संघाची लबाडी २ - डॉ. बाबासाहेबांना वैदीक धर्माचे समर्थक बनवले- प्रा. हरी नरके
रा.स्व.संघाचे जे मोजके श्रेष्ठी आहेत त्यात मोहन भागवत, मनमोहन वैद्य यांच्यानंतर तिसरा क्रमांक लागतो कृष्ण गोपाल शर्मा यांचा. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील तत्ज्ञ म्हणून लखनौच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाने व्याख्यानाला बोलावले होते. केंद्राची आणि युपीची सत्ता भाजपा-संघाच्या ताब्यात असल्याने विद्यापीठेही त्यांच्याच कब्ज्यात आहेत.
ज्यांचा बाबासाहेबांच्या जीवन-कार्य-विचारांचा अभ्यास नाही अशा व्यक्तीला भाषणाला ही विद्यापीठे बोलावतातच कशी? बाबासाहेबांच्या नावावर शर्मांनी चक्क विरोधी विचार ठोकून दिले. त्यांना बाबासाहेबांना शंकराचा अवतार घोषित करायचे असणार. त्यांच्या भाषणांच्या मोठमोठ्या बातम्या दिल्या गेल्या. लोकांमध्ये त्या वक्त्यांची आंबेडकरांवरील अधिकारी विद्वान अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. ही घटना आहे, साडेतीन वर्षांपु्र्वीची.
संघाचे सरसचिव मनमोहन वैद्य यांनी आरक्षणविरोधी वक्तव्यं केल्यानंतर आता संघाचे दुसरे श्रेष्ठी वादग्रस्त वक्तव्य करीत आहेत. संघाचे सह सरसचिव कृष्ण गोपाल शर्मा डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत डॉ. आंबेडकर विद्यापीठात, लखनौमध्ये बोलत होते.
ते म्हणाले, " १. बाबासाहेबांनी कधीही वैदीक [ब्राह्मणी] धर्माला विरोध केलेला नाही.
२. बाबासाहेबांना वैदीक [ब्राह्मणी] धर्म प्रिय होता. ते त्याचे समर्थक होते. त्यांचा विरोध फक्त त्यात नंतर घुसवण्यात आलेल्या वाईट गोष्टींना होता. ते मूळ वैदीक विचारांच्या बाजूचे होते.
३. भाषेच्या आधारावर राज्यं बनवायला आंबेडकरांचा विरोध होता.
४. आंबेडकरांचा कितीही अपमान झाला, त्यांना छळले गेले तरी त्यांनी ते विष [हालाहल] शंकर भगवानांप्रमाणे पचवले. [सुचन- बाबासाहेब शंकराचे अवतार होते]"
भाषण दीड तासांचे होते त्यात पाल्हाळच जास्त होते. मुद्दे एव्हढेच होते. पण ते लबाडीचे आणि घातक होते. बाबासाहेबांना वैदीकांच्या बाजूने उभे करण्याचे हे षडयंत्र होते.
हे भाषण विद्यापीठातले असल्याने ते विद्यापीठ पुस्तकरूपाने छापणार, मग ते अभ्यासक्रमाला लावले जाणार आणि इतिहास म्हणून रुजवले जाणार, अशी ही लबाडी होती.
मी कृष्ण गोपाल शर्मांना ताबडतोब उत्तर दिले आणि शर्मांचे वक्तव्य खोडून काढले.
त्यांना सणसणीत भीमटोला देताना मी म्हटले, " १. संघाचे कृष्ण गोपाल शर्मा बाबासाहेबांच्या विचारांचा विपर्यास करीत आहेत. बाबासाहेबांनी १९३६ साली लिहिलेल्या "जाती संस्थेचे उच्चाटण" या ग्रंथात चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा पुरस्कार करणार्या वैदीक विचारधारेला संपुर्ण नकार दिलेला आहे. कठोर धर्मचिकित्सा करून बाबासाहेबांनी वैदीक विचारधारेवर आसूड ओढलेले आहेत. अशा स्थितीत त्यांना सनातनी ब्राह्मणी धर्माचे समर्थक म्हणून पेश करणे अन्यायकारक आहे. बाबासाहेबांची टोकदार मांडणी बोथट करण्याची संघाची ही साजिश आहे. संघाला बाबासाहेबांना शंकराचा अवतार बनवायचा असून त्यांचे क्रांतिकारक विचार लपवायचे आहेत.
२. बौद्ध धर्म स्विकारताना त्यांनी घेतलेल्या २२ प्रतिज्ञांपैकी आठ प्रतिज्ञा वैदीक विचारधारा नाकारणार्या आहेत. अशा बाबासाहेबांना वैदीक तत्वज्ञानाचे पुरस्कर्ते म्हणून सादर करणे ही शर्मांची आणि पर्यायाने संघाची लबाडी आहे.
३. वैदीक धर्मग्रंथ हे बहिष्कृततेच्या तत्वाचे पुरस्कर्ते असल्याने या धर्मामुळे स्त्रिया, शूद्र [ओबीसी] आणि अतिशूद्र [अनुसुचित जाती] यांना अतोनात छळ सोसावा लागला. त्यांची उच्चवर्णियांनी ह्याच ग्रंथांच्या आधारे लूट केली असेही बाबासाहेबांनी सिद्ध केलेले आहे.
४. धर्माच्या आणि धर्मग्रंथांच्या नावावर स्त्री-शूद्रांवर शताकानुशतके अपार जुलूम करण्यात आला. ही तत्वं नुसती धार्मिक नसून ती कायदा आणि निर्बंध म्हणून राजसत्तेनं शेकडो वर्षे राजदंडाच्या जोरावर राबवलेली. त्यामुळे त्याला कायद्याचे, संविधानाचे रूप आलेले होते. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळून तसेच राज्यघटनेच्या कलम १३ मध्ये हे विषमतावादी कायदे रद्द केलेले असताना त्यांना या वैदीक विचारधारेचा समर्थक ठरवणं हे आम्हाला मान्य नाही.
५. गौतम बुद्धांनी वेद नाकारले. वैदीक विचारधारा फेटाळली. ब्राह्मणी कर्मकांड नाकारले. पुनर्जन्म आणि कर्मविपाकाचा सिद्धांत ठोकरला. श्रेणीबद्ध विषमता लादणारी वैदीक व्यवस्था बुद्धांनी उधळून लावल्याचे बाबासाहेबांनी सप्रमाण दाखउन दिले. बुद्ध गुणवत्ता आणि आचरणावर माणसाची पारख करीत होते, जन्मावर नाही हेही बाबासाहेबांनी सप्रमाण मांडले.
६. पुणे करारात बाबासाहेबांनी दुबळ्या, मागास समाजघटकांना आरक्षणाद्वारे न्याय मिळऊन दिला. संघाचा आरक्षणाला विरोध असल्याने बाबासाहेबांचे हे योगदान संघाला पुसायचे [ नष्ट करायचे ] आहे."
हे उत्तर यासाठी आवश्यक होते की हे लोक बाबासाहेबांना भगवान शंकराचा अवतार बनऊन मोकळे व्हायचे.
तेव्हा बोलणारी व्यक्ती कितीही मोठ्या पदावरील असली, शक्तीमान असली तरी उत्तर देणे भाग होते.
संघ वर्तुळात या उत्तराने संतापाची लाट उसळली. त्यांचा खूप जळफळाट झाला.
केलेल्या कामाचे ढोल वाजवण्याची आपली पद्धत नाही.पण बहुजन समाजाला सांगितल्याशिवाय कळतही नाही, त्याला काय करावे?
त्यावेळी टाइम्स समुहाने माझे म्हणणे ठळकपणे छापले होते. ते सोबत जोडले आहे.
संघ खडे टाकून अजमावतो. विरोध झाला नाहीतर सुसाट सुटतो. विरोध झाला तर दोन पावले मागे येतो. थांबतो. मात्र थोड्या दिवसांनी पुन्हा प्रचार सुरू करतो. अफवातंत्र, खिशात असलेले पत्रकार आणि मालक यांच्या जोरावर धडधडीत खोट्या गोष्टी इतिहास म्हणून लोकांच्या गळी उतरवतो. म्हणून वेळीच विरोध करावा लागतो.
प्रा. हरी नरके, 01/05/2020
संपुर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR2fJwHv5DhnuAJvbAx_ab_ANshKPSE6eReuGzIQasl6DoBGcMrCDllpVkY
परिशिष्ट-१-
How Babasaheb rejected and criticised the Vedas?
इकॉनॉमिक्स टाईम्स, Jan 24, 2017, वैभव पुरंदरे
First eight of the 22 vows that Ambedkar administered to his followers on the day he embraced Buddhism involved an open repudiation of the Vedic religion.
By Vaibhav Purandare, TNN| Jan 24, 2017
MUMBAI: Contrary to RSS official Krishna Gopal's claim that Dr Babasaheb Ambedkar had immense faith in the Vedic religion, the framer of India's Constitution not only never believed in the Vedas or Vedic faith but severely criticised it several times, once going to the extent of writing, in his canonical work 'Annihiliation of Caste', that “you have got to apply the dynamite to the Vedas and the shastras, which deny any part to reason; to the Vedas and shastras, which deny any part to morality .“
The first eight of the 22 vows that Ambedkar administered to his followers on the day he embraced Buddhism in Nagpur on October 14, 1956, were also an open repudiation of the Vedic religion, said scholar Hari Narke, who edited volumes 17 to 22 of Ambedkar's writings and speeches, published by the Maharashtra government.
In 1936, Ambedkar wrote, “The Hindu religion, as contained in the Vedas and the Smritis, is nothing but a mass of sacrificial, social, political and sanitary rules and regulations, all mixed up. What is called religion by the Hindus is nothing but a multitude of commands and prohibitions.“
Offering a radical solution to the problem of too many scriptures in Hinduism, he said the “Vedas, Shastras and Puranas, which are treated as sacred and authoritative, must by law cease to be so and the preaching of any doctrine, religious or social contained in these books should be penalised.“ Describing the great work of the Buddha, Ambedkar stated that the founder of Buddhism had “repudiated the authority of the Vedas“.When Buddha condemned “karma kanda“ (rituals) and Yagnas, Ambedkar stated, the “counter-revolutionaries“ opposed him saying these things “were ordained by the Vedas, the Vedas were infallible.“
But, he wrote, “People who had accepted the gospel of social equality and who were remaking society on the basis of each one according to his merits--how could they accept the Chaturvarnya theory of gradation and separation of man based on birth simply because the Vedas say so?“
In at least four of his works in addition to the controversial `Riddles in Hinduism -Caste in India' (1916), 'Annihilation of Caste' (1936), `Who were the Shudras' (1946) and `The Untouchables' (1948) -Ambedkar offered a strong indictment of the earliest known Hindu texts.
https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/how-babasaheb-rejected-and-criticised-the-vedas/articleshow/56750772.cms?from=mdr
......................................................
No comments:
Post a Comment