मराठीत आजवर "सूप वाजले" म्हटले जायचे, कालपासून मात्र "सूप गाजले" किंवा "सूप पाजले","सूप काढले" असा शब्दप्रयोग चर्चेत आला आहे.
मुळात "सूप" हा इंग्रजी शब्द असावा असे आपल्याला प्रथमदर्शनी वाटते. मात्र हा चक्क संस्कृत शब्द आहे. हा शब्द महाभारतात आलेला आहे. त्याकाळातील मांसाहारी सूप दूरदूरवर प्रसिद्ध असल्याची नोंद महाभारतात आलेली आहे.सूप काढणारांनी सूपावरून आपल्या "संस्कृतीचीच" ओळख करून दिली असेच म्हणायचे का?

..........
कृपया महाभारताचे शांतीपर्व वाचावे. " त्याच्या २९ व्या अध्यायात रंतिदेव ह्या अतिथ्यशील राजाच्या आठवणी ऋषींनी काढल्या आहेत.त्याच्या खानावळीत दूरदूरहून लोक जेवायला येत असत. त्याच्याकडचे मांसाहारी भोजन लोकांना खूप आवडत असे. एकदा रात्री अचानक खूप ब्राह्मण जेवायला आले.तेव्हा त्यांना नम्रपणे सांगण्यात आले की आता मांसहारी जेवन संपले आहे. कृपाकरून सुपावरच भागवून घ्या."...{संदर्भ: महाभारताची चिकित्सक आवृत्ती, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, १९७४, खंड तिसरा, शांतीपर्व, अध्याय २९ वा, श्लोक:१२०,} सदर श्लोक पुढीलप्रमाणे आहे."सूपभूयिष्ठमश्रीध्वं नाद्य मांसं यथा पुरा!!"
No comments:
Post a Comment