"आरक्षण" चित्रपटाच्या निमित्ताने जोर्दार घुसळण चालु आहे.यानिमित्ताने "अभिव्यक्ती स्वातंत्र्य खतरेमे" अशी ओरड काही मंडळींनी सुरु केलेली आहे.आम्ही काहीतरी "अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मारेकरी" वगैरे आहोत असा कांगावा सुरु आहे.आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते आहोत हे सर्वप्रथम स्पष्ट करु ईच्छीतो.अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळेच चर्चा,चिकित्सा,वादविवाद होऊ शकतात आणि त्यातुनच उपेक्षितांचे प्रश्न ऎरणीवर येतात.या चर्चा आमच्या विरोधातील अस्ल्या तरीही आम्ही त्याचे स्वागतच करतो.कारण आम्हाला समाजाच्या प्रबोधनात रस आहे. मुकबधीरपणात नाही.यानिमित्ताने काही प्रश्न उपस्थित झाले आहेत त्याची चर्चा झाली पाहिजे.
१]भारतीय राज्यघटनेच्या मुलभुत अधिकारातील १९{१}[अ]या कलमाद्वारे’भाषण व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. तथापि ते अनिर्बंध नाही. त्यावर कायदा व सुव्यवस्था.सभ्यता, नितिमत्ता व अनुसुचित जनजातीच्या हितसम्बंधाच्या संरक्षणासाठी निर्बंध घालता येतात.{पाहा: भारतीय संविधान,पान,७}
२]राज्यघटनेच्या मुलभुत अधिकारातील कलम १४,१५,१६,व १७ नुसार,समानता,जातीय भेदभावाला मनाई,समान संधी,आणि अस्प्रुश्यता उच्चाटनाचे हक्क देण्यात आले आहेत.या चित्रपटामुळे जर या देशातील दुबळ्या अश्या ७५ टक्के दलित-ओबीसी लोकांच्या वरिल कलम १४,१५, १६, १७ च्या हक्कांना बाधा येणार असेल तर काय करायचे याचे उत्तर कोण देईल?
३]सेन्सोर बोर्ड जरी सरकारनियुक्त असले तरी त्याच्यापेक्षा न्यायालय वर असते.असेच घटनात्मक अधिकार घटनेच्या कलम ३३९ अन्वये राष्ट्रपतींनी नेमलेल्या "अनुसुचित जाती आयोगाला" आहेत. {पाहा:पान,१०५,१०६}या आयोगाचे अध्यक्ष न्या.पुनिया हे सुप्रिम कोर्टाचे निव्रुत न्यायाधिश आहेत.अनुसुचित जातींच्या कल्याणाला बाधा आणणा-या कोणत्याही गोष्टीला हा आयोग रोखु सकतो.हा आयोग घटनात्मक असल्याने तो सेन्सोरबोर्डाच्या वरचा आहे.त्यामुळे न्या.पुनिया यांनी हा चित्रपट प्रदर्शनपुर्व पाहण्याची केलेली मागणी कशी उडवुन लावता येईल?
४]महाराष्ट्रात "मी नथुराम गोडसे बोलतोय" या नाटकाची सेन्सोरने रद्द केलेली परवानगी हायकोर्टाने दिली होती. याचा अर्थ न्यायालय हे "समांतर सेन्सोर बोर्ड"आहे असा होत नाही.तद्वतच राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोग हे समांतर सेन्सोर ठरत नाही.
५]प्रकाश झा यांच्या यापुर्वीच्या चित्रपटातुन दिसलेली सामाजिक जाणिव प्रगत नाही.त्यांचे नायक उच्च वर्णीय असतात आणि खलनायक नेमके मागासवर्गिय असे का बरे?
६]सेन्सोर बोर्डावरील मंडळींची सामाजिक जाणिव काय प्रतीची असते? श्रीमती आशा पारेख,श्रीमती शर्मिला टागोर या अभिनेत्री म्हणुन मोठ्या असतीलही,परंतु त्यांना जातीव्यवस्था,आरक्षण,सामाजिक न्याय यावरिल तद्न्य मानायला आम्ही तयार नाही.
७]आरक्षणच्या प्रति नफरत असलेल्या सेन्सोर बोर्ड,प्रकाश झा,अमिताभ बच्चन,सैफ अली खान वगैरें ऊच्चभ्रुंच्या हातात ९१ कोटी मागासवर्गियांचे हित सोपवावे असे आम्हाला वाटत नाही.
हे लोक म्हणजे कोणी समाजशात्रद्न्य,किंवा समाजहितैशी नव्हेत.
८]त्यांचा गल्लाभरुपणा ९१ कोटी लोकांच्यापेक्षा ज्यांना मोठा वाटतो त्यांना नम्र आवाहन आहे की,या देशात आधीच जात,धर्म,भाषा,प्रांत अश्या अनेक मुद्यांवरुन मोठी फुट आहे.आरक्षणाला विरोध करण्यासाठी अनेक दंगली झालेल्या असुन त्यात हजारो लोकांचे जिव गेलेले आहेत. तेव्हा सिनेमा लागु तर द्या,मग बघु, सिनेमांचा कुठे काय परिणाम होतो? तुम्ही प्रतिसिनेमा काढुन ऊत्तर द्या, आरक्षणविरोधी मते मांडायचा अधिकार नाही काय?वगैरे युक्तीवाद तकलादु आहेत.ह्या सिनेमातुन जर आरक्षण विरोधी लोकांना कोलित मिळाले तर त्याचे परिणाम भिषण असतील.शिवाय बहुजनातही काही फुटीर आणि द्वेषासाठी टपलेल्या अतिरेकी शक्ती आहेत.त्यांना खतपाणी मिळेल.अभिसरणवादी शक्ती कमकुवत होतील.ऊच्चवर्णियांविरुद्ध वेगाने तेढ वाढते आहे.दलित आदिवासी-ओबीसींच्या सहनशक्तीला फार ताणु नका.विषाची परिक्षा घ्यावीच का?
९] "सामाजिक सौहार्द"सर्वोपरी महत्वाचे आहे.ते जपले पाहिजे.ते पणाला लावुन ज्यांना "निखळ अभिव्यक्ती"स्वातंत्र्यासाठी काही करयचे असेल तर त्यांनी आरक्षण विरोधी चर्चा घडवाव्यात.त्यांनी लेख,पुस्तके, सभा,संमेलने,चर्चासत्रे,परिषदा घ्याव्यात.परंतु सिनेमा हे फार प्रभावी,संवेदनशील रसायन आहे.क्रुपाकरुन या देशाची सामाजिक विण उसवु नका.
are thik ahe ki chal shikshanat dile arakshan ani ghetle admission ya lokani... pan shikshan samplyanantar suddha ya lokana ka bhasate garaz arakshanachi....?? tumchya aarakshanamule open category chya lokana tyancha hakka milat nahi....
ReplyDeletetumhala zar kahi kamvayche asel tar te svatachya gunvattevar milva.... mehnat kara... amchya mehnativar paani firvanyacha kay adhikar ahe tumhala...?? amhi mar mar mehnat karayachi, ratri zaagun kadhaychya, abhyaas karaycha... pan jevha admission kivha nokarichi vel ali ki vaat baghat basaychi, amachya hakkachya nokrya, admissions tumhala milalele shaant basun baghat basayche....
ka mhanun sahan karayche aamhi... 50 varshapurvi dilele arakshan mi manya karto... tevha hoti garaj tyachi, ata nahi,.... pan he rajkarni lok he arakshan cancel karnar naahit.... kaaran vote banks zaatil na yaanchya....
pan ek lakshat theva ki ya arakshanamule bhale hi amhala nokrya milat nastil, admissions milale nasel pan tari suddha amhi bhuke marat nahi... mehnat karaychi tayari ahe... haar mananar nahi....
kahihi kaam dhande karun bhaji bhakri kamvu aamchi....
manat bharpur kahi aahe bolayala... pan bhavna dukhavayachya nahit mhanun bolat nahi....
वरिल प्रतिक्रिया चांगदेव मोहिते यांची आहे{.फेसबूकवरुन--आय बेट आय क्यान युनाऊट १ बिलियन मराठी पिपल ओन फेसबुक या ग्रुपमध्ये १ लाख,६ हजार,९५३ सदस्य आहेत.}
ReplyDelete70 75 kay changdeo 40 agdi 35 % asle tari ghetle jate tyana----------------------------this comment is from same group by SIDDHI BHOSALE.{AARAKSHANAABADDALACHAA AP PRACHAAR BAGHAA.}
ReplyDeleteकठीण आहे ! प्रश्न सार्वजनिक दृष्ट्या एखादे मत मांडण्याचा प्रयत्न करणार्या कलाकृतीचा आहे, तिच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आहे. ती निर्माण करणार्याचा हेतू काय आणि तिचा वैचारिक दर्जा काय ह्या भिन्न गोष्टी आहेत. ही अभिव्यक्ती जेव्हा देशाच्या यंत्रणेने नेमलेली जबाबदार संस्था, सेन्सॉर बोर्ड याच्या नजरेखालून जाते तेव्हा तिच्यामध्ये सार्वजनिक प्रदर्शनासाठी सेन्सॉर बोर्डाने लावलेल्या चाळणीचे सर्व निकष पूर्ण झालेले आहेत. मुद्धा म्हणून आम्हाला हेच मान्य नाही ! मग आम्ही पळवाटा शोधतो आणि म्हणतो, हो आम्ही विरोध केला या कलाकृतीला... पण आमचा हेतू बघा ! ( उदात्त) त्यांनी विरोध केला तेव्हा त्यांचा हेतू बघा ! (संकुचित ) इथे कलाकृती निर्माण करणारा समूह छोटा मासा आहे. ( सॉफ्ट टारगेट ) त्याने सर्व नियमांचे पालन केले आहे. विरोध करणार्यांकडे झुंडीचे पाठबळ आहे ! ( आणि आपण लोकशाहीत राहतो !) अशा प्रकारे विरोध करणार्यांना, त्यांच्या विचारांवर कोणी असे बंधन आणले तर ते मान्य नाहीच ! व्यासपीठावर उभे राहून कोणत्याही झुंडीचा, गटाचा नेता कुणावर ही अश्लाघ्य भाषेत प्रहार करू शकतो ! ( अभिव्यक्ती स्वातंत्र्य !) म्हणजे प्रश्न तत्व-बित्वाचा नाही, केवळ झुंडीच्या ताकदीचा उरतो. हे सर्व पाहून असे वाटते की या देशातल्या कलाकृती ही दाऊद इब्राहीम, छोटा राजन यांनीच बनवाव्या {COMMENT BY AABHAS ANAND FROM FACEBOOK}
ReplyDeleteakshay AMBEDKAR SUDDHA MARATHACH HOTE HE MALA HI MAHITI AAHE..PAN MA TUACH VICHAR KAR NA JARA...KAY EVDHA TYANA WATLA ASEL KI TYANI SWTAHLA DALIT SAMAJAT RAHANE CHANGLA WATLA TYANCHI MADTA KARNE CHANGLA WATLA..MANJHE BAG NA TUACH KITI TRAS SAHAN KARYALA LAGAT HOTA TYA LOKANA...BUS ME EVDACH BOLIN KARAN HYA VISHYAWARCH WAAD KADHICH SAMPNAR NAHI AAHE...TUMHI SAGLE MALA MITRA SARKECH AAHAT...TYA MULE ME JASTA KAHI BOLAT NAHI...JAI HIND JAI MAHRASHTRASHEVTI APAN SAMNYA MANSA AAHOT..EKINE ANI PREMANE RAHANE HYA PALIKADE AAPAN KAHICH KARU SHAKAT NAHI.{COMMENT FROM SAME GROUP BY AKSHAY GADE,SEE THE GENERAL KNOWLEDGE}
ReplyDeleteहरी नरके सर, आपण 'अभिव्यक्ति स्वातान्त्र्याच्याच' बाजूने aahaat हे aamhaalaa maahit आहे. 'आरक्षणावर चर्चा व्हावी म्हणून आपण ह्या मंचावर पोस्ट्स देखिल टाकल्या होत्या. या विषयाच्या चर्चेचे आपल्याला अजिबात वावडे नसून, आपण सर्व मतांचे स्वागतच करता याचे आम्ही saakshi आहोत. दुर्दैवाने माझा उजवा हात जायबंदी असल्याने त्या चर्चेत मी भाग घेऊ शकलो नाही.
ReplyDeleteसर, आरक्षनाचे उद्दिष्ट आहे की वंचित समाजाला शिक्षण आणि शिक्षण प्रसाराच्या प्रवाहात आणणे. परंतू या व्यवस्थेचा कोणालाही त्रास व्हावा अशी घटनेची, बाबासाहेबांची आणि कोणत्याही सुजाण नागरिकाची इच्छा नव्हती- नसावी. पण चित्र उलटे असल्याचे जाणवते. आरक्षण हे एक राजकीय हत्यार आहे हे लवकरच जाणवू लागले आहे. ते सूड बुद्धीने konyaa एका जातिविरुद्ध वापरले जाते आणि वापरले जावे असा काहीतरी पायंडा पडतो आहे. ज्याची झुण्ड अधिक मोठी त्याच्या साठी राखीव जागांचे धोरण अश्या dabaav तंत्राचा वापर होताना दिसतो आहे. आणि आपल्या सारखे समाज हितचिन्तक या विषयी न्याय भूमिका घेणार का असा एक मोठा प्रश्न आहे. कारण आपल्या समोर जाट आन्दोलानाने आणि मराठ्यांच्या आराक्षनाच्या मागाणिने एक भलताच प्रश्न उभा केला आहे. yaapudhe, झुण्डशाहिवर आरक्षण ठरणार का?
आणि ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला- अगदी गरज नसताना केवळ ठरावीक जातित जन्मला म्हणून लाभ मिळाला, अश्या उच्च पदस्थ लोकांनी आता पुढच्या पिढ्यात या संधीचा अजून लाभ 'लूटणे' कितपत योग्य आहे? उदाहरणार्थ, आपले मुंबई विद्यापिठाचे माजी कुलगुरु. ते स्वत:च सांगतात की त्याना दलित जातित जन्माला आल्याचा अजिबात त्रास जाणवला नाही.
आणि नरके सर, मला सांगा, अगदी उच्च वर्णीय लोक हे देखिल जात व्यवस्थेचे शिकार नाही आहेत का हो? पंढरपूरचे बडवे आपल्या पाल्यावर कसले डोम्ब्लाचे 'आधुनिक' शैक्षणिक संस्कार करणार हो? ते तर आपल्या सारखा उच्चशिक्षित आणि सामाजिक जाणिवा प्रखर असलेला बापच योग्य करेल की नाही? मग सांगा, आरक्षण पिढ्या न पिढ्या उपटणे हां आधुनिक ब्राह्मणवादच नाही का?
बाकी या चित्रपटा बद्दल आपले mhanane मला योग्य वाटते. अजून आपला समाज इतका प्रगल्भ नाही. ह्या विषयावर मराठी नाटक आले, तर मला काहीही म्हणायचे नाही; पण हिंदी आणि तोही व्यवसायिक हिंदी सिनेमा नकोच.
8 minutes ago · Like
{वरिल चिन्तनपर प्रतिक्रिया फेसबूकवर श्री.संतोष सराफ यांनी व्यक्त केली आहे.धन्यवाद.तुमचे मुद्दे महत्वाचे आहेत.बोलले पाहिजे.}
ReplyDelete@Narkesir,tumhi abhivyakti swantantryache marekari aahat,ase mhanne manala patat nahi.Parantu maze vyaktigat mat ase ahe ki chitrpat band paadnyapeksha tyat je chukiche aahe te tyacha yogy pratiwad chitrpatachyach madhymatun karta yeu shakel,tyachbarobar lekh lihunahi aaple mhanne mandta yeil. Filmchya promos varun v prakash jha amit bachhan yanchya aajtak la zalelya mulakhativarun tari 'aarakshan'virodhich film aahe,evhade tar kaltech.
ReplyDeleteabout an hour ago · Like · 1 person
Avinash Gaikwad Bhartiy mansiktet hindi chitrpatancha prabhav aahech,hehi nakarun chalnar nahi.
about an hour ago · Like · 2 people
Avinash Gaikwad Evhade matr khare ki ya film la releas chya agodarch bharpur fuktchi prasidhi milali.
about an hour ago · Like · 1 person{by AVINASH GAIKWAD,On facebook.}
Sir, 1ka chitrapatamule 19 koti bahujananch hit prakash zaa yanchyakde janar he manan kitpat sanyuktik ahe.
ReplyDeleteAni khel band padnyachi dhamki dene he kontya sanvidhanat basat.
Chitrapat he abhivyakti swatantrych prabhavi madhyam ahe manun tyadware aarakshan virodhi bolu naye as tumi mhanta ani vr amhi abhivyakti swatantryache puraskarte manta he kitpat sanyuktik ahe.
Ha payanda chukicha ahe. Udya tumi aarakshan virodhi fakt bolayla suddha, magasvargiyanchya ahitach tharvun bandi aanal.
Note- 'mi tumchya 1ka shabdashihi sahamat nai pn tumche mhanane mandnyacha tumcha adhikar abadhit rahava manun mi mareparyant laden'. - Voltaire.
Ya vachanavar maza purn vishwas ahe tyamule kuni mazi jat, varn, varg kadhu naye kiwa tyababt tark karu naye.{by SUNIL CHIVATE,From facebook}
Narke Sir, very enlightening as usual. Thanks for the tag!:)
ReplyDeleteabout an hour ago · Like · 1 person
Ganesh Dighe yach bhumikechi garaj aahe!!
31 minutes ago · Like{by NIYANTA DESHAPANDE & GANESH DIGHE,From facebook.}
बहुजन समाजाने या सिनेमावर बहिष्कार टाकला पाहीजे आणी या सिनेमा विरुद्ध एकजुटीने आंदोलन केले पाहिजे , खोट्या विचारांचा दगड बनून नंतर त्याची भिंत बनण्या अगोदर हे असले छोटे दगड फोडून काढण्याची सवय बहुजन समाजाने लावून घेतली पाहिजे , नाही तर याचे दुष्परिणाम बहुजन समाजाच्या पुढच्या पिढीला भोगावे लागतील याची आठवण बहुजन समाजाने सदैव ठेवावी
ReplyDelete2 hours ago · Like
Bipin Bodhisagar जर आरक्षण चित्रपट थोडा सुद्धा बहुजनांचा विरुद्ध असला तर बहुजन याला सडेतोड उत्तर देईल .
2 hours ago · Like
Bipin Bodhisagar माला वाटते हे लोकं अजून खैरलांजी मुळे झालेला बहुजनाचा उद्रेक विसले वाटतात
about an hour ago · Like
Bipin Bodhisagar जर ह्या ब्राम्हण वाद्यांनी पुन्हा कोणती ही चाल खेळली तर ह्यांना महागात पडेल आणी बहुजन समाज माहारांनी जसे भीमा कोरेगाव ल जशे मराठे कापून काढले होते तशे ब्राम्हण वादी कापून काढू . बहुजनाचा धिराचा बांध फुटायला आता वेळ लागणार नाही ....
about an hour ago · Like
Sumit Bauddh plz anyone can translate it in english /hindi....
about an hour ago · Like
Shantaram Nikam .आरक्षणमुले संवर्नांच्या हातात कोलीत भेटेल हि शंका काही खोटी नाही .अगोदरच मागासवर्गीय शिकून आमच्या जागा हिरावतोय हि त्यांची ओरड आहेच आणखी आरक्षण मध्ये काही मुद्दे त्यांना सापडले तर परत संवर्ण व मागास वर्गीयांमध्ये झगडे लागू शकतील यात वादच नाही .
about an hour ago · Like
Sukh Pal 20 KHARB KA GOLD SAARE MANDIRON ME 3 PERCENT BRAHMAN KE KABJE ME HAI VO 100 PERCENT RESERVATION JHA KO NAHI DIKHTA{ FROM FACEBOOK}
{FIRST COMMENT IS BY BAHUJAN ALL INDIA ..FROM FACEBOOK}
ReplyDeleteघटनेने सामाजिक न्याय अंतर्गत ज्या बाबीं सांगितल्या त्या समजून न घेता काही लोक जातीय अहंकार बाळगून आक्रस्ताळेपणाने लेखन करतात.असे लोकांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे वाटतात.तर्कसुसंगत ,वस्तुनिष्ठ मांडणी करणाऱ्याना भंपक ठरवून कुचेष्टा करणारे लेखन करीत राहतात. सत्य व हित दाखविले तरी त्यांची पारंपारिक संस्कारात वाढलेली मनोवृत्ती दुसऱ्यांना शिव्या घालण्यास उफाळून येते.ते स्वताच्या वर्ग वा जाती गटाचे प्रश्नच महत्वाचे मानतात.दुसऱ्या समाजातील आर्थिक सामाजिक व्यवस्था ,काय आहे.आपण परंपरेने धनिक आणि मानसन्मानाचे वाटेकरी आहोत .या पन्नास वर्षात केवळ न्याय मिळावा म्हणून आरक्षण आले तरी त्यांना ते चुकीचे वाटते.\?माणुसकीचे साधे अधिकार देताना ज्यांना वाईट वाटते त्यांना कसे सांगायचे,हा प्रश्न विवेकाने समजून घेतला पाहिजे आणि दिला पाहिजे, या साठी बुद्धिजीवींनी अभ्यास करून सर्वाना योग्य माहिती द्यावयास हवी.वरील मत योग्य वाटते.{From face book by SUBHASH WAGHMARE}
ReplyDeleteअत्यंत समर्पक लेख आहे. मुळात आपल्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या जो-तो आपापल्या सोयीनुसार करत असतो. त्यामुळे फार मोठे घोटाळे होतात. उच्चवर्णीयांनी काही करायचे म्हंटले तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे ढोल बडवले जातात आणि बहुजन समाजाच्या हिताच्या काही गोष्टी बहुजनांनी मांडल्या तर मात्र जातीयवादाला खतपाणी घालत असल्याचे आरोप होतात.
ReplyDeleteप्रकाश झा यांच्या आरक्षण या चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांचा हेतू प्रामाणिक असेल असे वाटत नाही. त्याला कारण आहे त्यांचे मागील काही चित्रपट. उदा. गंगाजल, अपहरण. या चित्रपटात बिहार मधील सामाजिक, राजकीय परिस्तिथी अतिरंजित आणि भडक स्वरुपात दाखवली आहे. या चित्रपटांचे नायक हे उच्चवर्णीय आणि खलनायक मात्र बहुजन समाजातील आहेत. गंगाजल मधील खलनायक साधू यादव (यादव हे बिहार मधील पशुपालक अहिर आहेत.) दाखवले आहेत. देशाच्या उत्तर भागात ब्राम्हणी वर्चस्व अधिक आहे. त्यामुळे तुलनेने उत्तरेत ब्राम्हणी अत्याचार अधिक झाले. असे असताना अत्याचार करणारे यादव वगैरे बहुजन दाखवायचे ही सनातनी मानसीकता आहे. त्यामुळे आरक्षण या चित्रपटात काही वावगे आणि घटनाविरोधी भाग असेल तर त्याला विरोध आवश्यक आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पोकळ ढोल बडवले बंद केले पाहिजे.
“आरक्षण” प्रश्नी उच्चवर्णीय मानसिकता ?
http://www.sahyadribana.com/2011/07/blog-post_30.html
{BY MAADHUSUDAN PATAKI From face book] }chitrapatat ast te vastavat ast ki vastvat je aste te chtrpatat aste...samaj shana aahe ...konti ghost kiti manavar ghyachi te saglyana samajte...samjaun sangitle ki prashana suru hotat...kay aahe ,kse aahe prateka samjude...
ReplyDeleteJuly 27 at 8:23pm · Like
Sanjay Sonawani It's a fashion now a days that take some contraversial issue and write a book or make a movie or produce drama. Such people dont need to have indepth knowledge of the topic they handle. They just select the topic with all the hopes to infuriate public sentiment in an order to earn money. Jha never have shown any depth in any topic he has handled in his previous movies. His all understanding is superficial and gory. I do not think his movie in any way can make any good impact on society....rather it might divide the society
July 27 at 8:39pm · Unlike · 4 people
Yeshwant Pawar @ sanjay sonawani. You are absolutely right, now this film star are doing your job, but didn't worry they are to small than you so forgive them, they will not do again, because I will tell them that it's the job of sanjay sirji you don't have right, all rights are reserved by SANJAY SONAWANI SIRJI.
Thursday at 12:31am · Like
Devidas Peshave Sadar Chitrapat yenya aadhich tya vishai aandaj bandhane, nidan mala tari chukiche vatate, kahi RPI netyanchi ani vicharvantanchi vidhane pahata kuthetari koni aaple bing tar phodnar nahina aashi dhasti tya madhun janavte, tasech vyaktiswatantryacha purskar jar aapan karat aasu tar sadar chitrapat ha tya digdarshakacha tya goshtikade pahanyacha eak drushtikon aahe aase manayala kay harkat aahe? Arthat tya madhun konatihi aashlaghya bab vyakta hot nasel tarach...
Thursday at 8:36am · Like
Shrikant Barhate I am very worried about the possible contents of this movie. I remember the failed attempt to create a socio-political upheaval at the time of Ramdoss-Venugopal controversy and the then temperament of the mass communication buzz. This half-baked Jha now may come up with a well-enveloped yet conniving substance. Sanjay Sonawani is right in pointing out the abject miasma of ignorance and malignance of social conscience so abundant in some neo-liberals of our society. It is increasingly getting urban in its nature to avoid difficult aspects of socio-political bargaining that are required to keep stability of the societal structure intact. Language of ‘equality’ and ‘competency’ is often paraded to quell the principle of equity. It is not unlikely, by accepting that this apprehension is only based on the historical perspectives and experiences, that a similar sophistry can again be fed to our mentally tired, stale and intellectually inefficient, dishonest elite class.
7 hours ago · Like · 1 person
Hari Narke thanks shrikantjee.well said.
7 hours ago · Like
Rahul Ware आपल्या देशात आरक्षणाच्या विरोधात एक फार मोठा गट सक्रीय आहे....त्याच्यातील (प्रकाश झा) सारखे मंडळी अशे उपद्वयाप करीत असतात......पण आपल्या विरोधामुळे त्यांना आयतीच प्रसिद्धी मिळ्ण्याची शक्यता जास्त आहे ...नाही का..
Censor Board is an autonomous body here too ! Works on well documented set of rules. Credibility of the appointed person ( sometimes) may raise doubt, as like all the autonommous bodies in this country, Member's nomination may be influenced by political groups !{by AABHAS ANAND from facebook}
ReplyDelete{by RAJESHVAR DHARMADHIKARI, from facebook}I like .
ReplyDelete26 minutes ago · Like · 1 person
Ajit Deshpande चित्रपट आणी क्रिकेट हे भारतीय समाजजीवनाचे एक अविभाज्य भाग झाले आहेत. भारतीय प्रेक्षाकामध्ये त्यातील कलाकार आणी खेळाडुचे स्थान हे एकाद्या देवते सारखे आसते हे विचारात घेता एकादा चित्रपट भारतीयांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडत आसतात. मुळात चित्रपट हे मनोरंजन करण्यासाठि आसतात. त्यातुन थोड्याप्रमाणात समाजप्रबोधन होत आसते. त्यामुळे चित्रपटांचा विषय हा वादग्रस्त आसता कामा नये जेणे करुन लोकांच्या भावनांव्दारे फ़क्त निर्मात्यांच्या आर्थिक फ़ायदा होईल आणी समाजिक मालमत्तेचे नुकसान होईल. आरक्षण हा विषय चित्रपटाचा होवु नये . हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही जे देशातील शांतता नष्ट करेल.
18 minutes ago · Like · 2 people
Avinash Gaikwad @ajit deshpande,Aaplyakade khup vishay vadgrast aahet.Tyachyawar +ve bajune vichar hot nahi.Aaplya samaj sudharakanni tyasathi aapli aayushe kharch keli.Chitrpat he prabhavi madhyam aahe,tyacha aapan kasa vapar karto hech mahtwache ahe
2 minutes ago · Like
{from facebook...by THANTHANPAL PARABHANIKAR} sar tumhi evhadhe pareshan hou naka . ha cenema chalavanya sathi sara stant aahe. bhartiy samajat thode vadal uthel 4 divasani sagale shant hoil. cenema karodocha dhanda karel bas.
ReplyDeleteअगदी.......... अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली बहुनांचे विषय रवंथ करण्याची हिम्मत होऊ नये असं प्रतिउत्तर देणे गरजेचं आहे. आम्ही पुण्यात लवकरच विरोध प्रदर्शन करणार आहोत. पुण्यातील मित्राना तसं सविस्तर कळ{FROM FACEBOOK....BY madhukar ramteke}
ReplyDelete{from facebook..by prasad vetal...}so biggggggggggg.....cool
ReplyDelete3 hours ago
Hrishikesh Shirsikar हरी नरके सर्, एक प्रश्न मला विचारायचा होता की साधारणपणे किती काळ लागेल बहुजनांच्या उद्धाराला असे आपणास
वाटते? आणि उद्धार झाला की नाही हे ठरवणार कोण आणि कसे? कारण उद्धार झाला तरी आरक्षणाचे फायदे घेणारे
लोक स्वतःच्या जातीतील इतरांवर अन्याय करतात असे आपणास वाटत नाही काय? यासाठी नॉन-क्रिमी लेयरची जी मर्यादा
आहे (४.५ लाख), ती गरीब लोकांची क्रूर चेष्टा नव्हे काय?
Santosh Iiml shri Machkar didn't understand that we have demanded for screening of movie before its release in a peaceful way...
ReplyDelete8 hours ago · Unlike · 2 people
Manoj Ganvir Jai Bhim ...Thanku Sir...
7 hours ago · Unlike · 2 people
Nitin Patil "Nikhal Swatanyapremi Buddhivadi" honyavachun paryay nahi!
Prakash Pol मुकेश माचकर यांचा लेख वाचला. प्रा. हरी नरके यांच्यावर टिपण्णी करणे आणि झा यांची वकिली करण्यापलीकडे या लेखात काहीही नाही. सामाजिक वास्तवाचा अजिबात विचार केला गेला नाही. प्रसार माध्यमे समाज मत बनवत असतात हे एका जेष्ठ पत्रकाराने नाकारावे याचेच आश्चर्य वाटते.
ReplyDelete