Friday, July 23, 2021

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री मोहन भागवत यांनी मुस्लिम समाजाबद्दल व्यक्त केलेली भूमिका फक्त बोलण्यापूरती आहे की संघ स्वयंसेवक ती अमलातही आणणार आहेत? संघ बदलला यावर विश्वास कसा ठेवायचा? सनातनी बदलले तर ते सनातनी कसे राहणार? मुस्लिम द्वेष,मुस्लिम समाजाविषयीचा विखार हा तर संघाचा प्राणवायु आहे.त्यावरच तर त्यांचे हिंदुत्व उभे आहे. भाजपाची हिंदू मतपेढी उभीच मुळी या तिरस्कारावर आहे. भागवतांनी संघाच्या आजवरच्या मुस्लिमविषयक भूमिका चुकीच्या होत्या असे जाहीर करून त्यांचे खंडन केलेले नाही. त्यामुळे सोयीनुसार कधी जुनी भूमिका व उत्तरप्रदेश निवडणुकीपुरती ही भूमिका असे नसेल याची खात्री कोण देणार? त्यामुळे भागवतांचे हे ग्लॅस्नोस्त नसून निवडणुका-मुस्लिम वोट बँक नी ई व्ही एम बचाव धोरणच दिसते.योगी हा खरा चेहरा नी नवे प्रवचनकार भागवत हा त्यांचा मुखवटा आहे. ह्याला कुणीही भुलणार नाही.. हा फक्त चुनावी जुमला आहे. इलेक्शन मॅनेजमेंटचा फ़ंडा..प्रा. हरी नरके

No comments:

Post a Comment