Friday, August 12, 2011

आरक्षण:शिक्षणाच्या बाजारीकरणाची कहाणी



Admagnet-X
आरक्षण - शिक्षणाच्या बाजारीकरणाची कहाणी
प्रा. हरी नरके
Friday, August 12, 2011 AT 07:39 AM (IST)

बहुचर्चित "आरक्षण' चित्रपटाला विरोध करणाऱ्यांनी बुधवारी हा चित्रपट पाहिला आणि आपली भूमिका मागे घेतली. या कार्यकर्त्यांचा विरोध का मावळला, याविषयी... 



संधी मिळाली तर मागासवर्गीयही उत्तम गुणवत्तावान होतात; यश प्राप्त करू शकतात, असाच संदेश "आरक्षण' चित्रपटाने दिला आहे. एका ध्येयवादी शिक्षकाच्या झुंजीची ही कहाणी आहे. जातीय तेढ, सामाजिक फाळणी किंवा आरक्षणाला विरोध, असे त्याचे स्वरूप नाही. हा चित्रपट आजपासून प्रदर्शित होत असला तरी त्याला प्रदर्शनपूर्व विरोध खूप झाला. चित्रपट न्यायालयात गेला. चळवळीतील काहींनी आरक्षणाचा मुद्दा घेऊन त्याला विरोध केला. शेवटी बुधवारी हा चित्रपट विरोधकांनी पाहिला आणि हिरवा झेंडा दाखविला.

प्रकाश झा यांचे चित्रपट समकालीन प्रश्‍नांवर असतात. "दामुल', "गंगाजल', "अपहरण', "राजनीती' या चित्रपटांनी झा यांचे हिंदी चित्रपट क्षेत्रातील स्थान पक्के केलेले आहे. "आरक्षण'मध्ये सामाजिक तेढ निर्माण करणारे आणि घटनात्मक हक्कांना बाधा आणणारे आरक्षणविरोधी चित्रण असल्यास त्याला शांततामय मार्गाने विरोध करू, अशी भूमिका राष्ट्रीय अनुसूचित जाती व जमाती आयोगांनी, तसेच समता परिषदेचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी घेतली होती. प्रकाश झा यांनी या मंडळींसाठी खास खेळाचे आयोजन केले होते. भुजबळांसह सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, महिला व बालकल्याणमंत्री वर्षा गायकवाड, खासदार समीर भुजबळ, रिपब्लिकन पक्षाचे गौतम सोनवणे, भाजपचे आमदार प्रकाश शेंडगे, कृष्णकांत कांदळे, डॉ. जब्बार पटेल आदींसमवेत मीसुद्धा हा चित्रपट पाहिला. प्रत्यक्ष चित्रपट पाहिल्यानंतर काही दृश्‍ये आणि प्रसंग काढण्याच्या अटीवर भुजबळांनी विरोध मागे घेतला. "आरक्षण हे घटनात्मक वास्तव असून, शिक्षणाचे बाजारीकरण होण्यास आरक्षण जबाबदार आहे का, याचा शोध मी चित्रपटातून घेतला आहे,' असे झा या वेळी म्हणाले.
जागतिकीकरणामुळे झालेले शिक्षणाचे बाजारीकरण, कोचिंग क्‍लासेसचे वाढते महत्त्व आणि आरक्षणाबाबतचे सामाजिक ताणतणाव या कथानकावर चित्रपट उभा राहतो. प्रभाकरन (अमिताभ बच्चन) हा ध्येयवादी शिक्षक एका नामवंत खासगी महाविद्यालयाचा प्राचार्य आहे. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीमुळे उच्च शिक्षण संस्थांमध्ये २७ टक्के आरक्षण आले. मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आनंदोत्सव केल्यामुळे उच्चवर्णीय मुले भडकतात. तणाव निर्माण होतो. हातघाईची वेळ येते. महाविद्यालयातील आरक्षणविरोधी लॉबीला मानवतावादी प्रभाकरन अडचणीचे वाटत असल्याने ते कटकारस्थान करून त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडतात. उपप्राचार्य मिथिलेश सिंग (खलनायक मनोज वाजपेयी) प्राचार्य बनतात. ते खासगी कोचिंग क्‍लासेस चालवत असतात. अमिताभचे घरच त्यांनी बळकावलेले असते. ते परत मिळविण्यासाठी अमिताभची ससेहोलपट आणि त्यांचा शैक्षणिक आदर्शवाद यांची टिपिकल हिंदी मसाला चित्रपटाची सगळी भट्टी वापरण्यात आली आहे.
गुंतागुंतीच्या प्रश्‍नांचे सुलभीकरण, आदर्शवादी मांडणी, मनोरंजनाची फोडणी आणि आरक्षण या ज्वालाग्राही प्रश्‍नाचा मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणून केलेला वापर, या चित्रपटात बघायला मिळतो. दीपक (सैफ अली खान) हा मागासवर्गीय युवक प्रभाकरनच्या मदतीमुळे अभ्यासात टॉपर आहे. परंतु त्याला नोकरीत डावलण्यात येते. शेवटी प्रभाकरन त्याला आपल्या महाविद्यालयात नोकरी देतात. आरक्षण प्रश्‍नावरून निर्माण झालेल्या संघर्षात दीपक गप्प बसू शकत नाही. ज्या उच्चवर्णीय मुलांना प्रवेशात अडचणी येतात, त्यांच्याशी त्याचा थेट सामना होतो. प्रभाकरनशी वाद होतात. महाविद्यालय सोडावे लागते. प्रभाकरनची मुलगी पूर्वी (दीपिका पदुकोण) दीपकच्या प्रेमात असते. परंतु वडिलांच्या बाजूने ती उभी राहते आणि आरक्षणाच्या प्रश्‍नावरील मतभेदामुळे ते दोघे दुरावतात.

शिक्षणापासून वंचित असलेल्या आणि विशेषतः प्रतिकूल परिस्थितीतील मुलांचे मोफत अभ्यासवर्ग प्रभाकरन म्हशींच्या गोठ्यात चालवतात. दीपक, पूर्वी आणि त्यांचे मित्र मदतीला पुढे येतात. त्यामुळे खासगी कोचिंग क्‍लासेसचा धंदा बसतो. मग कटकारस्थाने आणि संकटांची मालिका व शेवटी नेहमीप्रमाणे अनपेक्षित वळण घेऊन गोड शेवट, अशी मांडणी आहे. आरक्षण प्रश्‍नावरील काही प्रचलित गैरसमज भडकपणे मांडले जातात. त्यांची धारदार उत्तरेही दिली जातात. काही प्रसंग आणि समूहदृश्‍ये प्रभावी आहेत. काही दृश्‍ये व संवाद वादग्रस्त किंवा आक्षेपार्ह ठरू शकतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करून त्यावर चर्चा, वादविवाद होऊ शकेल. झा यांनी खासगी क्षेत्रात येऊ घातलेले आरक्षण रोखण्यासाठी हा चित्रपट बनवला आहे काय, त्यांनी कोचिंग क्‍लासेस आणि बाजारीकरणाचे खापर आरक्षणावर फोडणे अनुचित नाही काय, त्यांनी आरक्षण या प्रश्‍नाच्या गाभ्यालाही हात न घालता एक टिपिकल हिंदी मसालापट बनवून सरधोपट मार्गाने या प्रश्‍नांचे गांभीर्य कमी केले आहे काय, असे प्रश्‍न उद्‌भवू शकतात. झा यांच्याशी प्रतिवादही होऊ शकेल. तो केलाही पाहिजे. परंतु त्यांनी एका समकालीन प्रश्‍नाला हात घालण्याचे (टिपिकल हिंदी मसाला पद्धतीने का होईना) धाडस केल्याचे गुण त्यांना द्यावेच लागतील. चित्रपटाची हाताळणी खूप लाऊड आहे. संवाद मात्र धारदार आणि टाळ्या घेणारे आहेत. कष्टाचे महत्त्व उच्चवर्णीयांनी कष्टकऱ्यांनाच सांगावे यातला उपरोध नेमका टिपला आहे. एकूण काय, तर एका ध्येयवादी शिक्षकाच्या झुंजीची आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवरील टिपिकल हिंदी मसाला कहाणी म्हणजे "आरक्षण' होय.
टीव्हीवरील प्रोमो पाहून हा चित्रपट आरक्षणविरोधी असावा, असे वाटत होते. मात्र, चित्रपट पाहिल्यानंतर गैरसमज दूर झाला. काही दृश्‍ये आणि प्रसंगांमध्ये सुधारणा करण्याची तयारी झा यांनी दाखविल्याने समता परिषदेने विरोध मागे घेतला आहे.
- छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाममंत्री 



13 comments:

  1. ह्या पुढारी लोकांच्या कित्ती शिक्षण संस्थान मध्ये ५०% गरीब - दलित लोकांना फुक्कट शिक्षण दिला जाता ते बघा, मग कळेल कि कोनालीही नाही, हे कसा फक्त आपला उपयोगाच करून घेतात पण देत मात्र काहीच नाहीत.
    On 12/08/2011 08:42 AM tomindie said:
    शिक्षणाच्या बाजारीकरणाची कहाणी आहे म्हणूच आरक्षणला राजकीय नेते व शिक्षण सम्राट लोकांच्या भावना भडकावून विरोध करत आहेत बाकी काही नाही. सत्य समोर आनला कि विरोध करून ते असत्य करायला लावणं हेच होत आलाय
    On 12/08/2011 08:28 AM मंगेश टेकाळे said:
    प्रकाश झा हे पहिल्यापासून एक उत्तम निर्देशक आहेत त्यांची बरेचशी चित्रपटे जसे गंगाजल , अपहरण ही वास्तविक वाटतात. आरक्षण या मुद्यावार बोलणे म्हणजे डोंबार्याने केलेली तारेवरची कसरतच पाहिजे नाहीतर जिकडे कौल गेला तिकडची जनता आहेच विरोध करायला. त्यामुळे या चित्रपटाविषयी मला अश्याच अपेक्षा होत्या. हरिजी तुमचे समीक्षक खरंच खूप चांगले आहे.

    ReplyDelete
  2. वरिल ३ प्रतिक्रिया सकाळ च्या ई एडिशनवरुन साभार.

    ReplyDelete
  3. विरोध मावळला वैगेरे काही नाही हो. विरोध ह्या कृती तून आम्ही आरक्षित जनतेची किती काळजी करतो हेच तर दाखवून दियचे होते. तो हेतू सिद्ध झाला कि कसला विरोध आनी कसले काय?

    विरोधच करायचा होता तर चित्रपट रिलिझ झाल्यानंतरही करता आला असता.

    जातीय तेढ, सामाजिक फाळणी किंवा आरक्षणाला विरोध, असे काहिहि चित्रपटात नाही. तरीही त्याला विरोध करून जे झांचे नुकसान झाले ते आता कोण भरून देनार हे ठरवायला हवे... विरोध करणारे विरोध करून झाले बाजुला.

    शांततामय विरोध करू म्हणणारे भुजबळ साहेब, ज्या मंडळिंनी पोस्टर फाडले त्यांचे समर्थन कसे कायन करणार आहेत.?

    काही प्रसंग न आवडल्याने त्यात सुधारना कराव्यात. तसे पाहिले तर प्रत्येक कलाकृतीत प्रत्येकाला काही ना काही आवडत नाहिच. मग प्रत्येक वेळी कलाकाराने तसेच करायचे का. कलाकाराची कलाकृती घ्यायची कि नाही ह्याचे स्वातंत्य आपले आहे. ति कसी बनवायची हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कलाकाराकडेच अबाधित आसायला हवे.... हे आपणास आणि मंत्री मोहदयांना माझ्यासारख्या सामान्य क्षुद्राने सांगण्याची आवश्यता नाहिच... तरिहि..

    ReplyDelete
  4. Manish Kamble: "sir , tumhi ha chirtapat pahila aahe tumhich sanga"
    21 hours ago · Like

    Pravin Jadhav: "sir,do not make public fool".
    8 hours ago · Like · 1 person

    Shyam Ranjankar: "sir we had a long public debet over Praksh jha's aarakshan. initially we had feeling that something unconstitutional is about to happen. but are we aware of the secrete agenda of sangh pariwar. the adacemic books in Bihar are carrying the rss line, which they did dunig MDA rule under leadership of Murlimanohar Joshi. After emergency Adwani tookover I &B Ministry and recruited all rss people, we are suffering the poisionus fruits, that no tv channel if reflecting of educating people about the progressive though. they only make us aware of Hindu rituals. Has any body raised voice against it."
    6 hours ago · Like

    Dayanand Kanakdande: "above editirial from MAHARASHTRA TIMES".{from:facebook}

    ReplyDelete
  5. Abhijeet Pandit: sir....
    21 hours ago · Like

    Abhijit Ganesh Bhiva: "पूर्ण सहमत ................".
    21 hours ago · Like

    Munna Somani: "कोणत्याही गोष्टीला पहिल्या शिवाय किंवा ऐकल्या शिवाय विरोध करू नये
    IBN लोकमत आपण "आरक्षण" विरोधाचं समर्थन करीत होतात.
    पाहिल्यावर आपण आपली भूमिका आपण मागे घेतली यात समाधान आहे"
    21 hours ago · Like · 2 people

    Mangesh Bansod: "Khare Mhanje Aapan Jar Abhivyakti Swatantryache Purskarte Asu Tar Mag Cinema Baghaychya Aadhich Tyala Virodh Karun Aani Vatavaran Tapvun Aapan Kay Sadhle?Ya Prakaranamule Aadhich Aarakshanala Virodh Asnarya Deshdrohi Lokanna Jast Tav Aala Hota...!"
    20 hours ago · Like · 4 people

    Vjjaykumar Pawar: "Mahatma Phule na abhipryt aslyli bhujan chalval karya samta parishad ne vishist jati purti maryadit sanghtna ashi kyli aahe.Samajatil pratyak jati ghataka cha samaji,shyashanik anni rajkiya vikas fakta rashtra cha vikas ghadu shakto,kontihi ek jat kiwa dharm nawhe. tywhac desha madhe SAMTA yawo shakel".
    12 hours ago · Like

    Dayanand Kanakdande: "sir, promo pahun aata samadhan zale chhan tyadiwshi ibnlokmat varil chachet he shantpane ghetla asat tar bar zal hot "chtrapat nave chitpat " ha maharashtra times madhil lekh vacha. 2 divaadhicha.....{from:facebook}
    August 13, 2011 11:15 AM

    ReplyDelete
  6. Nandkishor Vaidya: "vyakti swatantrya m.f.hushain ne jevha sarswati che nange chitqa kadhale tevha kuthe gele hote. mare paryant m.f.hushain bharatat yeu sakale nahi.tevha jha samarthak kuthe mele hote?" {from:facebook}

    ReplyDelete
  7. Nandkishor Vaidya: "vyakti swatantrya m.f.hushain ne jevha sarswati che nange chitqa kadhale tevha kuthe gele hote. mare paryant m.f.hushain bharatat yeu sakale nahi.tevha jhasamarthak kuthe gele hote?"{from:facebook}

    ReplyDelete
  8. Yogesh Jagtap: "Your writing is inspiring!"
    Yesterday at 9:12am · Like · 1 person
    Rahul Ware: "चित्रपटाकडे आधीच दुर्लक्ष केले असते तर ह्या विषयाला नको इतकी प्रसिद्धी मिळाली नसती.............."{from:facebook}

    ReplyDelete
  9. GANESH BORDE:"काळ......... आय बी आन लोकमत वर तुमची चर्चा छान होती आणि ....तुम्ही सदर केलेले पुरावे बरोबर होते .......पण हि शुल्लक प्रश्नावरची चर्चा बरोबर वाटली नाही ...............!"
    August 9 at 7:07pm · Like · {FROM :FACEBOOK}

    ReplyDelete
  10. Sir, I hope you are not justyfying the Jha's act. I think name of the movie and promos should be changed. Or now onward censor board should take care of such issues. The first thing Jha did wrong is naming movies Aarakshan; second he showed the promos as if they are the topic and focus of movie; third he was quite for so many days towards opposition and made a free publicity by causing unrest in society. I think censor board should 1. Consider reviewing not just movie but the title and it's socio-cultural impacts 2. Promos for fare advertisement (so that people don't get misled- it was like focusing more on half naked lady than the car which is supposed to be advertised in an ad) 3. It shouldn't be the producer or director but the censor board which should answer the concerns of public on such issues. Because after all they censor the movie and grant it permission, if it's not their function as of now, it should be introduced. Thanks.
    Prakash B. Pimpale
    http://mukhyamantri.blogspot.com/

    ReplyDelete
  11. Arvind Kumar:
    "तमाशा देखिए, जो आदमी आरक्षण फिल्म का स्क्रिप्ट राइटर है यानी Anjum Rajabali, वह केंद्रीय सेंसर बोर्ड (CBFC) का सदस्य भी है। यही बोर्ड आरक्षण फिल्म को अप्रूव करता है। इनकी लीला अपरंपार है। आपसी बंदरबांट के प्रतियोगिताविहीन माहौल में ये लोग ज्ञान, विज्ञान, तर्कशास्त्र या ज्ञान के किसी भी क्षेत्र का विकास क्या करेंगे? ये अजीब लोग हैं।"{FROM:...FACEBOOK}

    ReplyDelete
  12. Anand Rahate:{FROM....FACEBOOK}
    "आरक्षन फिल्म के बहाने दलित विरोधी नया षड्यन्त्र साकार किया जा रहा है। कुछ साल पहले आरक्षण का मुद्दा चर्चा मे था। आरक्षण को लेकर इस देश मे कई बार दंगे हो चुके है। गुजरात मे तो लंबे समयतक आरक्षण के खिलाफ आंदोलन चल चुका है। मण्डल आयोग के खिलाफ भी बहुत बड़ा आंदोलन भड़काया गया था। आरक्षण को लेकर दलित समाज के खिलाफ युवा वर्ग को भी भड़काया गया था । उन्हे यह जताने की कोशिश की गयी थी की आरक्षण के कारण इस देश मे युवा वर्ग को बेरोजगार रहना पद रहा है। और जिनकी काबिलियत नहीं है ऐसे लोग केवल आरक्षण के कारण बड़े बड़े पदों पर विराजमान हो रहे है। साथियों, इस गलत फहमी को इसकदर लोगों के सामने रखा गया की युवा वर्ग और अन्य लोग इसे सच्चाई मानने लगे। और दलितों को उपरोध से सरकारी दामाद कहा जाने लगा।
    पिछले कुछ वर्षों से आरक्षण का मुद्दा पिछड़ गया था। भ्रस्टाचार , महंगाई, काला धन, नेताओं के झमेले आदि के बीच आरक्षण का मुद्दा चर्चा से दूर था। ऐसे मे प्रकाश झा जैसे चतुर फिल्म निर्माता ने आरक्षण के विषय पर फिल्म बनाकर गड़े हुवे मुद्दे को नए सिरे से हवा देने का कम किया है। आरक्षण के मुद्दे को उछालकर समाज मे तूफान खड़ा करने का घिनोना प्रयास प्रकाश झा ने किया है। दो समाजों मे टकराव पैदा कर अपना उल्लू सीधा करने का उसका मकसद है। विवाद पैदा कर वो पैसा तो कमा सकता है मगर इस विवाद से इस देश मे रहनेवालों का कितना बड़ा नुकसान होगा इसका उसे अंदाजा नहीं था...या अंदाजा हो भी तो उसने जानबूझकर यह दलितविरोधी कदम उठाया है।
    अमिताभ बच्चन जैसे सामंतों के दलाल एक्टर इस फिल्म का प्रमोशन कर आरक्षण की मानो वकालत कर रहे है। अमिताभ बच्चन ही क्यों ....रामदास आठवले जैसे चवन्नी मे बिकने वाले सस्ते नेता भी अपना राजनीतिक वजूद बचानेके लिए इस विवाद मे पड़ गए और न जाने कौनसा सौदा हुआ की अब आरक्षण फिल्म को क्लीन चिट देने का डंका बजा रहे है। और हम सब हमेशा की तरह मुह ताकते बैठे है। प्रकाश झा की बदनीयती और हमारे नेताओं की हरामखोरी को चुपचाप देख रहे है। उत्तर प्रदेश मे मायावती ने प्रकाश झा के घिनौनने मकसद को पहचान कर फिल्म के प्रदर्शन पर पाबंदी लगाई है। आंध्रा प्रदेश और पंजाब सरकार ने भी जातीयता कटुता फैलानेवाली इस फ़िल्मपर पाबंदी लगाई है। मगर जिस महाराष्ट्र मे डॉक्टर बाबासाहब अंबेडकरजी ने दलितों के उत्थान की मूवमेंट चलाई वहाँ के लालची लीडरों ने इस घातक फिल्म को सरपर उठा रखा है।
    हाल ही मे महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित पवार ने मगरूरी के साथ दलितों की शिक्षण संस्था मे की फ्रीशिप को बंद करने की शिफारिश की थी मगर किसी भी दलित नेता ने उसका विरोध नहीं किया। केवल पढे लिखे लोगों ने अपना विरोध जताया। जिस काँग्रेस को दलित समाज ने सर के ऊपर उठा लिया है वही काँग्रेस आज दलितों के पर काटने का प्रयास कर रही है। ऐसे मे आरक्षण जैसी फिल्म हमारे लिए मौत का पैगाम ला रही है।
    आप लिख लीजिये की हमारी यह उदासीनता आने वाले समय मे हमे महंगी पड़ने वाली है। क्योंकि यह मुद्दा अब केवल फिल्म का मुद्दा न रहकर हमारे खिलाफ आंदोलन का मुद्दा बनने मे देरी नहीं लगेगी। और अगर हम गाफिल रहे तो इसका बहुत भयानक खामियाजा हमे भुगतना पड़ेगा। आज भी हमारा समाज गरीबी और अज्ञान से उभरा नहीं है। अगर आरक्षण खत्म किया गया तो दुबारा हम गुलामी की गर्त मे धकेले जाएंगे। हमे एक हजार साल पीछे जानेमे देरी नहीं लगेगी। दुबारा हमे किसी और डॉक्टर अंबेडकर का इंतज़ार करना पड़ेगा

    ReplyDelete