Friday, July 23, 2021

 गुरुजी एका झाडाखाली विद्यार्थ्याला शिकवत होते."बेटा, लक्षात ठेव,जे आहे ते नाहीये. असल्याचा भास आहे...." इतक्यात एक हत्तीवर धावत येताना बघून गुरुजी १२०च्या स्पीडने पळाले. झाडावर जाऊन बसले. हत्ती गेल्यावर गुरुजी खाली आले, म्हणाले,"बेटा, जे आहे ते... " विद्यार्थी म्हणाला,"गुरुजी, मग हत्ती आला तेव्हा तुम्ही जीव वाचवायला पळालात का?"

गुरुजी म्हणाले,"कोणता हत्ती? कोण पळाला? तो तर सगळा भास होता."

काल गुरुजी संसदेत म्हणाले,"ऑक्सीजन अभावी देशात एकही मृत्यू झालेला नाही." "स्थलांतरीत मजुरात एकही मृत्यू न झाल्याचे " मागच्या अधिवेशनात त्यांनी सांगितलेच होते. पुढच्या अधिवेशनात सांगतील,"रेमेडिसीवर मिळत नव्हते,दवाखाण्यात बेड्स नव्हत्या,ह्या सगळ्या अफवा होत्या."

नन्तर हे 'संस्कारी-देशभक्त ' लोक पाठयपुस्तकात लिहितील,"मोदींच्या पुण्याईमुळे करोना तात्काळ पळाला, माणसं मेली,गँगेत प्रेतं वाहिली, स्मशानभूमीत जागा मिळत नव्हती त्याकाळात मात्र भारतात मनमोहन सिंग यांचं सरकार होतं." सराईतपणे खोटे बोलणे, स्वतःच्या नाकर्तेपणाच्या पावत्या दुसऱयांवर फाडणे हीच यांची नकली देशभक्ती!-- प्रा. हरी नरके

No comments:

Post a Comment