................................................http://epaper.esakal.com/sakal/22Oct2014/Enlarge/Ahmednagar/index.htm
पाथर्डीत एकाच कुटुंबातील तिघांची हत्या, मृतदेहाचे तुकडे करून विहीरीत टाकले
जवखेडे खालसा, ता.पाथर्डी जि.अहमदनगर येथे गवंडीकाम करणारे संजय जगन्नाथ जाधव {वय ४५}पत्नी जयश्री आणि मुंबईत शिकणारा मुलगा सुनिल या तिघांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आलेली आहे. त्यांच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करून ते विहीरीत टाकून देण्यात आलेले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील सोनई, खर्डा आणि आता जवखेडे अशा एकाच प्रकारच्या घटना वारंवार का घडत आहेत?
१.पोलीस आणि प्रशासनाची जरब राहिलेली नाही. किंबहुना त्यांच्या संरक्षणात अशा घटना घडत आहेत काय?
२.जातीयवादी राज्यकर्त्यांचे अभय मिळालेली मंडळी ही हत्याकांडे करीत आहेत काय?
३.सरंजामदारी मानसिकतेला बळ देणार्या जातीय संघटनांची ढाल पाठीशी असल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत काय?
४. सहकारातून आलेली संपन्नता जातीय मानसिकतेला खतपाणी घालीत आहे काय?
५. ह्या केवळ सुट्या घटना नाहीत.जातीय दंगल जेव्हा होते तेव्हा त्यामागे आग अनेक महिने धुमसत असते नी प्रासंगिक कारणाने ती पेट घेते तशीच जातीय विषवल्ली - जातीय अहंकार, दलितांविषयीचा तिरस्कार यांचे खदखदणारे रसायन नगर जिल्ह्यात कोठून आले आहे याची पाळेमुळे शोधली जायला हवीत.
घटना घडल्यानंतर चार दिवस चर्चा आणि नंतर सारे शांतशांत असे करून चालणार नाही.
संपूर्ण नगर जिल्हाच जातीय अत्याचारग्रस्त अतिसंवेदनशील जिल्हा म्हणून घोषित करून तेथील पोलीस आणि प्रशासनावर जबाबदारी निश्चित करायला हवीय का?
कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवली जायला हवी.
महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेला काळीमा फासणार्या या मानसिकतेचा तीव्र धिक्कार..

No comments:
Post a Comment