Friday, September 7, 2012

हमोंचा जातीय प्रचारअ.भा.मराठी साहित्य संमेलनात वाद हे झडलेच पाहिजेत असा महामंडळाच्या घटनेत एखादा नियम आहे किंवा कसे याची मला माहिती नाही.सालाबादप्रमाणे चिपळुणला होणा-या संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणुक गाजु लागली आहे.गेल्या ८५ साहित्य संमेलनात न घडलेली जातीय प्रचाराची घटना यावर्षी प्रथमच पाहायला मिळत आहे.त्याचे मानकरी आहेत लेखक आणि अध्यक्षपदाचे एक उमेदवार श्री.ह.मो.मराठे. हमोंनी या निवडणुकीत जातीय प्रचार करुन या निवडणुकीला झेडपीच्या निवडणुकीच्या पातळीवर उतरविले आहे.
काही लोक दागिने मोडुन खातात,काही आपली गरिबी मोडुन खातात तशी हमोंनी निवडणुक प्रचारात स्वता:ची जात "मोडुन खायला" सुरुवात केली आहे.
{आपले आडनाव ’मराठे’ असले तरी} आपण "ब्राह्मण" आहोत आणि आपणच एकमेव ब्राह्मणांचे तारणहार आहोत असे त्यांनी आपल्या प्रचारपत्रकात सुचकपणे नमुद केलेले आहे.ब्राह्मण समाजाच्या विरुद्धच्या सगळ्या अपप्रचाराला वाचा फोडण्याचे "ईश्वरी कार्य" आपण हाती घेतल्याची माहिती हमोंनी या पत्रकात देवुन मते मागितली आहेत.
हमो म्हणतात, "गेल्या दिडशे वर्षांपासुन महाराष्ट्रात ब्राह्मणद्वेषाचे वातावरण पद्धतशीरपणे तयार करण्यात येत असुन सध्या त्याचा कळस गाठण्यात येत आहे." याचा अर्थ हमोंचा रोख महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याकडे आहे.दिडशे वर्षांपुर्वी त्यांचे स्त्री व दलित शिक्षणाचे काम  सुरु झाले होते. हमोंचा अंगुलीनिर्देश तिकडेच आहे.
ब्राह्मण पुरुषांच्या सरसकट कत्तली करण्याची चिथावणी देणा-या पुरुषोत्तम खेडेकरांच्या विखारी पुस्तकाविरुद्ध हमोंनी भुमिका घेतल्याचे ते या पत्रकात ब्राह्मणांना आवर्जुन सांगतात.तेव्हा ते हे दडवुन ठेवतात  की खेडेकरांच्या या पुस्तकाविरुद्ध पोलीसात तक्रार करणारे हमो नसुन शाम सातपुते,संजय सोनवणी आणि मधुकर रामटेके हे होते.हमोना केवळ लाजेकाजेस्तव नंतर भुमिका घ्यावी लागली पण पोलीसकेस झाल्यानंतर हे "शुर शिपाई"  तब्बल सहा महिने  पुस्तकावर मुग गिळुन गप्प राहिले होते.
या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर ब्राह्मण मतदार असल्याने त्यांना "भिक्षांदेही करण्यासाठी" हमोंनी हे पत्रक काढल्याची टिका एबीपी माझा वाहिनीने थेटपणाने करुन या जातीय प्रचाराचे वस्त्रहरण केले. टिका सुरु झाल्यावर हमोंनी साळसुदपणाचा आव आणुन केलेला खुलासा  अतिशय विनोदी होता. "एबीपी माझा" शी बोलताना ते म्हणाले, "मी पत्रकात असे कुठे  लिहिलेय की मी ब्राह्मण आहे म्हणुन ब्राह्मण मतदारांनो मला मत द्या."
वा: हमो! तुम्ही मतदारांना आणि महाराष्ट्राला बोळ्याने दुध पिणारे समजता काय?तुमचे जातीय डावपेच आम्हाला कळत नाहीत काय?
हमोंच्या चार पानी पत्रकातील पुर्ण दोन पाने या ब्राह्मणकार्याची जाहीरात करणारी आहेत. त्यात हमोंनी घटनेने दिलेल्या सामाजिक  आरक्षणाविरुद्धही गरळ ओकलेले आहे. त्यांनी सामाजिक न्यायाऎवजी त्याला "जातवार आरक्षण"असे संबोधले आहे. कष्टक-यांना जमिनीची मालकी देणा-या कुळकायद्यालाही हमोंचा विरोध आहे. रानडे,आगरकर,केशवसुत,कर्वे,लोकहितवादी यांची तोंडदेखली नावे घेणारे हमो नेमके कुणाचे वारसदार आहेत?गं.बा.सरदार,य.दि.फडके,अरुण साधु,वसंत बापट,लक्ष्मण्शास्त्री जोशी आदींचा वारसा हमोंना नको आहे.त्यांना सदानंद मोरे यांनी वाहिनीवर  जातविरहीत प्रचाराचे प्रमाणपत्र देवुन त्यांची तळी उचलुन धरली असली तरी हमो हे विष्णुशास्त्री चिपळुणकरांचेच वारसदार आहेत आणि रानडे-केशवसुतांची नावे घेवुन ते त्यांना बदनाम करीत आहेत हे स्पष्ट आहे.
 मतदारांमध्ये दोन जातींचे लोक प्रामुख्याने आहेत.एकुणात ४० टक्के मतदार ब्राह्मण असल्याचे हमो सांगत असले तरी प्रत्यक्षात हे प्रमाण ५५ते ६० टक्केपर्यंत असावे असे जाणकारांचे मत आहे.त्याखालोखाल मतदार सत्ताधारी जातीचे आहेत.या दोघांची जुंपल्याचे चित्र निर्माण करुन हमोंना "विरोधीभक्त" ब्रिगेडकरवी ते मतदारांसमोर बिंबवायचे आहे. दोन प्रतिगाम्यांमध्ये कायम संगनमत असते हे अनेकदा दिसुन आले आहे.ही मिलीभगत ईथेही नसेलच असे नाही.
हमो म्हणतात,"पुढे जेम्स लेनचे पुस्तक व तो स्वत: यांची भारताच्या सुप्रीम कोर्टाने निर्दोष मुक्तता केली."हमोंची ही मांडणी सत्याला धरुन नाही. सरकारने  लेनच्या बदनामीकारक आणि विकृत पुस्तकावर  बंदी घातली होती. घटनेच्या कलम १९ नुसार असणा-या लेखन व अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार न्यायालयाने  ही बंदी उठवली.ती उठवण्यात आली कारण सरकारने हा आदेश काढताना खुप चुका केलेल्या होत्या.त्याचा फायदा पुस्तकाला मिळाला.पण ही याचिका लेनने केलेली नव्हती.किंवा लेनला निर्दोष ठरवावे अशीही मागणी नव्हती.पुस्तक वाचायला मिळावे अशी वाचकांची याचिका होती.लेनला कोर्टाने निर्दोष मुक्त केले ही हमोंची माहिती त्यामुळेच दिशाभुल करणारी आहे.
 हमोंनी या पुस्तकातील वादग्रस्त मजकुर आपल्या पत्रकात जसाच्यातसा उद्धृत करुन आणखी एक घोडचुक केलेली आहे.ही चुक यापुर्वी फक्त संभाजी ब्रिगेडने हजारो पत्रके छापुन केलेली होती. तीच ब्रिगेड आत्ता हमोंना त्यासाठीच टार्गेट करीत आहे.आहे की नाही मिलीभगत?प्रागतिक मतदार यातुन हमोंपासुन दुरावले तरी सनातन्यांची मते पक्की करण्याच्या तसेच संभाजी ब्रिगेडसारख्या अतिरेकी आणि जातीयवादी मराठा संघटनांना जेम्स लेनचे कोलीत देवुन चिथवायचे आणि तटस्थ मतदारांची सहानुभुती मिळवुन निवडुन यायचे अशी गणिते धुर्तपणे  मांडुन हमोंनी हे पत्रक काढलेले असावे.
हा वाद ओढवुन घेवुन सहानुभुती मिळवायची आणि निवडुन यायचे असा डावपेच यामागे असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.हा वाद कसे वळण घेतो त्यावर मराठे जिंकणारकी हरणार ते ठरेल.
प्रबोधनकार ठाकरे यांच्या "माझी जीवनगाथा" या आत्मचरित्रात एक आठवण दिलेली आहे.
१९२३ च्या राजकीय निवडणुकीत भास्करराव जाधव यांनी, "सातारा जिल्हा मराठा मतदारांचा असुन आपण मराठा आहोत सबब मराठ्यांची मते मराठ्यासच मिळाली पाहिजेत" असे प्रचारपत्रक काढले होते.{पान.२४४}
आज कायदे बदललेले आहेत. असा थेट जातीय प्रचार करता येत नसल्याने आजच्या "आडनावांच्या मराठ्यांनी"अधिक चतुर मार्ग वापरला आहे इतकेच.पण वृती तीच आहे.प्रागतिक महाराष्ट्राने याचा धिक्कार केला पाहिजे.


26 comments:

 1. FROM:FACEBOOK...
  Abhijit Thite, Hemant Divate and 17 others like this.

  Arun B.khore:
  " any sensible reader,author absolutely agree with Hari.in our sahitya sammelan,this typr mentality misled the whole process.we have to condemn the hiding intention of HA.MO. hope voters will think on this & they elect proper candidate."

  ReplyDelete

 2. FROM:FACEBOOK:
  Vilas Mohitepatil, Supriya Pawar and 22 others like this.

  Mahendra Kulkarni: नरके साहेब, सडेतोड.. आवडलं.
  20 hours ago · like · 1

  Mahendra Kulkarni: पण हमो कडून अशी अपेक्षा नव्हती ..
  20 hours ago · like · 1

  Jaydip Kulkarni: Prof. Narke sir .... agree with you ... atleast this field shld not be known for this kind of dirty politics .....
  20 hours ago · like · 1

  Sanjay Nangare: रानडे,आगरकर,केशवसुत,कर्वे,लोकहितवादी यांची तोंडदेखली नावे घेणारे हमो नेमके कुणाचे वारसदार आहेत?गं.बा.सरदार,य.दि.फडके,अरुण साधु,वसंत बापट,लक्ष्मण्शास्त्री जोशी आदींचा वारसा हमोंना नको आहे.त्यांना सदानंद मोरे यांनी वाहिनीवर जातविरहीत प्रचाराचे प्रमाणपत्र देवुन त्यांची तळी उचलुन धरली असली तरी हमो हे विष्णुशास्त्री चिपळुणकरांचेच वारसदार आहेत आणि रानडे-केशवसुतांची नावे घेवुन ते त्यांना बदनाम करीत आहेत हे स्पष्ट आहे.
  20 hours ago · like · 2

  Sudhakar Jadhav: ‎"ब्राह्मण समाजाच्या विरुद्धच्या सगळ्या अपप्रचाराला वाचा फोडण्याचे "ईश्वरी कार्य" " करण्यासाठी ब्राम्हण समाजाच्या संमेलनात गेले पाहिजे. सगळ्या मतदारांनी त्यांची रवानगी तिकडेच करावी.
  20 hours ago · like · 1

  Prabhakar Harkal: ह मो चा निषेध ...जातीच्या कठा काठाने उभी याहिलेली माणसे जातीच्या गटारीतच पडतील .हेच हमोने केल ..आयुष्य भर कमावलेले क्षणातच घालवले
  19 hours ago · Edited · like · 2

  Raj Asrondkar: राजकारण गजकर्ण असतं असं म्हटलं जातं, साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनीही ते आपल्या कृतीने सिद्ध करावं, हे वाईट...वाद निर्माण करून ब्राम्हणांची मते एकवटायची, असाच धूर्त मतलबी डाव त्यात दडलेला आहे, हे निश्चित....या डावातील इकडच्या आणि तिकडच्यांना आपण उघडं पाडलंत, हे चांगलं केलंत...
  18 hours ago · like · 2

  साळसूद पाचोळा: त्यांनी जाति बद्दल पत्रकात लिहले. ते जातियवादी झाले, पण जे साहित्य संमेल्लन "उधळवतात" त्यांच्याबद्दल निष्ठावाण साहितिंकांची नेमकी मतं काय आहेत तेही कळू द्यात.
  10 hours ago · like · 1

  ReplyDelete
 3. FROM:FACEBOOK
  Sanjay Sonawani साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी समजा ह.मो. निवडुन आले तरी वारक-यांच्या धमक्यांना घाबरणारे महाबळेश्वरी निर्बळ साहित्य सम्मेलनाचे संयोजक... आता हमोंना संभाजी ब्रिगेडच्या धमकीला घाबरुन चिपळुनकरी संयोजक त्यांना चिपळुनात येवू देतील काय? हमोंच्या दोन गंभीर चुका झाल्यात यातुन. एक...अस्तित्वहीण होत असलेल्या ब्रिगेडच्या हाती कोलीत दिले. अकारण साहित्यात जातीयवाद आनला (पुर्वी तो छुपा असे असे म्हनतात...पण आता चक्क एकदम उघड...) आणि त्यांच्या समर्थकांचेही पंचाईत केली. मी हमोंच्या तथाकथित वैचारिक पुस्तिकांच्या व त्यांच्या अज्ञानजन्य ताणलेल्या ब्राह्मण-मसीहा भुमिकेविरोधात असलो तरी त्यांच्या दोन-तीन साहित्यकृती अन्य उमेदवारांना जवळपासही फिरकु देणार नाहीत अशाच असल्याने खरे तर त्यांना एक साहित्त्यिक म्हणुन अधिक संधी होती. कदाचित आता सहानुभुतीमुळेही ती संधी कायम राखता येईल...पण या संमेलनाची नोंद इतिहासात "जातीयवादी" संमेलन अशेच होईल आणि हे साहित्य संमेलन ब्राह्मनी आहे हा जो जुना आरोप होता तो सत्यात आल्याचे चित्र निर्माण होईल. हमो हरले तर हुतात्म्याची माळ गळ्यात आहेच...एकून काय...हमो प्रसिद्ध (वा कुप्रसिद्ध) राहनारच!
  6 hours ago · like · 2

  Vijay Tarawade पु भा भावे अध्यक्ष असताना झालेले संमेलन आठवले
  6 hours ago · like · 1

  Rajendra Bapat हो ना. केव्हढा तो "गवगव्वा" पु भा भाव्यांच्या वेळी. असल्या "सोबती"संगतीमुळे "बेहरं" व्हायची वेळ आली असणार.
  6 hours ago · like · 1

  Anagha Lele साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाने काहीतरी कार्य करणे, काही विचार देणे अपेक्षित असते (ते तसे करत नसले तरीही), त्याचे अध्यक्षीय भाषण हा संमेलनाचा एक महत्त्वाचा भाग असतो, त्यामुळे त्याचा/तिचा राजकीय विचार काय आहे हे महत्त्वाचेच आहे...केवळ पूर्वी काही चांगले लिहिले आहे म्हणून आजच्या राजकीय भूमिकेकडे काणाडोळा करणे ही गोष्ट चूकच आहे. बाकी पूर्वी छुपं असलेलं असं उघड व्हायला लागलं हे चांगलंच झालं..
  5 hours ago · Like · 1

  FROM:FACEBOOK

  ReplyDelete
 4. Rajendra Bapat दत्तू बांदेकरांनंतर प्रवीणरावांनी विनोदातला षटकार मारलेला आहे :)
  18 hours ago · like · 3

  स्वाती ठकार ‎Anant Ghotgalkar-एजी .मी त्यांचं रससिद्धांतावरच विवेचन ऐकलं होतं . साधी सोपी भाषा ,सिद्धांत खूप छान उदाहरणानी उलगडून दाखवला होता .आधुनिक कवितेवरपण खूप सुंदर आणि तटस्थ विवेचन केलं होतं .☺☺☺
  17 hours ago · like · 2

  Ashok Thorat किर्लोस्करचे संपादक म्हणूनही त्यांचे योगदान खूप मोठे आहे पण ' घरदार ' बुडाल्यानंतर मिलिंद रत्नपारखी यांना अश्लील ' हैदोस ' काढावा लागला त्याचे काय ?
  16 hours ago · like · 2

  Vinayak Kalmundikar काही झाले कितीही इतरांना वाईट/ चुकीचे वाटणारे वागले तरी 'निष्पर्ण वृक्षावर ..,काळेशार पाणी' सारख्या कलाकृतींसाठी त्यांना शेकडो गुन्हे माफ !
  कलाकृती महत्वाच्या कलाकार नाही !
  9 hours ago · Like · 1

  Rajendra Bapat बालकांड सुद्धा.
  9 hours ago · Like · 1

  Pravin Bandekar मराठीत कार्पोरेट जगातल्या ताण्याबाण्यांवर, मार्केट कल्चरवर फार कमी लिहिले गेले आहे. ह०मो०नी हे विषय हाताळणा-या काही चांगल्या कथा लिहिल्या आहेत. खरं तर, "निष्पर्ण वृक्षावर...", "काळेशार पाणी", "बालकांड", आणि या कथा ह०मों०ना बाकीच्या गोष्टींपेक्षा अधिक विश्वासार्ह वाटायला हव्या होत्या...
  7 hours ago · like · 3

  Vijay Tarawade या संमेलनात समजा हमो निवडून आले पण ब्रिगेडींच्या विरोधामुळे संमेलनाला गेले नाही तर सातारा (आनंद यादव) आणि या संमेलनाचा पायंडा म्हणून इथून पुढे बिन अध्यक्षाची संमेलने भरवायची प्रथा पडली तर धमाल... दर वर्षीचा हा तमाशा थांबेल.
  6 hours ago · like · 2
  FROM:FACEBOOK

  ReplyDelete

 5. Bipin Karyakarte Khare aahe!
  18 hours ago · like · 1

  Rajendra Bapat बाकी घोटगळकर एसवाय टीवायला असताना आम्ही या जगात यावे की नाही याचा विचार करतच होतो हे येथे नंब्रपणे नमूद करतो ;-)
  18 hours ago · Edited · like · 6

  Anant Ghotgalkar देवा या साऱ्याशी संबंध नसणाऱ्या ब्राह्मणांना ह. मो.न्पासून वाचव.
  18 hours ago · like · 4

  Vijay Tarawade गंमत अशी की हमोंनी आयुष्य वैयक्तिक पातळीवर वेचून वेचून ब्राह्मणांवर टीका करण्यात व्यतीत केलं. ती यादी भयानक आहे.
  18 hours ago · like · 1

  Rajendra Bapat ‎>>>>देवा या साऱ्याशी संबंध नसणाऱ्या ब्राह्मणांना ह. मो.न्पासून वाचव. <<<<<
  मराठ्यांना ब्रिगेडीपासून वाचव. मुसलमानांना अल कायदा पासून वाचव. हिंदू धर्माला जातिविद्वेषापासून वाचव. जगाला धर्म नावाच्या गोष्टीपासून वाचव. आणि लाष्ट बट नॉट द लीष्ट बर्का देवा, मानवजातीला तुझ्या नावाच्या बाजारावरून वाचव.
  18 hours ago · like · 15

  Anant Ghotgalkar थप्पड हा टायपो आहे खप्पड असे वाचावे ,चेहरा थप्पड कसा होईल?
  18 hours ago · like · 6

  स्वाती ठकार हमोनी ब्राह्मणांच्या समर्थनार्थ बरीच पुस्तकं लिहिली आहेत .दोन पुस्तकं माझ्याही संग्रही येऊन पडली आहेत .ती वाचताना त्यानी लावलेला विशिष्ट रंगाचा चष्मा ठळकपणे दिसून येतो .☺☺☺
  18 hours ago · like · 3

  Rajendra Bapat त्यांचं तिसरं पुस्तक येऊ घातलंय् म्हणे : "ह मोंना किती झोडपणार ?"
  18 hours ago · like · 8

  Anant Ghotgalkar आम्हाला ह मो आवडतात ते त्यांच्या पहिल्या काही पुस्तकांमुळे.ही निवडणूक लढवणाऱ्यान्मध्ये ते साहित्यिक म्हणून मला उजवे वाटतात पण हे त्यांनी भलतेच काढले
  18 hours ago · like · 3

  Rajendra Bapat ‎"साहित्यिक म्हणून मला उजवे वाटतात" या वाक्यात अनंतरावांनी श्लेष साधलेला आहे :)
  18 hours ago · like · 7

  Vijay Tarawade हमो लेखक म्हणून चांगले आहेतच. ते नुसते देखील सहज आले असते. आणि हरले असते तरी त्यांच्या साहित्यिक मोठेपणाला बाधा येत नव्हती. हा वाद आणून त्यांनी काय मिळवले.
  18 hours ago · like · 4

  Anant Ghotgalkar You are impossible,Rajendra! :-)))
  18 hours ago · like · 1

  Rajendra Bapat ‎>>>>>You are impossible,Rajendra! :-))) <<<<

  "काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका, विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
  18 hours ago · like · 4

  स्वाती ठकार साहित्यिक म्हणून जर काही मत द्यायचं झालं तर ते मी नागनाथ कोत्तापल्लेना देईन...कारण त्यांची समीक्षेची जाण आणि शिकवण्याची पद्धत खूप छान आहे .त्यांची पुस्तकंही छान वाटली ☺☺☺
  18 hours ago · like · 1

  Anant Ghotgalkar रागावू नका स्वाती ,समीक्षेचे बरोबर आहे पण शिकवण्याची पद्धत ?
  18 hours ago · like · 2

  Pravin Bandekar जात दाखवून अवलक्षण...!
  18 hours ago · like · 9
  FROM:FACEBOOK

  ReplyDelete
 6. Anant Ghotgalkar:
  ६८ च्या सुमारास आम्ही एस वाय की टी वाय ला असताना ह .मो. मराठे राजाराम मध्ये बहुधा कुठली तरी फेलोशिप मिळून मराठीचे प्राध्यापक म्हणून आले होते.उंच,गोरे,नाकेले,देखणे आणि तरुण !त्यांच्याकडून शिकलो नाही तरी आकर्षण वाटे त्यांच्याबद्दल.निष्पर्ण वृक्षावर ..,काळेशार पाणी वगैरे नंतर आले.आज त्यांचा वयोमानाने थप्पड झालेला चेहरा पाहून जितके वाईट वाटले त्यापेक्षा जास्त वाईट साहित्यबाह्य विषय आपण मतदारांना लिहिलेल्या पत्रात आणला याचे न पटणारे समर्थन करताना त्यांना पाहून झाला.
  like · · Share · 19 hours ago ·
  You, संभाजी सावंत, Sudhakar Jadhav, Sanjay Sonawani and 19 others like this.

  Rajendra Bapat Political Suicide अशी एक संज्ञा अस्तित्वात आहे. हमोंनी केली ती साहित्यिक किंवा सांस्कृतिक आत्महत्या म्हणावी काय.
  19 hours ago · like · 9

  Vijay Tarawade हमो अतिशय चतुर आहेत. चुकून पराभव झाला तर जातीसाठी मी पराभव पत्करला असे हौतात्म्य ते मिरवतील.
  18 hours ago · like · 3

  Rajendra Bapat ते सगळं ठीक आहे. पण साहित्यिक म्हणून (उरलीसुरली) विश्वासार्हता संपली. अत एव साहित्यिक आत्महत्या. बाकी त्यांनी जातीची राजकारणं खुशाल करावीत.
  18 hours ago · like · 4
  FROM:FACEBOOK

  ReplyDelete
 7. FROM:FACEBOOK:
  Rajendra Bapat:
  ‎"राजकीय विचाराने प्रेरित झालेली अध्यक्षीय भूमिका" या संदर्भात मी परवाच असं म्हण्टलं होतं की :

  विद्रोही कवी आपल्या कवितेतून विद्रोह व्यक्त करतो आणि त्याचं वाचन संमेलनात करतो तेव्हा ते राजकीय विधान असतं. दुर्गा भागवत आणिबाणीचा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात निषेध करतात तेव्हा ते राजकीय विधान असतं. वारकर्‍यांच्या दबावापुढे मान्यवर साहित्यिक मान तुकवतात तेव्हा तेही एक राजकीय विधान मानायला हवं. मराठी भाषेच्या सद्यस्थितीबद्दलची चिंता, राज्यकर्त्यांची अनास्था आणि व्यापक चळवळीची गरज व्यक्त करणं हे भाषेच्या राजकारणाच्या संदर्भातलं राजकीय विधान आहे. "लेखण्या मोडा आणि शस्त्रे हातात घ्या" हे सावरकरांचं साहित्य संमेलनातलं विधान अर्थातच राजकीय विधान होतं.

  मलासं वाटतं साहित्य संमेलनात राजकीय हेतू असतात हा दोष नसून, गढुळलेलं, स्वार्थी , संकुचित राजकारण केलं जातं (ज्यात जातीयता हा विषारी घटकही आला) हा शाप मानायला हवा. अन्यथा साहित्यिकांनी राजकीय भूमिका सोडून केलेल्या वक्तव्यांना साबणाच्या बुडबुड्यांपेक्षा अधिक किंमत रहात नाही.

  ReplyDelete
 8. from:facebook...
  Chandrakant Puri:
  प्रिय प्रा. हरी नरकेजी, ह. मो. मराठे यांच्या साहित्यातील जातीय वादाची निंदा करून समस्त मराठी साहित्याची आपण सेवाच केली आहे. आपले जाहीर अभिनंदन.

  ReplyDelete
 9. FROM:Facebook...
  Balasaheb Magade: सर आपले मत एकदम बरोबर आहे...जातीचे भांडवल करून यश मिळवणे कोणालाही सहजशक्य आहे... ह. मो. यांच्या साहित्याचा मी एक वाचक आहे.. त्यांचे `निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी` हे पुस्तक मी अजूनही विसरलो नाही..ह. मो. जातीच्या आधारे स्वताची भूमीका ठरवत असतील तर आमच्या सारख्या नव्या पिढीने कोणाला आदर्श मानावे..? जात विध्वंसनाची लढाई लढायची कशी आणि कोणाचे विचार पुढे ठेऊन..? साहित्य हे माणसाला घडवते हे खरे आहे.. हे मी स्वता अनुभवतोय.. मग साहित्यिकच असे वागले तर आम्ही आमच्या भूमिका कशा स्पष्ट करायच्या...????

  ReplyDelete

 10. From:Facebook.........
  Narendra Chitte, Savita Mohite, Balkrishna Renake and 3 others like this.

  Sanjay Sonawani: ह. मो. अत्यंत लबाड, धुर्त आणि कट्टर जातीयवादी माणुस आहे.
  13 hours ago · like · 3

  Abhiram Dixit: ह मो चे पत्रक जालावर उपलब्ध आहे काय ?

  ReplyDelete
 11. FROM:Facebook.................

  Raosaheb Borade
  सध्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्येक्ष पदाच्या निवडणुकीची ' धुळवड' सुरु आहे .कोण कोण खेळायला येतंय? लाज सोडून खेळायला या
  Like · · Share · 3 hours ago ·
  23 people like this.

  Shankar Patil pan dhulavad gothyat tar khelat nahit na he lok
  3 hours ago · Like

  Mahesh Haul Patil लाज ही वेशीला टांगण्याची एकमेव गोष्ट आहे.आणि हल्ली नामवंत साहित्यिकांत तर स्पर्धाच लागलीय...कोण जास्त उंचीवर टांगतो याची.,..
  3 hours ago · Like · 1

  Kishor Bhagwat " Nirlajjam sadaa sukhi ". Sharam sharam k sharam pe sharme, sharam pe sharamna bhi ek sharam hai, sharam sharam pe sharam par na sharme, meri najar me vo besharam hai
  3 hours ago · Like

  Rajendra Holkar वेशी ढसाळल्या लाज टांगणार्या मूळे
  3 hours ago via mobile · Like · 1

  Kiran Dhanedhar सर
  साहित्य क्षेत्रातील या पदावर जाण्यासाठी निर्लज्ज व्हावे लागते? हे आपल्याकडुन आज कळलं अवघड आहे
  2 hours ago via mobile · Like

  Kiran Dhanedhar सर
  साहित्य क्षेत्रात हे काय चाललंय
  2 hours ago via mobile · Like · 2

  Kiran Dhanedhar आमच्या सारख्या वाचकांनी काय आदर्श घ्यावा

  ReplyDelete
 12. from:facebook..........
  September 5 at 8:32pm · Like

  Dr.Shridhar Pawar denial to politics is also politics ... literature is intend to establish humanity
  September 5 at 9:00pm · Like · 2

  Avit Bagle Dont waste public money on such things. instead give scholarships to writers from rural area.
  September 5 at 9:36pm · Like

  Malhar Patil good writer is always seriously aware of politics - but it dsn't mean he should speak on d behalf of any political party or system.
  September 5 at 10:38pm · Like · 1

  Shridhar Tilve he avadle mala
  September 5 at 10:53pm · Like

  Satish Laxman Chaphekar ksli sanskruti he sagle 10% quota vale.......fayda uptnare........manun apley kade 'jadtik' darjache shity niirman hoot nahi 'agatik' darjache hote samjle................
  Thursday at 5:54am · Like

  Chandrakant Patil प्रविण,
  तुम्हाला कळायला उशिर झाला़़
  ज्यावेळी साहित्यिक म्हणून पुढे येण्याची गरज असते तेंव्हा हे शेपूट घालून बसतात
  राज ठाकरे ज्यावेळी परप्रांतियानां धमक्या देतो तेंव्हा "अपवाद वगळता" मराठी साहित्यिक घाबरतात
  कसले साहित्य अन् काय?
  रद्दीवाले़ ़ !!!
  Thursday at 7:57am via mobile · Like · 1

  Shailendra Tambe sarvasamaveshak sahityasameelan houch shakat nahi.karan konti sahitya mulya jopasavit he hitsamdhanvar jast avlambun astat. sir,vidrohinbaddal tumche mat kay?
  Thursday at 9:01pm · Like

  Hari Narke sampurna sahamat.
  Friday at 11:03am · Like

  Suresh Naik hey kalanyasathidekhil sammelananchi Awashyakala aahe.
  Friday at 11:12am · Like

  Yogesh Mahale mi tumchya matashi sahmat aahe sir
  Friday at 2:51pm · Like

  Harishchandra Thorat निव्वळ साहित्य म्हणजे काय हे नीट समजले नाही. आपल्या समाजामध्ये जातिव्यवस्थेला महत्त्वाचे स्थान आहे आणि उत्तरोत्तर ते वाढत चालले आहे. अशा परिस्थितीत साहित्यव्यवहार, त्याचे संस्थात्मक अंग धरून, जातिव्यवस्थेपासून वेगळा ठेवता येणार नाही. सर्वव्...
  See More
  Yesterday at 11:52am · Like · 1

  Rajendra Mundhe apalya matashi sahamat ahot

  ReplyDelete
 13. FROM:FACEBOOK.........
  Ram Buran Nice one
  September 5 at 2:35pm · Like

  Sukhadev Kolhe real sir
  September 5 at 3:02pm · Like

  Siddharth Gamare बरी उपरती झाली.
  September 5 at 3:23pm · Like

  Sudam Rathod tarihi..to..ek..sahity..vyavahar..aahe
  September 5 at 3:27pm · Like

  Siddharth Gamare साहित्य व्यवहार नव्हे धंदा/राकारण/संस्कृतीकारन आहे.
  September 5 at 3:29pm · Like

  Rajendra Bapat जातीय विचाराने प्रेरित होऊन काहीही होत असेल तर ते अश्लाघ्य आहे हे मान्य करतो.

  मात्र, "राजकीय हेतूने प्रेरित होऊन केलेलं साहित्यिक संमेलन" या गोष्टीकडे आपण पुन्हा एकदा पाहू. "राजकीय हेतू" या शब्दांकडे त्या शब्दांच्या व्याख्येच्या संदर्भात ...
  See More
  September 5 at 4:32pm · Edited · Like · 2

  Prashant Panwelkar khare ahe
  September 5 at 6:47pm · Like

  Sachin Khutwalkar सावंतवाडीत काही वर्षांपूर्वी 'भरलेल्या' विद्रोही साहित्य संमेलनाला मी आवर्जून गेलो होतो. महाविद्यालयीन जीवन सुरु होते. काही विद्रोही विचार (चiकोरीबाहेरचे या अर्थाने) मिळतील, अशी भाबडी आशा होती. पण अध्यक्ष राजन खान यांचे भाषण वगळता पहिल्याच ...
  See More
  September 5 at 7:21pm · Like · 3

  Malhar Patil agree with u sachin khutwalkar.
  September 5 at 7:41pm · Like · 1

  Pradnya Daya Pawar प्रत्येक लेखक हा राजकारणाचाच लेखक असतो. प्रश्न फक्त इतकाच की तो कोणते आणि कोणाचे राजकारण लिहितो !
  September 5 at 7:50pm · Like · 1

  Pravin Bandekar ‎Rajendra Bapat, आपल्या बहुसंख्य साहित्यिकांकडे राजकीय भान वा भूमिका क्वचितच जाणवते. त्यामुळे, तुम्ही म्हणताय तसे "पोलिटिकल स्टेटमेंट" करण्याची कुवत अनेकांत नसते. मी संमेलनाचे ’राजकीय हेतू’ म्हणतोय ते या अर्थाने नाही. मतांचे राजकारण या अर्थ...
  See More
  September 5 at 7:57pm · Like · 1

  Rajendra Bapat मला तुमचा मुद्दा (मला असं वाटतं ) की समजलेलाच होता. त्याबद्दल मतभिन्नता नाही. मात्र, "समाजाचं प्रबोधन करण्याची गरज आहे" असं जे म्हणतात त्यांचंच प्रबोधन या उपरोक्त "राजकीय" संदर्भात करण्याची गरज इथे अधोरेखित होते आहे - इतकंच माझं म्हणणं.
  September 5 at 7:59pm · Edited · Like

  JayPraabhu Kamble jam majaa......!

  ReplyDelete
 14. FROM:FACEBOOK:
  PRAVIN BANDEKAR:
  काही कळत नव्हते त्या वयापासून मी निव्वळ साहित्याच्या ओढीने अनेक प्रकारच्या साहित्य संमेलनांना पदरमोड करून एक साहित्यप्रेमी म्हणून गेलो आहे. अनेकदा आमच्या गावात न मिळणारी विविध प्रकाशनांची पुस्तके संमेलनाच्या स्टॉलवर पाहायला मिळायची, म्हणूनही गेलो आहे. पण हळूहळू लक्षात येत गेले की, संमेलनाचे नाव काहीही असो, बहुतेक संमेलने ही जातीय आणि अंतिमत: राजकीय हेतूंनी प्रेरित आहेत. जातिनिहाय भरवली जाणारी जवळपास सगळी संमेलने (साहित्य संमेलनांसकट) तर अनेकदा थेटपणे विशिष्ट राजकीय पक्षांशी संबंधित असतात. अशा संमेलनांत सहभागी होणारे संभावित साहित्यप्रेमी, लेखक-वाचक अनेकदा साहित्यप्रेमापेक्षा साहित्यबाह्य कारणांनीच त्यात सहभागी होतात असेही लक्षात येत गेले. काही विशिष्ट भूमिका, विचारसरणी (उदा० फुले-आंबेडकरी विचार, हिंदुत्ववादी विचार, सम्यक विचार इ०) घेऊन भरवली जाणारी संमेलनेही मूलत: विशिष्ट राजकीय विचारांनाच बांधिल आहेत, असे दिसते. यातील काही तर निव्वल आपल्या विरोधी विचारांवर चिखलफेक करणारी, जातीयतेला खतपाणी घालणारीच असतात. आखिल भारतीय संमेलनाचे व्यासपीठही यापासून वेगळे आहे, असे म्हणता येत नाही. कौतिकराव ठाले पाटलानी एक पुस्तक लिहिले आहे, "संमेलनाच्या मांडवाखालून" ते वाचताना किंवा अनेक संबंधितांशी बोलताना ’आपली माणसे’ निवडून यावीत म्हणून काय काय केले जाते ते कळून येते. आणि एकूणच आपल्याकडे वाचनसंस्कृती का रुजली नसावी त्याचे आणखी एक कारण सापडते. निव्वळ जगभर संमेलने भरवली आणि जाहिराती घेऊन शेकडो दिवाळी अंक छापले म्हणजे मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती टिकेल, असे कुणीच शहाणा माणूस म्हणणार नाही.
  Unlike · · Unfollow Post
  You, Sanjay Ingle Tigaonkar, Sharad Ashtekar, Sunjay Awate and 51 others like this.

  Vikas Gawade U are right sir.
  September 5 at 12:56pm via mobile · Like · 1

  Bhausaheb Chaskar मी तुमच्या मताशी अगदीच सहमत आहे. संमेलनाचे सोहळे म्हणजे एक उत्सव, या पलीकडे त्याचे महत्त्व काय आहे? आणि पुन्हा असे आहे ना की, आपले सगळे जगणे आहे ना त्याच्या प्रत्येक अंगाला राजकारण स्पर्श करीत नाही असे उरलेय काय? घरी दारी इच्छा असो नसो... वाट्याला आलेय त्याला सामोरे जावे लागतेच लागते.
  September 5 at 1:01pm · Like · 2

  Abhiram Damodar Bhadkamkar खरंय प्रवीण, साहित्य संमेलन निखळ साहित्यावर असणारया प्रेमातून भरायला हवीत... "आपला माणूस" या भावनेने झाले तेवढे समाजाचे आणि साहित्याचे नुकसान पुरे झाले... आणि राजकारणाने तर खेल्खान्डोबच केलाय सगळ्याचा. साहित्यिक ओढ हा तू वापरलेला शब्दच योग्य आहे, ती नसेल तर पदरात काही वाद, काहींचं मिरवणं आणि (दर वर्षी जसं मुंबईत ला पावसामुळे वाहतूक ठप्प होते तसा) दरवर्षीचा एक उपचार इतकीच या सामेलानांची किमत राहणार.
  September 5 at 1:38pm · Like · 1

  Pramod Koyande Pravinji,Sahitya sammelanachya navakhali honare Utsavi sohale bandach vhayala hawet. Vachansanskruti vadhis lagnyasathi te kahi upyogache nahit. Sahityaprmini milun kahitari marg kadhayala hawa..
  September 5 at 2:15pm · Like

  Pramod Munghate khare aahe............
  September 5 at 2:17pm · Like

  ReplyDelete
 15. You, Mandar Ranade and Sandesh Purohit like this.

  Savita Mohite HMO NISHEDH.
  4 hours ago · Like

  FROM:FACEBOOK.......
  Sandesh Purohit ATISHAY SUNDAR
  4 hours ago · Like

  Mandar Ranade हमो मराठे यांचा धि:क्कार असो...
  4 hours ago · Like

  Ravi Bansode NISHED NISHED NISHED

  ReplyDelete
 16. श्री. हरी नरके, तुम्ही थोर विचारवंत आहात. इतिहासलेखक आहात. ठाकरे घराण्याबद्दल ते बिहारचे की महाराष्ट्रातील हा वाद सध्या गाजतोय. दिग्विजयसिंगांनी ठाकरे कुटुंब बिहारमधील असल्याचे पुरावे दिले आहेत. ठाकरे बंधू म्हणतात, आम्ही महाराष्ट्रातलेच आहोत. कृपया तुम्हीच यावर प्रकाश टाकावा. - अंजली बर्वे.

  ReplyDelete
 17. श्री. हरी नरके, तुम्ही थोर विचारवंत आहात. इतिहासलेखक आहात. ठाकरे घराण्याबद्दल ते बिहारचे की महाराष्ट्रातील हा वाद सध्या गाजतोय. दिग्विजयसिंगांनी ठाकरे कुटुंब बिहारमधील असल्याचे पुरावे दिले आहेत. ठाकरे बंधू म्हणतात, आम्ही महाराष्ट्रातलेच आहोत. कृपया तुम्हीच यावर प्रकाश टाकावा. - अंजली बर्वे.

  ReplyDelete
 18. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 19. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 20. FROM:FACEBOOK:...........
  Savita Mohite, Mandar Ranade and 9 others like this.

  Abhiram Dixit: प्रतिगामी शक्ती हातमिळवणी करतात का ? हा संशय रास्त वाटला. ब्रिगेडचा बागुलबुवा दाखवून ब्राह्मण संघटन आणी त्यातूनच्या निवडणुका - त्यातून पुन्हा ब्रिगेडला मिळणारे बळ. हे दुष्टचक्र कधी संपणार ? कुणास ठाउक ? पण हमो च्या पत्रकाच निषेध.

  ReplyDelete
 21. From: facebook............
  Bhim Phule, Sharadchandra Kharat and 20 others like this.


  Balasaheb Magade: सर आपले मत एकदम बरोबर आहे...जातीचे भांडवल करून यश मिळवणे कोणालाही सहजशक्य आहे... ह. मो. यांच्या साहित्याचा मी एक वाचक आहे.. त्यांचे `निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी` हे पुस्तक मी अजूनही विसरलो नाही..ह. मो. जातीच्या आधारे स्वताची भूमीका ठरवत असतील तर आमच्या सारख्या नव्या पिढीने कोणाला आदर्श मानावे..? जात विध्वंसनाची लढाई लढायची कशी आणि कोणाचे विचार पुढे ठेऊन..? साहित्य हे माणसाला घडवते हे खरे आहे.. हे मी स्वता अनुभवतोय.. मग साहित्यिकच असे वागले तर आम्ही आमच्या भूमिका कशा स्पष्ट करायच्या...????
  Saturday at 8:58pm · Unlike · 2

  Avinash Chilekar: HARIJI, HI JATIVADCHI KID itkayt SAMPANAR NAHI, karan sumbha jalala tari PIL kayam aashe

  ReplyDelete
 22. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 23. please see following

  http://sanjaysonawani.blogspot.in/2010/10/blog-post_14.html

  ReplyDelete
 24. HI ALL

  My Account was hacked, if some illegible content published by name then please ignore this contents

  ReplyDelete
 25. मी मुद्दाम हमोचे मूळ पत्र मिळविले व पुर्ण वाचले. हमोनी जातीय प्रचार केला असे मला तरी वाटत नाही. या पत्राला जातीय रंग देण्याचा प्रयत्न मात्र चालू आहे. 1995 च्या निवडणुकीत शरद पवार प्रचार सभेत "जोशी-महाजनांचे राज्य चालेल का ?" असे विचारीत होते. हा जातीय प्रचार नव्हता का ? जोशी मुख्यमंत्री झाले पण भाजपाने मात्र बहुतेक ओबीसींनाच पदे दिली होती हे मात्र सोयिस्करपणे विसरले जाते ! हमोना खरेतर आपण ब्राह्मणांची बाजू घेवून जे लेखन केले आहे त्याचाच अप-प्रचार होइल याची भीती वाटत होती व म्हणून त्यांनी सविस्तर लिहिले होते. आज नेमकी तीच भीती खरी ठरली आहे व एकजात सर्व ब्राह्मण व्देष्ट्यांना अनायसे कोलित मिळाले आहे !

  ReplyDelete
 26. कुंजीराच्या लेखावरील आपल्या प्रतिक्रियेला भरभरून प्रतिसाद दिला ते सर्व वाचक हमोंच्या प्रचारपत्रकाबद्दल मूग गिळून का आहेत?

  ReplyDelete