Monday, April 28, 2014

त्यातल्याच रद्दीची जगातल्या १०० भाषात भाषांतरे होणार ?

  • FROM:Prof. Satish Waghmare's Timeline
    Satish Waghmare
    खेळ जा.फे.मा. २०१४. अंक प्रकाशित झाला . संपादकीय मध्ये मंगेश काळे यांनी फार महत्वाचे प्रश्न उपस्थित केलेत . आवर्जून वाचावे , विचार करावे असे काही प्रश्न.
    मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी सरकारदरबारी चाललेली लगबग , अभ्यासगटाची निरीक्षणे , किंवा प्रस्थापित गटाच्या छुप्या अपेक्षा. यावर बोट ठेवताना ते म्हणतात . भारत सरकारकडून मराठीच्या विकासासाठी , संवर्धनासाठी दरवर्षी फार मोठा आर्थिक निधी मिळू शकेल . इतरही जे काय ‘अभिजात’तेचे फायदे असतील ते पदरात पडतील . महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ , भाषा संचलनालय , राज्य मराठी विकास संस्था , मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्या आजवरच्या कार्याचा लेखाजोखा मांडत ते म्हणतात या संस्थांवर वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेल्या तथाकथित मान्यवरांनी आपसात रमणा (शासनाचा निधी ) वाटायचा , पुरस्कृत करायचे , ग्रंथ खरेदीच्या वेगवेगळ्या योजनांमधून निवडक लेखक प्रकाशकांची टुकार पुस्तके खपवायची , नि झालंच तर काही नवी रद्दी छापून जुनी करायची . महाराष्ट्र देशीच्या पुरस्काराची गंमत सांगताना ते म्हणतात “वाचणाऱ्याची रोजनिशी नामक बुकाची महती अशी की या एकाच बुकास तीन पुरस्कार वेगवेगळ्या वाड.मय रुपात मिळाले. महाराष्ट्र फौंडेशनकर्त्यांना हे पुस्तक अपारंपरिक वाटले तर महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कार समितीला संकीर्ण , अकादमीने तर त्याच्याही पुढची दूरदृष्टी दाखवली . निबंध वाड.मयप्रकारातील हे पुस्तक असल्याचा शोधच या समितीने लावला .
    महाराष्ट्रदेशी अकादमी पासून सगळ्याच घाऊक संस्थांचे टेंडर ‘देशी’ कंपनीकडे असल्याने पुढल्या काळातही अशाच चमत्कारांना भरपूर वाव आहे. तेंव्हा या पुरस्काराचे आपण सगळ्यांनी स्वागतच करायला हवे .
    शेवटी काळे अभ्यासगटाने मांडलेल्या संकल्पचित्रावर लिहितात . अभ्यासगटाच्या , मराठीतले किमान जागतिक दर्जाचे हजार ग्रंथ अनुवाद करण्याच्या मानुब्यावर ते म्हणतात , माय मराठीत किमान एक हजार ग्रंथ ‘जागतिक’ दर्जाचे आहेत हा शोध कुणी व कसा लावला ? म्हणजे प्राचीन अर्वाचीन काळातली शे दोनशे पुस्तके जरी जागतिक दर्जाची गृहीत धरली तरी उरलेल्या ८०० पुस्तकांचे काय ? नि मराठी आधुनिक साहित्याच्या १०० वर्षाच्या कारकिर्दीत जिथे धड १०० पुस्तकं निवडताना दमछाक होते तेथे इतकी शेकड्यानी जागतिक दर्जाची पुस्तके आणणार कोठून ? तर याचाही थोडाफार अदमास हरी नरकेंच्या या लेखात घेता येतो . हरी नरकेंनी त्यांच्या लेखात जागतिक दर्जाच्या लेखकांची नामावली दिलेली आहे . त्यातली मासल्यादाखल काही नावे , शिवाजी सावंत , रणजीत देसाई , कुसुमाग्रज , वि.स खांडेकर , अनिल अवचट , रंगनाथ पठारे , मराठी वाचकांची या लेखकांनी थोडीफार करमणूक ही केली आहे . म्हणून काय हे लेखक जागतिक दर्जाचे आहेत का ? जागतिक तर दूरच मराठीतही हे लेखक धड उभे राहत नाहीत . इतकी हलाकीची परिस्थिती असताना हजार पुस्तकांची खानापुर्ती करण्यासाठी आजवर चमत्कार घडवून जी पुस्तकं गाजवली गेलीत त्यातल्याच रद्दीची जगातल्या १०० भाषात भाषांतरे होणार ?

    एकूणच अभिजातते साठीच्या प्रयत्नात दडलेले हेतू , पुरस्कारांचे राजकारण ,आणि जागतिक होऊ पाहणाऱ्या लेखकांचा दर्जा यावर भाष्य करणारे सडेतोड संपादकीय ! यातल्या प्रश्नांवर चर्चा व्हायला हवी .
     — with Sunil Tambe and 25 others.
    1Like ·  · 
    • Sunil Tambe इंग्रजी भाषेतलं पुस्तक मराठीत अनुवादित झालं की मराठी भाषेचा विकास होतो. मराठीतलं पुस्तक इंग्रजी भाषेत अनुवादित झालं की इंग्रजी भाषेत भर पडते. मराठी पुस्तकांची भाषांतरं इंग्रजी भाषेत करण्यासाठी म्हणजे इंग्रजी भाषेचा विकास करण्यासाठी महाराष्ट्रातल्या करदात्यांचा पैसा का वापरायचा? युनायटेड स्टेटस् इन्फर्मेशन सर्विस ह्या अमेरिकेच्या संस्थेने काही अभिजात अमेरिकन पुस्तकांचं मराठी अनुवाद करण्याचा उपक्रम काही काळ चालवला. त्यावेळी जयवंत दळवी युसीसमध्ये अधिकारी होते. त्यामुळे काही उत्तम ग्रंथ मराठीत आले. पण अमेरिकेलाही मराठी भाषेची सेवा परवडेनाशी झाली. तिथे महाराष्ट्र सरकारने मराठीतले ग्रंथ इंग्रजीत अनुवादित करण्याचा धंदा का सुरु केलाय ते कळत नाही. माय झवा नि सवाशिण म्हणा हे उपद्व्याप कशाला करायचे....मराठी पुस्तकांची एक लाखाची आवृत्ती संपू लागली की झक मारत इंग्रजी प्रकाशक अनुवाद छापायला पुढे येतील. ते पुस्तक अनिल अवचटचं आहे की नेमाडेचं की रणजित देसाई वा शिवाजी सावंतांचं, काहीही फरक पडणार नाही.
    • Rahul Bansode फेसबुकवर कुणितरी लिहणारा पोस्ट टाकतो आणि इतर लेखक त्याला लाईक करतात. मग लाईक करणारा एखादा लिहतो आणि आधिचा लेखक त्याला लाईक करतो. मराठी वाचकवर्ग संकुचित होत होत एक दिवस पुस्तके लिहणार्‍यांच्या संख्येएवढाच उरला तर मग ती अंतर्गत मर्यादा असलेली व्यवस्था बनेल. अपवाद अर्थात नानासाहेब पुरणचुर्‍यांचा. त्यांचा वाचक कधी लेखक बनु शकत नाही. ते एक प्रचंड दिव्य ठरेल आणि त्यामुळेच गणिताच्या नियमाने काही वांगमय प्रकारात वाचकसंख्या हि लेखक संख्येपेक्षा जास्त आहे. कुठल्याही साहित्यात जेंव्हा वाचकांची एकुण संख्या लेखकांच्या एकूण संख्येपेक्षा जास्त असते तेंव्हा ते साहित्य जागतिकचं असते असे माझे मत आहे. नानासाहेब पुरणचुरे, अभिजित साई, द.हा.तु़कडेकर, सुनिल उपदेशकर, नवनाथ चपटे हे सर्व जागतिक दर्जाचेच लेखक आहेत असे मला तरी वाटते.
    • Rajan Sane अगदी खरे आहे.
    • Rajan Sane सविस्तर नंतर लिहितो. 
    • Meera Sirsamkar नंतर येते पोस्टवर ... संध्याकाळी साडेसात नंतर .
    • Manohar Jadhav सतिशराव, तुमच्या चोखंदळ नजरेने संपादकीय मधील कळीचे मुद्दे शोधले आणि विषय चर्चेसाठी खुला केला , बरे केले , नाहीतर लोक बोलत नाहीत , असा अनुभव आहे .
    • Mrinmayee Ranade Deepak Pawar i am sure you have something to say
    • Harshad Sarpotdar वर उल्लेखिलेले सावंत, देसाई, खांडेकर, अवचट, पठारे हे लेखक जागतिक दर्जाचे नाहीत. जीए, पेंडसे नि पुलं सुद्धा नाहीत. मराठी पुरतेच ते ठीक आहेत. एक गो.नि.दांडेकरांचं 'जैत रे जैत' हे पुस्तक मला 'The old man & the sea' शी तुलना करता येण्यासारखं वाटतं. ते जागतिक दर्जाचं म्हणता येईल. बाकी दुसरं पुस्तक आठवत नाही. जोपर्यंत उंबरठ्याच्या आतल्या फालतू गोष्टी नि कादंबऱ्या लिहिल्या जात आहेत तोपर्यंत जागतिक पातळी गाठणं मराठी लेखकांना कठीण आहे.
    • Sunil Tambe जागतिक दर्जा म्हणजे काय, तो कोण ठरवतो वा निश्चित करतो हे मला माहित नाही. जागतिक दर्जा असेल तर देश, राज्य, जिल्हा, तालुका, गाव ह्या पातळीवरचे दर्जेही असायला हवेत.
    • Dinanath Manohar लेखकानं मराठीत लिहून जागतिक पातळी गाठणं कठीणच. त्यासाठी मराठी माणसांमध्ये आपल्या मतांच्या, धार्मिक श्रध्दांच्या विरोधात असलेलं साहित्य वाचण्याची रसिकता, सहसंवेदनशिलता, उदारमती दृष्टिकोन असायला हवा. जीझस ख्राईस्ट आणि मदर मेरी ह्यांच्यातील नात्यावर संशोधन करून कादंबरी लिहिण्याचं धाडस करणारा लेखक आणि त्या विषयावरील पुस्तक वाचणारे वाचक ह्या दोन्हीचा आपल्याकडे वानवा. एक रहस्यकथा हा प्राकर देखील उत्कृष्ट साहित्याच्या पातळीवर जाऊन पोचू शकतो हे आपल्या वाचकाला सोडा, समिक्षकाला तरी पटेल का? मराठीतील अशा अल्पसंख्य अपवाद असलेल्या रसिकांनी रुपांतरीत इंग्लीश साहित्य वाचून समाधानीत व्हावे, रुपांतरकारांनी पारितोषिकं घ्यावीत आणि प्रकाशकांनी भरपुर नफा कमवावा. मराठीतून इँग्रजीत ललित साहित्य रूपांतरीत करण्याचा आतबट्ट्यांचा व्यवहार करायला कोण खिशाला कात्री लावणार. हां, शासनाने अशा काही योजना आणल्या मराठी लेखक, प्रकाशक पुढे सरसावतील.
    • Shailen Bhandare "मराठीतून इँग्रजीत ललित साहित्य रूपांतरीत करण्याचा आतबट्ट्यांचा व्यवहार करायला कोण खिशाला कात्री लावणार?" >> हे फारसे पटले नाही. अगदी 'बनगरवाडी' आणि 'बलुतं'पासून मराठी पुस्तकांचे इंग्रजी अनुवाद झालेले आहेत, होत आहेत. अलीकडचीच गोष्ट घ्यायची तर 'माझा प्रवास' आणि 'कोबाल्ट ब्लू'चा इंग्रजी अनुवाद गेल्याच वर्षी होऊन ते वाखाणलेही गेले आहेत. बाकी वाचनाच्या बाबतीत 'उदारमतवादी' आणि सहसंवेदनाशील दृष्टीकोन असावा हे मान्य.
    • Sunil Tambe विजय तेंडुलकरांची नाटकं अमेरिकेत प्रतिष्ठीत रंगमंचावर सादर झाली होती, चोखंदळ अमेरिकन (अनिवासी भारतीय-मराठी लोकांसाठी नाहीत) प्रेक्षकांसाठी.
    • Balaji Sutar लेखकाचा दर्जा मोजण्यासाठी काही माप असतं काय ? मला परमपूज्य साने गुरुजींनी लिहिलेलं 'श्यामची आई' हे; आणि निशा डंके यांनी लिहिलेलं (अमोल प्रकाशन, सदाशिव पेठ, पुणे  ) "जादूचा पुतळा आणि सुंदर राजकन्या" हे चार रुपयांना मिळणारं पुस्तक जागतिक दर्जाचे वाटतं. आणखी कुणाला किंवा खुद्द मंगेश नारायणराव काळेंना बाबा कदमांचं 'भालू' किंवा रंगराव बापू पाटलांचं 'रानकोंबडी' हे पुस्तक जागतिक दर्जाचं वाटत असेल तर त्यांना येड्यात काढून 'जागतिक दर्जा' ही मराठी साहित्यात काहीतरी लैच दुष्प्राप्य बाब असल्याचे सांगण्याचा असला चावटपणा लोक का करत असतील ?
    • Shailen Bhandare "जागतिक दर्जा म्हणजे काय, तो कोण ठरवतो वा निश्चित करतो हे मला माहित नाही." >> जी कथावस्तू किंवा 'साहित्यिक मूल्ये' देश-काल-भाषा ह्यांचे बंधन तोडून सर्व जगातल्या लोकांना 'हात' घालू शकतात ती 'जागतिक' दर्जाची असे मला काहीसे वाटते. हे कदाचित भाबडे वाटणे असू शकेल, पण आहे! मराठीत अशा प्रकारचे लेखन निश्चितच झाले आहे, ह्या बद्दल दुमत नसावे! पण मराठी साहित्यिकांना आणि साहित्यिक संस्थाना साहित्याचे अर्थकारण नक्की कसे करायचे हे नीटसे माहित नाही, किंबहुना काहीच माहित नाही असे वारंवार दिसून येते. ते अर्थकारण समजून घेण्याऐवजी आणि त्यातून निश्चित होणाऱ्या वाटा चोखाळण्याऐवजी मराठी साहित्यविश्व हे त्याचा एक्झीस्टन्स फक्त 'सब्सिडाइझ्ड' कसं होईल इतकेच बघत आले आहे आणि त्यातूनच ही 'अनुदानाधिष्ठीत' विचारसरणी फोफावली आहे. त्यामुळे एखादी गोष्ट करायची झाली की त्याच्यामागे 'अनुदान' किती असावे ह्यापलीकडे फारसा विचार केला जात नाही! साहित्याचे अर्थकारण मराठीत गांभीर्याने घेतले जाईल तो सुदिन.
    • Vijay Tarawade मराठी भाषेला अभिजात चा दर्जा द्यायचाय की दंभिजात चा दर्जा द्यायचाय
    • Prashant Khandare मास्तरा सुट्टया लागल्या काय??? 
    • Harshad Sarpotdar माझ्या दृष्टीने जागतिक दर्जाच्या पुस्तकाची व्याख्या : 
      'जे पुस्तक कुठल्याही भाषेत सहजपणे भाषांतरीत किंवा रुपांतरीत होऊ शकतं, ज्यातील कथानक (थोड्या फार फरकाने) कुठेही घडू शकतं आणि ज्यातल्या भावविश्वाशी बहुतेक वाचक समरस होऊ शकतात ते पुस्तक.'
    • Avinash Gaikwad <<महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ , भाषा संचलनालय , राज्य मराठी विकास संस्था , मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्या आजवरच्या कार्याचा लेखाजोखा मांडत ते म्हणतात या संस्थांवर वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेल्या तथाकथित मान्यवरांनी आपसात रमणा (शासनाचा निधी ) वाटायचा , पुरस्कृत करायचे , ग्रंथ खरेदीच्या वेगवेगळ्या योजनांमधून निवडक लेखक प्रकाशकांची टुकार पुस्तके खपवायची , नि झालंच तर काही नवी रद्दी छापून जुनी करायची . >>
      - हे तर आत्ताही चालू आहे मराठीला अभिजात दर्जा मिळण्याअगोदर . म्हणून मराठीला अभिजात दर्जा मिळू नये काय ?
      यातला अत्यंत सोपा किंवा कठीण पर्याय म्हणजे योग्य जागेवर योग्य माणसांची निवड होणं . थोडक्यात व्यवस्था परिवर्तन .
    • Avinash Gaikwad रद्दी गाजवायलाही अक्कलहुशारी लागते . मंगेश काळे फारच संशयात्मा आहे ब्वा . 
      आता कुणी असंही म्हणू शकतं की - उत्कृष्ट असणारं मंगेश काळेंना रद्दी वाटेल व रद्दी असलेलं उत्कृष्ट वाटेल . 
      मग आली का पंचाईत . मग आपल्याला रद्दीची व्याख्या नीट करायला हवी .
    • Balaji Sutar 'जागतिक दर्जा' अशी काही स्थिर अवस्था असते काय ? किंवा या दर्जाचे काही कोंक्रीट निकष ? मला वाटतं उत्कृष्ट / सर्वोत्कृष्ट "वाटणं" ही एक सापेक्ष गोष्ट असते. मला जे अत्त्युत्तम वाटेल तेच इतरांनाही वाटेल याची काहीही खात्री नसते. माझ्या आकलनानुसार आजच्या मराठीत रंगनाथ पठारे आणि राजन खान हे लिहिताना अतिशय खोल तळ गाठण्याचा प्रयत्न करतात. 

      अमुक लेखन "आवडलं", "खूप आवडलं", "ठीक आहे" किंवा "अजिबात आवडलं नाही" यापलीकडे दर्जाबिर्जाच्या कुठल्या वैश्विक फुटपट्ट्या लेखनाला लावता येणं कठीण आहे. तुम्ही स्वत: लेखक असा, समीक्षक असा की साहित्याचे डॉक्टर असा; तुमच्या वैयक्तिक आवडीनिवडी तुमच्या दर्जाविषयक मतांनाही प्रभावित करतच असतात. "अमुक पुस्तक मला आवडलं नाही, पण ते निर्विवादपणे श्रेष्ठ आहे." असं म्हणताच येऊ शकणार नाही.
    • Mahendra Kadam charcha havich.pan bhashebaddal neet vichar hawa. prashna fakt anudanacha nahi.bhashecha gambhir vichar vhayaka hawa
    • Avinash Gaikwad Balaji Sutar:<<माझ्या कल्पनेनुसार आजच्या मराठीत रंगनाथ पठारे आणि राजन खान हे लिहिताना अतिशय खोल तळ गाठण्याचा प्रयत्न करतात. >> 
    • Mahendra Kadam abhihat bhashebaddal kuna ekache rajkaran asnyache karan nahi.tukaram marathitch lihit hota.to jagtik zala bhashabhanamule.marathila kami lekhun aplech nuksan aahe.
    • Avinash Gaikwad कुठल्याही भाषेला कमी लेखू नये .
    • Vikas Mohanrao Godage मराठीत म्हणण्यापेक्षा मी म्हणेन मातृभाषेत लिहूनच जागतिक दर्जा प्राप्त शकतो. जागतिक दर्जा म्हणजे जगातील मानवी स्वभावाला सामावून घेणारे साहित्य. स्वभावाला म्हटले कि त्यात संस्कृती परंपरा वैगेरे सगळे आले. मराठी माणूस इंग्रजीतून लिहून जागतिक होवू शकतच नाही. त्याचे साहित्य मराठी संस्न्कृती कि इंग्रजी संस्कुर्ती यात अडकून कुठलेच राहत नाही. तुर्की, रशियन आणि जापनीस लोकांना त्यांचे साहित्य जगात पोहोचवण्यासाठी इंग्रजीत लिहावे लागले नाही. 

      साहित्य म्हणजे फक्त भाषा नव्हे.
    • Hari Narke http://harinarke.blogspot.in/.....
      खेळचे संपादकीय, अभिजात मराठी आणि मराठी साहित्यविश्व
      खेळ या त्रैमासिकाच्या जा.फे.मार्च २०१४ च्या अंकातील संपादकीयात माझ्या अभिजात मराठीवरील लेखाच्या निमित्ताने काही उल्लेख करण्यात आलेले आहेत.त्याबद्दल मी संपादक श्री काळे यांचे आभार मानतो. खेळचे संपादक श्री. मंगेश नारायणराव काळे यांच्या या चार पानी संपादकीय मजकूरात ते नेमके काय म्हणतात, हे त्यांच्याच शब्दात वाचलेले बरे.त्यांनी "भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण - महाराष्ट्र", मुख्य संपादक-गणेश देवी, संपादक -अरुण जाखडे, या पद्मगंधा प्रकाशनाच्या,१७ आगस्ट २०१३ रोजी प्रकाशित झालेल्या ७८४ पानांच्या ग्रंथातील माझ्या लेखाचा संदर्भ दिलेला आहे. या रा‘यल आकारातील ग्रंथातील माझा "मराठी भाषेच्या अभिजात दर्जाविषयी" हा लेख दहा पानांचा आहे. हे दोन्ही लेख, {खेळचे संपादकीय आणि माझा लेख} मुळातून वाचून त्यावरील अभिप्राय आपण द्यावेत अशी विनंती आहे.त्यातून काही सकस चर्चा होऊन पुढे येणारे मुद्दे दिशादर्शक ठरू शकतील...continued on blog...
      harinarke.blogspot.com
      प्राध्यापक - महात्मा फुले अध्यासन,पुणे विद्यापिठ, पुणे, / सदस्य - महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग,
    • Satish Tambe जागतिक दर्जा वगैरे कुणी म्हटले की 'म्हणजे काय ' हा प्रश्न ओघातच सुचतो. त्यात हरी नरके ह्यांनी जी नामावलि दिली आहे ती वाचून तर असे वाटले की असाच काहीतरी जर जागतिक दर्जा असेल तर तो नसला तरी काही फारसे बिघडत नाही असे मराठीतील काही लेखकांना तरी नक्कीच वाटेल. असो. 
      व्यक्तिश: मला असल्या उतरंडीच्या चर्चात फारसे स्वारस्य वाटत नाही . आपल्याच भाषेतील ग्रामीण आणि नागर वातावरणावर लिहिण्यात आलेल्या कलाकृतींची गुणात्मक तुलना करणे अवघड जाते , असा माझा काही वर्षांचा अनुभव आहे. आणि ज्या कलाकृतीत जास्त मसालेदार / बहारदार / आजवर साहित्याच्या वेशीबाहेर ठेवले गेलेले आशयद्रव्य असते ती श्रेष्ठ गणली जाते . तर एकाच भाषेत देखील 'दर्जा ' ठरवणे जिकीरीचे ठरत असताना जागतिक वगैरे कसे जोखणार ? 
      पण जागतिक साहित्य माहित नसताना देखील कोणे एके काळी मला 'जी ए ' हे जागतिक दर्जाचे आहेत असे वाटायचे , फार काय त्यांना 'नोबेल ' देखील मिळू शकते असे वाटायचे.. हे ह्या निमित्ताने आठवले . आणि असे वाटण्याचे कारण हे असायचे की त्यांच्या कथातून जे समोर यायचे ते अखिल मानवजातीला कोणत्याही काळात लागू होईल असे वाटायचे . जे मराठीतील अन्य कुणाच्याही बाबतीत वाटले नाही . थोडक्यात काय तर 'जागतिक दर्जा'चे वगैरे जाऊ दे पण 'मानवी व्यवहारांना कवेत घेणाऱ्या कलाकृती किती असतात ह्याचा वेध घेतला पाहिजे . पण मरठी वचक एकुणातच किती सजग आहेत ?… मी तरी साशंक आहेत. 
      जागतिक पातळीवरचे साहित्य वाचणार्या मंडळीनी खरे तर ह्यावर प्रकाश टाकायला हवा .
    • Avinash Gaikwad 'थोडक्यात काय तर 'जागतिक दर्जा'चे वगैरे जाऊ दे पण 'मानवी व्यवहारांना कवेत घेणाऱ्या कलाकृती किती असतात ह्याचा वेध घेतला पाहिजे . ' - 
    • Sunil Kamble ज्या ठामपणे भाषा साहित्य दर्जा वगैरे वगैरेंविषयी विधान केली जाताहेत, तो आत्मविश्वास जागतिक दर्जाचा नाही का? मराठी साहित्य जागतिक दर्जाचं असूच शकत नाही असं कुणी म्हणत नाहीये हा संयम कौतुकास्पद. एवढं संयम आणि आत्मविश्वास नसल्यानं काही कॉमेंट करायची छाती नाही. एक शंका आहे. मराठी माणूस इंग्रजीतून लिहून जागतिक होवू शकतच नाही, असं असेल तर किरण नगरकर आणि विलास सारंग यांची नावं मराठीतले(च) प्रसिद्ध लेखक आहेत असं मी समजतो.
    • Sunil Kamble 'जागतिक पातळीवरचे साहित्य वाचणार्या मंडळीनी खरे तर ह्यावर प्रकाश टाकायला हवा.' हे खरं. जागतिक म्हणून जे जे पुस्तक गाजतं किंवा गाजवलं जातं ते खरंच थोरच असतं, आणि मराठीत 'तसं' थोर अजिबातच नाही किंवा काय हे कळेल तरी. .
    • Vinayak Ghode गांगरुन टाकतील अश्या जडशीळ जागतिक दर्जाच्या प्रतिक्रीयांची वाट बघतोय.मार्गदर्शनासाठी.वाचत असताना मीच जग असतो.त्यामुळे जे भारी वाटेल ते जागतिक दर्जाचे.सोपंय.माझ्यापुरतं.पण सुनीलसर म्हणाले तसं,जगभरचं वाचणारे यावर अधिक चांगलं सांगू शकतील.
    • Sunil Kamble <गांगरुन टाकतील अश्या जडशीळ जागतिक दर्जाच्या प्रतिक्रीयां> 
    • Satish Waghmare चर्चेचा एकूण रोख फक्त जागतिक या शब्दावर अडकून पडला आहे . तो महत्वाचा असला तरी फार महत्वाचा नाही . श्यामची आई हे भंपक पुस्तक एका बाजूला कुणाला जागतिक वाटू शकते , तसेच आई समजून घेताना हे उत्तम कांबळे यांचे पुस्तकही कुणाला जागतिक वाटू शकते . आपल्या जवळचे जगणे कुणा पुस्तकात किती आलेय . आणि लोकल पुरती मर्यादित न राहता वैश्विक जाणीव कवेत घेण्याची क्षमता कुणा लेखक कवित आहे यावर विचार झालेला नाही . याही पेक्षा जास्त महत्वाचे या स्टेट्स पुरते . इथे मंगेश काळेंनी एकूणच वाड.मयीन दुषित पणावर काही म्हत्वाचे भाष्य केले आहे , त्यावर विचार व्हायला हवा . तो इथे या चर्चेत होताना दिसत नाही . साहित्यबाह्य घटक साहित्यावर कशा प्रकारे प्रभाव टाकतात , आणि त्या प्रभावातून काही सत्वहीन मान्यताप्राप्त म्हणून कसे मिरवले जाते ? गोबेल्स नीतीने कायच्या काय कसेच्या कसे साहित्यिक चमत्कार कसे होतात यावर देखील विचार मंथन व्हायला हवे .
    • Avinash Gaikwad 'गोबेल्स नीतीने कायच्या काय कसेच्या कसे साहित्यिक चमत्कार कसे होतात यावर देखील विचार मंथन व्हायला हवे .'

      - अनुमोदन सतीशराव 
    • Sunil Tambe रविंद्रनाथांनी तुकारामाच्या काही अभंगांचा बंगालीमध्ये अनुवाद केला. हिंदीत अनुवादित झालेले तुकारामाचे अभंग गांधीजींना भावले. म. फुले ह्यांना संतांबद्दल विशेष आत्मीयता नव्हती परंतु अखंडांची रचना करताना तुकारामाच्या अभंगांनुसारच केली. रविंद्रनाथांच्या बंगालीतल्या कविता इंग्रजीमध्ये त्यांनी स्वतःच अनुवादित केल्या त्या इंग्रजी भाषकांना भावल्या. बंकिमचंद्रांची कादंबरी मराठी वा हिंदी भाषेत अनुवादित झाली आणि ती वाचकांनी उचलून धरली. खांडेकरांच्या कादंबर्‍यांचा अनुवाद तमिळमध्ये झाला आणि तमिळ साहित्याच्या इतिहासात खांडेकरांच्या वाट्याला काही पानं आली. मुद्दा साधा आहे, अनुवादित झाल्यावर जे साहित्य परभाषेतल्या वाचकांना आपलं वाटतं असेल ते त्या रचनेशी आपला संबंध जोडू शकत असतील तर ते साहित्यामध्ये नक्कीच असे गुण आहेत की ते विविध भाषेतल्या वाचकांशी संवाद साधू शकतं. हे गुण रुपाचे असतील वा दर्शनाचे (तत्वज्ञान). जवळपास सर्व भारतीय भाषांमध्ये अनुवादित झालेला मराठीतील एकमेव लेखक म्हणजे डॉ. आंबेडकर, हे नेमाडे ह्याकडे नेमाडे सरांनी लक्ष वेधलं आहेच. फणीश्वरनाथ रेणूचा प्रभाव विश्वास पाटलांवर पडतो. पांगिरा वा झाडाझडती ह्या कादंबर्‍या त्यामुळेच त्यांनी लिहील्या असाव्यात. नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांच्या जीवनावरील त्यांनी लिहीलेली कादंबरी बंगाली भाषेत कमालीची लोकप्रिय झाली. सुनील बंदोपाध्याय या बंगालीतील कवी, कथा-कादंबरीकाराने ह्या कादंबरीवर लेख लिहून, बंगाली लोकांच्या काही गंडांना विश्वास पाटलांनी अचूकपणे छेडलं आहे असं प्रशस्तीपत्रक दिलं. परभाषेतील लेखन आपल्या भाषेत अनुवादित होतं तेव्हा आपल्याला त्यातल्या अनेक गोष्टी भावतात. कधी तिथलं राजकीय-सामाजित वातावरण तर कधी नवा घाट तर कधी नवी दृष्टी. उदाहरणार्थ काम्यू, सार्त्र ह्यांच्या लेखनातील घाट आणि दृष्टी मराठीतीलच नव्हे अनेक भारतीय भाषांतील लेखकांना आकर्षित करणारी ठरली. पी.जी. वुडहाऊस आणि जॉर्ज मिकॅशचा विनोद पु. ल. देशपांडे ह्यांच्यावर संस्कार ठरला. डॉन क्विझोट आणि सँको प्लांझा ही पात्रं चिमणराव-गुंड्याभाऊ म्हणून मराठीत विख्यात झाली. नामदेव ढसाळ हा मराठीतला कवी हिंदी कवींना स्फूर्ती देणारा ठरला तो त्याच्या अभिव्यक्तीमुळे आणि आशयामुळेही. नामदेवचं वर्णन विश्वकवी असंही करण्यात आलं. म्हणजे नामदेवच्या कवितेतील विद्रोहाचं नातं जगातल्या विविध संस्कृतीतील विद्रोहाशी जोडण्यात आलं. आणि त्या त्या भाषेतल्या लेखकांना वा कवींनी ते आनंदाने जोडून घेतलं. नामदेवच्या कवितेचा परिणाम कळत-नकळतपणे आपल्यावर होण्यात त्यांना अभिमान वाटला. जेम्स हॅडले चेस, सॉमरसेट मॉम वा सिडने शेल्डन ह्या बाजारू खपाच्या इंग्रजीतील साहित्याचं आकर्षण मराठी, हिंदी, बंगाली इत्यादी भारतीय भाषेतील अनेक वाचकांना आहे. कारण त्या लेखकांनी वाचकाच्या रंजनाचा, करमणुकीचा कोणता तरी घाट वा सूत्र अचूकपणे पकडलं आहे. त्यामुळे जागतिक दर्जा वगैरे चर्चा बाजूला ठेवूया पण मराठीतले कोणते लेखक वा कवी परभाषेत (भारतीय भाषांसह) अनुवादित झाल्यावर त्या त्या भाषेचं वैभव वाढवण्याची क्षमता त्यांच्या रचनांमध्ये आहे, ह्या दिशेने गेलेलं बरं.
    • Satish Waghmare <<मराठीतले कोणते लेखक वा कवी परभाषेत (भारतीय भाषांसह) अनुवादित झाल्यावर त्या त्या भाषेचं वैभव वाढवण्याची क्षमता त्यांच्यात आहे, ह्या दिशेने गेलेलं बरं.>> या बरोबरच या लेखकां भवतालचे वाड.मयीन वातावरण देखील तपासणे त्यावर चर्चा करणे महत्वाचे ! कारण समीक्षा प्रभाव टाकत असतेच..
    • Sunil Tambe समीक्षेचं स्तोम आपण फारच माजवतोय. मार्केस ह्या लेखकाची पहिली कादंबरी वाचून स्पॅनिश भाषेच्या एका नाणावलेल्या समीक्षकाने अभिप्राय दिला होता की सदर कादंबरी छापण्याच्या लायकीची नाहीच पण मार्केसनेही साहित्य वगळता अन्य कोणत्यातरी क्षेत्राकडे वळावं हे उत्तम. हा अभिप्राय त्याने पत्राने मार्केसला कळवला. त्यामुळे मार्केसला धक्का बसला. मार्केसचे मित्र म्हणाले त्या समीक्षकाला काय घंटा कळतं. त्याच्याकडे दुर्लक्ष कर. मार्केसने तेच केलं. लेखकाचं स्पिरीट असं असतं.
    • Sunil Tambe साहित्याचा दर्जा वगैरे ठरवण्याच्या भानगडीत पडू नये. विद्रोही साहित्याची फूटपट्टी लावली तर शेक्सपिअर भुक्कड ठरेल. मार्क्सवादी साहित्याची फूटपट्टी लावली तर टॉलस्टॉय मूर्ख ठरेल, दलित साहित्याच्या निकषावर श्यामची आई टाकाऊ ठरेल. गुरुनाथ नाईक, सुहास शिरवळकर इत्यादी लेखकांच्या रचना वाचणारे अगदीच टाकाऊ ठरतील. साहित्य असो की समीक्षा हजारो फुलं फुलू द्या, अनेक स्कूल्स येऊ द्यात विकसीत होऊ द्या.
    • Satish Waghmare समीक्षेचं स्तोम माजवायला नको आहे . पण तिला पूर्ण नाकारता कशी येईल ? मार्केज ची तुलनात्मक समीक्षा इथे झालेली नाही आहे काय ? समीक्षेचं स्तोम लेखकाने झिडकारणे एकवेळ ठीक , पण आस्वाद आकलन मूल्यमापन या टप्प्यावर वाचकाने समीक्षा झिडकारून टाकणे कसे योग्य ठरू शकेल ? आज ज्ञानेश्वरीच्या किती ओव्या सामिक्षेशिवाय वाचकाला कळणार आहेत ? किंवा दलित आदिवासी बहुजन साहित्यातले किती संदर्भ एखाद्या जाणकार दलित समीक्षकाने जर सांगितलेच नाही तर कसे कळतील ?
    • Sunil Tambe <<< समीक्षेचं स्तोम माजवायला नको आहे . >>> हा मुद्दा मान्य आहे ना, मग ठीक आहे. माझा मुद्दा तेवढाच आहे.
    • Satish Tambe मराठी साहित्यातील साडेतीन टक्क्यांच साहित्य हे कलादृष्ट्या अधिक ' सजग ' होतं . पण ते अनुभवदृष्ट्या खूपच किरटं खुजं होतं . त्यामुळे ते काळाच्या ओघात मागे पडलं .तेव्हा ते जागतिक दर्जाचं वगैरे असण्याची शक्यताच नाही . साहजिकच त्यातून जोपासल्या गेलेल्या कला जाणीवा देखील वाहून गेल्या . त्यानंतर प्रसवल गेलेलं मराठी साहित्य आत्ता कुठे बाळसे घेते आहे ! आणि ते कलादृष्ट्या 'सजग ' व्हायची प्रक्रिया अद्याप सुरु झाल्याचे फारसे दिसत नाही . तर जागतिक दर्जा वगैरे जाऊ दे . साहित्य प्रसवताना त्याच्या मांडणीवर , रूपावर समांतरपणे विचार करण्याची पुढील काही वर्षात प्रक्रिया सुरु झाली , तरी खूप झाले ! थोडक्यात काय , जागतिक वगैरे जाऊ दे , तर 'दर्जा ' उंचावण्याचे भान येवो ! … हे ही नसे थोडके …
    • Balaji Sutar Satish Waghmare- आकाशवाणीवर निवेदकाच्या नोकरीसाठी गेलेल्या एका माणसाला "तुझा आवाज चांगला नाही." असं सांगून परत पाठवण्यात आलं होतं. पुढं त्या माणसाने त्याच्या क्षेत्रात जागतिक दर्जा मिळवला. त्याच्या या यशात त्याच्या आवाजाचा / संवादशैलीचा अतिशय मोठा वाटा होता. 'अमिताभ बच्चन' हे त्या वाईट आवाजाच्या माणसाचं नाव.

      बाकी, 'श्यामची आई' हे पुस्तक तुम्हाला वाटतं तेवढं मला भंपक वाटत नाही. मुलावर संवेदनशील संस्कार करणारी, एकाच वेळी हळव्या आणि कठोरही मनाची ती 'आई' तिच्या काळाचं आणि तिच्या मर्यादित (ब्राम्हणी ?) जगाचं अपत्य होती. तिला, तिच्या अस्तित्वाला तुम्ही खोटे म्हणू शकत नाही कारण अशीही आई याच जगात अस्तित्व राखून असते. 'श्यामच्या आई'तली आई आणि उत्तम कांबळे यांच्या "आई समजून घेताना"मधली आई यांच्यात मी फरक करत नाही. पुन्हा एकदा, हे सगळे अत्यंत सापेक्ष आहे. माझे निकष आणि तुमचे निकष वैश्विक असणं / वैश्विकतेला कवेत घेणारे असणं ही गोष्ट कठीणच असते. आपल्या व्यक्तिगत धारणा आपल्या निवडींना प्रभावित करत असतात हे नाकारताच येणार नाही.
    • Sunil Tambe कलात्मक घाट साधलाय असं कधी म्हणायचं...त्याची तत्वे कोणती, या विषयीच्या शिष्टमान्य रूपवादी भूमिकेला, केवळ दलित साहित्यकृतीच्या संदर्भातच नव्हे तर सर्वसाधारण सर्वच कलाकृतींच्या संदर्भात आव्हान उपस्थित करण्याची गरज वास्तविक आहे.आपण रूपवादी कसोट्यांना पुरे पडू शकत नाही ह्याची खंत आहे. त्यातून एक चमत्कारिक आग्रह निर्माण होतो तो असा की जे काही आम्ही लिहितोय त्यालाच तुमच्या कसोट्यांवर, त्या काटेकोरपणे न लावताच, चांगले म्हटलं पाहिजे. म्हणत नसाल तर आम्ही जातीयवादाचा आरोप करू. ह्यात आत्मविश्वासाच्या अभावापोटी निर्माण होणारी आक्रमकता दिसून येते. साहित्यशास्त्रामध्ये, सौंदर्यमीमांसेमध्ये, समीक्षेच्या तत्वांमध्ये आपणास योगदान करायचं आहे असा आत्मविश्वास दिसत नाही. त्यामुळे दलित साहित्य चळवळ सार्‍या मराठी साहित्यामध्ये चैतन्य निर्माण करू शकली नाही. आपला वेगळा सवतासुभा स्थापन करायचा आणि त्याचे लाभ पदरात पाडून घ्यायचे, इतरांना ब्राह्मणी म्हणत त्यांच्याकडून पाठ थोपटून घ्यायची, या राजकारणी वळणावरच ती अजून अडकली आहे. ----अशा आशयाची टीका वसंत पळशीकर ह्यांनी दलित साहित्य चळवळीवर केल्याचं स्मरतं.
    • Avinash Gaikwad दलित साहित्य चळवळ सार्‍या मराठी साहित्यामध्ये चैतन्य निर्माण करू शकली नाही. 
    • Satish Waghmare वसंत पळशीकरांचे खायचे दात आणि दाखवायचे दात भालचंद्र फडके आणि गंगाधर पानतावणे यांनी खूप पूर्वीच दाखवून दिलेले आहेत . समाज प्रबोधन पत्रिका आणि अस्मितादर्श मध्ये वाचल्याचे स्मरते . <<एक चमत्कारिक आग्रह निर्माण होतो तो असा की जे काही आम्ही लिहितोय त्यालाच तुमच्या कसोट्यांवर, त्या काटेकोरपणे न लावताच, चांगले म्हटलं पाहिजे. म्हणत नसाल तर आम्ही जातीयवादाचा आरोप करू>> मुळात दलित साहित्याची तुलना करताना हा दृष्टीकोन बाळगलाच गेला नाही असे नाही . जिथे सशक्त आशयाची छाननी व्हावी हि अपेक्षा तिथे कलावादी फुटपट्ट्या लावून वासलात लावण्याचे प्रयत्न केले आणि बाबुराव बागुल , दया पवार केशव मेश्राम हे लेखक कलावादी कसोट्यात पूर्ण बसत असले तरी सोयीस्कर दुर्लक्षिले गेले . पळशीकरांचा थोरपणा मराठी साहित्याला परिचित आहे .
    • Satish Waghmare Balaji Sutar <आकाशवाणीवर निवेदकाच्या नोकरीसाठी गेलेल्या एका माणसाला "तुझा आवाज चांगला नाही." असं सांगून परत पाठवण्यात आलं होतं. पुढं त्या माणसाने त्याच्या क्षेत्रात जागतिक दर्जा मिळवला. त्याच्या या यशात त्याच्या आवाजाचा / संवादशैलीचा अतिशय मोठा वाटा होता. 'अमिताभ बच्चन' हे त्या वाईट आवाजाच्या माणसाचं नाव.>> या न्यायाने रणांगण किती आवृत्या ? फक्त १० ? व पु २५ , पु लं २२ आहेत . मग त्यांना थोर ठरवावे लागेल . अर्थात ठरविणाऱ्याना अडवणारे नसतात . पण केवळ बहुमताच्या बळावर कुठलीही गोष्ट उंचीची म्हणून खपत नाही . <<आपल्या व्यक्तिगत धारणा आपल्या निवडींना प्रभावित करत असतात हे नाकारताच येणार नाही.>> पण सार्वकालिक काही मुल्ये ही समान पातळीवर दाब टाकत असतात . तुम्ही ती कितपत खुल्या मानाने स्वीकारता वा नाकारता हा प्रश्न खरा कळीचा .
    • Avinash Gaikwad 'पण सार्वकालिक काही मुल्ये ही समान पातळीवर दाब टाकत असतात . तुम्ही ती कितपत खुल्या मनाने स्वीकारता वा नाकारता हा प्रश्न खरा कळीचा .' 

      -चर्चा व्हायला हवी ती ह्या मुद्द्यावर - सार्वकालिक मूल्यांवर .
    • Satish Waghmare Avinash Gaikwad <<दलित साहित्य चळवळ सार्‍या मराठी साहित्यामध्ये चैतन्य निर्माण करू शकली नाही. >> पळशीकरांना उतार वयात फार अंधुक दिसत होतं .
    • Avinash Gaikwad पळशीकरांचं जाऊ दे ,आजही अनेक तरुण -वृद्ध महामहोपाध्याय या विचाराचे असतील . 
      पण हे सत्याला नाकारण्यासारखे अथवा अर्धसत्यालाच पूर्णसत्य म्हणण्याचा अट्टाहास करण्यासारखे आहे .
    • Avinash Gaikwad खुद्द खेळचे संपादक मंगेश काळे यांचंही याबाबतचं मत जाणून घ्यायला हवं .
    • Avinash Gaikwad Balaji Sutar:'अमिताभ बच्चन' यांचं उदाहरण देऊन तुम्हाला नेमके काय सांगायचेय ते कळले नाही . 
      मराठी साहित्याच्या कुठल्या बाबतीत ते उदाहरण पडताळून बघायचे ?
    • Sanmay Bhujbal Satish Tambe :Apan Prof Hari Narke Yancha mul lekh vachala aahe kay?
    • Satish Tambe Sanmay Bhujbal नाही . ह्या स्टेटस मधील संदर्भ आहे तेवढाच . का हा संदर्भ गलत आहे का ? की त्यात काही गफलत आहे ?

    Savita Mohite Satish Tambeji : pls Wacha --- "लेखाच्या शेवटी मराठीची स्वयंसिद्ध थोरवी सांगताना एका परिच्छेदात मी मला महत्वाचे वाटणारे तुकारामांपासून अवचटांपर्यंतचे ५७ मराठी लेखक दिलेले आहेत.त्यातील शिवाजी सावंत, रणजित देसाई, कुसुमाग्रज, खांडेकर, अनिल अवचट आणि रंगनाथ पठारे या सहा नावांना रा.रा. काळे यांचा आक्षेप आहे.खरंतर मला आवडणारे किंवा मोठे वाटलेले प्रत्येक नाव मा.काळेंना पटलेच पाहिजे असे नाही.व्यक्तीपरत्वे ही यादी बदलू शकते. काळेंनी मी दिलेली सगळीच्या सगळी म्हणजे ५७ नावे बाद केली असती तरीही माझी हरकत असणार नाही." Hari Narkehttp://harinarke.blogspot.in/.....
    खेळचे संपादकीय, अभिजात मराठी आणि मराठी साहित्यविश्व
    खेळ या त्रैमासिकाच्या जा.फे.मार्च २०१४ च्या अंकातील संपादकीयात माझ्या अभिजात मराठीवरील लेखाच्या निमित्ताने काही उल्लेख करण्यात आलेले आहेत.त्याबद्दल मी संपादक श्री काळे यांचे आभार मानतो. खेळचे संपादक श्री. मंगेश नारायणराव काळे यांच्या या चार पानी संपादकीय मजकूरात ते नेमके काय म्हणतात, हे त्यांच्याच शब्दात वाचलेले बरे.त्यांनी "भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण - महाराष्ट्र", मुख्य संपादक-गणेश देवी, संपादक -अरुण जाखडे, या पद्मगंधा प्रकाशनाच्या,१७ आगस्ट २०१३ रोजी प्रकाशित झालेल्या ७८४ पानांच्या ग्रंथातील माझ्या लेखाचा संदर्भ दिलेला आहे. या रा‘यल आकारातील ग्रंथातील माझा "मराठी भाषेच्या अभिजात दर्जाविषयी" हा लेख दहा पानांचा आहे. हे दोन्ही लेख, {खेळचे संपादकीय आणि माझा लेख} मुळातून वाचून त्यावरील अभिप्राय आपण द्यावेत अशी विनंती आहे.त्यातून काही सकस चर्चा होऊन पुढे येणारे मुद्दे दिशादर्शक ठरू शकतील...continued on blog...


    harinarke.blogspot.com
    प्राध्यापक - महात्मा फुले अध्यासन,पुणे विद्यापिठ, पुणे, / सदस्य - महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग,
  • Mahendra Bhaware अविनाश ,खेळाचा अंक मिळाला नाही,त्यात बर्याच खेळी खेळलेल्या असतात.ते समजूनच खेळी रंगवता येईल
  • Mahendra Bhaware पण एक साधे मत मांडता येईल,दर्जा ठरवणारे हे कोण तीकोन्जीराव असतात?
  • Satish Waghmare Mahendra Bhaware सर दर्जा सोडा वाड.मयीन दुषित पणावर ते जे काय म्हणतात . त्याविषयी तुमचे मत काय आहे ?
  • Avinash Gaikwad माणसाला व माणुसकीला केंद्रस्थानी ठेवून सार्वकालिक मूल्यांच्या आधारे प्रामाणिकपणे साहित्यकृतींचा काहीएक दर्जा ठरवता येऊ शकतो महेंद्र .
  • Mahendra Bhaware बावनखणीत किव्हा एख्याद्या गढीत चालणारे त्यांचे व्यवहार ,मांडवाल्या fockland रोडच्या भडव्या पेक्षाही कमी उंचीचे असतात.satishrao!
  • Mahendra Bhaware avinash,manya.
  • Satish Waghmare Mahendra Bhaware सर भयानक !
  • Mahendra Bhaware एखाद्या लेखकाने २० वर्षात ४ कादंबर्या लिहिल्या म्हणजे तो अर्धशतकाचा kadabmbarikar ठरू शकतो का?नेमाड्याना तसे ठरविले आहे.म्हणून म्हणतो हे तीकोन्जीराव कोण?
  • Satish Waghmare Mahendra Bhaware सर superlike !  तुमचा हिंदू वरचा समीक्षा लेख अफलातून आहे. झगझगीत आरसा ! .
  • Nilkanth Shere वसंत पळशीकर आणि मे. पु. रेगे याचे नवभारत मधील शेवटच्याच संपादकीय नव्हे तर आरंभीच्याही लेखनात हिंदुत्ववादी सूत्रे आढळतात ज्या चे वण॔न काहीजनानी नवहिंदुतत्ववादी असे केले आहे.तेव्हा दलित साहित्याबद्दल च्या त्यांच्या भूमिकेला फार महत्व देण्याची गरज नाही. हे आजचे रुपवादी समथ॔क लक्षात घेत नाहीत मोदी लाटेत असेच होणार.
  • Vinayak Ghode प्रादेशिक भाषेतला कोणता लेखक-कवी परदेशी भाषेत गेलाय याकडे लक्ष द्यायला हवं.पण जागतिक दर्जाच्या दृष्टीनं त्याकडे पाहणं सहज वाटत नाही.पैसे देऊन भाषांतर करवून घेण्याच्या आजच्या काळात तर नाहीच.मूळात,भावणं व्यक्तिसापेक्ष.त्यात अनुवादाची उर्मी येणं.त्या अनुवादकाचा मकदूर अनेक मुद्दे.जगभरातल्या प्रादेशिक भाषेतलं कितीतरी खणखणीत अस्सल साहित्य अनुवादाअभावी तिथंच राहीलं असेल.समीक्षा मार्गदर्शक खरीच.पण ती दिशादर्शनापेक्षा व्याख्या आणि शास्त्राच्या उलगडीतून डोकं उठवणारी बोजड होते .त्याचा काच नकोच वाटतो.समीक्षा साहीत्याची की समिक्षकाच्या विद्वतेचं(?) दर्शन घडवणारी? 
    असो,मस्त वाचावं आपलं आपण.महामूर.आनंद घ्यावा.झालं.
    मोठ्या संखेनं चांगले अनुवादक घडतील तर बरं.
  • स्वाती ठकार 1)इंग्रजी आणि मातृभाषा दोन्हीचे अनुवाद करणारा किंवा प्रादेशिक भाषेतला कवी जो आपल्या रचनांचा इंग्रजीत अनुवाद करू शकला तोच वैश्विक झाला .उदा.रविंद्रनाथ ,दिलीप चित्रे ,कोलटकर ,विंदा ,निर्मल वर्मा,वगैरे ...
    2) अभिजात म्हणजे नित्य नुतन ...परंपरा आणि नवता याचा मेळ घालणारी ....एखाद्या नदीसारखी प्रवाही ,सर्वाना सामावून घेणारी इतकी साधी आणि सोपी परिभाषा ज्या प्रादेशिक भाषाना अभिजाततेचा दर्जा मिळाला त्यानी मानली आणि त्या सहज अभिजात ही झाल्या आणि वैश्विकही 
    ..उदा ...कर्नाटकात तुळू ,कोंकणी कन्नड स्वर ,मैसूर कन्नड आणि बेळगावसीमेवरची मराठी मिश्रित कानडी याना सामावून पुष्ट झालेली कानडी या सर्व भागातील नवीन शब्दांचा समावेश असलेला कोश हे त्या अभिजाततेचं वैशिष्ट्य ...आपल्याकडे मालवणी ,वऱ्हाडी माणदेशी ,खानदेशी बेळगावी अजूनी गटातटातच आहेत ...मिसळल्यात कुठे ? कोशाचे काम तर अगदी प्राथमिक स्तरावर आहे ..तरी आपण पाठ थोपटून घेतो आहोत ...असो ,एका तुकारामाला वैश्विक स्तरावर नेणारे दि.पू .म्हणून ग्रेट वाटतात ..लिहिण्यासारखं खूप आहे .... 
  • Sanmay Bhujbal सतिशसर,ही खेळकर चर्चा आपण सुरु केल्याबद्दल धन्यवाद.
    प्रा.हरी नरके यांनी खेळकरी काळे यांना दिलेले उत्तर आपण एकदा नजरेखालून घालावे.{http://harinarke.blogspot.in/...खेळचे संपादकीय, अभिजात मराठी आणि मराठी साहित्यविश्व}
    काळे यांची हातचलाखी बघा: एकीकडे ते म्हणतात,"माय मराठी अभिजात झाल्याबरोबर तिचा डंका जगाच्या काना कोपर्‍यात वाजू लागेल असे स्वप्न पाहायला हरकत नसावी.तर हे स्वप्न थोडावेळ बाजूला ठेवून मागे वळून पाहिलं तर काय चित्र दिसतं? आजवर शासन,संस्थात्मक स्तरावर काय झालं?" म्हणजे प्रा.नरके यांच्या लेखाचे निमित्त करायचे. तरिही त्यातल्या मुख्य प्रतिपादनाला बगलही द्यायची.नरकेंच्या लेखाचा मूळ गाभा सोडून नरकेंच्या दुय्यम आणि शेरेवजा मुद्द्यांचे भांडवल करायचे आणि तरिही शेवटी मात्र सरकारी अनास्थेचे खापर प्रा. नरके यांच्यावरच फोडून मोकळे व्हायचे, अभ्यासगटाच्या प्रामाणिक प्रयत्नांना नजरेआड ठेवून त्यांच्यावरच अंतिम हेत्वारोप करून मोकळे व्हायचे हे "कसब" अफलातूनच म्हटले पाहिजे. काळेसरकार, तुम्ही जर सरकारबद्दल बोलताय तर तुमचा निश्कर्ष नरकेंना आणि अभ्यासगटाला झोडणारा कसा? 
    नरके काय महाराष्ट्र सरकारच्या आजवरच्या घोळाला जबाबदार आहेत काय?{"एकुण काय तर भाषासंवर्धनाची ,तिच्या विकासाची , साहित्याच्या भरभराटीची अभ्यासगटाची संकल्पना अशी लुटीपुटीच्या मनोराज्यावर उभी आहे, नि तिचा डोळा "अभिजात"ते कडे नसून येणार्‍या डबोल्यावर आहे."} मंगेशराव, हे अनुदान केंद्राकडून महाराष्ट्र सरकारला मिळेल, अभ्यासगटाला नाही, याचे तरी भान ठेवा राव. हे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देणे झाले. सतिष सर, यातले "काळेबेरे" कळण्यासाठी जरा नरकेसरांचा मूळलेख आणि त्यांचे ब्ला‘गवरील उत्तर वाचावे व प्रतिक्रिया द्यावी ही विनंती..
    नरके सरांचे म्हणणे अगदीच तर्कसंगत आहे.{"असे म्हणून आजचा आणि आजवरचा मराठी साहित्यविश्वाचा लेखाजोखा काळेंनी मांडलेला आहे. श्री.काळे यांचा भर मराठीच्या विद्यमान दूरावस्थेवर आहे आणि त्यातील बहुतांशी मुद्दे मला मान्यच आहेत."}पुढे नरके म्हणतात तेही विचारात घ्यायला हवे. "खांडेकर व कुसुमाग्रज यांना ज्ञानपिठ पारितोषिक मिळालेले आहे आणि शिवाजी सावंतांना ज्ञानपिठ समकक्ष मुर्तीदेवी सन्मान मिळालेला आहे.रणजित देसाई, अवचट आणि पठारे यांनीही राष्ट्रीय पातळीवरील साहित्यविषयक सन्मान मिळवलेले आहेत. हे सगळेच मराठीतील महत्वाचे लेखक आहेत असे मला वाटते.असे मत बाळगण्याची परवानगी कोणाकडूनही घेण्याची मला गरज वाटत नाही. त्यामुळेच "मराठीतही हे लेखक धड उभे राहात नाहीत" या रा.रा. काळे यांच्या मताशी मी सहमत नाही." यापुढे काळे म्हणतील तेच "उभे लेखक" आणि बाकीचे कोण मग?
    या सहापैकी कोणता लेखक मराठीत "धड उभा राहात नाही" हे काळे यांनी सांगायला हवे. अशा ताशेर्‍यांनी त्यांना मोडीत काढणे म्हणजे पांढर्‍यावर काळे करणे होय... आणि ते अन्यायकारक नाही काय?
  • Savita Mohite मंगेशराव, हे अनुदान केंद्राकडून महाराष्ट्र सरकारला मिळेल, अभ्यासगटाला नाही, याचे तरी भान ठेवा राव. हे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देणे झाले. सतिष सर, यातले "काळेबेरे" कळण्यासाठी जरा नरकेसरांचा मूळलेख आणि त्यांचे ब्ला‘गवरील उत्तर वाचावे व प्रतिक्रिया द्यावी ही विनंती..
  • Ashok Buddhivant Respected Satish Waghmare sir: "काळे यांची हातचलाखी बघा: "
  • Balaji Sutar Satish Waghmare- @"पण सार्वकालिक काही मुल्ये ही समान पातळीवर दाब टाकत असतात ." - बरोब्बर हाच प्रश्न मी पहिल्या कॉमेंटमध्ये विचारला होता की "जागतिक दर्जा मोजण्याचे काही माप असते काय?" हे माप म्हणजेच तुम्ही म्हणता ती सार्वकालिक मुल्ये असणार. साहित्यासारख्या प्रवाही, व्यक्ती / समाज / कालसापेक्ष कलेमध्ये अशी सार्वकालिक मुल्ये कशी शोधणार ? कोण ठरवणार ? "मी सांगतो त्या निकषांवर अमुक कादंबरी श्रेष्ठ / हलकी माना" असं कुणी सांगत असतील तर ते इतरांनी शिरोधार्य का मानायचं ? आधीचंच उदाहरण परत घ्यायचं तर एकेकाळी 'श्यामची आई' ही एक श्रेष्ठ कलाकृती मानलीच जात होती. आज आपण तिला भंपक म्हणून झटक्यात झटकून टाकतो. मूल्यांचा शोधसुद्धा अखेरीस ज्याच्या त्याच्या प्रकृतीनुसार ठरत असणार. साहित्य हे काही 'हायड्रोजनचे दोन आणि ऑक्सिजनचा एक अणु एकत्र आले की पाणी तयार होते' असा ठोस निकष (मूल्ये ) सांगणारं शास्त्र नाही. त्यामुळे सार्वकालिक वगैरे कसोट्या साहित्याला लावू नयेत.
  • Balaji Sutar Avinash Gaikwad- अमिताभ बच्चनचा उल्लेख एवढ्यासाठी की आवाज हे ज्याचं अतिशय महत्वाचं बलस्थान आहे अशी धारणा जगन्मान्य झालेली आहे त्याच माणसाला 'आवाज वाईट' म्हणून निकालात काढणं एखाद्याला शक्य झालं ते त्याची व्यक्तिगत समजूत तशी होती म्हणून. उत्कृष्टतेचे निकष ज्याचे त्याचे वेगळाले असणे शक्य असते हे सांगण्यासाठी हे उदाहरण दिले. त्याचा अर्थातच साहित्याशी काही संबंध नाही, तर्कशास्त्राशी मात्र नक्की आहे असं मला वाटलं.
  • Vikas Mohanrao Godage <साहित्यासारख्या प्रवाही, व्यक्ती / समाज / कालसापेक्ष कलेमध्ये अशी सार्वकालिक मुल्ये कशी शोधणार ?>
    काळाच्या कसोट्यावर उतरते, सर्व भावभावनांना सामावून घेते आणि तत्कालीन समाजाचे प्रतीबिमित्वा कालसापेक्ष ज्या साहित्यात उतरते त्या साहित्याला वैश्विक आणि जागतिक साहित्य म्हणायला हरकत नाही. 

    तूकारामाला ग्रेट म्हणावे असा हट्ट नाही पण ते काळाच्या कसोट्यावर खरे उतरले आहेत म्हणून ते वैश्विक आणि ग्रेट आहेत. काळ बदलले, संस्कृत्या बदलल्या राज्य आणि राज्यकर्ते बदलले पण हे साहित्य आजही तीच मानवी मुल्य जपून आहेत मानव जमातीला मार्ग दाखवण्याचे काम करते आणि आजही कालबाह्य झालेले नाही म्हणू ते ग्रेट आहेत. 

    समकालीन कसोट्या साहित्यात लावू नयेत हे खरे मानले तर विविध कालीन विविध कसोट्यावर तावून सुलाखून निघालेले साहित्याला वैश्विक सर्वकालीन साहित्य मानायला काय हरकत आहे? Balaji Sutar
  • Balaji Sutar Vikas Mohanrao Godage- मेटाकुटीला येऊन पन्नास साठ वर्षे या ग्रहावर कशीबशी रेमटून काढणारी तुमच्यामाझ्यासारखी माणसे अखंड 'काळाच्या कसोट्या' वगैरे बोलू लागली की मला चर्चेतून पळून जावंसं वाटू लागतं.  (BTW, "पळून जावंसं वाटणं" या क्रियेला जागतिक दर्जा लावता येईल काय ? सर्व काळात आणि सर्व प्रदेशातल्या लोकांच्या मनात कधी नं कधी ही वैश्विक भावना येतच असणार नं ?  )
  • Murli Khairnar हुश्श! दमलो बुवा मूळ स्टेटस आणि त्यावरच्या सत्त्याहत्तर कॉमेंट वाचून. काही काही कॉमेंट तर निबंधापेक्षा मोठ्या साइझच्या होत्या. आता इतके सगळे वाचून झाल्यावर यापेक्षा जास्त काही लिहवत नाही. लेखनसीमा.
  • Vikas Mohanrao Godage आपली वर्ष मेटाकुटीला येवून ५० - ६०, मी माझी ९० धरतो, असली तरी दुनिया म्हणजे आपण थोडेच आहोत. दुनिया आपल्या अगोदर पण होती आणि नंतर पण राहील. पण साहित्य हे कालातीतच असते. साहित्यिक अमर होतो साहित्यामुळे. मग त्याचे मापदंड पण कालातीतच पाहिजे कि नाही.
  • Balaji Sutar Vikas Mohanrao Godage- @"साहित्यिक अमर होतो साहित्यामुळे." - खरे आहे. 

    "अमर सायकल मार्ट. म्हणजे च्यायला पृथ्वी नष्ट झाल्यावरही किंवा सूर्य थंड झाल्यावरही हे अमरच राहणार." असं पांडुरंग सांगवीकर नामक थोर गृहस्थाने म्हणूनच ठेवलेले आहे. 
  • Satish Waghmare @murliv सर तुम्ही दमून कसं चालेल ? ते तुम्हाला अलाऊड नाही. मी आता परीक्षेत बिझी असणार दिवसभर , तुमच्या comment ची वाट पाहतो. 
  • Sunil Kamble Sanmay Bhujbal, 
  • Vikas Mohanrao Godage जीथे पांडूरंगच सांगवीकर सवता बोलतात, तीथे पूढे बोलण्याची आमची काय मजाल ,
  • Sanmay Bhujbal From Akshay Indikar Timeline:Akshay Indikar
    2 hrs · 
    मराठी मध्ये अनेक जागतिक मानण्यापेक्षा वैश्विक मुलभूत मानवी भावभावनांना अभिव्यक्त करणारे अनेक लेखक आहेत. जी ए कुलकर्णी , श्री ना पेंडसे , भाऊ पाध्ये , समर खडस , नेमाडे, तुकाराम , बहिणाबाई , श्याम मनोहर , दुर्गा बाई, फुले , आगरकर, आंबेडकर , , रा धो कर्वे, गौरी देशपांडे , विजय तेंडूलकर, चित्रे ,शरण कुमार लिंबाळे,शंकरराव खरात पुरुषोत्तम बोरकर , विलास सारंग, एलकुंचवार , विश्राम गुप्ते , करंदीकर, रेगे, सदानंद रेगे, कॉ शरद पाटील, मकरंद साठे ( तीस रात्री) , जयंत पवार, कुरुंदकर, आनंद विन्ग्कर, साने गुरुजी, सगळे संत कवी, किरण नगरकर, खानोलकर यांची पुस्तके अनुदान मिळून भाषांतरित होऊन स्वस्तात उपलब्ध होतील .अनेक ठिकाणी जातील त्यावर काही चर्चा होऊन काही हालचाली होतील, अनेक फालतू गोष्टींसोबत अनेक चांगल्या किंबहुना चांगल्या च गोष्टी जास्त होणार आहेत हे दिसतय , आणि काही काहींच्या मते वाईट असणारी पुस्तके पण त्यात होतील पण सर्वश्रेष्ठ साहित्य सोबत सामान्य साहित्य पण तिकडे जाईल. जाउद्या न , ज्यात सत्त्व आहे ते टिकेलच. आणि माझ्या मराठी भाषेत प्रचंड महान पुस्तके आहेत जी पुस्तके च काळाला पुरून उरतील, त्यामुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून काम करणे हे मराठी मध्ये विचार करणारा माणूस म्हणून मला माझी जबाबदारी वाटते /१००० ग्रंथ सहज निघतील अशी खात्री वाटते.. राज ठाकरे यांनी या मराठी कडे जरा लक्ष देऊन बघावे. मराठी म्हणजे भय्ये लोकांना मारणे च नसावे .... आपला नम्र अक्षय .
  • Sanmay Bhujbal From- Sanjay Sonawani's Timeline:Sanjay Sonawani
    5 hrs · Pune · 
    अभिजात मराठीच्या संकल्पनेला विरोध करणारे झारीतील शुक्राचार्य पुन्हा उगवू लागले आहेत. मराठी साहित्य कुचकामी असल्याचे त्यांना साक्षात्कार होऊ लागले आहेत. "खेळ"चे संपादक श्री. मंगेश नारायणराव काळे हे त्यात भर पडलेले एक नांव. प्रा. हरी नरके, रंगनाथ पठारे प्रभृतींच्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या प्रयत्नांना खिळ घालण्याचे काम त्यांनी आपल्या संपादकियातून केलेले आहे. मराठीतील वर्तमानकालीन साहित्य...त्याचा दर्जा आणि भाषेचा अभिजातपणा यातील फरक तरी श्री. काळे यांना चांगलाच माहित असावा. मराठी भाषेचे अभिजातपण सिद्ध होणे म्हणजे ती भाषा सम्स्कृतोद्भव नाही हे सिद्ध होणे हे त्यांच्यासारख्या संस्कृतालाच सर्व भाषांची जननी मानना-यांना कसे सहन होईल? मराठी साहित्याचा दर्जा त्या भाषेतील किती साहित्याला आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय पुरस्कार मिळाले याचा विचार करणा-यांना मुद्दलात पुरस्कार कसे लोबींग करुन मिळवले जातात हे माहित नाही कि काय? येथेच, खुद्द मराठीतील साहित्याचा दर्जा ठरवू पाहनारे आपल्या समिक्षेची सर्व साधने पाश्चिमात्य वापरत आपल्याच कंपुतील साहित्यिकांना कसे वर चढवतात हे माहित नाही कि काय?
    अभिजात मराठी म्हणजे स्वतंत्र उगम असलेली मराठी. ती स्वतंत्रच होती याचे अगणित पुरावे उपलब्ध आहेत. असे असतांना तिच्या अभिजाततेचा दर्जा जर नाकारला गेला तर काळेंसारखे झारीतील शुक्राचार्यच त्याला जबाबदार असतील आणि मराठी माणूस अशांना कधी क्षमा करणार नाही!
  • Satish Waghmare Sanmay Bhujbal नरके सरांना मी वैयक्तिक ओळखतो . त्यांच्या चिकित्सक अभ्यासू वृतीचा मी चाहता आहे . खेळच्या संपादकीया मध्ये अभ्यासगट आणि नरके सर हा फक्त एक मुद्दा आलेला आहे . वाड.मयीन दुषित वातावरणावर काळेंनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत . ते बाजूला पडले जात आहेत . त्यावर चर्चा व्हायला हवी . वाचकाची रोजनिशी या पुस्तकाबाबत त्या पुस्तकाला दिलेल्या पुरस्कारा मागची विविध संस्थाची भूमिका वा समज भयानक विचित्र आहे . या वृत्तीवर काळे काही बोलत असतील तर ते गांभीर्याने घ्यायला पाहिजे . नरके सरांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये जागतिक दर्जाच्या मतभिन्नते बाबत एकमेकांचे स्वातंत्र्य मान्य केलेले आहेच . त्यामुळे त्यावर अधिक न बोलता मराठी साहित्यातल्या 'चलता' है या वृत्तीवर बोलले पाहिजे . Sanjay Sonawani सरांची कॉमेंट म्हणजे विरोधी मत मांडले कि शुक्राचार्य ही न पटणारी आहे . सोनवणी सर , नरके सर आणि काळे सर सर्वांचेच माय मराठीवर सारखे प्रेम आहे हेच मला यातून प्रकर्षाने दिसतेय आणि सकारात्मक मौज वाटतेय .
  • Savita Mohite मराठीच्या उत्कर्षासाठी आपल्याला प्रत्येकाला काय करता येईल, आणि सध्याची विपन्नावस्था, सरकारी अनास्था कशी दूर करता येईल हा आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तो मराठी माणसाला जोडणारा धागाही आहे. प्रा. हरी नरके यांचा मूळ लेख मी वाचला आहे. त्यांनी यासाठी फार भरिव सुचना मांडलेल्या आहेत.वाचन संस्कृती वाढवण्यासाठी मराठीतील सर्व "अक्षरलेणी" रास्त किंमतीत प्रत्येक मराठी माणसाच्या दारात पोचवणे, अनुवाद कार्य हाती घेणे, मराठीचे अध्ययन-संशोधन करणार्‍या संस्था, महाविद्यालये, विद्यापिठे आदींना अनुदाने, तरूणांना भाषा अभ्यासाकडे वळवण्यासाठी फेलोशिप देणे, मराठीच्या सर्व बोलींचा अभ्यास करणे, त्यांचे कोश प्रकाशित करणे, प्रकाशने करण्यासाठी प्रोत्साहन देणे, आणि गावपातळीपासूनच्या सर्व साहित्य संमेलनांना मदत देणे, या सुचनांमध्ये वावगे काय आहे? त्या उडवून लावाव्यात किंवा नाकाराव्यात अशा असतील तर मग त्याऎवजी पर्यायी सुचना/ कार्यक्रम देणे ही संपादक काळे यांची जबाबदारी होती. सध्या मराठीत काय वाईट आहे तेव्हढे सांगितले म्हणजे भागते हा टिपीकल/ सिनिकल आणि म्हणूनच हास्यास्पद काळेउद्योग आहे. खरा प्रश्नाय ते बदलायचे कशे? नेमके यावर मात्र काळॆंचे मौन ! काळेंचे मुळ दुखणे असेय की, ते मराठीचे "मालक" असताना हे नरके कोण लागून गेले त्यांना सांगणारे? नरकेंच्या कोंबड्याने उगवत असेल तर आम्ही मालकमंडळी कोंबडेही झाकून ठेऊ.....
  • Meera Sirsamkar इथल्या सगळ्या प्रतिक्रिया वाचणे शक्य झाले नाही आणि मलाही थोडा उशीरच झाला चर्चेत यायला - पण मुळ स्टेटसला अनुलक्षून … 
    एखाद्या खेळामध्ये ranking किंवा rating असते, उदा. उसेन बोल्ट हा जमेकातील धावपटू ९. ५८ सेकंदात १०० मीटर धावतो म्हणून तो जागतिक क्रमवारीत अव्वल /प्रथम दर्जाचा ठरतो . म्हणजे खेळातील कामगिरीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करता येते . पण तसे वाङ्मयाच्या बाबतीत होणे अवघड आहे .कारण वाड्मय हा विषयच वस्तुनिष्ठ (figures & facts वाला ) नाही . त्याचप्रमाणे ते आत्मनिष्ठही नसते .ते अनुभूतीनिष्ठ असते . त्यामुळे वाङ्मयाच्या बाबतीत जागतिक दर्जा ठरवणे अवघड असते . तरीही जसे विज्ञान ,वैद्यकीय शांतता अर्थशास्त्र … अशा विविध क्षेत्रांमध्ये जागतिक पातळीवर पुरस्कार दिले जातात, त्याचप्रमाणे साहित्य या विभागातही दिले जातातच . मग यासाठी ते कोणते निकष लावत असतील ? तर त्या लेखकाच्या साहित्यकृतींनी , आजवरच्या साहित्यप्रकारापेक्षा , जो सर्वस्वी भिन्न असेल असा … काही वेगळा विचार मांडला आहे का ?किंवा त्या साहित्यामुळे एकूणच वाड्मयात काही नवी भर पडलेली आहे का ?किंवा काही नवीन प्रयोग केला आहे का ? असे (आणखी ) काही निकष विचारात घेतात . 

    बाजारात कोणत्याही वस्तूची निर्मिती झाली की त्याची वर्गवारी होणारच . मग वाङ्मयच या बाबतीत कसा अपवाद ठरेल ? मुळात आवडणारे ,लोकप्रिय आणि दर्जेदार असे वाङ्मयाच्या बाबतीत तीन प्रकारच्या साहित्यवर्गांचे अस्तित्व ( एकमेकांसोबत ) मानले तर फारसे मतभेद /संघर्ष होणार नाहीत . खरे तर लोकप्रिय साहित्य वाचणाऱ्यांना दर्जेदार वाचायला आवडत नाही ( किंवा उलटही ) असे नसते . एखादी व्यक्ती म्हणते मला श्यामची आई आवडते तर याचा अर्थ त्याला इतर काही आवडतच नाही असे कुठे असते ?आणि ज्यांना वाचायची मुळातूनच आवड असते ते स्वतः साहित्यातील पायऱ्या ओळखतात . वाङ्मय व्यवहारात समीक्षकांचे महत्व तर असतेच पण चांगला वाचक स्वतः समीक्षक असतो असतो. 

    आणि केवळ भाषांतराने किंवा अनुवादाने ते ते साहित्य वैश्विक कसे ठरेल ?मुळात त्या साहित्याचा दर्जाच तसा असावा लागतो . तुकाराम वैश्विक झाले कारण त्यांचे साहित्य त्या दर्जाचे आहे . अशा अनेक मराठी कलाकृतींचे अनुवाद होणे आवश्यक आहे . वरच्या प्रतिक्रियांमध्ये अशा मराठी साहित्यकृतींचे उल्लेख आलेले आहेतच .आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा ( ज्यासाठी हरी नरके प्रयत्न करत आहेत ) मिळाला पाहिजे हे ही खरेच ! 

    हल्ली खूप मोठ्या प्रमाणावर पुरस्कार दिले जातात ,हे तुमच्या स्टेटसमध्ये म्हणलेले आहे . ते खरेच आहे .अनुदाने घ्यायची,त्यांचे आपापसात वाटप करायचे ,पुरस्कार खिरापतीसारखे द्यायचे …. ही तुम्ही मांडलेली परिस्थिती अत्यंत खेदजनक आहे . आणि दुर्दैवाने अनेक क्षेत्रात अशाच वृत्ती बोकाळल्या आहेत ! मग यामुळेच दर्जा घसरतो आहे का ? पण त्यामुळे इथे घडणारी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की खूप पुरस्कार मिळाले म्हणून वाचक ते पुस्तक विकत घेऊन वाचत नाहीत , किंवा खूप गाजलेला लेखक आहे म्हणून त्याचे कोणतेही पुस्तक गाजेल असेही नाही . किंवा दर्जेदार असेल असेही नाही . मागे एक ग्रंथपाल बाई भेटल्या ,त्या म्हणाल्या ,"आम्ही कोणतीही पुस्तके बाजारात आल्या आल्या लगेच पसंत करत नाही , थोडी उसंत घेऊन पुस्तके घेतो …". हे उदाहरण प्रातिनिधिक ठरावे !
  • Sanjay Sonawani Satish Waghmare सतीशजी, "मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी सरकारदरबारी चाललेली लगबग , अभ्यासगटाची निरीक्षणे , किंवा प्रस्थापित गटाच्या छुप्या अपेक्षा......" हे वा त्या आशयाचे विधानच अत्यंत आक्षेपार्ह आहे. अभिजात भाषा कशाला व कशासाठी याची बेसिक्स माहित नसता केले गेलेले ते विधान आहे कि अत्यंत जाणीवपुर्वक, जणू काळेंना ते छुपे हेतू माहितच असल्यासारखे केले गेलेले ते विधान आहे? अन्य भाषिक मी अभिजाततेसाठी एकदिलाने उभे ठाकलेले पाहिले आहेत. आपल्या मराठीतच मात्र सुरुवातीपासून (तीन वर्ष मी पाहतोय...) असे लोक उघड वा छुपा विरोध करत आहेत...ही काही चांगली बाब वाटत नाही भावा!
  • Savita Mohite वाघमारेसर, 
    भालचंद्र नेमाडे, सतिश काळसेकर आदींशी काळेंचे फार जुणे भांडण आहे. त्यावर त्यांना बोलायचेय तर मग सरळ नी थेट बोला ना ! ताकाला जाऊन भांडे का लपवताय? त्यासाठी अभिजात दर्जा साठी झगडणारांना मदत करण्याऎवजी त्यांची टिंगल कशासाठी? अभिजात दर्जा, नरकेंच्या सुचना आणि काळसेकरांचा पुरस्कार यांचा बादरायणी संबंध कशाला?
  • Vikas Mohanrao Godage ही चरचा महणजे आमहा मराठी साहीत्याचा फक्त काही पूस्तके वाचण्यापूरता संबंध असनार्यासाठी एक पर्वनीच आहे
  • Murli Khairnar या पोस्टवर फार छान चर्चा सुरु आहे. माझी प्रतिक्रिया. दोन तुकड्यात 

    १. ‘खेळ’ नावाचे हे नियतकालिक मी कधीही वाचलेले नाही. पण त्यात छापून येणार्‍या मजकुराबाबत फेसबुकवर आजपर्यंत जे काही वाचायला मिळाले, त्यावरुन खेळकर्त्यांचा विशिष्ट अजेंडा असावा आणि त्याप्रमाणे त्यांचे काम चालत असावे असा माझा ग्रह झालेला आहे. (काही अजेंडा ठेवून साहित्यविषयक चळवळ करणे हे मी अजिबात गैर मानीत नाही.)

    २. मराठी भाषेला अभिजातपणाचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकार, नरके, पाठारे प्रभृती मंडळींनी चालवलेल्या चळवळीला माझा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांच्या खटपटीला यश येऊन हा दर्जा लवकरात लवकर मिळो.

    ३. साहित्य संस्कृती मंडळ, मराठी भाषा विकास संस्था, भाषा संचालनालय अशा सगळ्या संस्थांच्या निरुपयोगीपणाबद्दल माझी पूर्ण खात्री आहे. खेळकर्त्यांचा राग त्यांच्या पैसे अकारण/ सकारण खर्च करण्याच्या पद्धतीवर दिसला. एखाद्याला / एखाद्या समूहाला त्याच्या मनाप्रमाणे हवे त्या ठिकाणी (पक्षी आपल्या माणसांसाठी) पैसे खर्च करता येत असले तर त्यात इतरांना वावगे का वाटावे? त्या त्या सरकारी साहित्यविषयक संस्थांना मिळणारा आणि पुढे मिळू घातलेला पैसा त्यांनी कसाही खर्च करावा. (ज्यांना तो अस्थानी/ भ्रष्ट/ चुकीचा खर्च वाटतो त्यांना भ्रष्टाचाराशी देणेघेणे नसून खरे तर तो त्यांच्यात ‘मला (पक्षी माझ्या माणसांना) का नाही’ या विचारातून उगवणारा मत्सर असतो.)

    ४. मात्र अशा तर्‍हेच्या संस्था जोपासल्याने काही गैर गोष्टी घडतातच. त्याचा तपशीलात उहापोह आठव्या कलमात केला आहे.

    ५. अशा तर्‍हेचा पैसा ‘या जातीच्या’ किंवा ‘त्या जातीच्या’ किंवा ‘अमुकतमुक प्रकारच्या’ अशा कोणत्याही पुस्तकांसाठी/ लेखकांसाठी खर्च केला तरी त्यातून भाषेचा किंवा साहित्याचा स्थानिक वा जागतिक असा कोणताही दर्जा उंचावत नाही अशी माझी दृढ श्रद्धा आहे. फार तर त्यातून काही लेखक, काही प्रकाशक आणि फार तर काही राजकारणी यांचा आर्थिक दर्जा उंचावतो इतकेच. आणि असा तो उंचावायला माझी मुळीच हरकत नाही. …… (पुढे चालू)
  • Murli Khairnar आधीच्या प्रतिक्रियेवरून पुढे …… 

    ६. जागतिक दर्जा ही राजकीय चाल आहे. आणि कोणत्याही प्रकारचे राजकारण करणारांबद्दल मला निरतिशय प्रेम आहे. त्यामुळे कितीही पुस्तके, लेखक यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी कुणी चळवळ करीत असेल तर मी त्याकडे विस्मयमिश्रित कुतुहलाने पहातो. आणि मला त्यातून निखळ आनंदच मिळतो. 

    ७. खरोखर पुस्तकांचा दर्जा ज्यामुळे ठरतो / उंचावतो असे घटक वेगळेच आहेत. त्याबद्दल फार कमी लोक बोलतात, याचे वैषम्य वाटते. 

    ८. साहित्यविषयक सरकारी निमसरकारी संस्था, विद्यापीठाच्या भाषाशिक्षण समित्या यावर काम करणार्‍या लोकांनी कोणत्याही प्रकारच्या पुस्तकांची / लेखकांची भलामण करावी, तो त्यांचा अधिकारच आहे. मात्र ही भलामण करतांना ते ज्या प्रकारचे पारिभाषिक शब्द वापरुन त्याचे गुळगुळीकरण करतात त्याला माझा तीव्र आक्षेप आहे. अशा गुळगुळीत, संदर्भहीन झालेल्या पारिभाषिक शब्दांचा हुशारीने उपयोग करुन ‘सैद्धांतिक समीक्षा’ नावाचे एक अजब प्रकरण मराठी भाषेच उद्भवले आहे. त्यात तर्‍हेतर्‍हेच्या इझमच्या चित्तचक्षुचमत्कारिक फोडण्या घालून ते विद्यापीठांमधून साहित्यशास्त्र, सौंदर्यशास्त्र, समीक्षाशास्त्र, तत्वज्ञान अशा नावाने शिकवण्याचा धंदा निघाला आहे. त्यातून कुणाचे पोट भरत असेल तर त्याला माझी ना नाही, पण या गडबडीमुळे गेल्या पन्नास वर्षात नव्याने साक्षर झालेल्या तीन पिढ्यांची वाचनाची सवय मुळातून मारली गेली आहे हे निश्चित. त्यातून साहित्य संकुचित तर झालेच पण सहिष्णुता, समरसता या सामाजिक गुणांनाही कीड लागली आहे.

    ९. कलम आठ मध्ये व्यक्त केलेल्या कारणांमुळे अशा तर्‍हेचे सैद्धांतिक, पक्षी पारिभाषिक, पक्षी गुळगुळीत पक्षी बोधहीन लिखाण करणार्‍या सर्व प्रकारच्या अ‍ॅकेडेमिक साहित्यपुंगवांविरुद्ध मी जेहाद पुकारीत आहे. अशा तर्‍हेचे लिखाण करण्याच्या प्रेरणांचा समूळ उच्छेद करण्याची मी घोर प्रतिज्ञा केली आहे.
  • Balaji Sutar Murli Khairnar- Hats off ! 

    (या जेहादमध्ये मलाही एक मुजाहिदीन म्हणून सामील करून घ्यावे अशी विनंती आहे.  )
  • Manish Arun Borse Murli Khairnar - Ekhada neyatkalik na vachatat.....nivvad aakiv mahitivar mat banavna kitpat yogya..........
  • Manish Arun Borse Akshay Indikar - Marathi madhe jagtik darjache....hazar pustake aahet great.....indikar plz mala kiman 100 pustakinchi (jagtik darjachi) naava due shakal ka......tevdhich mazhya nyanat bhar padel....
  • Satish Waghmare Murli Khairnar सर १) <<‘खेळ’ नावाचे हे नियतकालिक मी कधीही वाचलेले नाही. पण त्यात छापून येणार्याभ मजकुराबाबत फेसबुकवर आजपर्यंत जे काही वाचायला मिळाले, त्यावरुन खेळकर्त्यांचा विशिष्ट अजेंडा असावा आणि त्याप्रमाणे त्यांचे काम चालत असावे असा माझा ग्रह झालेला आहे. >> तुमचे कलम एक पटले नाही . काही अजेंडा ठेवून साहित्यविषयक चळवळ करणे गैर आहे वा नाही हा भाग वेगळा , केवळ एक पोस्ट वाचून पण अजेंड्याचा आरोप करणे गैरच ! तुम्ही अजून इतर काही मजकुराचा संक्षिप्त तपशील दिला असतात तर ठीक होते .
    २)तुमच्या कलम दोनशी सहमत . मला वाटते याच्याशी कुणीच असहमत होणार नाही . काळे देखील झालेले नाहीत . पण ते असहमत आहेत हा चुकीचा सूर चर्चेत उठविला जातोय . ते अत्यंत गैर ! 
    ३) << (ज्यांना तो अस्थानी/ भ्रष्ट/ चुकीचा खर्च वाटतो त्यांना भ्रष्टाचाराशी देणेघेणे नसून खरे तर तो त्यांच्यात ‘मला (पक्षी माझ्या माणसांना) का नाही’ या विचारातून उगवणारा मत्सर असतो.) >> कुणाच्याही हेतूवर अशी शंका कशी काय घेतली जाऊ शकते ? तुम्हाला वैयक्तिक जे वाटते , त्याला सार्वत्रिक स्वरूप एकांगी पद्धतीने देणे योग्य वाटत नाही . उलट ते अन्यायकारकच म्हणावे लागेल . <<या विचारातून उगवणारा मत्सर असतो >> इथे मत्सराला हक्क , अधिकार , हे शब्दही पर्याय होऊ शकतात . 
    ४) <<त्यातून काही लेखक, काही प्रकाशक आणि फार तर काही राजकारणी यांचा आर्थिक दर्जा उंचावतो इतकेच. आणि असा तो उंचावायला माझी मुळीच हरकत नाही.>> यातले काहीच लेखक , काहीच प्रकाशक वर्षानुवर्ष स्वतःचे आर्थिक दर्जे उंचावत आहेत , मग वाड.मयीन दर्जाच्या नावाने भले ते एकमेकांना कनिष्ठ मनात असतील , तर त्यातल्या लाभ न मिळालेल्या गटाने बंड पुकारले तर तेही गैर ठरू नये . त्यावर हेत्वारोप करून त्या बंडाला नकारात्मक रूप देणे अयोग्य वाटते .
    ५) <<जागतिक दर्जा ही राजकीय चाल आहे.>> ती वाड.मयीन राजकीय चाल आहे . साडे शहाण्णव टक्के व साडेतीन टक्के यातला गोंधळ म्हणता येईल . त्याकडे कुणी कसेही बघू शकतो . त्यामुळे सहमत . 
    ६) <<खरोखर पुस्तकांचा दर्जा ज्यामुळे ठरतो / उंचावतो असे घटक वेगळेच आहेत. त्याबद्दल फार कमी लोक बोलतात, याचे वैषम्य वाटते. >> सहमत Satish TambeRavindra Lakhe, तुम्ही स्वतः आणिHarishchandra Thorat सर यांना tyag करण्याचा हेतू हाच कि तुम्ही याविषयावर बोलावे .

    ७) सामिक्षेवरील टिप्पणी मान्य भलामण करणाऱ्या गटांच्या भाषिक दुबळेपणावर योग्य ठपका . <<साहित्य संकुचित तर झालेच पण सहिष्णुता, समरसता या सामाजिक गुणांनाही कीड लागली आहे.>> सहमत ! 
    ८ )<<सैद्धांतिक, पक्षी पारिभाषिक, पक्षी गुळगुळीत पक्षी बोधहीन लिखाण करणार्याद सर्व प्रकारच्या अॅ केडेमिक साहित्यपुंगवांविरुद्ध मी जेहाद पुकारीत आहे.>> जेहादास सहमती . साहित्य कुणाचे आंदण नसल्याने नॉन अॅहकेडेमिक साहित्यपुंगव अधिकाधिक तयार व्हावेत , करावेत यासाठी शुभेच्छा !!!
  • Vikas Mohanrao Godage <<जागतिक दर्जा ही राजकीय चाल आहे.>> ती वाड.मयीन राजकीय चाल आहे . साडे शहाण्णव टक्के व साडेतीन टक्के यातला गोंधळ म्हणता येईल . त्याकडे कुणी कसेही बघू शकतो . त्यामुळे सहमत ..................................................................................................जागतिक दर्जा हि साडे शहाण्णव टक्के विरुद्ध साडेतीन टक्के हा संघर्ष आहे हे नाही समजले
  • Vikas Mohanrao Godage बोलू प्रत्यक्ष भेटीत
  • Sunil Tambe धर्मयुद्ध, जेहाद (की जिहाद) हे शब्द अरबी का फारसी वा तुर्की भाषांमधील शब्दांना पर्याय म्हणून मराठीत रूढ झाले ह्याची मला गंमत वाटते. हिंदुस्थान जेहाद वा जिहाद वा धर्मयुद्ध कधीही झालं नाही, ह्याचा तो पुरावाच वाटतो. Murli Khairnar
  • Murli Khairnar मित्रवर्य सतीश वाघमारे सर, 
    १. खेळ हे नियतकालिकाबद्दलची माझी टिप्पणी तीन गोष्टींवर होती. १. तुमची पोस्ट २. अलीकडेच त्यात आलेल्या मार्कीझच्या मुलाखतीच्या भाषांतरकार अपिणे या समिक्षकाशी झालेली एकतर्फी चर्चा व ३. काही दिवसांपूर्वी अशाच एका वादग्रस्त लेखाबद्दल फेसबुकवर आलेली एक पोस्ट व तदनुषंगिक चर्चा. हे नियतकालिक मला नियमित मिळावे यासाठी आवश्यक तो पत्रव्यवहार करीत आहे. 

    २. काही नाही. ३. व ४. पैशांचा उल्लेख झाल्यावर हळवे होणे ही महाराष्ट्रीय मानसिकता आहे. हळवे होऊ नये. मत्सराला हक्क वा अधिकार समजणे हा आर्थिक निरक्षरतेचा भाग आहे. परंतु हे विषय अर्थशास्त्राशी निगडीत असल्याने त्यावर स्वतंत्रपणे बोलू. मी जानेवारी २०१५ नंतर या (अर्थशास्त्राच्या) विषयावर स्वतंत्र व तपशीलवार लिहिणारच आहे. 

    ५. राजकीय चाल म्हणतांना प्रचलित साडेतीन व साडेशहाण्णव यांच्या पलीकडे सामान्य सत्ता-घर्षणाकडे मला लक्ष वेधायचे आहे. माझा विरोध असलाच तर साडेतीनातल्या दिडाला आहे. 

    ६. दर्जा या संकल्पनेसंदर्भात मते मांडावी यासाठी ----- अ.) मी पुरेसा परिपक्व नाही. ब. ) दर्जा ही संकल्पना पुरेशी परिपक्व नाही. क.) साहित्यविषयक संस्था परिपक्व नाहीत आणि ड. इथले वाचक परिपक्व नाहीत. या चारपैकी आपल्याला सुयोग्य वाटेल तो पर्याय निवडावा. 

    ७. व ८. अरेच्च्या! तुम्हीही मराठीचे प्राध्यापक आहात हे घटकाभर विसरलोच होतो की मी! सॉरी सॉरी!!!!!!
  • Harshad Sarpotdar Murli Khairnar आजपर्यंत 'साडेतीन' माहीत होते. आता हे 'दीड' कोण ?
    21 hours ago · Like · 1
  • Avinash Gaikwad <<मराठी भाषेचे अभिजातपण सिद्ध होणे म्हणजे ती भाषा सम्स्कृतोद्भव नाही हे सिद्ध होणे हे त्यांच्यासारख्या संस्कृतालाच सर्व भाषांची जननी मानना-यांना कसे सहन होईल? >>
    Sanmay Bhujbal यांच्या या विधानावर चर्चा व्हायला हवी . 
    त्यांनी नीट टाइप केलेले नाही . 
    पण त्यांच्या म्हणण्याचा अर्थ - मराठी भाषा ही संस्कृत भाषेतून उगम पावलेली भाषा नाही .
  • Vikas Mohanrao Godage आता कळले हा खेळ बहूजन वीरूदध बराहमन का आहेै
  • Sunil Tambe भारतातली कोणतीही भाषा संस्कृतोद्भव नाही. माझा भाषाशास्त्राचा अभ्यास नाही. पण कोणतीही भाषा दुसर्‍या भाषेतून निर्माण होते हे मला पटत नाही. खूप विचार करूनही पटत नाही. हा अडाणचोट सिद्धांत बायबलमधल्या टॉवर ऑफ बाबेल ह्या गोष्टीतून निर्माण झाला आहे. सदर सिद्धांताला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. संस्कृतला इंडो-आर्यन लँग्वेज म्हणण्यापेक्षा देववाणी म्हटलेलं परवडू शकेल. त्यामुळे एखादी भाषा संस्कृतोद्भव नाही एवढाच अभिजाततेचा निकष असेल तर अभिजात भाषेच्या विकासासाठीचे 100 कोटी रुपये भारतातल्या प्रत्येक भाषेला मिळायला हवेत.
    17 hours ago · Unlike · 1
  • Avinash Gaikwad <<संस्कृतला इंडो-आर्यन लँग्वेज म्हणण्यापेक्षा देववाणी म्हटलेलं परवडू शकेल>>

    यासंबंधी आणखी जाणून घ्यायला आवडेल . 


    <<त्यामुळे एखादी भाषा संस्कृतोद्भव नाही एवढाच अभिजाततेचा निकष असेल तर अभिजात भाषेच्या विकासासाठीचे 100 कोटी रुपये भारतातल्या प्रत्येक भाषेला मिळायला हवेत.>>
    - मिळू द्या ना ,बिघडले कुठे ?
    17 hours ago · Edited · Unlike · 1
  • Meera Sirsamkar खरे तर ,
    १ . भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे म्हणजे नेमके काय ?
    २. त्यामुळे कोणते लाभ (आर्थिक नव्हे ! ) मराठी भाषेला मिळणार आहेत ? 

    ३ आजवर कोणकोणत्या भारतीय भाषांना अभिजाततेचा दर्जा मिळालेला आहे ? आणि त्यामुळे त्या विशिष्ट भाषा समृद्ध झाल्या आहेत का ?
    ४. आणि मराठी भाषेला तसा अभिजाततेचा दर्जा मिळणे आवश्यक असेल तर काय करणे गरजेचे आहे ? 
    ५. यासाठी आम्ही काही मदत करू शकतो का ?
    या संदर्भात मागे टी व्ही वर हरी नरके यांनी आपली मते मांडली होती . तो कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट झाला होता असे स्मरतेय .
    पण इथे फेसबुकवर त्या संदर्भात काही लेख /माहिती/लिंक उपलब्ध आहे का ?
    …… आणि मग या साऱ्या संदर्भात मराठी भाषा संस्कृतोद्भव आहे किंवा नाही हा मुद्दा मला तरी गौण वाटतो .
    17 hours ago · Unlike · 1
  • Avinash Gaikwad Meera Sirsamkarतुमच्या शंकांचे निरसन Hari Narke सर व Rangnath Pathareसर हे चांगल्या प्रकारे करू शकतील ,असे वाटते .
    17 hours ago · Edited · Unlike · 2
  • Hari Narke मराठी भाषा अभिजातच…
    Kalamnaama,
    http://kalamnaama.com/marathi-bhasha-abhijatach/....
    ...See More


    kalamnaama.com
    दहा वर्षांपूर्वी केंद्र सरकारने तामीळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यानंतर ...See More

No comments:

Post a Comment