दु:खी व तणावाखाली असल्याचे जानवले होते. अर्थात त्यांना धम्क्या आल्या नव्हत्या असे त्यांनी दुस-या दिवशी स्पष्ट केले. कोम्रेड शरद पाटील यांच्या पुस्तक प्रकाशन सोहोळ्यासाठी अलीकडेच डा. साळुंखे पुण्यात आले होते तेंव्हा मात्र त्यांना धमक्या आल्या होत्या. साळुंखे यांच्या धमक्यांचे चर्वित-चर्वण करणा-या ब्रिगेड व बामसेफ़च्या कार्यकर्त्यांनी मात्र प्रा वाघ व मला आलेल्या धमक्यांवर मौन पाळुन एक प्रकारे धमक्यांचे समर्थनच केले. फुले आंबेडकरी चळवळीतले हे लोक आता धमक्यांच्या पातळीवर उतरुन चळवळ पुढे नेण्याची स्वप्ने पहात आहेत. महाराष्ट्रातील अनेक साहित्यिकांनी व्यक्तिगत भेटीत या धमक्यांचा निषेध केला आणि त्याचे सार्वत्रीक निषेधाचे पडसाद सर्व स्तरांत उमटु लागले आहेत. मी या सर्वच धाडसी साहित्त्यिक-विचारवंतांचे व फुले-आंबेडकरवादी चळवळीवर जीवापाड प्रेम करणा-या असंख्य कार्यकर्त्यांचे जाहीर आभार मानतो.
मुलनिवासी नायक या दोन पाणी वर्तमानपत्राने (?) सलग दोन दिवस या सम्मेलनातील साहित्यिकांबद्दल अवमानकारक मजकुर प्रकाशित केला होता. नामदेव ढसाळ हे वीराचे नाव आहे कि गाढवाचे, आणि सर्व आंबेडकरवादी साहित्यिक हे Intelectual prostitute आहेत असे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली. कमरेखालची गलिछ्छ भाषा वापरून गेली दीड वर्षे बामसेफचे हे वर्तमानपत्र फुले-आंबेडकरी चळवळीचा चेहरा शिवराळ, असभ्य, अश्लील आणि माथेफिरुपणाचा बनवत आहे. चळवळीतील आघाडीचे विचारवंत डा. रावसाहेब कसबे, डा. भालचंद्र मुणगेकर, डा. सुखदेव थोरात, को. शरद पाटील, प्रा. दत्ता भगत, प्रा. नागनाथ कोतापल्ले, डा. नरेन्द्र जाधव, उत्तम कांबळे, प्रा विलास वाघ आदिंवर बदनामीकारक अश्लाघ्य मजकुर वारंवार प्रकाशित केला जात आहे. हे वर्तमानपत्र राज्यातील एकाही स्टालवर विकत मिळत नाही. आपल्यात भांडणे नकोत म्हणुन संयम बाळगणारे हे विचारवंत एका भस्मासुराला जन्म देत आहेत. हे दुर्लक्ष्य चळवळीला फार महागात पडणार आहे. ही बामसेफिय मंडळी फुले-आंबेडकरी चळवळीचे ठेकेदार बनून दररोज शिव्यांचा रतीब घालत आहेत. ब्ल्याकमेलींग आणि दहशतीच्या जोरावर यांनी हैदोस घातला आहे.
सांस्क्रुतीक दहशतवाद या परिसंवादात श्रीमती विद्या बाळ, श्री मुकुंद टांकसाळे, प्रा. जयदेव डोळे, प्रा. सुधाकर यादव यांची भाषणे झाली. प्रत्येक वक्त्याला २० मिनिटे देण्यात आली होती. या परिसंवादाच्या सुरुवातीचा फलंदाज मी होतो. मनुस्म्रुतीने स्त्रीया आणि शुद्रातिशुद्र यांचे मानवी अधिकार नाकारुन व त्रैवर्णिकांना विशेषाधिकार देवुन दहशतवादाचा पाया घातला. बाळ गांगल यांनी केलेली महात्मा फुले यांची बदनामी, मराठा महासंघाने डा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिडल्स विरुद्ध केलेला कांगावा आणि विरोध, ग्याझीटियर मद्धे राजर्षि शाहू छत्रपती यांची करण्यात आलेली बदनामी, सनातन प्रभातने महात्मा फुले यांच्याविरुद्ध उघडलेली आघाडी यांचा परामर्श घेउन मी या सर्व बाबतीत दिलेले अल्प-स्वल्प योगदान याबाबत बोललो. सध्या चळवळीच्या नावावर श्री वामन मेश्राम व श्री पुरुषोत्तम खेडेकर हे करीत असलेले लेखन व वक्तव्य यांची माहिती मी उपस्थितांना दिली. यावेळी सभाग्रुहात दस्तुरखुद्द पुरुषोत्तम खेडेकर त्यांच्या कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. त्यांच्या "शिवरायांच्या बदनामीची केंद्रे" या ग्रंथात त्यांनी सुनियोजित दंगली घडवुन सर्व ब्राह्मणांची कत्तल करण्याची चिथावणी दिल्याचा पान नं ५४-५५ वरील मजकुर वाचुन दाखवला. श्री खेडेकर यांना भाषणाची संधी नसल्याने त्यावर अधिक भाष्य वा टिका टिप्पणी करणार नसल्याचे मी नमुद केले. त्यांच्या वर्तमानपत्रात गेली सहा महिने ते माझ्या विषयी धादांत खोटा आणि चितावणीखोर मजकुर प्रकाशित करतात आणि माझ्या खुलाश्याची मात्र एक ओळही छापत नसले तरी मी मात्र फुले-आंबेदकरी मुल्य पाळणारा कार्यकर्ता असल्याचे स्पष्ट केले. श्री खेडेकर यांनी संपुर्ण कार्यक्रमभर मौन पाळुन त्यांच्या पुस्तकातील लेखनाचे पुन:समर्थनच केले.
श्री टांकसाळे यांनी संभाजी ब्रिगेडच्या प्रवक्त्याने हरी नरके यांच्या आईची बदनामी केल्याबद्दल निषेध नोंदवला. श्री. डोळे यांनी श्री खेडेकर व तत्सम मंडळी भडक भाषेचा आणि बेजबाबदार वक्तव्यांचा वापर झटपट प्रसिद्धीसाठी करत असल्याचे सांगितले. स्श्री यादव यांनी कलेच्या क्षेत्रातील हिंदुत्ववांद्यांच्या दहशतवादाचा परामर्श ( एम. एफ. हुसेन यांच्या संदर्भात...) घेतला. श्रीमती बाळ यांनी पुरुषसत्ताक व्यवस्थेने स्त्रीवर्गावर लादलेल्या दहशतीचा समाचार घेतला.
मुलनिवासी नायक ने मात्र दि. ३ एप्रिलच्या अंकात पानभर धादांत खोटा आणि विक्रुत व्रुत्तांत प्रकाशित करुन आपली घ्रुणास्पद कर्तुत्व पुन्हा एकदा दाखवुन दिली आहे. जिद्न्यासुंनी क्रुपया www.mulnivasinayak.com या वेबसाइटवर जावुन हा अंक पहावा किंवा पुढील लिंकला भेट द्यावी. http://www.mulnivasinayak.com/pages/2011/Apr/03/news/1_1.jpg  

17 comments:

  1. No one can overtly support any kind of pressure tactics used to interfere in the normal proceedings of a peaceful function. Having said this, it would be naive to say that persons like Namdeo Dhasal have an iota of credibility among the ambedkarite masses. Actions speak louder than words and notwithstanding his literary contribution if it is any worth at all, his actions have proved that he is just one amongst a long list of traitors.
    As to the origin of the war-of-words between Mr. Narke and BAMCEF, I am in ignorance but must say that it is very unfortunate.
    Sachin Salave.

    ReplyDelete
  2. नरकेजी छान आणि जाग्रुत लेखक/विचारवंताची "भुमीका" तुम्ही पार पाडत आहात. बिग्रेड आणि बाफसेफचा हा वैचारिक/सामाजिक अश्लाघ्य भाषेचा दहशत्वाद थांबला पाहिजे. बहुजन चळवळीची दिशा, संस्क्र्तुती भरकटवून टाकणाऱ्या खेडेकर, वामन यांचा जाहिर निषेध व्हायलाच हवा. याशी मी सहमत..बहुजन श्ब्दाची किंमत कमी होन्यामागे हीच मंडळी जबाबदार आहेत..

    ReplyDelete
  3. नरकेजी छान आणि जाग्रुत लेखक/विचारवंताची "भुमीका" तुम्ही पार पाडत आहात. बिग्रेड आणि बाफसेफचा हा वैचारिक/सामाजिक अश्लाघ्य भाषेचा दहशत्वाद थांबला पाहिजे. बहुजन चळवळीची दिशा, संस्क्र्तुती भरकटवून टाकणाऱ्या खेडेकर, वामन यांचा जाहिर निषेध व्हायलाच हवा. याशी मी सहमत..बहुजन श्ब्दाची किंमत कमी होन्यामागे हीच मंडळी जबाबदार आहेत..

    ReplyDelete
  4. the sc, st ,obc leaders -oraters,and so called reformers of todays are cheap. As they don't remember what they had promised to the society in past and what they are speaking today. just these people are misguiding the mob on there orater and intellectual potential.But one day will come when they became NUDE in front of society whose KATHNI-KARNI differs.
    One thing i gathered that bhahujan's most of energy is going to waste in home -than against enemy.
    what is happening is very sad --------
    (its my personal comment and what my inner concious says.)

    dr y.d waghmare
    bamcef pune district president

    ReplyDelete
  5. या दहशदवादाचा निषेधच केला पाहिजे.

    ReplyDelete
  6. या दहशदवादाचा निषेधच केला पाहिजे.

    ReplyDelete
  7. साळसूद पाचोळा आता हळुहळू तथाकथित बहुजन म्हनवून घेणाऱ्या संघटनांचा "कावा" पुढे येवू लागला आहे. दलित, ओबीसींचा वापर करून हिंदु/ब्राह्मन/मराठा ह्यांच्यात वाद पेटवत ठेवायचा. त्यासाठी शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेत राहयेचे आणि दलितांना आपल्या संघटनांकडे ओढायचे....... आणि आप्ला सामाजिक/वैचारिक लढा चालवायचा.

    ॥।Avinash Jadhav : //...त्या भांडारकर मध्ये जाऊन हरी नरके यांनी व्याख्यान देणे तसे अयोग्य होतेच..//.हे प्रा. हरी नरके यांचे सारख्या विचारवंताला समजायला नको होते का!!!..//.प्रा. हरी नरके यांचे येथेच चुकले...//॥

    @ Avinash Jadhav मित्रा,

    डॉ. नरकें कसे चुकले, त्यांनी काय करायला हवे होते, त्यांनी कोणत्या विष्यावर व्याख्यान द्यायला नको, कुठल्या वास्तुत व्याख्यान द्यायला नको हि नियमावली त्यांनी आपणाकडून शिकावी का? त्यांनीच काय बहुनजांतिल कुणीही ते तुमच्या किंवा तुमच्या संघटनेकडून शिकावे काय?

    आणि नरकेंनी भांडारकमध्ये जावून व्याख्यान दिले तर काय फरक पडतो? आ ह साळूंखे आणि तुमचे इतर नेते भांडारकर मध्ये जावून वाचन करतात, ते चालते. मग तेथे व्याख्यान दिले तर ते आपणास का चालत नाहि.See More
    Yesterday at 11:33am · LikeUnlike

    ReplyDelete
  8. Sunil Tambe आपण समूह म्हणून अन्य समूहांपेक्षा श्रेष्ठ आहोत ही धारणा म्हणजे ब्राह्मण्य. या धारणेच्या विरोधात आंदोलन छेडणं अवघड असतं, जवळपास अशक्यच. त्यामुळे असेल कदाचित् पण ब्राह्मणेतर चळवळीने ब्राह्मण या जातीला लक्ष्य केलं. तरीही राजकारण आणि राजकीय सत्...तेतील ब्राह्मणांची सत्ता खालसा होण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र निर्माण होईपर्यंत थांबावं लागलं. १९०९ च्या सुमारास आलेल्या मोर्ले-मिंटो सुधारणांनी देशात लोकशाही रुजवायला सुरुवात केली. परंतु त्याचवेळी ब्रिटीशांनी जातवार जनगणना करून फुटीचं बीज रोवलं होतं. त्यामुळेच लोकशाहीबरोबरच जातींचं राजकारणाला संस्थात्मक आधार मिळाला. मराठा नामक जातीच्या निर्मितीची प्रक्रिया या काळात सुरु झाली आणि १९२० पर्यंत या प्रक्रियेने वेग घेतला (वाचाः भालचंद्र नेमाडे). स्वातंत्र्योत्तर काळात अनुसूचित जाती-जमातींमध्ये समावेश व्हावा म्हणून अनेक समूहांनी मागण्या केल्या. आजही त्या मागण्या सुरूच आहेत (उदा. गोवारी, गुजर). महाराष्ट्रात अन्य मागासवर्गीय, भटके-विमुक्त, नवबौद्ध यांना राखीव जागा देण्यात आल्या. त्यांच्यामध्ये आपला समावेश व्हावा यासाठीही अनेक समूहांनी मागण्या वा प्रयत्न केले. वंजारी समाजाचा समावेश भटक्या-विमुक्तांमध्ये झाला. पुढे मंडल आयोगाच्या शिफारसी स्वीकारल्यानंतर विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यानुसार राखीव जागा आल्यानंतर ब्राह्मणेतरांमधील अंतर्विरोध वाढले. मराठा जातीच्या नेतृत्वाला शह बसू लागला. त्यातूनच मराठा एकीकरणाची चळवळ सुरु झाली. या काळात आ.ह.साळुंखे, हरी नरके संभाजी ब्रिगेडच्या व्यासपीठावर जात होते. आ.ह. साळुंखे यांनी तर शिवधर्माची घटना लिहीली. पुरुषोत्तम खेडेकर ह्यांची नेतृत्वाखाली हजारो मराठ्यांच्या साक्षीने शिवधर्माचं प्रकटीकरण केलं. साळुंखे आणि नरके दोघांनीही डाव्या चळवळीची साथ सोडून जातीवर आधारीत राजकारणाची सोबत केली. त्याच राजकारणातून सांस्कृतिक दहशतवादाचा जन्म झाला. जातीवर आधारीत राजकारण ब्राह्मणांचं असो वा ब्राह्मणेतरांचं, शत्रूलक्ष्यी मांडणीतून दहशतवादाच्या जन्माची शक्यता वाढते. असो.See More
    Yesterday at 3:00pm · LikeUnlike · 1 person
    Loading...

    ReplyDelete
  9. Arun B.khore agree with yu & hari.
    21 hours ago · LikeUnlike

    ReplyDelete
  10. Sateshwar Morey जातीवर आधारीत राजकारण (अथवा चळवळ )* ब्राह्मणांचं असो वा ब्राह्मणेतरांचं, शत्रूलक्ष्यी मांडणीतून दहशतवादाच्या जन्माची शक्यता वाढते. या तांबेच्या विधानाशी मी सहमत आहे. सम्यक साहित्य संमेलानात मला व्यक्तिगत अडचणींमुळे सहभागी होता आले नाही त्या...मुळे नेमकेपणाने तिथे काय घडले त्यावर बोलणे इष्ट नाही, पण गेल्या अनेक दिवसांपासून प्रा. हरी नरके बामसेफ आणि मराठा सेवा संघ विशेषत: मा. वामन मेश्राम आणि पुरुषोत्तम खेडेकर यांच्या संदर्भात जे बोलत आहेत त्यावरून हे प्रकरण केवळ व्यक्तिगत असून त्याला सामाजिक मुलामा चढविण्याचा तर प्रयत्न होत नाही ना? कारण ह्या दोघांनी त्याच्यावर जे आरोप केले ते ब्राम्हणाचे दलाल अथवा पुरोगामी चळवळीचे विरोधक असण्या संबंधीचे आहेत. या सगळ्याचे कर्तृत्व चळवळीतील लोक जाणतात .ते अज्ञानी आहेत असे समजून आपली बाजू मांडण्याचा हा प्रयत्न असेल तर तो चुकीचा आहे. हे एक आणि दुसरे असे की, " फुले आंबेडकरी चळवळीतले हे लोक आता धमक्यांच्या पातळीवर उतरुन चळवळ पुढे नेण्याची स्वप्ने पहात आहेत." हे लोक आंबेडकरी चालवतील आहेत हे ठरविण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. हे यासाठी की कदाचित ते लोक बामसेफचे असेल अथवा मराठा सेवासंघाचे ह्या संघटना आंबेडकरी आहेत की नाही? हे अजून वादातीत नाही. हे आपण जनताच तरीही त्यांना आंबेडकरी म्हणून उल्लेखित करून आपण जे काही निष्ठेने आंबेडकरी चळवळीत राबणारे कार्यकते आहेत त्यानाही त्यांच्याच रांगेत उभे केलेत. आपण जसे एकमेकांना संबोधत आहात खरेच आपण तसे आहात काय? हा प्रश्न आपण स्वताला विचारल्यास त्याचे खरे उत्तर मिळू शकते आणि त्याला कुणाच्या साक्षीची किवा कुठल्याही पुस्तकाच्या संदर्भाची गरज नाही.
    यापेक्षाही गंभीर आरोप डॉ. आंबेडकर लेखन आणि भाषण प्रकाशन समितीचे सचीव म्हणून जे काम केले त्या संदर्भात नागपूरच्या प्रकाश बनसोड यांनी पुस्तकच प्राशीत करून केले त्यासंदर्भात आपण आपल्या ब्लागवर अजून काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यासाठी या भानगडीमुळे वेळच मिळाला नसेल किंवा त्यावरून सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्याचे लक्ष विचलित व्हावे म्हणून तर हा व्यक्तिगत तंटा सामाजिक केला नसेल? असे काही अत्यंत जाणकार लोक बोलत आहेत हे आपल्या कानावर असावे यासाठीच ही प्रतिक्रिया जयभीम बाकी भेटी अंती बोलूच. * कंसातील पुष्टी माझीSee More
    17 hours ago · LikeUnlike

    ReplyDelete
  11. Dhananjaykumar Pawar बाबासाहेबांना आपेक्षित धम्म क्रांतीची आठवन करून देनार्यानी जातीच्या आथ्वा इतर राजकारणात पडू नये.धम्म क्रांतिचे मार्ग वेगले आहेत.
    15 hours ago · UnlikeLike · 1 person
    Loading...

    ReplyDelete
  12. Mr.Hari Narke speaking in a function held in BORI is not an issue here. Its not about applying standards but its about applying same standards to everybody. So applying a completely different yardstick to Mr.Hari Narke and exempting others from that application is not fair. Those who wish to make this issue a basis for criticising Mr. Narke must rethink their position for they can be easily refuted.

    It is also important that some self-certified honest Ambedkarites clarify their position on Poona Pact and Gandhi and the existing political reservation otherwise their efforts to gain some free brownie points in this Mr.Narke-BAMCEF tussle will go in vain.

    The major point of difference is Maratha Reservation. This issue is not so simple because it concerns constitutional amendment and also categorization. I know this fully well that any provision of Maratha Reservation must not carve out a share from the existing 27% of the OBC. As far as i know BAMCEF has made it clear that it supports the required Constitutional Amendment and even Categorisation.

    Sachin Salave.

    ReplyDelete
  13. नरके साहेब आपल्या भोवती विचारांचं मोठ वलय आहे. कोणी कुठे काय छापते, म्हणते व त्यावर तीव्र प्रतिक्रिया देवून मुद्द्दा रस्त्यावर आणणे आपल्या दिग्गजाकडून अनावश्यक वाटते . फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीला काय मारक आणि तारक आहे हे आज लोकांना कळले आहे. पुरावा, मुद्दा मग दे गुद्दा........... व्यक्तिगत समर्थन , विरोध...जात ...जात... शेवटी जातच........ इथेच पोहचलो.

    ReplyDelete
  14. नरके साहेब आपल्या भोवती विचारांचं मोठ वलय आहे. कोणी कुठे काय छापते, म्हणते व त्यावर तीव्र प्रतिक्रिया देवून मुद्द्दा रस्त्यावर आणणे आपल्या दिग्गजाकडून अनावश्यक वाटते . फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीला काय मारक आणि तारक आहे हे आज लोकांना कळले आहे. पुरावा, मुद्दा मग दे गुद्दा........... व्यक्तिगत समर्थन , विरोध...जात ...जात... शेवटी जातच........ इथेच पोहचलो.

    ReplyDelete
  15. Bamsef ani Sambhaji Briged ya khupach chyotya sanghatana ahet. Khari mothi sanghatana hi RSS ahe. tyamule Narake tumhi ugicha phandya chatu naka. RSS ya mulavar ghav ghala. Sampurna BAMASEF ani Sambhaji Briged ya sanghatananpekhya Sangli yethil Shivaprathisthan navachi RSS chi yek kup pillu sanghatana hi prachand mothi ahe. Ji phulyana Nich mhanate. Gandhila napusak mhanate.Tumhi RSS chi ladha. He bakiche apoap gapp basatil.

    ReplyDelete
  16. Dear, Hari Narke Sir, Jaibheem! Don't worry about BAMCEF / BSP. We will be fight with social communication. Be start fight against fascism, caste-ism, capitalism and corruption. People will be diverse where there is nationalist, humanist. If we are right, we will be win to the kanshiram / mayavati and any anti-nationalist. Kanshiram was a Hitler, Just like Bal Thakre. Both are caste base thinkar and actors. Waman Meshram also a another student of Kanshiram. Blind follower is every where, they are Fakir of the Lakir. They are not studious. Without study anybody, anywhere can't be success. They are divider in India. Where is social and economic democracy in up? Be aware the people about the democracy!! jjjjjjjjjjjjay Braaat! Jai Bharat.

    ReplyDelete