"भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्ये अभिजात मराठी भाषा अभ्यास केंद्राची स्थापना."
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या भारतीय भाषा अध्ययन विभागातर्फे "अभिजात मराठी भाषा अभ्यास केंद्राची" स्थापना करण्याचा निर्णय आज संस्थेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या केंद्राच्या प्रमुखपदी प्रा.हरी नरके यांची नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या अभिजात मराठी भाषा समितीच्या वतीने करण्यात आलेल्या मराठीच्या अभिजातता विषयक संशोधनात भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचा प्रमुख सहभाग होता. संस्थेतर्फे प्रा. हरी नरके, प्रा. श्रीकांत बहुलकर, प्रा. मैत्रेयी देशपांडे आदींनी हा प्रस्ताव तयार करण्याच्या कामी प्रा. रंगनाथ पठारे समितीला महत्वपूर्ण सहभाग दिलेला होता. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत आजवर गेले शतकभर प्रामुख्याने संस्कृत, पाली, अर्धमागधी, प्राकृत भाषांचा अभ्यास केला जात असे. आता संस्था मराठी भाषाविषयक संशोधन प्रकल्प हाती घेणार आहे. मराठी भाषेचे अद्ययावत संशोधन व अध्ययन केंद्र भांडारकरमध्ये निर्माण करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
...............................................................................................
भांडारकरचा कारभार आता मराठीतून
पुणे, दि.११: भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था या शताब्धीच्या उंबरठ्यावर असलेल्या जागतिक किर्तीच्या संस्थेचा कारभार यापुढे मराठीतून करण्याचा निर्णय आज एकमताने घेण्यात आला. नवनिर्वाचित नियामक मंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत प्रा.हरी नरके, शाम सातपुते, श्रीनिवास कुलकर्णी, मंडलेकर डी.एन., प्रा. श्रीकांत बहुलकर, वसंत वैद्य, पं.वसंत गाडगीळ, प्रमोद जोगळेकर, राहुल सोलापुरकर,एड.विनायक अभ्यंकर, संजय पवार,भुपाल पटवर्धन यांनी हा विषय उपस्थित केला. त्याला सर्वांनी पाठींबा दिला. आजवर या जागतिक किर्तीच्या संस्थेचा सगळा कारभार इंग्रजी भाषेतून चालत असे. संस्थेचे सदस्य जगभर असल्याने त्यांनी यापुढे मागणी केल्यास इंग्रजीतही कागदपत्रे पुरवली जातील. वर्जित प्रयोजने वगळता बाकी कारभार मात्र मराठीत चालेल. संस्कृत, पाली, अर्धमागधी, प्राकृत भाषांचा प्रकाशन, अध्यापन, अध्ययन, संशोधनपर अभ्यास करणार्या या संस्थेने यापुढे मराठीत कारभार करण्याचा घेतलेला निर्णय ऎतिहासिक स्वरूपाचा होय.हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.
भांडारकर संस्थेचे आजवर महाभारताची चिकित्सक आवृत्ती, १९ खंड, भारतरत्न पां.वा.काणे यांचे धर्मशास्त्राचा इतिहास, पाच खंड, प्राकृत शब्दकोश, छ.संभाजीमहाराज यांचे बुधभूषण, {प्रकाशन १९२६,} हे ग्रंथ गाजलेले आहेत.

No comments:
Post a Comment