लेखकांचे स्वातंत्र्य आणि महात्मा फुले - प्रा.हरी नरके
१८४९ साली सांस्कृतिक दहशतखोरांमुळे जेव्हा मराठी लेखकांचे स्वातंत्र्यसंकटात सापडले होते तेव्हा महात्मा जोतीराव फुले त्यांच्या मदतीला धावलेहोते. पेशवाई बुडाली आणि इंग्रजी राज्य आले. पेशवाईत ब्राह्मणांना पर्वतीच्यारमण्यात दक्षिणा वाटली जात असे. इंग्रजांनीही तिच पद्धत चालू ठेवली होती.त्यासाठी दक्षिणा प्राईज कमिटी स्थापन करण्यात आली होती. आधुनिक शिक्षण घेतलेल्या लोकहितवादी,गोवंडे,भवाळकर,जोशी आदी सुधारकांनी ही पद्धत बंद करून ती रक्कम लेखकांच्या उत्कृष्ठ ग्रंथांना पुरस्कार देण्यासाठी वापरावी असा सरकारकडे अर्ज केला. ही बातमी कळताच सनातनी भडकले.अर्जदारांना जातिबहिष्कृत करण्याचा हुकूम काढण्याचे ठरले. तुळशीबागवालेराममंदिरात त्यासाठी सभा बोलावण्यात आली.सुधारक मंडळी हादरली. ते सगळे तरण्याबांड जोतीरावांकडे धावले.जोतीरावांनी त्यांना मदतीचे आश्वासन दिले. लेखकांचे स्वातंत्र्य अबाधितराहिले पाहिजे अशी त्यांची भूमिका होती.लोकहितवादींच्या वाड्यावर सगळेजण भल्या पहाटे जमले. जोतीरावांनी आपल्या तालमीतल्या १५० पहिलवानांना तिथे उपस्थित ठेवलेले होते. सर्वात पुढे जोतीराव आणि त्यांच्यामागे हातात काठ्या, भाले घेतलेले १५० कमांडो.मध्ये ब्राह्मण सुधारक. अशी कडेकोट मिरवणूक तुळशीबागवाले राममंदिरात पोचली.जोतीराव आणि त्यांचे सहकारी पहिलवान प्रवेश द्वारावर उभे राहिले.
सुधारक आत गेले. जमाव संतापलेला होता. ते या तरुणांना शिव्याशाप देतहोते. कोणी त्यांच्या शेंड्या ओढीत होते. कोणी त्यांना चापट्या मारत होते. कोणी अंगावर थुंकत होते तर कोणी खडे मारीत होते.सुधारक घाबरून गेले होते.सभा सुरु झाली.अध्यक्षस्थानी असलेल्या मोरेश्वरशास्त्री यांनी या तरुणांनी अक्षम्यगुन्हा केल्याचा निकाल दिला.ज्यांनी अर्ज लिहिलाय त्यांना वाळीत टाकण्याचे ठरले.सुधारक आधीच ठरल्याप्रमाणे म्हणाले, " आम्ही हा अर्ज लिहिलेला नसून तोजोतीराव गोविंदराव फुले यांनी लिहिलेला आहे. तुम्ही त्यांना शिक्षा करूशकता."आणि ब्रह्मवृंदांची ती सभा पंक्चर झाली.आज जे उत्कृष्ठ ग्रंथांना पुरस्कार दिले जातात ते सुरु करण्यातअशाप्रकारे जोतीराव आणि त्यांचे ब्राह्मण सुधारक मित्र यांचा मोलाचा वाटाआहे.पुढे न्या.म.गो. रानडे यांच्या प्रयत्नातून साहित्य संमेलन सुरु झाले.त्यांनी जोतीरावांना निमंत्रण दिले.तत्कालीन लेखक ज्वलंत अशा जातिव्यवस्थेच्या सामाजिक प्रश्नावर ठोस भूमिका घेता नसल्याने या उंटावरून शेळ्या हाकणारांच्या साहित्य संमेलनावर जोतीरावांनी बहिष्कार घातला.
- प्रा.हरी नरके, ७ जानेवारी २०१९
No comments:
Post a Comment