जागतिकीकरणाच्या आजच्या लाटेत "स्पर्धाच स्पर्धा चोहीकडे" असे वातावरण आहे.थातुरमातुर स्पर्धा आयोजित करायच्या.लोकांना एसएमएस करायला लावायचे आणि त्यातुन मजबूत कमाई करायची असा हा सापळा असतो. काही वाहीन्या आणि प्रिंटमिडीयातील मंडळींनी अलिकडॆच या लाटेत हात धुवुन घेण्याच्या उद्देशाने अशीच एक स्पर्धा घोषित केलेली आहे.महात्मा गांधींनंतरचा सर्वश्रेष्ट भारतीय कोण? हे ठरविण्यासाठीची ही मेरेथोन स्पर्धा आहे. २६ सदस्यीय ज्युरींनी १०० नामांकनांमधुन ५० नावे निवडलेली आहेत. २५ जुनपर्यन्त वाचक आणि प्रेक्षकांनी केलेल्या मतदानातुन तसेच आजपासुन ३१ जुलैपर्यंत घेतल्या जाणा-या देशव्यापी "ओपिनियन पोल"मधुन १०जणांची नावे निवडली जातील. १५ ओगस्टला त्यातुन एका सर्वश्रेष्ट भारतीयाचे नाव घोषित केले जाईल.
या ५०जणांमध्ये डा.बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरु, सरदार पटेल, जयप्रकाश नारायण, डा.राममनोहर लोहिया,राजगोपालाचारी,विनोबा भावे,कांशीराम,इंदिरा गांधी यांच्यासह नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन आणि मदर तेरेसा यांचाही समावेश आहे.या यादीत उद्योगपती जे.आर.डी.टाटा, शास्त्रद्न्य डा.होमी भाभा,विक्रम साराभाई, ओस्कर पुरस्कार विजेते दिग्दर्शक सत्यजित रे आणि ओलेंपिकमध्ये भारताला होकीची असंख्य सुवर्णपदके मिळवुन देणारे मेजर ध्यानचंद यांचीही नावे आहेत.
चित्रपट,संगित, नाटक,क्रिडा,उद्योग अश्या ग्लेमर असणा-या आणि माध्यमप्रिय क्षेत्रातील किती लोक या यादीत असावेत? ६० टक्के! रजनीकांत,देव आनंद, दिलीप कुमार, किशोर कुमार, राजकपुर, मिल्खासिंग, कपिल देव, गावस्कर, सचिन तेंडुलकर, विश्वनाथन आनंद, अमिताभ बच्चन, ए.आर.रहमान, लता मंगेशकर आदिंची बाजारातील केवळ लोकप्रियता बघुनच त्यांना या यादीत घातले असावे हे स्पष्टच आहे.या मालिकेतील निम्मे लोक आज हयात असुन त्यांच्या कामाचे मुल्यमापन आत्ता लगेच करण्याची एव्हढी काय घाई होती तेच समजत नाही.बाबासाहेब, नेहरु, पटेल यांच्यासारख्या राष्ट्र्नेत्यांसोबत या हयात मंडळीची तुलना करणे पोरकटपणाचे आहे.कोणत्याही स्पर्धेत एक संकेत पाळला जातो.स्वत: आयोजकाने किंवा त्यांच्या कुटुंबियांनी त्यात भाग घेवु नये.पण या स्पर्धेच्या आयोजकांपैकी असणा-या एका मोबाईल कंपनीचे मालकही या यादीत आहेत.संयोजकच स्वत: स्पर्धक असण्याची ही जगातील एकमेव स्पर्धा असावी.
या स्पर्धेवर माझे प्रामुख्याने २ आक्षेप आहेत.{१}पहिले सर्वश्रेष्ट भारतीय म्हणुन महात्मा गांधी यांची निवड कोणी,कधी आणि कोणत्या निकषांच्या आधारे केली हे जाहीर करण्यात आलेले नाही. {२}जाती,धर्म,प्रदेश,भाषा, लिंगभाव,वर्ग,वर्ण आदि भेदांचे माहेरघर असणा-या या देशातील लोकव्यवहार आणि लोकमत घडविण्याची यंत्रणा यांचे भान ठेवण्यात आलेले नाही.
या यादीत अवघ्या सहा महिलांना स्थान देण्यात आलेले आहे.या यादीतील सुमारे ६५%लोक हे भारतीय वर्णव्यवस्थेने ज्या ३ वर्णांना{ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य} "द्विज" मानले त्यातील ६५% आहेत.मुस्लीम समाजातील जातीव्यवस्था सच्चर आणि मिश्रा आयोगांनी अधोरेखित केलेली आहे.त्यामुळे धर्मांतरित द्विजांचा विचार केला तर ही संख्या ८०% वर जाते. भटके-विमुक्त आणि आदिवासींना या यादीतुन बहिष्कॄत करण्यात आलेले आहे.इतर मागास वर्ग आणि अनुसुचित जाती यांचे प्रतिनिधित्त्व दाखविण्यापुरतेच आहे.
महात्मा गांधी हे एक महान नेते होते यात वादच नाही.देशाच्या स्वातं-यासाठी त्यांनी दिलेले योगदान अभुतपुर्व होते.असे असुनही एक खेदजनक अनुभव आपल्यासमोर मांडला पाहिजे. त्यांच्या साहित्याचे १०० खंड भारत सरकारने प्रकाशित केलेले आहेत.त्यांचा मराठी अनुवाद करण्याचा प्रकल्प महाराष्ट्र सरकारने हाती घेतला होता. ४० खंड प्रकाशित करुन तो बंद करण्यात आला.कारण त्या ग्रंथांची किंमत नाममात्र ठेवुनही त्याला ग्राहकच मिळेना.सरकारने हे संच शाळा,महाविद्यालये, विद्यापिठे यांना मोफत देण्याची योजना आखली परंतु प्रतिसाद शुन्य.आजही हे खंड निर्मितीखर्चाच्या फक्त एक टक्का भावातही घ्यायला कोणी तयार नाही. त्यामुळे सरकारची मोठी पंचायत झालेली आहे.ही पुस्तके रद्दीत घालता येत नाहीत आणि गोडावून्स अडकुन पडलेली आहेत.
कविवर्य कुसुमाग्रजांची एक गाजलेली कविता आहे.शिवराय,फुले,बाबासाहेब,टिळक,गांधीजी यांचे पुतळे एकदा गप्पा मारत बसलेले असतात.सर्वांच्या व्यथा ऎकुन गांधीजी म्हणतात,"तुमचे तसे बरे आहे,तुमच्यामागे एकेक जात, किमान पोटजात तरी आहे.माझ्यामागे आहेत केवळ सरकारी कार्यालयांच्या भिंती." गेला महिनाभर आपण एक वाद झडताना बघत आहोत. गांधीवादी,सत्याग्रही म्हनवुन मिरवणारे काहीजण गांधीभवनाची मालकी कोणाची यावरुन एकमेकांच्या झिंज्या उपटित आहेत.
मध्यंतरी राजकुमार हिरानी यांनी "गांधीगिरी" चित्रित करणारा मुन्नाभाई पडद्यावर आणला तो सुपरहिट झाला.
डा.बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधींवर अनेकदा प्रखर टिका केलेली आहे."गांधी आणि कांग्रेसने अस्प्रृश्यांचे काय केले?" रानडे,गांधी आणि जिना आदी ग्रंथांत याचे अनेक पुरावे मिळतात."अस्पृशता नष्ट व्हावी म्हणुन गांधीजी प्रयत्न करीत आहेत हे मी कधीच नाकारलेले नाही परंतु ते मुर्खांच्या साम्राज्यात विहार करणा-या तत्वद्न्यान्यापैकी एक योगभ्रष्ट विभुती दिसतात.महात्मा हे एखाद्या वावटळीसारखे असतात, त्यांच्यामुळे धुळ तेव्हढी उडते, समाजाचा स्तर मात्र उंचावत नाही".अश्या कडवट शब्दांत बाबासाहेबांनी हल्ला केलेला आहे.जातीव्यवस्थेच्या प्रश्नांच्या संदर्भात ते दोघे परस्परविरोधी छावणीत राहुनही एकमेकांमुळे विकसित होत गेले असे मानणारा अभ्यासकांचा एक वर्ग आहे.
बाबासाहेबांनी प्रतिकुल परिस्थितीतुन येवुन अपार कष्टाने जी असामान्य उंची गाठली ती बघता, "मेकर्स ओफ युनिव्हर्स" च्या मालिकेत संपुर्ण जगातील गेल्या दहा हजार वर्षातील निवडक १०० महापुरुषांमध्ये त्यांना स्थान देण्यात आलेले आहे.त्यात बुद्ध,महावीर आणि अशोक हे अग्रभागी आहेत.मात्र या मालिकेत गांधीजींना स्थान देण्यात आलेले नाही.
बाबासाहेबांना मत द्या,असे सांगणारे बरेच एसएमएस मला आले.दुसरीकडे स्पर्धेत अजिबात भाग घेवु नका असेही सांगणारे काही निघाले.चळवळीतील लोकांचे फोननंबर मिळविण्याची संघाची ही खेळी आहे,सबब फोन करु नका असेही सांगणारे निघाले.
गांधीजींना परस्पर सर्वश्रेष्ट ठरवुन टाकायचे आणि आता त्यांच्यानंतर कोण ते सांगा असे विचारायचे हा रडीचा डाव नाही काय? बाबासाहेबांसमोर बाजारबुणगे वाटावेत अश्या काही अत्यंत सामान्य कुवतीच्या लोकांना या स्पर्धेत आणायचे हाही नविन प्रकारचा जातीवादच नाही काय? जातीग्रस्त मानसिकता असणारे भारतीय लोक बाबासाहेबांचे मोठेपण कबुल करण्याची दानत आतातरी दाखवतील काय?असे काही प्रश्न आहेत. जनता,ज्युरी आणि बाजार काय करतो ते १५ आगस्टला कळेलच.
ज्या भारतीय मतदारांनी १९५२ आणि १९५४ च्या लोकसभा निवडणुकीत "राज्यघटनेच्या या जनकाला" पराभुत केले होते त्यांना आपली चुक दुरुस्त करण्याची ही संधी आहे.ते आपली चुक दुरुस्त करतील काय?
.....................................................................................................................................................................
{टिप:पहिल्या फेरीचे निकाल हाती आले असुन प्रथम क्रमांकाची मते डा.बाबासाहेब आंबेडकर यांना मिळालेली आहेत.उरलेल्या ९ जणांमध्ये पं.नेहरु,इंदिरा गांधी,मदर तेरेसा,सचिन तेंडुलकर,वल्लभभाई पटेल,जे.आर.डी.टाटा,अटलबिहारी वाजपेयी,अब्दुल कलाम,लता मंगेशकर असा क्रम आहे.}
या यादीत अवघ्या सहा महिलांना स्थान देण्यात आलेले आहे.या यादीतील सुमारे ६५%लोक हे भारतीय वर्णव्यवस्थेने ज्या ३ वर्णांना{ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य} "द्विज" मानले त्यातील ६५% आहेत.मुस्लीम समाजातील जातीव्यवस्था सच्चर आणि मिश्रा आयोगांनी अधोरेखित केलेली आहे.त्यामुळे धर्मांतरित द्विजांचा विचार केला तर ही संख्या ८०% वर जाते. भटके-विमुक्त आणि आदिवासींना या यादीतुन बहिष्कॄत करण्यात आलेले आहे.इतर मागास वर्ग आणि अनुसुचित जाती यांचे प्रतिनिधित्त्व दाखविण्यापुरतेच आहे.
ReplyDeleteसर्वश्रेष्ट ठरवण्यासाठी फक्त कर्तुत्व महत्वाचे आहे. लिंग, जात, धर्म ह्या गोष्टी गौण आहेत.
अंगभुत गुणांना वाव मिळण्यासाठी संधी आवश्यक असते. आपल्या देशात पक्षपाताची तीन केंद्रे आहेत,जात,वर्ग,लिंगभाव.संधीच डावलली गेली तर कर्तृत्वाची चमक दिसणार कशी?
ReplyDeleteFROM:FACEBOOK:....sunil tambe:"म. गांधी यांचं समग्र साहित्य भारत सरकारने प्रसिद्ध केलं. म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं समग्र साहित्य महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलं. म. गांधी यांच्या जीवनावरील चित्रपट भारत सरकारने प्रायोजित केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावरील चित्रपटालाही भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांनी अर्थसहाय्य केलं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं समग्र साहित्य प्रकाशित करण्याचं कार्य सावरकरवाद्यांनी केलं. सावरकर यांच्या जीवनावरील चित्रपटही सावरकरवादी वा राष्ट्रवादी यांनी स्वखुषीने दिलेल्या अर्थसाहाय्यातून निर्मिला गेला".
ReplyDelete22 hours ago · Like
Prashant Dugane: "very nice sir"..
10 hours ago · Like
Pradip Jadhav: "REMARKABLE POINT SIR"
9 minutes ago · Like
नमस्कार सर...
ReplyDeleteअसल्या स्पर्धा जी मंडळी घेत आहेत ते नक्कीच चुकीचे आहे... हयात नसलेल्यांना ह्या असल्या स्पर्धेत ओढणे दुर्दैवी आहे...
तुमचा लेख वाचला...एकंदर गांधीजींना तुम्ही महान म्हणताय पण शालुतून टोमणे मारायचे तसे काही किस्सेही सांगताय...
१) आंबेडकर हे महान होतेच हे तुम्ही आम्ही सांगायची देखील गरज नाही.. पण त्या प्रमाणेच गांधीजी देखील महान होते..तुमच्या म्हणण्या नुसार आंबेडकरांना डावलले (बाकी नेहरू, इंदिरा गांधी, सरदार पटेल, मदर तेरेसा ह्यांच्याशी तुम्हाला लेणे देणे दिसत नाही...) पण म्हणून आयोजकां वर टीकेची झोड उठवायची सोडून तुमच्या लेखातून अप्रत्यक्ष पणे गांधीजींना निशाणा केलेला दिसून येतो...
...दुखः म्हणजे नरके सरांसारख्या वक्त्याला सरदार पटेल, मदार तेरेसा, इंदिरा गांधी, पंडित नेहरू ह्या महान विभूत्या आपल्याश्या वाटू नयेत..??? त्यांना केवळ आंबेडकर हेच आपलेसे वाटतात..!!! ??
इतरांबद्दल त्यांची निष्ठा लेखातून तरी कुठे दिसून येत नाही...
२) गांधीजींच्या वर लिहिले गेलेले मराठी साहित्याची काय दुर्दशा झालेली आहे हे उदाहरण इथे देण्याची काय गरज??? ह्या वरून तुम्हाला काय सिद्ध करायचे आहे..??.. गांधीजींचे साहित्य कोणही घेत नाही आणि आंबेडकरांचेच साहित्याचे सरकारी मुद्रणालयातून बऱ्याच प्रती खपतात ज्याचे तुम्हीच संपादक आहात..त्या वरून गांधी आणि आंबेडकरांची तुलना करायची का??? बरं मराठी सोडून इतर भाषेतील साहित्याची निर्मिती आणि विक्री बद्दल तुम्ही माहिती का बरं नाही दिलेलीत..आणि हो सरकारी प्रकाशने सोडून बोला..सध्याच्या काळात आंबेडकरी चळवळीतील मंडळी सरकारी मुद्रणालयातून जास्त साहित्य विकत घेते.. त्या मूळे साहजिकच आंबेडकरांच्या साहित्याला सगळ्यात जास्त मागणी असणार..हे अगदी सरळ व सहज आहे..कोणाची किती पुस्तके खपतात हा काही तुलनेसाठी विषयच होऊ शकणार नाही..असेच जर "संकुचित निकष" प्रत्येक जन आपापल्या सोयीनुसार लावत राहिला तर महा पुरूषां पेक्षा आज कालचे नगरसेवक देखील आपापल्या प्रभागां मध्ये महान ठरतील.....त्या मूळे शक्यतो महा पुरुषांची तुलना न केलेलीच बरी..
Prof.Anand Ubale: {ubaleanand@gmail.com}by email:
ReplyDelete12:40 (5 hours ago)
to me
Dear sir
Jay bhim
As usual u have placed the brilliant arguement. day by day u are
becoming strategic in ur writing which is definitely a sign of a
seasoned writer and thinker.ur reference of makers of universe is
certainly relevent and crucial in this connection. in a way u have
stated that ambedkar is beyond any contest.
>
Mukund Taksale:" मिडिआचा असला आचरटपणा एवढ्या सिरिअसली घ्यायचं कारण नाही, हरी. असला पोरकटपणा हसून घालवण्याची विनोदबुद्धीही आपल्या ठायी हवी. प्रत्येक गोष्ट अशी जिवाला सावून घ्यायचं ठरवलं तर पंचाईत होईल". - मुकुंद टाकसाळे{from:Facebook}
ReplyDelete20 hours ago · like · 3
SUDHAKAR JADHAV:"अशी स्पर्धा ठेवणारे मुर्ख आणि अशा स्पर्धेत भाग घेणारे महामुर्ख !"
ReplyDelete21 hours ago · like · 4
Mahesh Pilkhane: "सचिन तेंडूलकर आणि बाबासाहेब आंबेडकर ह्यांची तुलना करून IBN वाल्यांनी स्वतःची वैचारिक दिवाळखोरी दाखवून दिली आहे..."
21 hours ago · like · 5
Mahendra Bhaware Amhalahi ase watate ki Gandhina thor tharvinare TIKONJIRAO Kon?
21 hours ago ·like · 1
Santishree Pandit: Sir, wishing you on
20 hours ago · like · 1
Santishree Pandit: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा
गुरुःसाक्षात परब्रह्मा तस्मैश्री गुरवे नमः
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा{from:facebook}
sudhakar jadhav:" "गेला महिनाभर आपण एक वाद झडताना बघत आहोत. गांधीवादी,सत्याग्रही म्हनवुन मिरवणारे काहीजण गांधीभवनाची मालकी कोणाची यावरुन एकमेकांच्या झिंज्या उपटित आहेत." ही वस्तुस्थिती असली तरी यात गांधींचा संबंध आणि दोष काय ? याच न्यायाने तुम्ही बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेतील वाद आणि मारामाऱ्या या बद्दल का नाही लिहिलेत . गांधींवर टीका करावी असे अनेक मुद्दे आणि प्रसंग आहेत . पण एका गोष्टीचे श्रेय त्यांना नक्कीच देता येईल कि गांधी हे एकमेव असे राष्ट्रीय नेते होते ज्यांनी आपल्या कुटुंबियासाठी किंवा वारसदारा साठी कोणतीच संपत्ती मागे ठेवली नाही. ज्या वादा बद्दल तुम्ही लिहिलेत ती संस्था देखील गांधी निर्मित नाही हे आपल्या सारख्या विद्वानांना चांगलेच माहित असेल."
ReplyDelete19 hours ago ·like · 3
Vijay Sonawane: "The sponsor of the series is a telecom company.The chain SMSs sent by people wanting their ideal to be number one must have earned millions of Rupees for the company.
Basically what the media is doing is a dukandari`'. The great Indian debate is proving that the media in India is media of dukandar by dukandar and for dukandar".
9 hours ago · like · 1
Hari Narke:" गांधीवादी "सत्याग्रही" हे स्वता:ला समाजाच्या नैतिकतेचे घावुक ठेकेदार समजत असतात.प्रत्येक समाजघटकाने त्यांच्याकडुनच पुरोगामित्वाचे मान्यतेचे प्रमाणपत्र घेवुन सोबत बाळगले पाहिजे असा त्यांचा तोरा असतो, म्हणुन हे लिहावे लागले.बाबासाहेबांच्या संस्थेतील मारामा-या निषेधार्यच आहेत.त्यावर मी अन्यत्र विस्ताराने लिहिलेले आहे.माझा रोख गांधीजींवर नसुन गांधीवादी शंकराचार्यावर आहे."
8 hours ago · Like · 2
Vinod Sonawane I do not agree with M.K. gandhi, saying that 'No one is behind me!, The Great Pandit Nehru was behind him all the times............
5 hours ago · Like
Rahul Dahikar: "kya baat hai sir ekdam barobar bolalet."
5 hours ago · Like
Prashant Ballal:" जाधव साहेब, बाबासाहेबांसारखा दूरदृष्टी असणारा नेता संपूर्ण भारतात सापडणार नाही, आपण सांगितल्याप्रमाणे गांधींनी आपल्या वारसांसाठी कोणत्याही प्रकारची संपत्ती मागे ठेवली नाही, त्याचप्रमाणे बाबांनी सुद्धा आपल्या वारसदारांसाठी कोणतीही विशेष तरतूद करून ठेवली नव्हती हे विशेष. बाबांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये सुरु असलेल्या राजकीय वर्चस्वाच्या लढाईचा आम्ही कधीही अभिमान बाळगलेला नाही तसेच असल्या गोष्टींचा आम्ही जाहीर निषेध सुद्धा केलेला आहे.राहिला प्रश्न नरकेंच्या मूळ पोस्टचा तर आम्ही गांधींना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मानतो, परंतु सदर वाहिनीने गांधींना सुद्धा वोटिंग पोल मध्ये समाविष्ट करायला हवं होतं. जेणेकरून लोकांमध्ये चर्चेला सुरुवातच झाली नसती".{FROM:FACEBOOK}
SUNIL TAMBE:"म. गांधी यांचं समग्र साहित्य भारत सरकारने प्रसिद्ध केलं. म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं समग्र साहित्य महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलं. म. गांधी यांच्या जीवनावरील चित्रपट भारत सरकारने प्रायोजित केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावरील चित्रपटालाही भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांनी अर्थसहाय्य केलं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं समग्र साहित्य प्रकाशित करण्याचं कार्य सावरकरवाद्यांनी केलं. सावरकर यांच्या जीवनावरील चित्रपटही सावरकरवादी वा राष्ट्रवादी यांनी स्वखुषीने दिलेल्या अर्थसाहाय्यातून निर्मिला गेला".
ReplyDeleteMonday at 9:03pm · Like
Prashant Dugane: very nice sir..
Yesterday at 8:55am · Like
Pradip Jadhav :REMARKABLE POINT SIR...{FROM:FACEBOOK}
मा. नरके सर,
ReplyDelete'गांधींनंतरचा सर्वश्रेष्ठ भारतीय कोण?' हा आपला लेख अतिशय आवडला. 'गांधींनंतरचा सर्वश्रेष्ठ भारतीय कोण?' मुळात हे शीर्षकच अनेक वादांना जन्म देणारे आहे. हा एक, बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल, नेताजी बोस आदी महामानवांना कमी लेखण्याचा प्रयत्न वाटतो. टाटा, तेंडूलकर, कलाम आदी लोकांच्या कर्तेपणाचा (नाकर्तेपणाचा) भारतीय जनतेवर कवडीचाही परिणाम नाही.
बाबासाहेबांबरोबर इतरांची तुलना करताना त्या- त्या माणसांचे कर्तृत्व मोजावे, जातीचा निकष लावण्यात काहीच अर्थ नाही.
आपला नम्र,
हृषीकेश अरुण दोंदे
twitter.com/DondeHA{BY:EMAIL}
Sandip Deore:" hi sprdha band karnyasathich ata praytn kele pahijet.".
ReplyDeleteThursday at 3:01pm · Like
Satish Laxman Chaphekar: Nasrke Sar apan jar apla chtasa desh sodul baherchey jagat gelo......tar India matle ki yes from Gabdhi's country see uttar milte...........apan lok fakta gol gol firat ahot, apla desh manjech jag ahe ase manto.......Gandhini chuka kelay astil...chuka prteya mansachey hatun hotat karan to manus ahe.....tar te manus asnaychech lakshan ahe...........Goutam Budth....Ahinsa apleyla navin nahi ............Bhrtat Goutam Budthani ahisa rujavle.pan pardeshamdhey Buddth nirmanch zala nahi manun tyna ya ahiseche akrashan ahe......ani arthat gandche.....manun jara pradesattil loknshi jar contat kela tar.........Gandhi hech nav yete...javljaval 75 deshani Gandhi che stapms kadle ahet...tyna ya Ahiseche karshan ahe...............manun nivad koni hi karat nast tar jag samjch karat asto............ani prtyek manus ya jgatla smajach ghtak ahe........{BY:FACEBOOK}
सर,
ReplyDeleteकृपया हे ट्राय करुन बघा.
ज्ञ - j + shift ~ + j
डॉ= shift D + shift~ + O
(Baraha Direct Unicode)
Apratim Lekh aahe Sir Tumcha..!
ReplyDeleteTumchya vicharanna salam
Pan Educated Zalela Samaj jo varnavyavstechi pathrakhan kartoy aani aajhi Gulamgirit aani bhedbhavachya vilkhyat sapdlay he nakkich,
Buddhi Kshin karun thevliy Yanchi tharavik kshamteparyantach te vichar karu shaktat he varil kahi commentmule siddh hotay,
Savayach aahe yanna negative point kadhaychi
Jase ki Chitrakarane ekhade chitra kadhave aani chitrakalechi janiv nasnarya vyaktine mhanave ki ha rang yethe nako hota agadi tasach zalay yanch.(karan chitrakaralach mahit ki konta rang kothe havay, nahi ka?)
Kahinni tar lekh purnpane vachlach nahi ase distey tyasathich "Maker's Of Universe" madhe gandhijinche nav kuthehi nahi he punha namud karavese vatate,
Vidnyan aani satyata yanna samore janyachi yanchi himmatch hot nahi,
Kahinna itkach sangavase vatate ki tumchya buddhine vichar kelelech satya hi ghor samjut karu naka karan yat tumchech nuksan aahe..!
Dhanyavad...