Saturday, June 6, 2015

consistency is the virtue of an ass


Dr. Babasaheb Ambedkar says---

 To a critic who is a hostile and malicious person and who wants to make capital out of my 
inconsistencies my reply is straight. Emersson has said that consistency is the virtue of an ass

and I don't wish to make an ass of myself. No thinking Human being can be tied down to a

view once expressed in the name of consistency. More Important than consistency is 

 responsibility. A responsible person must learn to unlearn what he has learned. A responsible

person must have the courage to rethink and change his thoughts.Of course there must be

good and sufficient resons for unlearning what he has learned and for recasting his 

thoughts.There can be no Finality in Thinking."


 [ Thoughts on Linguistic States, Preface, 23 Dec.1955.]  { Dr Babasaheb Ambedkar Writings and Speeches, Vol.1, Govt.of Maharashtra, Mumbai. Second Edition, 2010, pg.139 }


 "जबाबदार माणसाकडे पुनर्विचार करण्याचे आणि आपले विचार बदलण्याचे धाडस असलेच पाहिजे." 

बाबासाहेब ‘भाषावार प्रांतरचनेवरील विचार’ या विषयावरील लेखनात इमर्सनला उद्धृत करुन म्हणाले होते, “ द्वेषबुद्धीने 

माझ्यावर टिका करणार्‍या आणि माझ्या विसंगतीचेच भांडवल करू पाहणार्‍या माझ्या टिकाकाराला मी सरळ उत्तर देत आहे. 

विचारातील सातत्य, सुसंगती हा गाढवाचा सद्गुण आहे असे इमर्सनने म्हटले आहे. सुसंगती राखून मला गाढव व्हायचे नाही. 
सुसंगतीच्या नावाखाली एकेकाळी व्यक्त केलेल्या मताला कोणताही विचार करणारा माणूस स्वत:ला जखडून घेणार नाही. 

सुसंगतीपेक्षाही जबाबदारी जास्त महत्वाची असते. जबाबदार माणसाकडे एकदा शिकलेले विसरून जाण्याचे, पुनर्विचार 

करण्याचे आणि आपले विचार बदलण्याचे धैर्य असले पाहिजे. अर्थात तसे करण्यासाठी त्याच्याजवळ पुरेशी आणि सबळ 

कारणे असली पाहिजेत. कारण विचारविश्वात अंतिम असे, शेवटचा शब्द म्हणून काही नसते.” {भाषावार प्रांतरचनेबाबत विचार, प्रस्तावना, २३ डिसेंबर, १९५५, { डा.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे,खंड-१, महाराष्ट्र शासन, मुंबई, दुसरी आवृत्ती, २०१०, पृ.१३९}

यावरून आंबेडकरवाद हा परिवर्तनशील राजकीय विचार होता हे स्पष्ट होते.

No comments:

Post a Comment