प्रमोद महाजन हे एक अफलातून वक्ते होते.
एका भाषणात त्यांनी सांगितलेला किस्सा -
एक शाळेत शाळा तपासनीस आलेले असतात. ते एका मुलाला एक प्रश्न विचारतात, मुलाला नीट उत्तर देता येत नाही. ते वैतागतात, त्याला म्हणतात, अरे, तुला इतक्या साध्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही, वर्षभर वर्गात काय झोपा काढतोस?
तो मुलगा म्हणतो, सर चुक माझी नाही.मुळात मी या वर्गातला विद्यार्थीच नाहीये. मला दुसर्या वर्गातून इकडे आणून बसवलय. मला कसं माहित असणार इकडचं?
साहेब शिक्षकाला झापतात, काय हो असा उद्योग करता काय? इकडची उपस्थिती वाढवण्यासाठी दुसर्या वर्गातली मुलं आणून बसवता?
साहेब शिक्षकाला झापतात, काय हो असा उद्योग करता काय? इकडची उपस्थिती वाढवण्यासाठी दुसर्या वर्गातली मुलं आणून बसवता?
शिक्षक गयावया करीत सांगतात, साहेब विश्वास ठेवा, मी हे केलेले नाही. आज इकडचे शिक्षक रजेवर असल्याने ऎनवेळी मला या वर्गावर पाठवलेय. मला हे काहीही माहित नव्हते.
साहेब भडकतात, मुख्याध्यापकाला बोलवून धारेवर धरतात.
असले धंदे करता?
मुख्याध्यापक म्हणतात, साहेब त्याचं असं झालं, इथल्या मुख्याध्यापकांच्या मुलीचा आज बाहेरगावी साखरपुडा आहे. ते नसल्याने संस्थेने मला आजचा दिवस दुसर्या शाळेतून इकडं पाठवलय. माझी काय चुक?
साहेबांचा पारा चढतो. ते संतापून म्हणतात, अरे चाललय काय या शाळेत? मुलं नकली, शिक्षक बदली, मुख्याध्यापक बाहेरचे, अरे मुर्खांनो, आज जर खरा साहेब आला तर असता तर काय शोभा झाली असती कळतय तुम्हाला?
No comments:
Post a Comment