रा.स्व. संघ ही शिस्तबद्ध संघटना असल्याचे ढोल वाजवले जातात,
मग संघ कार्यकर्ते ३ जानेवारी १९४९ ला राज्यघटना सभेचे कामकाज उधळायला संसदेत का घुसले होते?
शिस्तीत घटनासभा बंद पाडून भारताचे संविधान लिहिण्याच्या कामात मोडता घालून हे लोक संविधानाला पाठींबा देत होते का? ह्यालाच हे संविधानाचा सन्मान म्हणतात का?
वाचा- " संविधान सभेचे उपाध्यक्ष डॉ. एच.सी. मुखर्जी यांनी सदस्यांना सांगितले की आपले कामकाज उधळण्यासाठी, गोंधळ घालण्यासाठी काल आर.एस.एस.चे कार्यकर्ते सभागृहाच्या लॉबीत घुसले होते. सिक्युरिटीने त्यांचा वेळीच बंदोबस्त केल्याने अनावस्था प्रसंग टळला. तरी यापुढे सदस्यांनी फक्त ओळखीच्याच कार्यकर्त्यांना प्रवेश पत्रिका द्याव्यात."
पाहा - संविधान सभेचे इतिवृत्त, भारत सरकार प्रकाशन, नवी दिल्ली, खंड, ७वा, पृ. १२३३, दि. ४ जाने. १९४९ CAD7/1233, ४ जाने.१९४९,
#RSS_की_पोलखोल
-प्रा.हरी नरके, २१/०४/२०२०
No comments:
Post a Comment