Friday, May 20, 2011

ईतिहासात लग्न, ईतिहसातच मुलेबाळे

मित्रांनो, आज आपल्यासमोर अनेक समस्या आहेत. त्यांचा डोक्याला सतत ताप होतो. महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, गुन्हेगारी,वाढती लोकसंख्या........यादी फ़ार मोठी आहे.आजचा वर्तमान हा उद्याचा ईतिहास आसतो. या सगळ्या प्रश्नांपासून सुटका करून घेण्याचा अतिशय सोप्पा मार्ग हवाय का? चला आपण ईतिहासात घुसू या. कायम त्यातच बुडून जाउ या. ईतिहासात जेवण, ईतिहासात झोप,ईतिहासात लग्न, ईतिहसातच मुलेबाळे, ईतिहासातून बाहेर यायची गरजच काय? मार्क्स म्हणाला होता .. धर्म ही आफ़ूची गोळी आहे. त्याला ईतिहास तर म्हणायाचे नव्हते ना? चला आपण याचे पेटंट घेवू या.महाराष्ट्राला कोणी स्पर्धकच आसू शकत नाही.जय महाराष्ट्र...जय ईतिहास..जय शिवराय..जय............?

9 comments:

  1. ईतिहासाचा गजर झेंन्डा रोविला. देव ईतिहास...क्शेत्र ईतिहास....घर ईतिहास...पोर ईतिहास...रस्ता ईतिहास... राजकारण इतिहास...पैसा इतिहास...रक्त इतिहास..गावा इतिहास..प्यावा इतिहास...नारा इतिहास....फ़क्त ’प्यार’ इतिहास............................

    ReplyDelete
  2. इतिहासाचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी केला जात आहे.सत्ताधारी समाजात नेत्रुत्वासाठी फ़ार मोठी स्पर्धा आहे, त्यामुळे इतिहासाचे शस्त्र चलाखपणे वापरुन सत्तेचा सोपान चढण्याचा हा कावा आहे, हे उघड दिसतेय.

    ReplyDelete
  3. देर आये, दुरुस्त आये!
    बरं इतिहास जाउद्या! मी उद्याचा इतिहास अर्थात आजच करंट अफ़ेयर सांगतो! भारताच्या सनदी सेवेत दाखल होण्यासाठी दरवर्षी घेतल्या जाणार्‍या युपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगच्या परीक्षेत गेली ४-५ वर्षे महाराष्ट्रातून सर्वप्रथम येण्याचा मान ब्राह्मण पोरं मिळवत आहेत! २००९- अनिकेत मांडावगणे, २०१०- अनय द्विवेदी, या वर्षी २०११- कृष्ण अय्यर.
    गेली काही वर्ष महाराष्ट्रातील बहुजन पोरं ”जय भिम” म्हणत अभ्यास करायचा सोडुन ”जय ...” करत राडा करत सुटली आहेत. परत उद्याचे परिवर्तनवादी भटांनी सर्व अधिकार-पदे कशी आपल्या ताब्यात ठेवलीन, कसं मोठ्ठ षडयंत्र होतं ई. बडबडायला मोकळी! अर्थात महाराष्ट्रातून असली तरी भारतातून सर्वप्रथम बहुजनच होती या तथ्याशी त्यांना काही देणघेण नाहीच! नाही तर पंडितराव सारखं मंत्रीपद तयार करणारे, संस्कृतला प्रोत्साहन देणारे, आऊसहेबांची सुवर्णतुला करणारे शिवबा, ब्राह्मणांनाही जवळ करावे म्हणणारे जोतिबा, वेदा निंदी तो चांडाळ म्हणणारे तुकोबा , एखाद्याला जसं रोज सकाळी कोंबड लागतच तसं यानां सकाळी-सकाळी एखादा तरी ब्राह्मण कापल्या शिवाय चैन पड्त नसे, अशा प्रकारे प्रोजेक्ट केलं नसतं!

    ReplyDelete
  4. सांगे वडिलांची कीर्ती तो एक मुर्ख...असे समर्थ सांगून गेलेत...याचाच अर्थ असा की केवळ पूर्वजांच्या थोरवी पुन्हा पुन्हा ऐकून किंवा सांगून आपण मोठे होत नसतो. माझ्या पूर्वजांकडे सोण्यानाण्यांचे हंडे होते, हे काही माझे क्वालिफिकेशन असू शकत नाही. आपल्या वंशजांना आपला अभिमान वाटेल असे काहीतरी आपल्या हातून घडले पाहिजे, हाच संदेश पूर्वजांच्या कर्तृत्वातून, इतिहासापासून घेतला पाहिजे. इतिहास प्रेरणा आहे तोवर ठीक पण त्याला भूत बनवून मानगुटीवर बसविणे आणि पछाडल्यागत वागणे यातून आपण स्वतःचे अवमूल्यन करुन घेतो. इतिहास आहे तिथेच असतो...शांतपणे पाहतो आपल्या आक्षेपांकडे-विक्षेपांकडे.

    ReplyDelete
  5. jo apla itihas mahit nahi to kadhich itihas ghadu shakat nahi

    ReplyDelete
  6. हे आपण त्रासून लिहिलं असेल अस वाटत.
    पण खर सांगायचं तर मला गंमत वाटली. कारण हे हरी नरके सरांनी लिहिलं. मी आपली जी भाषणे एकली आहेत त्यात आपले इतिहास संशोधन हा प्रमुख मुद्दा असतो. येथे असलेले आपले बहुतेक लेख हे इतिहासाशी संबंधित आहेत. "महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, गुन्हेगारी" या आपण मांडलेल्या सर्वात महत्वाच्या समस्यांविषयी एकही लेख नाही. अर्थात मी आपला ब्लॉग वाचतो ते आपण या समस्यांवर लिहितात म्हणून नक्कीच नाही. म्हणून म्हटलो गंमत वाटली....

    ReplyDelete
  7. तुमच्या विचारांशी पूर्णतः सहमत!! महाराष्ट्राला इतिहासाची बाधा झालीये.. इतिहासाचा रोग झालाय.. तो काळ होता जेन्वा समाजाच्या शुद्धीकरणाची गरज होती, आजचा काळ तसा नाहीये. आजचा समाज हा ५०-१००-१५० वर्षांच्या समाजापेक्षा वेगळा आहे. आजचे किती जण जाती प्रथेने पोळले गेले आहेत?? विसरलेली, गाडलेली भूतं परत जिवंत करून काय फायदा?? आत्ताची जातीप्रथा हि ऐकीव माहितीवर आहे, अनुभवावर नाही!! एखादं उदाहरण कुठेतरी होत असेल पण १००-१५० वर्षांखाली (भले त्याच्या अगोदर हि अजून हजार वर्षे) झालेल्या अत्याचारांबद्दल आत्ता रक्त गरम करून कुणाचे काय साधणार आहे?? समाजाच्या उत्क्रांतीच्या ह्या वेग-वेगळ्या अवस्था असतात, आणि प्रत्येक समाज त्या मधून जात असतो. पण स्वतःच्या नाकार्तेपणासाठी किती दिवस इतिहासाचा पदर पकडायचा? इतिहासाचा आसरा घेवून स्वतःची कर्तव्यशुन्यता कशाला लपवायची?? इतिहासाला आणि सामाजिक बदललाच्या अभ्यासाला तज्ञांकडे सोपवून काही तरी राचान्त्मक कार्य करणे हे तरी आपल्या हात आहे!!! किती दिवस इतिहासाच्या गाजराची पुंगी वाजवणार आहोत आपण?? आणि हे तथाकथित अत्याचार फक्त भारतीय इतिहासाचे वैशिष्ठ्य नाहीये.. तो मानवी स्वभावाचा एक अविभाज्य अंग आहे आणि कुठल्या न कुठल्या स्वरूपात प्रत्येक सभ्यतेमध्ये, संस्कृतीमध्ये बाहेर येणारच आणि वेळो-वेळी आलेला पण आहे!!

    ReplyDelete
  8. नरके साहेब या ईतिहासाच्या अभ्यासाच्या जोरावरच आपण ईथ पर्यन्त पोहचला आहात.सानपाडा, नवीमुम्बई येथे मे काहि वर्षान्पुर्वी आपले व्याख्यान/भाषण ऐकले व त्यामधे आपण ईतिहास सन्शोधनाची गरज कशी आहे व जस-जसे ईतिहासाचे सन्सोधन होत जाईल तस तसे समाजाचा कसा फायदा होईल हे सान्गितले पण आज आपणच ईतिहास सन्शोधनाची खिल्ली उडवित आहात हे आश्चर्यच आहे.

    ReplyDelete