Monday, April 27, 2020

चंद्र, सूर्य, राहू, केतू, मंगळ, बुध, गुरूसह नायजेरियामध्ये कोरोनात मदतीला धावले स्वयंसेवक- रा.स्व.संघ 11






चंद्र, सूर्य, राहू, केतू, मंगळ, बुध, गुरूसह नायजेरियामध्ये कोरोनात मदतीला धावले स्वयंसेवक- प्रा. हरी नरके

आमच्या हाती आलेल्या खात्रीशीर बातम्यांनुसार कोरोनापिडीतांसाठी आज विश्वात फक्त स्वयंसेवकच मदतीचे काम करीत आहेत. सरकारं ठप्पं आहेत, सैन्यं झोपलीयत, पोलीस पर्यटनाला गेलेत. काम करताहेत ते फक्त एक  हजार कोटी स्वयंसेवक. [जगाची लोकसंख्या भले ८०० कोटी असेल पण आमचे स्वयंसेवक मात्र १ हजार कोटी आहेत.] स्वयंसेवक रात्रंदिवस सलग २९ ते ३२ तास दररोज  मदतीचे काम करतात. न थकता, न खातापिता, न झोपता. प्रत्येक स्वयंसेवक विश्वातील सर्वांच्या मदतील धावलेला आहे. जगातील ३३३ देशांमध्ये आज स्वयंसेवक मदतवाटप करीत आहेत. [ काय म्हणता जगात २२० च देश आहेत, असतीलही, पण आमचे स्वयंसेवक ३३३ देशांत काम करताहेत.]

विशेषत: राहू आणि केतू या ग्रहांवरील काम विशेष प्रशंसनीय आहे. झालेच तर नायजेरिया, रशिया, जपान, चीन, फ्रान्स, जर्मनी येथील कार्याबद्दल तेथील राष्ट्रप्रमुखांनी प्रशंसोद्गार काढलेत. कोरोना संपल्यावर त्यांनीही स्वयंसेवक होण्याचे अभिवचन दिलेले आहे. तिथे घरोघर जाऊन स्वयंसेवक चितळेंचे दूध, नागपूरची टरबुजं, नरेंद्र केळी, अमित गाजरं, आंबाभुर्जी आणि संघप्रणीत शेतीतील धान्य वाटत आहेत. आजवर सुमारे दहा लाख कोटी टन धान्याचं वाटप झालेलं आहे. वाटलेल्या गंगाजल, गोमुत्र आणि गोमयाची तर मोजदादच नाही.

परवाच ट्रंपतात्यांचा शेटना फोन आला होता. म्हणाले, मला गुजरात चहा, चितळेतुपाचा शिरा, मनोहर भुर्जी आंब्याचा रस, रेशीमबागेतील भरीत आणि मोतीबागेतील कोशिंबीर भयंकरच आवडली. तात्या पुढे असेही म्हणाले की, व्हॉईटहाऊसमध्ये सगळे कामचोर भरलेत. काम करताहेत ते फक्त स्वयंसेवक. असेच फोन राहू, केतू आणि आणखी साताठसे ग्रहांवरून तसेच पाचकशे तार्‍यांवरून आलेत. मोजदाद तरी किती ठेवणार?

अशा मजकूराच्या प्रत्येकी शंभर पोस्टी एकेकाने आज फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सपवर फिरवा. हाणा तिच्यामायला. हाय काय, अन नाय काय! लक्षात ठेवा आपले ब्रीदवाक्य काय आहे? काम चिमुटभर, पण प्रसिद्धी, मार्केटिंग आभाळभर. सरकारी कर्मचारी, स्वयंसेवी संस्था मदतीचे काम करीत असतील तिथे जाऊन आपला बॅनर लावून फोटो काढून आणायचे. लक्षात ठेवा काम न करता फक्त फोटो खेचायचे नी पोस्ट करायचे. आयटी सेलकडून आम्ही फोटोशॉंपी मारून घेतोच आहोत.

प्रत्येक पोस्टींमागे एक अमितकेळे, देवेंद्रगाजर आणि नरेंद्र चलनातले चाळीस पैसे दिले जातील. जे स्वयंसेवक एव्हढेही करणार नाहीत त्यांना वळूंच्या गोठ्यात बांधण्यात येईल. चला लागा कामाला ******! सुस्तावलेत नुसते.

प्रा. हरी नरके,२७/४/२०२०

No comments:

Post a Comment