Friday, July 23, 2021

संस्कृतीची निर्मिती


दहावी,बारावीचे निकाल लागले की घराघरात मार्कांची चर्चा रंगू लागते. आपल्या पाल्याला चांगले मार्क मिळावेत,नामवन्त कॉलेजात प्रवेश मिळावा, त्यानन्तर चांगल्या पगाराची नोकरी मिळावी अशी वहिवाट असते.त्यात चुकीचं काही नाही.पण एव्हढचं पुरेसं नाही.समाज म्हणून ज्ञाननिर्मिती नी कौशल्यवर्धन यांचा ध्यास गरजेचा आहे.ओबीसी मेरिट या मालिकेत आपण ज्या ओबीसीने उत्तम वाचन,लेखन, ग्रँथसंग्रह केलाय त्यांचाही गौरव करणार आहोत. ज्यांच्या घरी स्वतः विकत घेतलेल्या २००० किंवा अधिक पुस्तकांचा संग्रह असेल त्यांनी त्या पुस्तकांसोबतचा सेल्फी फेसबुकच्या कॉमेंट मध्ये पाठवावा व स्वतःबद्दल १५० शब्दात लिहावे.

लक्षात ठेवा,जे समाज ज्ञानार्जन आणि ज्ञाननिर्मितीत अग्रेसर असतात तेच संस्कृतीची निर्मिती करू शकतात.पैसा, उत्तम राहणीमान,श्रीमंती भवताल महत्वाचा असतोच,पण तो संस्कृतीची जोपासना करू शकेलच असं नाही. आपल्याला दोन्ही हवेत. -प्रा. हरी नरके

No comments:

Post a Comment