एक अविस्मरणीय प्रकाशन समारंभ
"संयत, स्फोटक नी श्रेष्ट आत्मचरित्र : गाणाराचे पोर"
- मेघना पेठे
मी आजवर पुस्तकांचे असंख्य प्रकाशन समारंभ पाहिले, परंतु यासम हाच! एखाद्या मैफिलीसारखा २ तास उमलत,फुलत गेलेला समारंभ आज मी पुण्यात नुक्ताच पाहिला.लेखक, समिक्षक आणि प्रमुख पाहुणे यांचे तिघांचेही गोळीबंद विचार, अभ्यासपूर्ण भाषणे आणि आत्मचरित्राचे उत्स्फुर्त आस्वादन असलेला सुरेल मैफिलीचा हा अनुभव खरंच फार वेगळा होता.
एस.एम.जोशी फौंडेशन सभागृहात आज सायंकाळी ६.१५ ते ८.१५ मुंबईच्या येशू पाटील यांच्या शब्द पब्लिकेशनने हा कार्यक्रम आयोजित केला होता.कार्यक्रमाला तमस या हिंदी कादंबरीचे लेखक भीष्म सहानी तब्बेत बरी नसल्याने येऊ शकले नाहीत. भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांचे पुत्र राघवेंद्र जोशी यांच्या" गाणाराचे पोर" या आत्मचरित्राचे प्रकाशन ओसंडून वाहणार्या भरगच्च उपस्थितीत पार पडले.जागतिक किर्तीचे पं. भीमाण्णा जोशी यांच्या पहिल्या उपेक्षित पत्नीच्या मुलाची ही कैफियत आहे. यावेळी ख्यातनाम कथा नी कादंबरीकार मेघना पेठे यांचे झालेले भाषण अप्रतिम होते, त्या म्हणाल्या, " हे पुस्तक विलक्षण वाचनीय आहे. असे संयत,स्फोटक नी श्रेष्ट पुस्तक लिहिल्याबद्दल मला लेखकाची असूया वाटते. इतके चांगले मी नाही लिहू शकणार.भारतीय विवाह संस्थेने गर्भाशयाचे आरक्षण करण्यासाठी लग्नाची पद्धत निर्माण केली.आज कर्तबगार स्त्री एकटी राहू शकते,पण पुरूष नाही एकटा राहू शकत.जुन्या काळात स्त्रियांना पतीशिवाय पर्यायच नसायचा. कालचा तो जेव्हा दुसरीकडे जायचा तेव्हा पहिल्या पत्नीच्या व तिच्या मुलांच्या वाट्याला नेमके काय यायचे याचे एका धॄव बाळाचे विलक्षण जखमा करणारे चित्रण या पुस्तकात आहे."
मेघना पेठे लिहितात छानच पण बोलतातही अप्रतिम. त्यांचे सगळे भाषण हा एक अनुभव होता. ह‘टस ओफ मेघना पेठे. यावेळी लेखकाने केलेले प्रास्ताविक भारावून टाकणारे होते. त्यांनी पुस्तक लेखनामागची पार्श्वभुमी मांडली.कोणतीही कटूता नसलेले हे भाषण चटका लावणारे होते.
प्रसिद्ध समिक्षक प्रा. हरिचंद्र थोरात यांनी या ग्रंथाचा करून दिलेला प्रदीर्घ परिचय अभ्यासपूर्ण आस्वादक भाषणाचा उत्कृष्ट नमुना होता. आता हे पुस्तक वाचल्याशिवाय पर्याय नाही.
संयोजक-प्रकाशक येशू पाटील यांनी स्वागत केले. विनिता आपटे यांनी सुत्रसंचालन केले आणि आभार मानले.कार्यक्रमाला शंकर सारडा, मुकुंद टांकसाळे, गिताली विम, ज्ञानदा देशपांडे आणि इतर असंख्य मान्यवर उपस्थित होते.

No comments:
Post a Comment