सामाजिक विचारवंत संजय सोनवणी यांचा लढा
मित्रवर्य आणि ख्यातनाम सामाजिक संशोधक, विचारवंत आणि योद्धे श्री.संजय सोनवणी गेले २ दिवस कोथरूडच्या करिष्मा चौकात उपोषण करीत आहेत.त्यांना तीव्र मधुमेह असल्याने या दीर्घ उपोषणाने त्यांची प्रकृती बिघडली आहे.
त्यांनी सुरू केलेला लढा अभुतपुर्व आणि ऎतिहासिक असा आहे. या लढ्याने प्रथमच काही मुद्दे देशासमोर चर्चेला आणलेले आहेत.
१...आरक्षणधारकांसाठी सर्वमान्य आचारसंहिता असावी.
२. सध्या आरक्षण मिळणार्या ज्या जाती/जमातींची प्रवर्ग बदलण्याची मागणी आहे, त्या सर्वांना एकत्र आणून त्यांच्यात संवाद, जागृती आणि व्यापक ऎक्य घडवून त्यांचा सर्वांचा एकत्रित लढा उभारणे.
३. जे घटक आज खुल्या गटात आहेत त्यातल्या दुर्बलांना आरक्षण मिळावे.
४. सर्व जातीजमातींमध्ये राष्ट्रीय ऎक्यभावना वाढवण्यासाठी म.फुले आणि म.गांधी यांच्या मार्गाने जागरण आणि अभिसरण निर्माण करणे.
हे सगळेच मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत. त्यासाठी नेटाने आणि २४*३६५* आमरण काम करण्याची गरज आहे.
श्री.सोनवणी हे देशाचे वैभव आहेत. भारतीय जातीपातीची मानसिकता बदलण्यासाठी आजवर अनेकांनी काम केलेय. या कार्याला फुले, शाहू, आंबेडकर,शिंदे, सयाजीराव, गांधी असा फार मोठा वारसा आहे. हे काम राष्ट्रीय आव्हानात्मक काम आहे.
श्री.सोनवणी त्यासाठी गेले अनेक वर्षे समर्पित वृत्तीने काम करीत आहेत.
माझ्या माहितीत असा हा पहिलाच माणूस आहे की ज्याने स्वत: लाभार्थी नसताना आणि सर्वप्रथम स्वत: डिकास्ट होऊन विविध जातीजमातींचा इतिहास शोधणे, लिहून प्रकाशित करणे, त्यावर चर्चा घडवणे, व्याख्याने देणे,सोशल मिडीयाच्या {ब्लो‘ग, फेसबुक} माध्यमातून रात्रंदिन वैचारिक मांडणी करणे असे तळमळीचे काम गेली अनेक वर्षे सातत्त्याने लाऊन धरलेले आहे.
श्री.सोनवणी हे "ऎशी कळवळ्याची जाती! करी लाभाविना प्रिती!" या वृत्तीचे चालताबोलते प्रात्यक्षिक आहेत.
अशा माणसांची आज आपल्या समाजाला गरज आहे.
या दोन दिवसात हजारो लोकांनी त्यांना भेटून आणि फोनवरून उपोषण सोडण्याची विनंती केली. आमच्या सर्वांच्या आग्रहाला मान देऊन त्यांनी आत्ताच उपोषण मागे घेतले असले तरी या विषयांना न्याय मिळण्यासाठी आमरण कार्यरत राहण्याचा आणि नेटवर्कींगला आयुष्य वाहून घेण्याचा त्यांनी निर्धार केलेला आहे. त्यांच्या या सर्व कामाला आमच्या हार्दीक शुभेच्छा...
संजय सोनवणी भाऊ, आम्हाला तुमचा अभिमान वाटतो....

No comments:
Post a Comment