फटाके : आनंद व्यक्त करण्याची अघोरी, अडाणी आणि असंस्कृत पद्धत.
आमच्या कुटुंबात गेली ५० वर्षे आधी गरिबीमुळे फटाके खरेदी करणे परवडत नाही म्हणून आणि नंतर परवडत असूनही विचारपुर्वक वरिल कारणांमुळे फटाक्यांवर बहिष्कार घालण्यात आलेला आहे.
..................................................................
मला फटाक्यांची चीड आहे. कानठळ्या बसवणारा तो गलिच्छ आवाज नको म्हणून गेली अनेक वर्षे आम्ही दिवाळीत शहरात राहणे टाळतो.
ध्वनी आणि हवेचे भयंकर प्रदुषण करणारे फटाके, उडऊन झाल्यानंतर परिसराचा अक्षरश: उकीरडा बनऊन टाकतात. एरव्ही स्वच्छतेबद्दल दक्ष असलेले महानगरी सुशिक्षित लोक फटाक्यांमुळे आपण परिसर अस्वच्छ केलाय तर तो आपणच साफ करायला हवा हे मात्र विसरतात. अशी साफसफाई करणारी एकही व्यक्ती मी गेल्या ५० वर्षात पाहिलेली नाही.याचा अर्थ फटाके उडवणारे सगळेच लोक बेजबाबदार आणि क्रूर असतात.
दुसर्यांना त्रास देऊन ज्यांना आनंद मिळतो ते समाजविघातक लोक होत. सर्व प्रकारचा शांतताभंग करणार्या नी भयावह प्रदुषणकारी फटाक्यांवर तात्काळ बंदीच घालायला हवी.
फटाक्यांच्या कारखान्यात बालमजुरांना राबऊन घेतले जाते.
आपल्या श्रीमंतीचे नागडेउघडे आणि बिभत्स प्रदर्शन करण्यासाठी मोठमोठे फटाके उडवले जातात.
त्यातून गरिबांनाही परवडत नसले तरी प्रसंगी कर्ज काढून फटाके खरेदी करावे लागतात.
संगित, नाट्य, साहित्य, दिवाळी अंक, फराळ, पर्यटन, खरेदी, सजावट, आकाश कंदील,रांगोळ्या आदी दीपोत्सवाच्या आनंदाचे अनेकानेक मार्ग असताना जे आनंद व्यक्त करण्याची ही अघोरी, अडाणी आणि असंस्कृत पद्धत वापरतात त्यांची मला चीड येते.

मला फटाके वाजवणारे लोक आवडत नाहीत. जसे मला समाजविघातक लोक आवडत नाहीत.
फटाक्यांना मिळणारी प्रतिष्ठा नष्ट झाल्याशिवाय हे फटाक्यांचे गलिच्छ आकर्षण समाजातून हद्दपार होणार नाही.
फटाके हे दिवाळीचा आनंद नासवणारे भयंकर विषाणू हद्दपार करूया.
दिवाळीचा आनंद द्विगुणीत करू या.

No comments:
Post a Comment