Wednesday, December 3, 2014

संधी चालून येते तेव्हा..

http://epaper.eprahaar.in/#
प्रहार,मुंबई, दि. २९ नोव्हेंबर, २०१४ शनिवार पृ.२
http://prahaar.in/relax/269517
November 29, 2014 03:45:17 AM | Author प्रतीक्षा चौकेकर


टीव्ही इण्डस्ट्रीत आपल्याला काम मिळावं, दिग्गजांबरोबर काम करण्याची संधी आपल्यालाही नशीबी यावी असं स्वप्न या इंडस्ट्रीत येणा-या प्रत्येक नवोदित कलाकाराचं असतं. त्यांना ही संधी मिळते तेव्हा त्यांच्या आयुष्यात काय बदल होतात, हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. पुण्यातून मुंबईत कामाच्या शोधात आलेल्या प्रमीतीला जेव्हा ही संधी मिळते तेव्हा तिचं आयुष्य कसं बदलल याची ही गोष्ट..

pramiti Narake   अभिनयाचं शिक्षण घेतल्यानंतर प्रत्येक कलाकार शोधात असतो तो एका मोठय़ा ब्रेकच्या. काम मिळावं म्हणून हवी तेवढी मेहनत घ्यायला ते तयार होतात आणि जेव्हा अशी मोठी संधी चालून येते तेव्हा त्यांना काय वाटतं ही जाणून घ्यायची उत्सुकता मला होती, त्यातून प्रमीतीचा चेहरा समोर आला. ‘तू माझा सांगाती’ संत तुकाराम आणि आवलीची संसारगाथा या नावानं संत तुकाराम महाराजांच्या संसाराची कथा ई-टीव्हीवर सुरू झाली. संत तुकाराम यांचं नुसतं वारकरी संप्रदायाशीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राशी एक वेगळंच नातं जोडलं आहे. त्यामुळे या मालिकेचा प्रेक्षकवर्गही मोठा आहे.

या मालिकेत आवलीची म्हणजे तुकाराम महाराजांच्या दुस-या पत्नीची भूमिका साकारलीय ती पुण्याच्या प्रमीती नारके हिनं. लहानपणापासून सगळ्याच गोष्टीत पुढे असणा-या प्रमीतीनं आपल्याला मोठं झाल्यावर अभिनेत्री व्हायचं हे पक्क ठरवलं होतं. ती म्हणते ‘लहानपणापासून मला अभिनेत्री बनायचं होतं. कॅमेरासमोर काम करायचं होतं. या क्षेत्रात आल्यावर काम मिळेल की नाही याची खात्री नसते, आणि काम मिळालं तरी याच क्षेत्रात चांगलं करिअर बनेल की नाही याची शाश्वती कोणच देऊ शकत नाही. त्यामुळे माझे बाबा मला सांगायाचे तू यापेक्षा काहीतरी दुसरं करं. पण मला याच क्षेत्रात यायचं होतं त्यामुळे शिक्षण संपल्यानंतर ललीत कला केंद्रातून अभिनयाचं शिक्षण घ्यायला सुरूवात केली.’

दर महिन्याला नवं नाटक बसवं, मोठ मोठय़ा दिग्गजांकडून अभिनयाचे धडे गिरव असं करत करत तीन वर्ष तिची ललीतमध्ये निघून गेली, पण शिक्षण संपल्यानंतर पुढे काय असा प्रश्न तिच्यासमोर होताच यासाठी लवकरात लवकर कामही मिळवायचं होतं म्हणून कमाच्या शोधात पुण्याहून तिनं मोर्चा थेट मुंबईकडे वळवला. मुंबईत आल्यानंतर इतर नवोदितांसारखी पहिली कोणती गोष्ट करायची तर काम शोधायचं हे तिन मनाशी पक्क केलं. ती म्हणते ‘मला काम मिळवायचं होतं, मुंबईत आल्यानंतर मी लगेचच काम शोधायला सुरू केलं. कामाच्या शोधात दिवसातून किमान चार ऑडीशन माझ्या असायच्याच. महिनाभर कामाच्या शोधात मी फार वणवण केलीय. एका महिन्यात मी इतक्या ऑडीशन दिल्यात की त्यांची संख्याही मला आठवत नसेल. एके दिवशी आवलीच्या भूमिकेसाठी ऑडिशन सुरू आहेत असं कळलं आणि तिथे गेल्यावर या भूमिकेसाठी किमान पाचशेच्यावर ऑडीशन झाल्याचं कळलं. आता आपल्याला काही काम मिळणार नाही असं मला वाटलं पण शेवटी हो नाही करत आवलीच्या भूमिकेसाठी मला घेण्यात आलं.’

संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर ही मालिका असल्यानं मालिकेतील कलाकारांचा गोतावळा खूपच मोठा आहे. यात अनेक अनुभवी कलाकार आहेत. या सगळ्या कलाकारांबरोबर काम करण्याची मोठी संधी प्रमीतीकडे आली तेव्हा तिला काय वाटत होतं हे सांगता ती म्हणते ‘माझ्या जोडीला सहकलाकार म्हणून चिन्मय मांडलेकर होता. तो इतका आभ्यासू आहे की त्याच्या सोबत काम करायचं म्हणजे थोडं दडपण होतं, कॅमेरासमोर याआधी मी शॉर्ट फिल्म केल्या होत्या त्यामुळे कॅमेराची भिती नव्हती. पण आपण नवोदित कलाकार त्यामुळे कॅमेरासमोर अभिनय करताना चुकलो तर आपल्यामुळे इतर कलाकारांनाही थांबावं लागणार. त्यांनाही तोच सिन पुन्हा पुन्हा करावा लागणार अशी भिती मला होतं. पण या सगळ्याच कलाकारांनी खूपच सांभाळून घेतलं त्यामुळे काम करताना आणखी मज्जा आली. ’

कलाकारांसोबत काम करताना प्रमीतीनं चिन्मय मांडलेकरचीही खूप स्तुती केली आपल्याला त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली तीही पहिल्याच झटक्यात यासाठी ती स्वत:ला खूपच भाग्यशाली मानते ‘ती म्हणते चिन्मयकडून खूपच शिकण्यासारखं आहे आणि कामाची सुरूवात त्याच्यासोबत करायला मिळणं हे भाग्याच आहे, त्याचं वाचनही इतक अफाट आहे. आमच्यापेक्षा तोच जास्त काम करतो, तरी तो त्या कामातून स्वत:साठी वेळ काढतो. खूप वाचन करतो. दर चार दिवसांनी त्याच्या हातातलं पुस्तक बदलतं आणि आपण मात्र काहीच करत नाही, त्यामुळे थोडी स्वत:ची चिड येते पण नेहमी काही वेगळ शिकायला मिळतं याचा आनंद वाटतो.’

आवलीची भूमिका करताना प्रमीतीला काय अनुभव आले असं विचारल्यावर ती म्हणते ‘मला आवली यांच्याविषयी माहिती आधीपासून वाचण्यात आलं होतं, तुकाराम महाराजांच्या आयुष्यावर जी काही पुस्तक लिहली होती त्या पुस्तकातून जी आवली समोर आली ती एक फटकळ, चिडीचिडी, रागीट अशा काहीशा स्वभावाची होती. पण हे पात्र जेव्हा मी स्वत: करायला घेतलं तेव्हा आवलीविषयी जे काही पूर्वग्रह माझे किंवा इतर लोकांचेही असतील ते एका फटक्यात दूर झाले. तिच्या वागण्याची खरी कारणं काय होती ही त्यानिमित्तानं मला कळली आणि ती लोकांनाही कळतील.’

आवलीची भूमिका साकारताना प्रेक्षकांकडून आलेला एक गंमतीदार किस्साही तिनं सांगितला ती म्हणते ‘टीव्हीवर मी नववारी साडीत आणि पारंपारिक दागिने अशा प्रकारची माझी वेशभूषा दाखवण्यात आली आहे त्यामुळे प्रेक्षकांना मला तसंच बघायची सवय झालीय जेव्हा मी बाहेर फिरायला जाते तेव्हा काहीजण पटकन बोलतात तुम्ही आवली आहात मग नववारी साडीत फिरलं पाहिजे. पण त्यांना कळत नाही मी आवलीची भूमिका फक्त पडद्यावर साकारते ते काम संपल्यानंतर माझं वेगळं आयुष्य सुरू होतं.’

प्रमीतीचा या इण्डस्ट्रीतला प्रवास या मालिकेपासून सुरू झालाय, अर्थात या भूमिकेनंतर तिचे काही वेगळ्या योजना असतील पण पुढे व्यवसायिक नाटक आणि सिनेमा तिला करायचा आहे.
.................................

Tuesday, December 2, 2014

नेमाडेसरांच्या सहवासात


नेमाडे, इंग्रजी शाळा, साहित्य संमेलन आणि मी






हा आठवडा अतिशय संस्मरणीय गेला. कायम आठवत राहिल असा.
महात्मा फुले समता पुरस्कारासाठी डा.भालचंद्र नेमाडेसर पुण्यात आले होते. नेमाडे सर आणि सौ.प्रतिभाताईंच्या समवेत चार दिवस पोटभर गप्पा झाल्या.

 तासभर फुले वाडा दोघांनी फुरसतीने आणि आस्थेने पाहिला. सरांचे वाचन -पुस्तकांचे आणि माणसांचे अतिशय भन्नाट आहे. आरपारच घुसतात. विपर्यास करणारे, कांगावा नी कोल्हेकुई करणारे यांना ते छटाकभरही दखलपात्र मानत नाहीत. जबरदस्त झेप आणि भक्कम आत्मबळ यांचे प्रतिकच.

वाड्यावर दहाबारा वाहिन्या आणि विसेक वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी आलेले. त्यांना सरांशी बोलायचे होते. सर त्यांच्याशी बोलायला फारशे उत्सुक नव्हते. पत्रकार मित्रांनी मला गळ घातली. फक्त पुरस्काराबद्दलच विचारायचे या अटीवर मी सरांना विनंती केली.  पुरस्काराबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करायला सर तयार झाले. सर वाड्यातच त्यांच्याशी उभ्याउभ्या बोलले. अनेकांनी सरांचा बाईट घेतला. पुरस्काराबद्दल सर म्हणाले, "आजवर मला अनेक पुरस्कार मिळाले पण महात्मा फुले यांच्या नावाचा पुरस्कार फुल्यांच्या वाड्यावर त्यांच्या स्मृतीदिनी मिळणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा सन्मान आहे. मी फुलेवादी आहे. फुलेंकडून मला तरूण वयात दिशा आणि उर्जा मिळाली. समाज व्यवस्थेचं फुल्यांनी केलेलं विश्लेषण आम्हाला भारतीय समाजाची रचना समजाऊन घ्यायला कायम मार्गदर्शक ठरलं. जात,वर्ग, स्त्रीवाद यांचं फुल्यांचं आकलन द्रष्टेपणाचं आणि खर्‍या अर्थाने देशाला आधुनिक बनवणारं आहे......" सर भरभरून खूप बोलत होते.

जाता जाता एकाने सरांना साहित्य संमेलनाबद्दल विचारलं. सर म्हणाले, "मी त्या विषयावर बोलणार नाही. त्यावर मी खूप बोललोय.  त्याबद्दल बोलणं म्हणजे केवळ वेळ वाया घालवणं आहे. पुन्हापुन्हा बोलून काय उपयोग होणारेय? हा महामंडळाच्या चार रिकामटेकड्या लोकांचा उद्योग आहे. त्यातून साहित्याचं काहीही भलं होत नाही."

पत्रकार म्हणाले, "पण महात्मा फुल्यांनी साहित्य संमेलनाचं निमंत्रण नाकारलं होतं. तुमचं काय?"
सर म्हणाले, " मीही त्याच मताचा आहे. मी संमेलनाला जातच नाही. मला बोलऊ नका असंच मी त्यांना सांगितलय." सर बोलायला तयार नसतानाही त्यांना छेडलं गेलं. जाताजाता त्यांनी मी याविषयावर का बोलू इच्छित नाही म्हणून नकार देण्याचं कारण सांगताना जे म्हटलं त्यालाच अवास्तव आणि भरमसाठ  प्रसिद्धी दिली गेली. गदारोळ माजवला गेला.

सरांच्या संपूर्ण भाषणात या विषयाला त्यांनी स्पर्शही केलेला नाही. ते उत्स्फुर्तपणे फुल्यांवर बोलले. सामाजिक-सांस्कृतिक प्रश्नांचं त्यांनी विश्लेषण केलं. इंग्रजी शाळा आणि साहित्य संमेलनं यावर या भाषणात ते अवाक्षरही बोललेले नाहीत. तरिही जणु काही ते हे विषय आपल्या भाषणातच  बोलले असा भास निर्माण केला गेला. ही अर्धसत्य आणि अर्धवट पत्रकारिता कोठे चाललीय?

कार्यक्रमानंतर उशीरा आलेले काही वाहिन्या आणि वर्तमानपत्रांचे मित्र मला भेटले.

पुन्हा मागचीच आवृत्ती झाली.एकानं विचारलं,  "मराठी भाषेबद्दल काय सांगाल? इंग्रजी शाळांचं गावोगावी पेव फुटतय, मराठी शाळा बंद पडताहेत यावर उपाय काय?"

यावर सर म्हणाले, " शिक्षण मातृभाषेतूनच झालं पाहिजे. त्यातूनच बुद्धीचा विकास होतो.माणूस मातृभाषेत विचार करतो.त्याला स्वप्नंही आपल्याच भाषेत पडतात. मी भाषाशास्त्रज्ञ आहे. गुलामीच्या मानसिकतेतून इंग्रजीचं स्तोम माजवलं गेलंय. इंग्रजी भाषा शिकायला हवी. माझा तिला विरोध नाही. पण मराठी शाळांमधून उत्तम इंग्रजी शिकवण्याची सोय करा. इंग्रजी शाळांचं गावोगावी पेव फुटतय, मराठी शाळा बंद पडताहेत त्यासाठी प्रसंगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांवर बंदी घाला. मराठीतून शिकलेलेच लोक मोठे झाले.  महाराष्ट्रात इंग्रजी माध्यमातून शिकून श्रेष्ठ शास्त्रज्ञ, लेखक, विचारवंत, नेते झाल्याचं मला एकतरी उदाहरण दाखवा. त्यातून सारे हमाल तयार होतात आयटीतले. इंग्रजी माध्यमात मुलांना घालणं म्हणजे त्यांना पाण्यात बुडऊन मारणं आहे. त्यांची वाढ खुंटते. ते इकडचे ना तिकडचे बनतात. ..........."

बर्‍याच पत्रकारांनी संदर्भ सोडून, विपर्यस्त स्वरूपात सरांना पेश केले. अनेक फेसबुकवीरांनी त्यावर आधारित मुक्ताफळं उधळली. अग्रलेखही  खरडले गेले. नेमाडेंची खिल्ली उडवली गेली. महाराष्ट्र एव्हढा कृतघ्न केव्हा नी कसा बनला?

अनेक वाहिन्यांनी त्यांना यावरच्या चर्चेला निमंत्रित केले. सरांनी सगळ्यांना स्पष्ट नकार दिला. ग्रेट भेटी नाकारणारे नेमाडे या विद्वानांना झेपणारे नाहीत हेच खरे.

नेमाडेसर मला म्हणाले, " बघ, यासाठी मी या लोकांशी बोलत नसतो. ज्यांना मी अनेकदा भेटी नाकारल्यात ते माझ्यावर चवताळणारच ना. जाऊ दे. फुल्यांनी मराठी पत्रकारिता ही "पोटभरू" पत्रकारिता आहे असं तेव्हाच सांगून ठेवलय. साहित्य संमेलन आणि इंग्रजी शाळांचे सारे लाभार्थी लोक नेमाडेंवर तुटून पडलेले, आरडाओरडा नी कांगावा करीत असलेले बघून सर हसत म्हणाले, "यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार? हे एकजात इंग्रजीची गुलाम मनोवृत्ती हाडीमाशी भिनलेले लोक आहेत.

मराठीचा न्यूनगंड असलेले हे पोटार्थी लोक आपण संपूर्ण अदखलपात्र मानले पाहिजेत. त्यांना कसलेही उत्तर देण्याच्या फंदात पडू नकोस. मी फुल्यांबद्दल जे बोल्लो ते फारसे पुढे येऊ नये म्हणुन ते त्याला फाटे फोडतील, शब्दच्छल करतील. विषयांतर नी विपर्यास करतील. ते वाट्टॆल तो कांगावा करतील. हाच यांचा लाडका उद्योग आहे. त्यात त्यांना रमू द्यावं. या विद्वान लोकांना बिच्यार्‍यांना पोटासाठी असलं थोर काहीबाही करावच लागतं.  आपण आपल्या आवडीच्या कामात बुडून जावं."

चला हवा येऊ द्या.

...............................................

Thursday, November 27, 2014

जोतीराव - विनम्र अभिवादन...

२८ नोव्हेंबर २०१४
महात्मा जोतीराव फुले यांचा स्मृतीदिन.

आज त्यांना आपल्यातून जाऊन १२४ वर्षे पूर्ण झाली नी १२५ वे वर्ष लागले. शतकोत्तर रौप्य वर्ष....
हा माणूस काळाच्या एव्हढा पुढे होता की एव्हढी वर्षे झाली तरी त्यांचे विचार कालबाह्य झाले नाहीत, आजही प्रस्तुत आहेत ते.
आयुष्य त्यांचे समर्पित होते, ज्ञानार्जन नी ज्ञाननिर्मिती व ज्ञानप्रसाराला...
हा माणूस झुंजला सार्‍यासार्‍या शोषित वंचितांसाठी....
सामाजिक लोकशाहीची प्रस्थापना हे त्यांचे मिशन होते.
स्त्री-पुरूष समता, जातीनिर्मुलन, संसाधनांचे फेरवाटप, धर्मचिकित्सा, आंतरजातीय विवाह या पंचसुत्रीतला कोणताही कार्यक्रम  बाद झाला नाही,
जसजसा काळ जातोय तसतसा हा माणूस अधिकाधिक समकालीन बनतोय.
विनम्र अभिवादन...

Saturday, November 8, 2014

दिलदार पु.ल.

दिलदार पु.ल.



शाळकरी वयात पुलंच्या साहित्याने मनावर गारूड केलेले होते.

त्यांच्या वाढदिवसाला त्यांना  शुभेच्छा द्यायला त्यांच्या घरी गेलेलो. एव्हढा लहान मुलगा एकटा सायकलवर दुरून आला याचे त्यांना कौतुक वाटलेले. मी बावळटासारखी  त्यांना "हरी नारायण आपटेंची" ’गड आला पण सिंह गेला.  ही कादंबरी भेट द्यायला नेलेली. पुलंनी त्या भेटीचेही बहुधा मला बरं वाटावं म्हणुन छान कौतुक केलं.

म्हणाले, "मुला, अरे तू कितवीत आहेस?"

"चौथी"

"अरे, मीही चौथीत असतानाच पहिली एकांकिका लिहिली होती. ती याच कादंबरीवर आधारित होती. किती छान योगायोग. बरं सांग, तू हेच पुस्तक का निवडलस?"

मी सरळ खरं कारण सांगून टाकलं.

"ही माझी आवडती कादंबरी आहे, नी सध्या सर्वात स्वस्तात मिळणारी एकमेव चांगली कादंबरी आहे, म्हणून मी ती निवडली."

तेव्हा माझा महिन्याचा पगार पाच रूपये होता नी पुस्तकाची किंमत १ रूपया २५ पैसे होती.
पुल दिलदार होते. हजरजबाबी तर होतेच. त्या पहिल्याच भेटीत त्यांनी आपलंसं केलं.

पुढे सतत भेटत राहिलो. पत्रं लिहित राहिलो. ते प्रत्येक पत्राला आवर्जून उत्तर द्यायचे.

भालचंद्र नेमाडे यांनी पुलंवर केलेली टिका मला फार झोंबली होती. मी पुल भक्तच होतो ना!

मी भाईंकडे नेमाडॆंवर खूप चिडून बोललो. म्हटलं, मला नेमाडॆंचा पत्ता द्या. मी त्यांना खरमरीत पत्रं लिहितो.
त्यांनी विचारलं, " तू नेमाडेंचं कायकाय वाचलेयस?"
"काहीच नाही."

" आधी कोसला वाच. मग मी तुला त्यांचा पत्ता देईन."

भाईंची आज्ञा. वाचली कोसला.

केवळ ग्रेट. खूप भाराऊन गेलो.

म्हटलं, "भाई, नेमाडे तर बाप माणूस आहे. एव्हढा मोठा लेखक तुमच्यावर का भडकतो?"

"हे बघ, तू अजून खूप लहान आहेस. थोडा मोठा झालास की कळेल तुला. अरे, मी मध्यमवर्गियांची करमणूक करणारा बरा लेखक आहे. मात्र माझा रोल विदुषकाचा आहे.मात्र  नेमाडे हा मराठीतलाच नव्हे तर जागतिक साहित्यातला अफाट लेखक आहे. त्यांची माझ्यावरची टिका फारशी चुकीची नाही.तू या वादात पडू नकोस. नेमाडेंची साहित्यातली झेप बघ. त्यांची दृष्टी बघ.हे सारं महाराष्ट्राला पुढं नेणारं आहे हे कधीही विसरू नकोस."

"पु.ल". - असा दिलदार "भाई " पुन्हा होणे नाही.
...............................................

Tuesday, November 4, 2014

एबीपी माझा प्रमितीची मुलाखत

एबीपी माझा प्रमिती मुलाखत 

Interview of Pramitee Narke { as Avalee - Jijai - Wife of Saint Tukaram } on ABP Majha, In Remote Majha, at 1.30pm & 5.30pm.. Monday, 3 Nov.2014

{about Marathi Serial "Tu Majha Sangatee" on Life of Saint Tukaram and Avalee _ Jijai, on Etv Marathi. }

एबीपी माझावर प्रमिती नरकेची मुलाखत, { रिमोट माझा } सोमवार, दि. 3 नोव्हें. 2014, रोजी दु.१.३० वाजता आणि सायं.५.३० वाजता.}
"तू माझा सांगाती" या
 आवली उर्फ जिजाई आणि संत तुकाराम यांची संसारगाथा साकारणार्‍या मालिकेतील आवलीची भुमिका प्रमिती नरके करीत असून, या मालिकेच्या प्रवासाबाबत प्रमितीची मुलाखत....

Monday, November 3, 2014

सदाशिव अमरापूरकर

सदाशिव अमरापूरकर हे सामाजिक प्रश्नांवर पोटतिडकीने बोलणारे कलावंत होते. कार्यकर्त्यांना मदतीचा हात  मिळावा यासाठी स्थापन करण्यात आलेल्या "सामाजिक कृतज्ञता निधी" ची संकल्पना कृतीशीलपणे उचलून धरणारा आणि गेली २५-३० वर्षे सामाजिक चळवळींची पाठराखण करणारा मित्र चळवळींनी गमावला आहे.
अमरापूरकर "अर्धसत्य" मधील भुमिकेने प्रकाशझोतात आले. त्यांची कन्यादान मधील कामगिरी लक्षणीय होती. मात्र त्यांच्या हिंदी चित्रपटातील नंतरच्या बहुतेक खलनायिकी भुमिका बर्‍याचशा एकसाची आणि भडक होत्या.
सामाजिक प्रबोधनासाठी उभ्या राहिलेल्या "लोकशाही प्रबोधन मंचा" च्या निमित्ताने अमरापूरकरांशी जवळून संबंध आला. औरंगाबाद, नगर, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, राजापूर ते मुंबई अशा दौर्‍यात गावोगाव लोकशाही बचाव च्या भुमिकेतून आम्ही मांडणी करण्यासाठी फिरलो होतो.
डा.श्रीराम लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर, डा. नरेंद्र दाभोळकर यांच्या टिममध्ये मी सर्वात ज्युनियर आणि बडबड्या. प्रवासात अमरापूरकर मला त्यांच्या कारमध्ये घ्यायचे. अतोनात गप्पा व्हायच्या. अनेक प्रश्नांवरील भुमिका त्यांना समजाऊन घ्यायच्या असायच्या. प्रसिद्धीच्या झोतात असलेला हा रंगकर्मी माझ्यासारख्याशीही अतिशय जिव्हाळ्याने गप्पा मारायचा. अनेक मुद्दे टिपून घेऊन त्यांचा ते भाषणात वापर करायचे. भाषणात सतत नवा कंटेंट असावा यासाठी ते प्रयत्नशील असायचे.
प्रसिद्धीचे अफाट वलय असूनही त्यांचे पाय कायम मातीत घट्ट रुजलेलेच राहिले.
सुमारे दहा दिवसांचा तो दौरा अविस्मरणीय होता. मी सभेचा पहिला वक्ता असायचो. डा.लागू सर्वात शेवटी बोलायचे. डा.लागू, निळूभाऊ आणि अमरापूरकरांना बघायला तुफान गर्दी व्हायची. सभेनंतर झोळी फिरवली जायची. कार्यक्रमाच्या खर्चासाठी सभेला आलेल्या लोकांकडूनच निधी मागितला जायचा. ते न लाजता झोळी फिरवायचे.लोक भरभरून मदत करायचे. डा. दाभोलकर आमचे व्यवस्थापक होते.
रात्री मुक्कामी सगळे एकत्र जेवायचो, गप्पांचे फड रंगायचे.
खरेच तो प्रवास किती सुंदर होता!...
त्यांनी अहमदनगरला अ.भा.मराठी नाट्यसंमेलन घेतले. त्यांनी मला अगत्याने निमंत्रित केले. परिसंवादात बोलायला लावले. महात्मा फुले हे मराठीचे पहिले आधुनिक नाटककार असल्याचे आम्ही याच नाट्यसंमेलनात आवर्जून मांडले. ते पुढे रुजले. अमरापूरकरांचा त्याकामी आग्रह आणि पुढाकार होता.
पुढे त्यांची कायम भेट होई. भरभरून बोलत. विचारपूस करीत.
एक जवळचा मार्गदर्शक आणि हितचिंतक गेल्याचे अपार दु:ख आहे.
विनम्र श्रद्धांजली.

Wednesday, October 22, 2014

फटाके : आनंद व्यक्त करण्याची अघोरी पद्धत.

फटाके : आनंद व्यक्त करण्याची अघोरी, अडाणी आणि असंस्कृत पद्धत.

आमच्या कुटुंबात गेली ५० वर्षे आधी गरिबीमुळे फटाके खरेदी करणे परवडत नाही म्हणून आणि नंतर परवडत असूनही विचारपुर्वक वरिल कारणांमुळे फटाक्यांवर बहिष्कार घालण्यात आलेला आहे.
..................................................................

मला फटाक्यांची चीड आहे. कानठळ्या बसवणारा तो गलिच्छ आवाज नको म्हणून गेली अनेक वर्षे आम्ही दिवाळीत शहरात राहणे टाळतो.

ध्वनी आणि हवेचे भयंकर प्रदुषण करणारे फटाके, उडऊन झाल्यानंतर परिसराचा अक्षरश: उकीरडा बनऊन टाकतात. एरव्ही स्वच्छतेबद्दल दक्ष असलेले महानगरी सुशिक्षित लोक फटाक्यांमुळे आपण परिसर अस्वच्छ केलाय तर तो आपणच साफ करायला हवा हे मात्र विसरतात. अशी साफसफाई करणारी एकही व्यक्ती मी गेल्या ५० वर्षात पाहिलेली नाही.याचा अर्थ फटाके उडवणारे सगळेच लोक बेजबाबदार आणि क्रूर असतात.

दुसर्‍यांना त्रास देऊन ज्यांना आनंद मिळतो ते समाजविघातक लोक होत. सर्व प्रकारचा शांतताभंग करणार्‍या नी भयावह प्रदुषणकारी फटाक्यांवर तात्काळ बंदीच घालायला हवी.

फटाक्यांच्या कारखान्यात बालमजुरांना राबऊन घेतले जाते.

आपल्या श्रीमंतीचे नागडेउघडे आणि बिभत्स प्रदर्शन करण्यासाठी मोठमोठे फटाके उडवले जातात.

त्यातून गरिबांनाही परवडत नसले तरी प्रसंगी कर्ज काढून फटाके खरेदी करावे लागतात.

संगित, नाट्य, साहित्य, दिवाळी अंक, फराळ, पर्यटन, खरेदी, सजावट, आकाश कंदील,रांगोळ्या आदी दीपोत्सवाच्या आनंदाचे अनेकानेक मार्ग असताना जे आनंद  व्यक्त करण्याची ही अघोरी, अडाणी आणि असंस्कृत पद्धत वापरतात त्यांची मला चीड येते.

आमच्या कुटुंबात गेली ५० वर्षे आधी गरिबीमुळे फटाके खरेदी करणे परवडत नाही म्हणून आणि नंतर परवडत असूनही विचारपुर्वक वरिल कारणांमुळे फटाक्यांवर बहिष्कार घालण्यात आलेला आहे.

मला फटाके वाजवणारे लोक आवडत नाहीत. जसे मला समाजविघातक लोक आवडत नाहीत.

फटाक्यांना मिळणारी प्रतिष्ठा नष्ट झाल्याशिवाय हे फटाक्यांचे गलिच्छ आकर्षण समाजातून हद्दपार होणार नाही.

फटाके हे दिवाळीचा आनंद नासवणारे भयंकर विषाणू हद्दपार करूया.

दिवाळीचा आनंद द्विगुणीत करू या.

एकाच कुटुंबातील तिघांची हत्या,

................................................http://epaper.esakal.com/sakal/22Oct2014/Enlarge/Ahmednagar/index.htm

पाथर्डीत एकाच कुटुंबातील तिघांची हत्या, मृतदेहाचे तुकडे करून विहीरीत टाकले

जवखेडे खालसा, ता.पाथर्डी जि.अहमदनगर येथे गवंडीकाम करणारे संजय जगन्नाथ जाधव {वय ४५}पत्नी जयश्री आणि मुंबईत शिकणारा मुलगा सुनिल या तिघांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आलेली आहे. त्यांच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करून ते विहीरीत टाकून देण्यात आलेले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील सोनई, खर्डा आणि आता जवखेडे अशा एकाच प्रकारच्या घटना वारंवार का घडत आहेत?

१.पोलीस आणि प्रशासनाची जरब राहिलेली नाही. किंबहुना त्यांच्या संरक्षणात अशा घटना घडत आहेत काय?

२.जातीयवादी राज्यकर्त्यांचे अभय मिळालेली मंडळी ही हत्याकांडे करीत आहेत काय?

३.सरंजामदारी मानसिकतेला बळ देणार्‍या जातीय संघटनांची ढाल पाठीशी असल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत काय?

४. सहकारातून आलेली संपन्नता जातीय मानसिकतेला खतपाणी घालीत आहे काय?

५. ह्या केवळ सुट्या घटना नाहीत.जातीय दंगल जेव्हा  होते तेव्हा त्यामागे आग अनेक महिने धुमसत असते नी प्रासंगिक कारणाने ती पेट घेते तशीच जातीय विषवल्ली - जातीय अहंकार, दलितांविषयीचा तिरस्कार यांचे खदखदणारे रसायन नगर जिल्ह्यात कोठून आले आहे याची पाळेमुळे शोधली जायला हवीत.

घटना घडल्यानंतर चार दिवस चर्चा आणि नंतर सारे शांतशांत असे करून चालणार नाही.

संपूर्ण नगर जिल्हाच जातीय अत्याचारग्रस्त अतिसंवेदनशील जिल्हा म्हणून घोषित करून तेथील पोलीस आणि प्रशासनावर जबाबदारी निश्चित करायला हवीय का?

कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवली जायला हवी.

महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेला काळीमा फासणार्‍या या मानसिकतेचा तीव्र धिक्कार..

Monday, October 20, 2014

उग्र आणि मुजोर जातीयवादाला चपराक?


सर्वप्रथम मी या सत्तांतराचे जाहीरपणे स्वागत करतो. विजयी मंडळींचे अभिनंदन करतो आणि पराभुतांचे सांत्वन करतो.

राज्याच्या सत्तेचा चेहरा बदलतोय. तो अधिक सर्वसमावेशक होतोय. बहुजनवादाचा बुरखा घालून पेरलेला  उग्र आणि मुजोर  सत्ताधारी जातीयवाद पराभवाच्या दिशेने जाताना दिसतोय. काही मस्तवाल नी जातीयवादी नेत्यांना लोकांनी नाकारले आहे. नवे जागृत मतदार तयार होत आहेत. आम्हाला गृहीत धरणे आणि विद्वेषासाठी वापरून घेणे गेले ५०वर्षे चालूये, ते  आम्ही यापुढे खपऊन घेणार नाही, असे सांगत विद्यमान जातीय मतब्यांकांना भगदाडे पडत आहेत.

पैसा, पेड माध्यमांचा उपयोग करणे, "नोटा"चा वापर, हे वाढत आहेत. मतदारांनी निर्धार केला तर काही मुजोर जातीयवादी असे सरदार, मनसबदार, जहागिरदार, पाटील, देशमुख आणि संस्थानिक पराभूतही होऊ शकतात. पर्याय असेल तर मतदार नक्की तिकडे वळतात, असे राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या  निकालातून स्पष्ट होते असे मला वाटते.

सत्यशोधक चळवळीच्या पुण्याईवर महाराष्ट्राचा सामाजिक चेहरामोहरा बदलला गेला. त्याचेही एक समाजशास्त्रीय महत्व जरूर होते. मात्र लवकरच निवडणुकीच्या तंत्रावर पकड मिळवलेल्या सत्ताधारी, उग्र आणि मुजोर  जातीयवादी टोळ्यांनी  बहुजनवादाचा मूळ विचार आणि सामाजिक ध्येयवाद  बाजूला ठेऊन शिवछत्रपती आणि  फुले-शाहू-आंबेडकर यांचे केवळ नामस्मरण करीत वाटचाल सुरू केली. त्यांना या महापुरूषांच्या  विचारधारेशी काहीही देणेघेणे नव्हते. वापर तेव्हढा करायचा होता. ही केवळ तोंडपाटीलकी होती.

त्यातून सत्तेचा पाया आकुंचित झाला. एकजातीय चेहरा आक्रमक बनू लागला. पण हे लोक चतूर असल्याने त्यांनी चोराच्या उलट्या बोंबा या न्यायाने विरोधी छावणीच जातीयवादी असल्याचा जोरदार डांगोरा पिटला. राज्यात तीनचार समाजाच्याच संघटित मतब्यांका होत्या. त्याच्या जोरावर कधी त्यात युतीच्या नावावर आघाडी नी आघाडीच्या नावावर युती करण्यात आली नी सत्तेच्या चाव्या नी तिजोर्‍या कब्ज्यात ठेवण्यात आल्या.

१९८० च्या दशकात प्रथमच नव्या जाणीवांचा मतदार तयार होऊ लागला. १९९५ ला त्याचा परिणामही दिसला. पण त्याला अवघ्या ५ वर्षात कोप्च्यात ढकलण्यात जुनेजाणते यशस्वी झाले. त्यानंतर  गेल्या १५ वर्षात राज्य ज्या दिशेने जात होते ती नवी मोगलाईच होती.

या निवडणुकीत जाहीरपणे  विदर्भातील काही नेत्यांची नावे घेऊन राज्य "त्यांच्या" ताब्यात देणार काय? अशी उग्र जातीयवादी मांडणी केली गेली. तिला मतदारांनी धुडकाऊन लावले हे बरे झाले. बाबा-दादा-आबा परत आले असले तरी ते मतदारांनी दिलेल्या या फटकार्‍याचा गर्भित अर्थ समजू शकतील काय?

राज्यातील स्वत:ला पुरोगामी/परिवर्तनवादी म्हणवणार्‍या अनेक पढीक पंडीतांना राज्यातील सामान्य मतदारांना जे दिसते ते अजुनही दिसत नाही. हे महाभाग आजही १८१८ ते १९६० याच काळात वावरत आहेत. ते ज्यांना जातीयवादी म्हणून ठोकीत आहेत ते समावेशक बनलेत  नी ज्यांना पुरोगामी म्हणून  ते डोक्यावर मिरवीत आहेत ते जातीयवाद्यांचे आश्रयदाते नी पोशिंदे बनलेले आहेत.

 राज्याची शिक्षण, माध्यमे, प्रशासन, राजकारण या सगळ्यांची सुत्रे आज ज्यांच्या हातात एकवटली आहेत ते जेव्हा उघड नी जहरी जातीयवादाचे प्रवक्ते बनतात तेव्हा संतुलन ढासळते आणि मग परिवर्तन अटळ बनते. तथापि या परिवर्तनाचे आकलन करण्याची क्षमता विद्यमान तथाकथित पुरोगाम्यांकडे आहे काय? याचे उत्तर लवकरच मिळेल.

 मी या सत्तांतराचे जाहीरपणे स्वागत करतो.

Thursday, October 16, 2014

नमोभक्त आणि नमोरुग्ण




"मतदान करा" असे सांगणार्‍या मोहीमा जोरदारपणे चालवूनही सुमारे ६५ % मतदान झाले. हे प्रमाण खरेतर सरासरी ९०% ते ९५ %  पर्यंत जायला हवे. लोक मतदान का करीत नाहीत?

राजकारणाविषयीची तुच्छताबुद्धी, नेत्यांच्या दांभिकतेची लोकांना असलेली चिड आणि पैशाचा महापूर बघून आलेली किळस यातून  जो तिरस्कार मनात साकळतो त्यामुळे मतदान कमी होते का?

आपला देश विभुतीपुजकांचा देश आहे. लोकशाही जरी आपल्याकडे रूजली असली तरी आजही लोकांना एकखांबी तंबूचे जबरदस्त आकर्षण वाटत असते. त्यामुळेच नमोभक्त आणि नमोरुग्ण यांची संख्या खूप मोठी आहे.

आधींच्याबद्दलचा तिटकारा {प्रस्थापित विरोधी जनमत} आणि आक्रमक बाजाराच्या तालावर चालवली गेलेली प्रचारमोहीम यात कोणकोण बाजी मारतेय ते बघायचे.

अभय बंग म्हणाले तसा आता विचारधारेचा फरक हा पाचही प्रमुख पक्षांमध्ये केवळ तोंडी लावण्यापुरताच उरलेला असल्याने आणि निवडणुका लढवणे हे आता केवळ कोट्याधिशांनाच शक्य असल्याने आता फंडे फक्त सत्तेचे ...आणि सत्तेचे...
भाकरी फिरवली जाणार हे चंगलेच म्हणायचे.

Monday, October 13, 2014

Pramitee in "Tu Majha Sangatee" - as Awalee

Alok Jatratkar
1 hr · Kolhapur · 
First look of Pramitee Narke as Awlee in "Tu Majha Sangatee" on Life of Sant Tukaram, Serial on E tv Marathi. From Today at 7.30pm...Proud of you Dear. Congratulations to you and your proud parents Hari Narke and Sangita Narke.....Alok Jatratkar



प्रमिती आवलीच्या भुमिकेत

आज सोमवार दि.१३ आक्टोबरपासून, सायंकाळी ७.३० वाजता, ई टिव्ही मराठीवर,
प्रमिती आवलीच्या भुमिकेत


                                           {महाराष्ट्र टाइम्स, मुंबई, दि.१३ आक्टो.२०१४}


संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि त्यांच्या पत्नी आवली उर्फ जिजाबाई यांची संसारगाथा  "तू माझा सांगाती " सध्या ई टिव्ही मराठीवर दररोज सायं. ७.३० वा.सादर  केली जात आहे.. या अतिशय लोकप्रिय असलेल्या  मालिकेत चिन्मय मांडलेकर या गुणी अभिनेत्याने संत तुकाराम साकार केले असून छोट्या आवलीची भुमिका मृण्मयी सुपाळने केली होती. माझी मुलगी प्रमिती हिची यातल्या मोठ्या आवलीच्या भुमिकेसाठी निवड झाली आहे. तिची छोट्या पडद्यावरची ही पहिलीच भुमिका आहे. पुणे विद्यापिठाच्या ललित कला केंद्रामधून  {नाटयशास्त्र} अभिनयाची पदवी सुवर्णपदकासह प्राप्त केल्यानंतर प्रमिती आज तिच्या करियरला सुरूवात करीत आहे. आपल्या शुभेच्छा आणि आशिर्वाद यांची आवश्यकता आहे.

मालिका दिग्दर्शक आणि निर्माता -- संगीत कुलकर्णी.
संशोधन : उन्मेश अमृते
कथा -- ज्योती सागर.
पटकथा - शिरीष लाटकर.
संवाद : दिग्पाल लांजेकर
संगितकार -- अशोक पत्की.
कला दिग्दर्शक  -- अजित दांडेकर.
क्यामेरा - हर्षल शिपोस्कर
का. निर्माता : सिद्धार्थ नाचणे

आज सायं. ७.३० वा. प्रमितीचा सहभाग असलेला पहिला भाग  दाखवला जाईल.

पुनरप्रक्षेपण : रात्री १०.३०वा., सकाळी ७ वा., सकाळी ९ वा., दुपारी ३.३०वा., आणि सायं.५.३० वाजता
आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत..
........................................

{कात्रण: महाराष्ट्र टाइम्स, मुंबई, दि.१३ आक्टो.२०१४}

Sunday, October 12, 2014

हेच का लोकशिक्षण?






  मतदानाचा अधिकार कोणाकोणाला असावा यावर स्वातंत्र्यानंतर फार मोठी चर्चा झालेली होती. ब्रिटीश सरकारने आयकर भरणारे, पदवीधर आणि राजे महाराजे अशा मर्यादित लोकांनाच मताधिकार दिलेला होता. त्या पार्श्वभुमीवर काहींना असे वाटत होते की, फक्त सुशिक्षितांनाच मताचा अधिकार असावा. याऊलट डा. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आदींचा आग्रह होता की सर्व प्रौढांना मताधिकार असावा. त्यावर त्यांचा समर्थनपर युक्तीवाद असा होता की, निवडणुकांच्या माध्यमातून ज्या प्रचारसभा होतील त्यातून होणार्‍या महाचर्चांमधून लोकशिक्षण - लोकप्रबोधन होईल. या शिक्षणापासून कोणीही भारतीय वंचित असता कामा नये. मतदार यादीत ज्याचे नाव त्याचे देशाच्या सातबार्‍यावर नाव. तोतो - तीती देशाची मालक. स्वातंत्र्यकाळी देशात अवघी १२ टक्के साक्षरता होती. आज ती देशात ७५ नी राज्यात ८५ टक्क्यांच्या पुढे गेलीय. 

प्रत्यक्ष प्रचार सभा, प्रसारमाध्यमे आणि सोशल मिडीया  यातून या निवडणुकीत जो जंगी बार उडवून देण्यात आलाय त्याला लोकशिक्षण म्हणता येईल?

प्रचाराच्या या घसरलेल्या दर्ज्याला जबाबदार कोण?

परस्परांवर बेलगाम आरोप करणे, अतिशय बेछूट बोलणे, समोरच्यांचे सगळेच श्रेय नाकारणे, आपण नी आपला पक्ष तेव्हढे सर्वगुणसंपन्न असल्याचा डांगोरा पिटणे यात कोणीच मागे नाहीत. नेते आणि पक्ष जनतेला गृहीत धरीत आहेत किंवा ते सराईतपणे जनतेला बेवकुफ बनवीत आहेत असे काहींना वाटते. जयललिता, येडी युरप्पा, लालूप्रसाद ही देशपातळीवरील उदाहरणे बघितली तर भ्रष्टाचार नी गुन्हेगारी यात कोण अडकला यापेक्षा तो आमच्या पक्षातील की आमच्या विरोधकांच्या पक्षातील यावर सगळ्यांच्याच प्रतिक्रिया बेतलेल्या असतात. सारेच पक्ष आणि नेते सत्तेसाठी आटापिटा करणारे. त्यासाठी सगळी साधनसुचिता खुंटीला अडकऊन ठेवलेले. वर आपदधर्म म्हणुन त्याचे निर्लज्यपणे समर्थन करायलाही अजिबात न कचरणारे.

सगळेच उन्मादाचे पुरस्कर्ते. सगळेच पक्षांतराचे समर्थक. पैसा, निर्ढावलेपणा, खोटे बोल पण रेटून बोल, तोंडी लावायला विकास, सेक्युलरवाद, सुशासन, महागाई, भ्रष्टाचार निर्मुलन असले डायलो‘ग्ज...

 आज तुरूंगात असलेल्यांना किंवा जामीनावर सुटलेल्यांना सर्वांनीच तिकीटे दिलेली आहेत. सगळेच कोट्याधीश.  या निवडणुकीत पैशाचा वाहणारा महापूर बघता या निवडणुका म्हणजे उघडपणे पैशाचा खेळ होय हे सांगायला कोणीही कचरत नाही. माध्यमांवर पेडन्यूज आणि पे‘केजचे सरसकट आरोप होत आहेत आणि त्याचे खंडन करण्याएव्हढे बळही कोणात नाही.

राज्यात आजही ४५ लक्ष कुटुंबे दारिद्र्य रेषेखालचे जीवन जगतात.त्यातली २४ लक्ष कुटूंबे बेघर आहेत. ते आणि आर्थिक स्थिती बरी किंवा सधन असणार्‍या मतदारांच्या वतीने असे युक्तीवाद केले जातात की निवडणुका जिंकणारे जर किफायतशीर गुंतवणूक म्हणून या खेळात उतरलेत तर मग त्या नफ्याचा काही हिस्सा आपल्याला आधीच मिळाला तर त्यात वावगे काय?

 परवा रस्त्याने जाताना सहज कानावर पडले,एकजण मोबाईल वर दुसर्‍याला सांगत होता,  " अहो, हे कलीयुग आहे. खाल्ले दोन पैसे तर काय बिघडले? आज कोण खात नाही? सारेच चोर आहेत असे उगीच कशाला म्हणायचे? असली गांधीबाबा आपला. त्याला जे जे जवळ करतील ते ते आपले. खा. खाऊ द्या. सगळे शेवटी पैशासाठीच जगतात ना?"

एकुण काय तर आपल्या वाट्याला आलेली भुमिका आपण खरी वाटेल अशा ताकदीने निभवायची अशा तयारीचे देशात १२५ कोटी आणि राज्यात १२ कोटी कसलेले अभिनेते आणि अभिनेत्री आहेत....


Thursday, October 2, 2014

‘त्यांच्या’साठी कोणता कार्यक्रम?

   
>> प्रतिमा जोशी 
पंतप्रधान मोदींच्या, 'देशानं गांधींना काय दिलं?' या प्रश्नाचं आजवर काही प्रमाणात विशिष्ट समाजघटकांनी दिलेलं उत्तर 'कुचेष्टा' हेच असल्याचं दिसतं. 

आपल्या भाषणातील म. गांधींच्या गौरवपूर्ण उल्लेखापेक्षाही शारीर हत्येनंतरसुद्धा त्यांची कणाकणानं हत्या करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता कार्यक्रम देणार आहेत, हा कळीचा प्रश्न आहे! 
...............................................................

आपल्या भाषणातील म. गांधींच्या गौरवपूर्ण उल्लेखापेक्षाही शारीर हत्येनंतरसुद्धा त्यांची कणाकणानं हत्या करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता कार्यक्रम देणार आहेत, हा कळीचा प्रश्न आहे!

मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील २० हजार भारतीयांसमोर हिंदीतून केलेलं भाषण हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सफल अमेरिका दौऱ्यातील परमोच्च बिंदू होता. ओघवत्या हिंदीतील लयबद्ध भाषण आणि सभागृहांतून त्याला मिळणारा उत्तेजित प्रतिसाद पाहून कित्येकांना स्वामी विवेकानंदांच्या शिकागो येथील धर्मसंसदेतील सुप्रसिद्ध भाषणाची आठवण झाली आ​णि 'त्या नरेंद्रानंतर या नरेंद्राने ओजस्वी वाणीने अमेरिका जिंकली' अशी भावना व्यक्त होऊ लागली. फरक इतकाच होता, की शिकागो येथे जगभरातील विविध वंशांचे व धर्मांचे नागरिक आले होते, तर मोदींसमोरील सर्वच श्रोते अनिवासी असले, तरी भारतीय होते आणि मोदींशी स्पर्धा करणारा दुसरा कोणीही वक्ता नव्हता.

या भाषणात अनेक मुद्द्यांना पंतप्रधानांनी हात घातला असला, तरी त्याचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे सुमारे ८० ते ९० मिनिटांच्या या भाषणात त्यांनी तब्बल तीन वेळा म. गांधी यांचा उल्लेख केला. स्वातंत्र्यलढा गांधींनी कसा सामान्यांच्या आंदोलनात परिवर्तित केला होता यावर पंतप्रधानांनी भर दिला. हातात कसलंही हत्यार नसलेला साधा माणूसही स्वातंत्र्ययोद्धा होऊ शकतो हा विचार गांधींनी भारताला दिला अशा आशयाचं वक्तव्य करताना तळमळीनं शिकवणारा शिक्षक, नेकीनं सफाई करणारा कामगार, खादीचेच कपडे वापरीन असा निश्चय करणारे सामान्यजन यांनाही स्वातंत्र्याच्या लढाईत आपलाही याद्वारे सहभाग आहे असे कसे वाटत असे याबद्दल ते बोलले. भारत 'गंदगीमुक्त' करण्यासाठी आपणही असं व्यापक आंदोलन उभारू इच्छित असल्याचं ते म्हणाले. इतकंच नव्हे, तर गांधींनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं, आपण त्यांना काय दिलं? असा प्रश्नही श्रोत्यांना विचारला.

म. गांधींचा शस्त्रविहीन परिवर्तनाचा मार्ग, अहिंसेचं तत्वज्ञान, सहिष्णुतेचा आणि सत्याचा आग्रह हा भारतीय जनतेला आणि जगातील अब्जावधी संवेदनशील माणसांना लढ्याचा अद्भूत मार्ग वाटत आला असला, तरी या मार्गाची खिल्ली उडवणारे असंख्य भारतीय स्वातंत्र्यानंतरच्या दुसऱ्या पिढीपासूनच मोठ्या आवाजात बोलू लागले होते. गांधी हा देशावरील आणि हिंदू धर्मावरील कलंक आहे अशा भावनेने त्यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे यांना इतिहासाचे नायकत्व बहाल करण्याची धडपड एका गोटातून सातत्याने गेली ६० वर्षे केली जात आहे आणि त्याला गांधीद्वेषाची भरघोस फळेही आलेली दिसत आाहेत. जे आपल्याला अमान्य आहे, पटत नाही, शत्रुवत भासते ते गोळ्या घालून नष्टच केले पाहिजे या भावनेच्या पगड्याखाली गांधीहत्येचे समर्थन करणाऱ्या वर्गाची १९४७च्या दरम्यान असलेली गंगोत्री आज विस्तीर्ण आणि खोल पात्रात रूपांतरीत झाली आहे नि त्यात निर्माण झालेल्या काळ्याशार डोहांमध्ये विखारी मनोवृत्तीची जलपर्णी फोफावली आहे. इतकी, की या पाण्यातला प्राणवायूच संपुष्टात आल्याची भयशंका मनात आल्यावाचून राहत नाही. देशाची फाळणी, पाकिस्तानची निर्मिती, ही जणू गांधींचीच इच्छा किंवा खरं तर कटकारस्थान (पर्यायाने मुसलमानांचे लांगुलचालन) असल्याचा प्रचार करत त्यांना फाळणीचे गुन्हेगार ठरवले गेले.

हा इतिहास उगाळण्याचा प्रश्न नाही; तर या पार्श्वभूमीवर तयार झालेली देशातील बहुसंख्यांची, विशेषतः २० वर्षांपूर्वीच्या उदारीकरण नि जागतिकीकरणामुळे ज्यांचे कल्पनातीत भले झाले अशा वर्गाची वर्तमान मनोभूमिका ही प्रामुख्यानं भारतीय चलनावरील गांधीजींच्या चित्राविषयीच आस्था असणारी आहे, एरव्ही गांधींनी या देशाला काय दिलं असाच प्रश्न ते विचारताना दिसतात. इतकंच नाही, तर पंतप्रधान मोदींनी ज्या 'आंदोलना'चा गौरवानं उल्लेख केला, ती भ्याडांची अहिंसा असल्याचे शेरे मारत स्वातंत्र्यप्राप्तीचं श्रेयही ते गांधींना द्यायला तयार नाहीत. लढे, आंदोलनं वगैरे सैनिकांची किंवा लोकोत्तर व्यक्तींची बाब आहे, आपण सामान्य माणसं, आपण काय करणार, या विचारापासून प्रतीकात्मक कार्यक्रमांद्वारे देशातल्या कोट्यवधी माणसांची मुक्तता करून कोट्यवधी जनता स्वतःच कशी शस्त्र बनू शकते ते सप्रमाण सिद्ध केलेल्या या नेत्याचं अस्पृश्य समाजासंदर्भातील अपराधी भावनेनं उद्गारलेलं, 'एका गालावर मारलं, तर दुसरा पुढे करायला हवा' हे वाक्य अपभ्रंश करत, संदर्भहीन करत टवाळीसारखं वापरलं गेलं. ज्याच्या सार्वजनिक आयुष्याची सुरुवातच आणि पुढे अख्खी हयातच परकीय इंग्रजांना हाकलून देण्यासाठी कामी आली, त्यानं देशाला फक्त खजूर, बकरीचं दूध, चरखा इतकंच दिलं... फारफार तर सफाईचा झाडू प्रतिष्ठित केला असा प्रचार गेली पन्नाससाठ वर्षं खुबीनं केला गेला, स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पिढीच्या गळी पद्धतशीर उतरवला गेला. गांधींचे 'सत्याचे प्रयोग' म्हणजे वासनेनं माखलेले रंगिले चाळे असा विकृत प्रचारही बिनदिक्कत केला गेला आहे. आताचं युग टेक्नॉलॉजीचं, सोशल मीडियाचं आहे. महिलांबरोबर नृत्य करतानाचे किंवा त्याहून अश्लील असे मॉर्फिंग केलेले, फोटोशॉप केलेले गांधींचे फोटो कुचाळक्या करणाऱ्या पोस्टसह नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीआधी काही महिने सोशल मीडियावर कसे फिरले आणि त्यावर फाजील कमेंट्सही कशा शेकडोंनी केल्या गेल्या हे लक्षात घेतलं तर अपभ्रंश, विकृतीकरण, अपसमज हे शब्दही फिके वाटू लागतील. पंतप्रधान मोदींच्या, 'देशानं गांधींना काय दिलं?' या प्रश्नाचं आजवर काही प्रमाणात विशिष्ट समाजघटकांनी दिलेलं उत्तर 'कुचेष्टा' हेच असल्याचं दिसतं.

स्वातंत्र्यानंतर गांधींच्या वाट्याला आलेले शल्य असे की, जी जनता या कुचेष्टेच्या परीघात नाही, तिलाही गांधींचा आपमतलबी जप करणाऱ्यांमुळं गांधी फारसे आपले वाटू शकले नाहीत. सत्ताधाऱ्यांचा सामान्यांना आलेला अनुभव हा अनेक बाबतींत पोळून टाकणारा होता. ज्या सामान्य माणसाला गांधींनी 'आंदोलना'चे नायक बनवले, त्या माणसाच्या संघटित गाऱ्हाण्यांनाही जिथं वजन उरलं नाही, तिथं एकेकट्या व्यक्तीच्या वाट्याला उपेक्षा आणि अपेक्षाभंग दोन्ही येणं स्वाभाविक होतं. भ्रष्टाचार, रोजगाराची शाश्वती नसणं, लाल फितीत चांगल्या योजनांचंही भजं होणं, सरकारी यंत्रणेतली माणसं ही परक्या ग्रहावरून आलेली आहेत की काय अशी शंका येण्याइतपत त्यांचं जनतेशी नातं न उरणं आणि त्याचवेळी नेतेमंडळींशी मात्र त्यांचं साटंलोटं असणं हीच सत्ताधाऱ्यांची ओळख या देशात बनली आहे. अशा सत्ताधाऱ्यांनी गांधींचा वारसा सांगणं जर कोणी फारसं मनावर घेतलं नाही, तर त्यात नवल नाही. गांधींचा वारसा सांगणाऱ्यांनी, गांधींचा वारसा नाकारणाऱ्यांनी आणि त्यांनी काही वारसा दिलाय याची जाणच नसणऱ्यांनीही त्यांना या देशात संदर्भहीन बनवलं आहे.

म. गांधींच्या गौरवपूर्ण उल्लेखापेक्षाही शारीर हत्येनंतरसुद्धा त्यांची कणाकणानं हत्या करणाऱ्यांना पंतप्रधान कोणता कार्यक्रम देणार आहेत, हा कळीचा प्रश्न आहे!

सफाईचा राष्ट्रीय फार्स ?

मुख्यपान » संपादकीय » बातम्या
 
1
 
0
 
गांधीजींचा वैशिष्ट्यपूर्ण श्रमविचार
- -
गुरुवार, 2 ऑक्टोबर 2014 - 03:45 AM IST

गांधी जयंती हे जर समाजवास्तवाला नजरेआड करून डोळे मिटून प्रार्थना करण्याचे कर्मकांड होऊ द्यायचे नसेल किंवा सफाईचा राष्ट्रीय फार्स बनू द्यायचा नसेल तर भारतातील जातवास्तव आणि भांडवली अर्थकारणातून निर्माण झालेल्या प्रश्‍नांना गांधी कोणत्या पद्धतीने भिडत होते आणि त्या प्रश्‍नांचा निरास करण्यासाठी कोणता विचार मांडत होते, याचे चिंतन झाले तर अधिक उचित ठरेल.

श्रमप्रतिष्ठा पुनःप्रस्थापित करण्याचा गांधीजींचा प्रयत्न होता. आधुनिक तंत्रज्ञानामुळे उत्पादनासाठी शरीरश्रम अनावश्‍यक झाले असले तरी उपासना म्हणून ते करीत राहावेत, असे ते सांगत होते.
- यशवंत सुमंत
गांधी जयंती हे जर समाजवास्तवाला नजरेआड करून डोळे मिटून प्रार्थना करण्याचे कर्मकांड होऊ द्यायचे नसेल किंवा सफाईचा राष्ट्रीय फार्स बनू द्यायचा नसेल तर भारतातील जातवास्तव आणि भांडवली अर्थकारणातून निर्माण झालेल्या प्रश्‍नांना गांधी कोणत्या पद्धतीने भिडत होते आणि त्या प्रश्‍नांचा निरास करण्यासाठी कोणता विचार मांडत होते, याचे चिंतन झाले तर अधिक उचित ठरेल.

रस्किनच्या श्रमकेंद्री उपजीविकेचा विचार आणि टॉलस्टॉयच्या ‘भाकरीसाठी  मजुरी’च्या विचाराने प्रेरित होऊन गांधींनी ‘श्रमविचार’ गीतेच्या परिभाषेत सांगितला व श्रमांकडे पाहण्याची आधुनिक दृष्टी भारतीयांमध्ये रुजवायचा प्रयत्न केला. जातिव्यवस्थेने बुद्धी आणि श्रम यांची अभेद्य अशी फारकत केली होती. ती उच्च-नीचतेच्या श्रेणीत बंदिस्त केली होती. मलमूत्रादी घाण साफ करणे, मेलेल्या जनावरांची कातडी सोलणे यासारखी कामे अस्वच्छता, दुर्गंधीशी संबंधित म्हणून ती नुसतीच हलक्‍या दर्जाची नव्हेत, तर ती अपवित्र आणि ती करणारा वर्ग अस्पृश्‍य आणि बहिष्कृत ठरविण्यात आला. व्यक्तीला स्वतःची ओळख शोधण्याचा, ती सिद्ध करण्याचा व ती इतरांना पटवून देण्याचा अवकाशच जातिव्यवस्थेने खतम केला.या व्यवस्थेमुळे श्रम आणि श्रमिक अप्रतिष्ठित व कलंकितही केले. म्हणूनच डॉ. आंबेडकरांनी जातिजन्य श्रमजीवींच्या आत्मसन्मानाच्या व स्वयंनिर्णीत आणि स्वयंनिर्धारित सामाजिक ओळखीच्या प्रश्‍नाला दलित व मानवमुक्तीच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आणले. आंबेडकरांचा श्रमप्रतिष्ठेबाबतचा विचार हा गांधींपेक्षा खचितच वेगळा होता. पण जातिव्यवस्थेने बुद्धी आणि श्रमांची झालेली फारकत, श्रम व श्रमिकांची झालेली अप्रतिष्ठा याबाबत उभयतांचे  एकमत होते व ते दोघेही श्रमप्रतिष्ठा कशी पुनःप्रस्थापित करता येईल यासाठी प्रयत्नशील होते.

दुसऱ्या बाजूला भांडवली उत्पादन पद्धतीने श्रमाचे वस्तूकरण केले होते. श्रम क्रयवस्तू बनली. स्पर्धाशील आणि महाकाय उत्पादन यंत्रणेत स्वतःसाठी श्रम करून गरजा भागविण्याचा अवकाशच माणसाने गमावला होता. श्रम सर्जनशून्य आणि यांत्रिक बनले. कारण ते दुसऱ्या कोणाच्या तरी गरजा भागविण्यासाठी, माझ्या इच्छेविरुद्ध व माझ्या सर्जनशीलतेला दाबत घडत होते. कामाची क्षमता आणि तयारी असून काम न  मिळणे आणि मिळाले तर कामाच्या/ श्रमांच्या प्रमाणात मोबदला न मिळणे या वास्तवात माणूस अडकला. माणसाला शोषण आणि परात्मतेच्या गर्तेत ढकलणाऱ्या औद्योगिक भांडवलशाहीच्या उत्पादन व्यवस्थेत श्रमप्रतिष्ठा कशी स्थापन करता येईल, हा खरा प्रश्‍न होता. मनुष्यबळ विपुल असलेल्या आशियाई समाजांत भांडवलप्रधान अर्थव्यवस्थेपेक्षा श्रमप्रधान अर्थव्यवस्था उभी करणे बेरोजगारांच्या प्रश्‍नाच्या संदर्भात अधिक हितावह, अशी गांधींची धारणा होती. अवजड यंत्राधारित उत्पादन व्यवस्थेची गरज मनुष्यबळ मुबलक प्रमाणात उपलब्ध नसलेल्या पश्‍चिमी देशांना कदाचित उपयुक्त ठरू शकेल; पण अन्यत्र ती बेरोजगारी  वाढवेल असे गांधींना वाटत होते आणि त्याही दृष्टीने श्रमांचा विचार ते करीत होते.

मुख्य म्हणजे श्रमप्रधान उपजीविका माणसाला त्यांची नैतिकता गवसण्यात अधिक साह्यकारी होऊ शकते, ही गांधींची श्रद्धा होती. माणसाच्या शरीरश्रमांस निसर्गदत्त काही मर्यादा असल्याने त्याची उत्पादनशक्तीही निसर्गानेच त्याच्या गरजा भागविण्याइतपत मर्यादित केली आहे. पण यंत्र-तंत्रज्ञानातील प्रगतीने उत्पादनक्षमताच अफाट वाढली असे नाही, तर तो उत्पादक श्रमांपासून सुटका करून घेण्यासाठी उद्युक्त केला गेला. श्रमविन्मुखता हे त्यांचे मूल्य बनले. शरीरश्रमांपेक्षा बौद्धिक श्रम उच्च प्रतीचे, अशी धारणा बनली. या पार्श्‍वभूमीवर समाजधारणेसाठी करावी लागणारी सर्व कामे व त्यासाठीचे श्रम हे सारख्याच मोलाचे व त्यातही अनुत्पादक श्रमांपेक्षा उत्पादक श्रम अधिक महत्त्वाचे आणि बौद्धिक श्रमांपेक्षा शारीरिक श्रम श्रेष्ठ, असे गांधींचे प्रतिपादन होते. उत्पादक श्रम ही समाजधारणेची शर्त म्हणून तर सेवारूप श्रम हे सामाजिक उत्तरदायित्व म्हणून केले पाहिजेत व त्यातच माणसाची आणि म्हणून श्रमांचीही प्रतिष्ठा आहे, असा गांधींचा अभिप्राय आहे. जातिबद्ध समाजात शूद्रांवर उत्पादक श्रमांची सक्ती होती, तर अतिशूद्रांवर सेवारूप श्रमांची. म्हणूनच त्या श्रमांना प्रतिष्ठाही नव्हती. उच्चवर्णीयांनी सफाईची कामे सेवावृत्तीने व अतिशूद्रांप्रतीच्या अपराध भावनेने करावीत, तर भांडवलशाही क्रांतीतून निर्माण झालेले उत्पादक  श्रमांचे, व्यावसायिक व करार स्वातंत्र्याच्या रूपात मिळणारे स्वातंत्र्य सर्वांनाच असले पाहिजे, असे गांधी सांगतात. पण कायद्याचे हे स्वातंत्र्य दिले तरी विषम समाजात हे व्यवसाय/ रोजगार/ करार स्वातंत्र्य शूद्रातिशूद्र वर्गांना उपभोगता येईलच असे नाही. तसेच यंत्रावर आधारित भांडवली उत्पादन व्यवस्थेला सर्वांनाच रोजगार पुरविता आला नाही, ही इतिहासाची साक्ष आहे. या पार्श्‍वभूमीवर निव्वळ यंत्राधारित भांडवली उत्पादन पद्धत लादणे याचा साधा अर्थ शूद्र समजल्या गेलेल्या उत्पादक जातीचे पारंपरिक व्यवसाय उद्‌ध्वस्त करणे होय. पर्यायी रोजगार  उपलब्ध झाल्याशिवाय आहे त्या व्यवसायातून हद्दपार होणे यातून बेरोजगारांची  समस्या उग्र बनणार  होती. या दृष्टीने गांधींनी उत्पादक जातींनी त्यांचे पारंपरिक व्यवसाय करण्यात काहीच गैर नाही, असे म्हटले. पारंपरिक व्यवसायाचा विचार करताना गांधींनी उत्पादक जाती आणि सेवा जाती, असा फरक केल्याचे दिसते. जातींनी त्यांचे पारंपरिक व्यवसाय करावेत, हे गांधींचे म्हणणे मुख्यत्वे शूद्र वर्णातील उत्पादक जातींच्या संदर्भात होते. अतिशूद्र समजल्या गेलेल्या सेवा जातींच्या संदर्भात नव्हते. उत्पादक आणि सेवारूप कामाची व श्रमांची प्रतिष्ठा त्यांना प्रस्थापित करायची होती.

डॉ. आंबेडकरांचा तंत्रज्ञानाच्या विकासाला विरोध नव्हता. मनाच्या विकासासाठी ठराविक काळ  घोर श्रमांपासून मुक्ती मिळायला हवी, असे ते सांगत. शुद्रातिशुद्रांना ती नाकारण्यात आली. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे श्रमांच्या वेठबिगारीतून मुक्त होऊन मन-बुद्धीच्या विकासासाठी अवकाश प्राप्त होईल, असे बाबासाहेबांना वाटत होते. उत्पादनतंत्रामुळे समृद्धी येणार असली तरी माणसाने चंगळवादाकडे जाऊ नये, असे मार्क्‍स आणि आंबेडकर- दोघेही म्हणत होते. माणसे शोषण, पिळवणूक याला कंटाळून कुकर्माकडे वळतात. एकदा अभावग्रस्तता संपली, की माणसे विवेकाने वागतील म्हणून उत्पादनवाढ व त्यातून समृद्धी हवीच. पण तीवर विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नको, हा मार्क्‍सच्या समाजवादाचा आशय होता. पण माणसाची स्खलनशीलता लक्षात घेता अभावग्रस्तता संपल्यावर तो अधिक विवेकाने, नैतिकतेने वागेल याची हमी काय आणि ती कोण देणार, असा प्रश्‍न गांधी उपस्थित करतील. त्यासाठी माणसाला उत्पादनाच्या अशा संरचनेत ठेवायला हवे, की त्याच्या अमर्याद उपभोग क्षमतेला काही संरचनात्मक मर्यादा पडतील. श्रमकेंद्री उपजीविका हा त्यावरचा संरचनात्मक मार्ग आहे. म्हणूनच गांधींच्या मते, उत्पादनाची गरज म्हणून जरी शरीरश्रम अनावश्‍यक झाले तरी उपासना म्हणून ते करीत राहावेत. यातच माणसाची व श्रमांची प्रतिष्ठा आहे.
(लेखक राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत.)

 
1
 
0
 

फोटो गॅलरी

Tuesday, September 30, 2014

राजदीप सरदेसाई प्रकरण : काही निरिक्षणे


राजदीप सरदेसाई प्रकरण : काही निरिक्षणे

राजदीप सरदेसाई प्रकरणात काही गोष्टी ठळकपणे पुढे आल्या...

मोदीभक्त नी भाजपा - संघ परिवारातील बरीच मंडळी राजदीपवर अनेक वर्षे खुन्नस ठेऊन असल्याने त्यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा हात धुऊन घेतला. कमरेखाली वार करण्यात आणि हुज्जत घालण्यात यांचा हात कोणीच धरू शकत नाहीत.

मोदी, संघ, भाजपा इ.वर पारंपरिक राग असणारे काही पुरोगामी राजदीपच्या समर्थनार्थ उतरले. धक्काबुक्की करणारे परिवारातील आहेत म्हणून राजदीपच्या बाजूने ते धाऊन आले. राजदीपच्या निमित्ताने लगे हात वरील मंडळींची धुलाई करण्याचाच त्यांचा उद्देश असल्याने ते कंबर कसून कामाला लागले.

पुरोगामी दहशतवाद, प्रतिगामी दहशतवाद अशी काहींनी मांडणी केली. खरं तर दहशतवाद हा कोणाचाही असो तो निषेधार्हच असतो. दहशतवादी हे पुरोगामी किंवा प्रतिगामी छावणीतले असू शकतात, पण दहशतवाद कसा पुरोगामी असेल? तो धिक्कारार्हच असतो.तो कोणाचा आहे यावर त्याचे मोल ठरत नाही. तो कोणाचाही असो तो निषेधार्हच असतो.

नमोभक्त म्हणू लागले, " राजदीपनेच सुरुवात केली मग लोकांचा नाईलाज झाला," "राजदीप औचित्यभंग करणारे प्रश्न लोकांना कार्यक्रमाच्या ठिकाणी रस्त्यावर विचारीत असल्याने लोक चिडणे स्वाभाविक होते," " राजदीपने प्रसिद्धीसाठी हे केले,"  इ.इ. पण हा झुंडीचा किंवा उन्मादी जमावाचा बचाव झाला. यात कांगावा मोठ्या प्रमाणात आहे. राजदीप एक पत्रकार म्हणून दौर्‍यावर गेलेले होते. ते झिलकरी, नमोभक्त किंवा चिअरगर्ल्स पैकी नाहीत हे विसरले गेले. त्यामुळेच ज्यांना प्रश्न विचारणे मान्यच नसते अशा उन्मादी झुंडीने राजदीप मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. हुल्लड माजवण्यात आली. उद्योगपती गौतम अडाणी यांच्याबाबतच्या राजदीपच्या ट्वीटवरून राजदीपना टार्गेट करण्यासाठीच थंड डोक्याने हा प्लान करण्यात आलेला असावा असे घटना डोळ्यांनी पाहणार्‍या त्रयस्त भारतीयांचे म्हणणे आहे. { पाहा : अचिंत शर्मा व कौमुदी वाळिंबे यांचे निवेदन } त्यावरून हा हल्ला पुर्वनियोजित होता हे स्पष्ट होते. अशावेळी १०/१५ मिनिटे हुल्लडबाजी झाल्याने राजदीपही चिडला. त्याचाही तोल गेला. त्याने आत्मसंरक्षणार्थ जे जे  केले ते व्हीडीओ फुटेज प्रसारित करून त्यानेच सुरूवात केली होती असे पसरवले गेले. राजदीपच्या धक्काबुक्कीची बातमी झाल्याने  लगेच विरोधी तक्रार तयार करण्यात आली नी व्हीडीओद्वारे प्रसारित करण्यात आली.

राजदीपच्या आजवरच्या  पत्रकारितेचे फटके बसल्याने जखमी झालेले काही लोक तर राजदीपवर टिका करण्याची ही आयतीच संधी चालून आली म्हणुन त्याच्यावर तुटून पडले.

व्यावसायिक स्पर्धेत ज्यांची गुणवत्ता  राजदीपपुढे कायम झाकोळली गेली होती / आहे, असेही माध्यमातले  बरेच जण असणार, आहेतच.  तेही कुठले कुठले जुने मुद्दे उकरून काढायला लागले. या धंद्यातली राजदीपमुळे दुखावली गेलेली भुतावळ कोल्हेकुई करू लागली.

काहींनी सोयिस्कर मौनराग आळवला. नमोभक्तांच्या चुकीवर पांघरूण घालण्यासाठी हा मौनाचा कट किंवा समर्थनपर युक्तीवाद अत्यावश्यक होता.

यातले झुंडीचे बरोबर ठरवण्याचा प्रयत्न करणारे तिचे समर्थक/नमोभक्त,  राजदीपच्या घटनात्मक अभिव्यक्ती स्वातंत्र्याकडे कानाडोळा करीत आहेत. झुंडीपुढे एकट्या माणसाला आत्मसंरक्षणाचाही हक्क नसतो, असे त्यांना सुचवायचे आहे काय? या देशात पंतप्रधान भले मोदी आहेत, सत्तेवर भाजपा आहे, पण अजुनही सर्वोच्च राज्यघटनाच आहे ना? आपल्या देशात लोकशाहीच आहे ना?

"सत्या-असत्याशी मन केले ग्वाही, मानियेले नाही बहुमता." .अशा वृत्तीचे लोक समाजात होते, आहेत, राहतील. विचारांशी/ मतभिन्नतेशी ज्यांचे वैर असते अशा संघटित ताकदी अशांना उखडून टाकण्याचा सतत प्रयत्न करीत असतात. 

राजदीप या व्यक्तीच्या प्रत्येक कृतीचे समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्या आजवरच्या भल्याबुर्‍या कृतींवर पांघरूण घालण्याचाही मुद्दा नाही. राजदीपवर टिका जरूर करा. कोणीही चिकित्सेच्या बाहेर नाही. पण हिंसाचार, धक्काबुक्की, अपशब्द यांना थारा नको. त्याचे उदात्तीकरण, समर्थन नको. अर्थात टिकाही सभ्यतेच्या घटनात्मक चौकटीतच व्हायला हवी.

मार्टीन निमोलर म्हणतो, "ते आले नी त्यांनी माझंच बकोटं पकडलं, तेव्हा वाचवा, वाचवा म्हणून मी मदतीसाठी खूप आटापिटा केला पण माझ्या मदतीसाठी यायला आजुबाजूला कोणीच शिल्लक नव्हतं." एव्हढा उशीर होऊ नये असे वाटत असेल नी पत्रकारिता आणि चीअरगर्ल्स यात काही फरक असेल तर मोकळेपणी व्यक्त व्हा.

भुमिका घेणारे नकोत, प्रश्न विचारणारे नकोत,  फक्त भाट हवेत, भक्त हवेत असे ज्यांना वाटते ते चिडणारच. अजातशत्रू ही मिथ आहे. वास्तवात तसले काही नसते. नो‘नकमिटल राहणे, भोंगळ राहणे, म्हणजे प्रस्थापितांनाच समर्थन देणे असते. तो तथाकथित तटस्थपणाचा फक्त देखावा असतो. राजदीप तसा नसेल तर ते त्याचे सामर्थ्य आहे. कमजोरी नाही. 

..............................................................
2.
राजदीप सरदेसाईंनी सुपारीबाज पत्रकारितेवर ओढले कोरडे
ज्येष्ठ पत्रकार श्री. राजदीप सरदेसाई यांनी त्यांच्या ट्वीटमधून सुपारीबाज पत्रकारितेवर कोरडे ओढले आहेत. त्यातून पत्रकारितेचे क्षेत्रही कसे प्रदुषित होत चालले आहे त्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. ते म्हणतात, "
Rajdeep SardesaiVerified account
@sardesairajdeep
Sorry folks, won't respond to lies of channel/editors caught on tape seeking bribes and sent to jail. Supari 'journalism' at its worst.
Rajdeep Sardesai @sardesairajdeep · 13h
Teri galiyon mein na rakhege kadam aaj ke baad... Gnight, shubhatri."
Reply0 replies Retweet335 retweets335 Favorite391 favorites391
.................
बर्‍याच सामान्य माणसांचा आजही छापून आलेल्या गोष्टींवर विश्वास असतो. २४ तास चालणार्‍या बातमीच्या वाहिन्यांमध्ये अतितीव्र स्पर्धा आहे. ही स्पर्धा बर्‍याचदा जीवघेणी बनते. टीआरपी, रेव्ह्यून्यू, नंबर वन या प्रकारात विश्वासार्हता गुंडाळून ठेवली जात असेल तर ते खेदजनक आहे.
हे क्षेत्र आता पैसेवाले उद्योगपती आणि सत्ताधारी यांच्या कब्ज्यात जात असल्याचे चित्र पुढे येत आहे. त्यातून नफ्यासाठी सर्व काही क्षम्य अशी विचारसरणी रूढ होत आहे.
राजकीय क्षेत्र किती "पवित्र नी स्वच्छ" आहे त्याचे ताजे दर्शन जयाअम्मांच्या निमित्ताने झालेच आहे.
प्रशासनातील अनेक जण "आदर्श" बनण्याचा आटापिटा करीत असताना दिसतात.राजकीय हस्तक्षेपाने त्यांचे कंबरडे मोडल्याचे सांगितले जाते.
न्याय संस्थेकडून अद्यापही बर्‍याच अपेक्षा आहेत नी काही प्रमाणात माध्यमांकडूनही.
माध्यमांमधल्या मित्रांनी यावर बोलायला हवे.
अर्थात असे म्हणतात की, "पाण्यात असताना पाण्याबद्दल बोलण्याच्या फंदात पडू नये, नाहीतर पाणी तोंडात जाण्याचा धोका असतो."
व्रत, व्यवसाय, नफा मिळवून देणारा एक उद्योग, निव्वळ धंदा, नी आत्ता टोळीयुद्ध अशा क्रमाने माध्यम क्षेत्राचे अध:पतन होत आहे काय?
गुन्हेगारी टोळ्या कोणाच्याही हत्तेच्या सुपार्‍या घेतात. तर सुपारीबाज पत्रकारिता चारित्र्यहनन, बदनामी, धमक्या देऊन खंडण्या वसूल करणे आणि राजकीय - सामाजिक हत्त्या करणे यात बुडत चालल्याचे बोलले जाते. राजदीप यांच्या या ट्वीटने त्याला बळकटी मिळते. या धाडसाबद्दल त्यांचे अभिनंदन. आपण त्यांच्याशी सहमत आहात काय?
....................................................................
3.
by Hari Narke: --
राजदीप सरदेसाई धक्काबुक्की प्रकरण, निवडक व्हीडीओ आणि वस्तुस्थिती
घटनाक्रम, १. राजदीपना धक्काबुक्की झाल्याची बातमी आली.
२. राजदीपच जमावातील काहींच्या अंगावर धाऊन जात असल्याचा व्हीडीओ प्रसारित करण्यात आला. त्यावरून आधी राजदीपनी सुरवात केली असे भासवले गेले.
३. अचिंत शर्मा या प्रत्यक्षदर्शी पत्रकाराने या सार्‍या प्रकरणामागील "राजकारण" उलगडणारी पोस्ट पेजवर टाकली आणि हल्लेखोरांची लबाडी उघडकीला आली.
४.मुळात सकाळी राजदीपने ट्वीट करून पंतप्रधानांसोबत त्यांच्याच होटेलात एक बडा उद्योगपती राहत असल्याचे म्हटले आणि या प्रकरणाला सुरुवात झाली.
५. जमावातले काही लोक त्या ट्वीटबाबत राजदीपना जाब विचारत होते.
६. सुमारे ५० लोकांच्या जमावातून जेव्हा घोषणा देत काही उन्मादी लोक अंगावर येतात तेव्हा एखाद्या माणसाला {पत्रकाराला} आत्मसंरक्षणाचा हक्क असतो की नाही?
७. अमेरिकेत तरी बहुधा अजून ओबामांचेच राज्य आहे. तिकडे लोकशाही असल्याने विरोधी आवाज ऎकण्याची पण सवय अद्याप शिल्लक आहे.
८. तुम्ही सत्तेवर असता, परदेशात असता, तेव्हाही पत्रकाराला घेरणार, अंगावर जाणार,तो स्वसंरक्षण करीत असेल तर त्याचे १५ मिनिटे चाललेल्या घटनेचे अवघ्या काही सेकंदांचे व्हीडीओ प्रदर्शित करणार नी असे भासवणार की सुरूवात तर राजदीपने केली होती.
हो, ट्वीट करून सुरुवात राजदीपने केली होते हे खरे आहे. जमाव अंगावर आल्यास स्वसंरक्षणाचा हक्क प्रत्येकाला असतो. राजदीपसोबत झुंड नव्हती.
त्यामुळे सत्ता, झुंड, उन्माद आणि लोकशाहीविरोधी मानसिकता यातून लक्षात येते की काय घडले असावे.
.........................................................
4.
Here is the story from a fellow journalist and eye witness of the Rajdeep incident. Rajdeep Sardesai
Achint Sharma:
The Rajdeep Sardesai video no one will post on youtube or Social Media!
Rajdeep was already trending on twitter after what happened earlier in the day before the Modi's speech at the Madison Square Garden. You guys saw that the video, didn't you. (This was shot before PM arrived at Madison Square Garden)
But this is the episode that no one will tell you about, and in fact, I DARE EVERY ONE OF YOU WHO RECORDED THIS BUT WON'T POST IT FOR REASONS NOT TO BE NAMED.
The Story Part II ( Right after the event at Madison Square Garden)
I was at Times Square when I heard or in fact read about it as the screen out there flashed a tweet about Rajdeep's episode earlier in the day.
Once done interviewing and usual stuff, took a walk down to Madison Square Garden. The Venue where Rajdeep was heckled in the morning.
By the time I reached, the speech was still on, so took a pit-stop right across the street at my hotel to charge the batteries of my cell phone and my digicam.
I return, interviewed a couple of people on their way out. But while I interviewed the last family, I hear some noise, quite different from 'Har Har Modi' or the 'Modi Modi' chant across the 7th Avenue. I turn around only to find Rajdeep Sardesai and a senior cameraperson in the middle of a mob trying to calm down a group of approximately 50 people around him.
My first Reaction: Are these guys for real?
Second reaction: To see if any other TV crew was there, none
I barge in, just to check if Rajdeep was alright. Yes, he was. Smiling, calm, and trying to reason out a crowd which wasn't prepared to listen to anything he said. Then the pushing and shoving begins. A barrage of abuses follow.
Why?
Probably because of Rajdeep's tweet about an influential person staying in the same hotel as Narendra Modi's
The mob called him by names and hurled the choicest of words towards him. When I tried to shield the fellow journalist, I realised, that I became a target as well. This went on for good 10-15 minutes. The NYPD was right there, but won't blame them for not knowing what was going on in the middle of that crowd of 50 odd people. The cameraman had to ensure his equipment was safe, so was trying his best he could, to fend off a few people who tried to come closer to Rajdeep. This went on for good 10 minutes.
Despite my repeated requests to stay away from Rajdeep, the mob continued to shout pro-Modi slogans right in front of his face to instigate him. A particular person wearing glasses, and once again in an orange attire, almost shoved his phone into the cameraman's lens to which Rajdeep protested.
Luckily, fellow scribes Mohit Roy Sharma and Bhupendra Chaubey arrived at the scene. Three of us literally made a human chain, to get Rajdeep out of that place.
I'm sure all of this is on tape as the cameraman might have stopped recording, but the PCR back in India would have everything that transpired in front of that camera lens.
I say this with conviction that a lot of people had their cameras rolling as well.
The abuses, the pushing and shoving, and the instigation, all on tape.
Yes, you have every right to be a supporter, but let's not mix a fan with a fanatic. Learn to respect other people. Learn to respect to earn respect. Just a few minutes ag o, the Prime Minster delivered a lovely speech about peace and how India is a great democracy. But you guys defy all logic.
I hope this post is shared and reaches all the people who saw the second episode right in front of their eyes and captured it on their cameras.
Look inside you, and just think what you did and ponder upon what you could have done.
Peace
Achint Sharma
‪#‎IStandWithRajdeep‬ and yes I stood With Rajdeep Sardesai
..............................................
5
From Kaumudee Valimbe : 

That so called 'full video' is not full even. It doesn't show how the mob was hostile towards Rajdeep. I was there. Crowd started jeering him. 'Rajdeep Sardesai Murdabad' types... He certainly lost temper at that particular moment, but stayed on there for couple more hours. Answered / argued with even more rowdy people. A few people were high on euphoria and were in a really aggressive mood..

Perhaps it was hard for euphoric people to understand/accept that somebody else can really have different facts/views/opinions. And yes, in the vdo we can hear a half 'Ahole' from Rajdeep, but not what all was said to him before that!......................................
Kaumudee Valimbe-- 
;  I do not see this particular incident covered - publicized in US press. So no worries about harming PM visit any way! In fact, US press has taken note of the protests staged outside MSG along with the PM event. Many of us perhaps haven't understood the real nature of this great gala at MSG. TV images may have created impression back home that whole USA was cheering for him. That is not the case. This is a staged show - not a spontaneous welcome extended by the great Indian diaspora. Big business lobby with vested interests (and jingoist mindset) has put on the great show. That does not even mean all Indian origin people across US. There were hundreds of protestors outside MSG - they were of Indian origin too.

............
6.

हिंसा नी उन्माद यांचा निषेध
अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील प्रत्येक हल्ला निषेधार्हच होय. मात्र अमेरिकेत पत्रकार राजदीप सरदेसाई यांना धक्काबुक्की करणारांनी कमाल केली आहे. या मुजोर आणि हिंसक अतिरेक्यांची इथवर मजल जाईल असे वाटले नव्हते. ज्यांना चिकित्सा, लोकशाही, विचार स्वातंत्र्य, हे काहीच मान्य नाही अशा शक्तींनी केलेला हा हल्ला आहे. लोकशाहीवृत्तीने संयमाने याचा प्रतिवाद नी 
प्रतिकार करायला हवा. या हिटलरी प्रवृत्तीचा धिक्कार असो... हा नेमका कुठे प्रवास चालूये?
...........................................