Monday, July 30, 2012

कुंजीरांनी केलेली फुले बदनामी




ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले १८४८ साली शाळेत शिकवायला जात असताना पुण्यातील काही "द्विज" समाजकंटक आणि सनातनी त्यांच्या अंगावर चिखल, शेण,दगड मारीत असत. २०१२ साली त्याच पुण्यातील एक इसम जोतीराव व सावित्रीबाईंची बदनामी करताना आढळुन आला आहे.मात्र त्याने चतुराईने आपण "सत्यशोधक" नाटकाचे लेखक,दिग्दर्शक आणि सावित्रीबाईंची भुमिका करणारी अभिनेत्री यांच्यावर हल्ला करीत आहोत अशी बतावणी केलेली आहे.{"गोपुविरचित सत्यशोधक: ऎसा जोती होणे नाही", परिवर्तनाचा वाटसरू, १६-३० जुन} हे तिघेही जन्माने ब्राह्मण असल्याने त्यांच्यावरच्या या हिंसक हल्ल्याने काहीजण  चेकाळुन गेले आहेत तर काहीजण दचकुन गेले आहेत.या हल्लेखोराने ५०-६० ईंग्रजी पुस्तकातील अवतरणांचा बेफाम मारा करुन आपण फुल्यांवरील एकमेव अधिकारी विद्वान असल्याचा उत्तम भास निर्माण केला आहे.अत्यंत थंड डोक्याने "संतप्तपणाची पोज" घेत तुफान उन्माद निर्माण करण्यासाठी केलेले हे विकृत  लेखण आहे.सदर इसम आपण फुल्यांच्या बाजुचे आहोत असे ओरडून सांगत असला तरी मुलत: तो त्यांचा अवमान कसा करीत आहे हे पुराव्यानिशी मांडण्यासाठी हा लेख.
"सुनियोजित जातीय आणि धार्मिक दंगली घडवुन सर्व ब्राहमण पुरुषांची  कत्तल करण्याची" चिथावणी देणारी पुस्तिका लिहिणारे मराठा सेवा संघाचे श्री. पुरुषोत्तम खेडेकर यांचे किंवा मराठा महासंघाचे पुण्याचे अध्यक्ष श्री.शांताराम कुंजीर यांचे हे लेखण असावे असेच मला ते वाचताना वाटत होते. परंतु हे आकसपुर्ण लेखन करणारे स्कालर आहेत प्रा. विजय कुंजीर!  फुले पतीपत्नीवर लिहिण्यासाठी त्यांचे दोघांचे समग्र साहित्य आणि त्यांची अद्ययावत चरित्रे तरी किमान वाचलेली असावीत अशी माझी या विषयाचा एक विद्यार्थी म्हणुन अपेक्षा होती.कुंजीरांनी हि पुस्तके वाचलेली आहेत असा आरोप मी त्यांच्यावर करुच शकत नाही.कुंजीरांनी फुल्यांची म्हणुन दिलेली बारिकसारिक माहितीही निराधार आणि नकली आहे.कुंजीरांची भाषा शिवराळ आणि मस्तवाल आहेच परंतु त्यांची तात्विक मांडणीही पुरुषी,सरंजामी आणि सत्ताधा-यांचे हितसंबंध जोपासणारी "फुलेविरोधी" मांडणी आहे."भट’,’बामण’,ब्राह्मण्यावरची" त्यांची टिका अनुषंगिक आहे.मुळात फुल्यांची बदनामी करण्यासाठी वापरलेला तो धूर्त डावपेच आहे.
फुलेवादी असणे म्हणजे दररोज त्यांच्या फोटो किंवा पुतळयाची पुजा करणे किंवा चढ्या सुरात आरत्या गाणे नव्हे. "स्त्री-पुरुष समता,जातीनिर्मुलन,ज्ञाननिर्मिती,चिकित्सा आणि संसाधनांचे फेरवाटप" हा फुलेविचारांचा गाभा आहे.कुंजीरांचे लेखन याला पोषक असेल तर ते फुलेवादी आणि ते त्याला घातक असेल तर ते फुलेविरोधी ठरवावे लागते.
कुंजीर आपल्या लेखात तुच्छतेने म्हणतात,"बरे ईंग्रजी येवुनही कृष्णशास्त्रींची बायको काय तारे तोडणार? बामनी पितृसत्ताकतेतील संततीजनन यंत्र ते,तिला ईंग्रजी आले काय की फ्रेंच आले काय ,काय फरक पडणार?" एका स्त्रीविषयीची ही घृणास्पद विचारधारा फुलेवादात बसते काय? "सत्यशोधक" या नाटकात सावित्रीबाईंची भुमिका अत्यंत तळमळीने साकारणा-या पर्ण पेठे यांच्याविषयी कुंजीर म्हणतात,"जोतीराव नाटकभर एका अल्लड शालेय कन्येसम सावित्रीबाईबरोबर संसार करत होते.फुले दुटप्पी वाटतात इतके ते सावित्रीबाईंचे पात्र मुल आहे.एकुण फेन्सी ड्रेस करुन शाळेतल्या वार्षिक स्नेहसंमेलनात फिरत असल्यागत सावित्रीबाई वावरते.इतके पोचट पात्र आहे सावित्रीबाईंचे." आजवर देशभरातल्या ४० हजारांपेक्षा जास्त लोकांनी "तिकीट" काढुन हे नाटक बघितलेले आहे.त्यात फुल्यांवरील अनेक अधिकारी विद्वान,जाणते रंगकर्मी, सामाजिक चळवळींचे नेते,कार्यकर्ते,आणि सामान्य नागरिक यांचा समावेश  होता. दुषित पुर्वग्रहांनी माथेफिरु बनलेल्या "फुकट्या" कुंजीरांचा एकमेव अपवाद वगळता माझ्यासह सर्व प्रेक्षकांना पर्णचा अभिनय आवडलेला आहे. फुले साहित्य, चरित्र, भाषा, समाजव्यवहार  आणि नाट्यव्यवहार यांचे आकलनच जर शाळकरी आणि जातीयवादी असेल तर मग शाळकरीच उपमा सुचणार! कायतर म्हणे पेठेंनी आपल्या मुलीलाच सावित्रीबाईंच्या भुमिकेसाठी का घेतले? मी या नाटकाच्या निर्मितीप्रक्रियेत सुरुवातीपासुन आहे. सर्वप्रथम पेठेंनी या रोलसाठी ब्राह्मणेतर समाजातील अभिनेत्रींचीच निवड केलेली होती.माझ्या परिचयाच्या अशा तिघीजणींना  त्यांच्या व्यक्तीगत अडचणींमुळे तालमी केल्यानंतरही  नाटक सोडावे लागले.शेवटी प्रयोगाचा दिवस जवळ येवुन ठेपल्यानंतर पर्णने  स्वता:हुन ही भुमिका मी करीन पण नाटक झालेच पाहिजे असे कर्तव्यबुद्धीने सांगितले.ज्या लोकांचा कृतज्ञताबुद्धीशी परिचयच झालेला नसतो अशांच्या  पुरुषी,सरंजामी मानसिकतेला ही तळमळ समजणारच नाही.त्यामुळे ते असलेच गरळ ओकणार. या नाटकाची निर्मिती करणारी पुणे मनपा कामगार युनियन सफाई कामगारांसाठी अनेक वर्षे झटत आहे.ज्या लोकांनी आयुष्यात कधीही नाटकात काम केलेले नव्हते अशांना आठआठ महिने अहोरात्र राबुन पेठेंनी रंगमंचावर समर्थपणे व सफाईने उभे केले त्या अतुल पेठेंचे पांग कुंजीरांनी कसे फेडलेत? तर म्हणे मुख्य रोल उच्च वर्णियांना दिलेत आणि दुय्यम रोल बहुजनांना. भरतमुनीचे नाट्यशास्त्र चुकीच्या कारणासाठी साक्षीला उभे करुन कुंजीरांनी आपले ठार अडाणीपणच उघडे केलेय.नाटकात भुमिका करणे हे कायम निम्न जातींचे काम मानले गेलेय.त्यात सगळेच रोल मग ते प्रमुख असोत कि दुय्यम शुद्र-अतिशुद्रच करत आलेत हे कुंजीरांच्या गावीच नाही. कुंजीरांचा दावा आहे की, सावित्रीबाई "व्रत", "प्रकृती" असले ब्राह्मणी शब्द वापरुच शकत नाहीत.त्यावरुन थेठ गोपुंची जात काढुन  ते मोकळे होतात.कुंजीरांनी जोतीराव-सावित्रीबाईंच्या भाषेचा-लेखनाचा काडीमात्रही अभ्यास केलेला नाही. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या साहित्यात त्यांनी अनेकदा "व्रत","प्रकृती" हे शब्द वापरलेले आहेत..{पाहा:महात्मा फुले समग्र वांग्मय, पृ.२६७,६३२ आणि सावित्रीबाई फुले समग्र वांग्मय,पृ.८, ९९} कुंजीरांच्या मते गोपुंची ही भाषा सावरकरी आहे, ब्राह्मणी आहे.मात्र ज्याअर्थी फु्ल्यांनी ही भाषा वापरलीय त्याअर्थी कुंजीर फुल्यांनाच सावरकरी आणि ब्राह्मणी ठरवुन त्यांचा  अवमान करतात हे सिद्ध होते.
या नाटकाद्वारे  मुख्य प्रवाहामध्ये फुल्यांना पोचविण्यासाठी प्रतिभावंत दिग्दर्शक अतुल पेठे यांनी आपल्या आयुष्यातील एक वर्ष स्वत:च्या खिशाला खार लावुन विनामुल्य काम केले.म्हणुन कामगार युनियनने कृतज्ञतेपोटी काही रक्कम पेठ्यांना प्रवासखर्चासाठी दिली.  तीही त्यांनी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तिथल्यातिथे देणगी म्हणुन देवुन टाकली. ही "दानत"  परपुष्ट आणि "शोषक" असणा-या सरंजामदारांना कशी समजणार? या "फुकट्यांचा" अपराधभाव मग जागा झाला. एकीकडे अजाअज,इमावच्या आरक्षणाला संपुर्ण विरोध करणारी आणि त्याच वेळी आम्हालाही इमावमध्ये आरक्षण द्या म्हणणारी ही सत्ताधारी मानसिकता असल्याने कांगावा करुन "दलितांना आरक्षणाऎवजी खाजगी धर्मादाय मार्गाने हे शिकवु पाह्तायत" अशा चोराच्या उलट्या बोंबा मारु लागली.
कुंजीरांचा आरोप आहे की, भांडारकर प्रकरणामुळे मराठा जातीयवादाला उत्तर म्हणुन पेठ्यांनी हे नाटक बसवले. प्रयोगात पुढे मराठ्यांबद्दलचे ९६ कुळी ,पंचकुळी हे उल्लेख गाळल्याबद्दल हेच कुंजीर  तक्रारही करतात.जर यातुन पेठेंना  मराठा जातीयवादाला उत्तरच द्यायचे असते तर हे उल्लेख गाळण्याऎवजी त्यांनी ते अधिक ठळक केले असते.पण तर्कहीन पद्धतीने कुंजीर दोन्हीबाजुंनी बोलत राहतात. दुतोंडी वाचाळपणा करीत पाल्हाळ लावित जातात. या भरताडात कुंजीर मस्तवालपणे असेही सुचवतात की, फुले द्रष्टे नव्हतेच, फुल्यांना संस्कृतचा गंधही नव्हता,ते संस्कृतचे विरोधक होते, फुल्यांना ईतिहासकरणाची जाण नव्हती,फुल्यांना खरी राष्ट्रभक्ती कळलीच नव्हती, फुल्यांचे ’महा्त्मेपण’ जे काही होते ते केवळ ख्रिस्ती मिशन-यांमुळेच होते,ते ब्राह्मणद्वेष्टे होते,ते हिंदु हा शब्द वापरतच नसत. कुंजीरांचे हे सारेच आरोप निराधार आणि अडाणीपणाचे आहेत. जोतीरावांची बदनामी करण्यासाठीच कुंजीरांनी हे आरोप केलेले आहेत.
फुल्यांच्या लेखनात "हिंदु" हा शब्द अनेकदा आलाय.{पाहा:म.फु.स.वा.,पृ.१९७,३३६,३४९,३६३,३६५,४१९} सावित्रीबाईंनी तर या धार्मिक भेदभावावर कवितेतुन प्रश्नही उपस्थित केलेला आहे.{सा.फु.स.वा.पृ.८३-८७} सावित्रीबाई आणि जोतीरावांनी आपल्या लेखनात असंख्य संस्कृत श्लोक  पान नंबरसकट उद्धृत केलेले आहेत.जोतीरावांना संस्कृत भाषेची आवड होती.ते संस्कृत ग्रंथांचे नियमित वाचक होते.त्यांनी  पाठक गुरुजींची खाजगी शिकवणी लावुन संस्कृतचा व्यासंग केलेला होता.{पाहा:आम्ही पाहिलेले फुले,पृ.६१ आणि म.फु. स.वा.पृ.२६४} "इतिहास" आणि "नेशन{राष्ट्र"}विषयक जोतीरावांची मांडणी वाचली की कुंजीरांच्या याबाबतच्या अज्ञानाची किव येते.{स.वा.पृ.२६५,५२३, आणि सा.फु.स.वा.४५-५०} महात्मा फुल्यांच्या जडणघडणीत बुद्ध,अश्वघोष, येशु,प्रेषित महंमद पैगंबर, कबीर, तुकाराम, टामस पेन आणि मिशनरी अशा अनेकांचा वाटा होता.त्यांच्या प्रतिभेचे आणि द्रष्टेपणाचे सारे श्रेय केवळ मिशन-यांना देणे हा फुल्यांचा अवमानच होय.मिशन-यांनी दिलेले शिक्षण जरी महत्वाचे असले तरी ते इतरही अनेकांना मिळाले होते मग ते का नाही फुले बनू शकले? "आपल्याला बालपणीच्या मुस्लीम मित्रांच्या संगतीमुळे हिन्दुधर्माविषयी व जातीभेदाविषयी प्रश्न पडु लागले" असे फुले स्वत:च आवर्जुन नमुद करतात.{म.फु.स.वा.पृ.३३६} पण हे काहीही कुंजीरांनी वाचलेले नसल्याने ते तोंडावर आपटतात.
कुंजीरांनी वारकरी संप्रदायाबद्दल अत्यंत बेजबाबदार,टवाळखोर आणि उथळ मांडणी केलीय.महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा हा विषय आहे.तो एव्हढ्या सवंगपणे हाताळण्याचा विषय नाही.त्यात फार मोठी सामाजिक गुंतागुंत आहे.फुले स्वत: देहु-आळंदीला वारीच्या काळात व्याख्यानांसाठी जात असत.{आ.पा.फु.पृ.७४-७५} सत्यशोधक समाजाचे बहुतेक सर्व सभासद वारकरी होते.फुल्यांनी केलेली सत्यधर्माची स्थापनाच मुलत: कबीर,तुकारामादी संतांच्या विचारांवर आधारित होती, हे विसरुन कसे चालेल? लोकांपासुन फटकुन राहण्यालाच क्रांतीकारकत्व मानणारे कुंजीरांसारखे लोक एकतर विक्षिप्त {सिनिकल} असतात किंवा दहशतवादी तरी!
कुंजीरांनी मराठी रंगभुमीविषयी अत्यंत गलिच्छ भाषा वापरलेली आहे.मराठीतले पहिले आधुनिक नाटक जोतीरावांनी लिहिलेले आहे.त्याचे नाव "तृतीय रत्न" असे आहे. कुंजीरांप्रमाणे जोतीरावांनाही  संस्कृतचा द्वेष वाटत असता तर त्यांनी त्याचे नाव "तिसरे" रत्न  ठेवले असते.मराठी नाटक,नाटककार आणि रंगभुमी यावरील कुंजीरांची सगळी टिका कमरेखालची आणि हिडीस आहे. ही टिका आपण गोपु किंवा पेठेंवर करित असल्याचे ते भासवित असले तरी त्यांचा खरा रोख पहिले नाटककार महात्मा फुले यांच्यावरच आहे. गोपुंच्या सत्यशोधकची संहिता पुस्तकरुपाने १९९६ पासुन बाजारात उपलब्ध आहे.मग त्यावर हल्ला करण्यासाठी कुंजीर एव्हढी वर्षे का थांबले होते?  पेठेंनी बसवलेले हे नाटक गाजु लागले,त्यातुन खरे फुले लोकांपर्यंत पोचु लागले.ज्यांना फुल्यांचे अपहरण करुन सत्ताधारी वर्गाचे हितसंबंध जपायचे आहेत त्यांना बहुजनांचे लक्ष ख-या प्रश्नांकडुन विचलीत करण्यासाठी ब्राह्मणद्वेषाचे नाटक करावेच लागते. चिकित्सेचे दरवाजे कायमचे बंद करण्यासाठी हेतुपुर्वक शिवराळभाषा वापरायची,जातीय हेत्वारोप करायचे,त्यातुन ब्राह्मण-ब्राह्मणेतरांतील सामाजिक अभिसरण रोखायचे, सगळे काही जन्मावरच ठरते अशी सनातनी भुमिका घ्यायची आणि बुद्ध, फुले, आंबेडकरांच्या परिवर्तनवादी विचारांची नसबंदी करायची  हे यांचे सत्ताधारी राजकारण असते.हे नाटक बघायला मोठ्या संख्येने जाणा-या बहुजन वर्गाचा बुद्धीभेद करण्यासाठी आणि त्याला नाटक पाहण्यापासुन रोखण्यासाठीच कुंजीरांनी हे लेखन केलेले आहे.
खरेतर कुंजीरांना गोपु,पेठे यांच्यावर साधार,संयत आणि समर्पक वैचारिक टिका करुन ही चर्चा पुढेही नेता आली असती,पण मग ज्ञाननिर्मितीच्या कामांबद्दल तुच्छता पसरवता आली नसती, जातीनिर्मुलन, चिकित्सा, स्त्रीपुरुषसमता या फुलेवादी विषयपत्रिकेकडे लोक वळले असते.तेच तर कुंजीरांना व्ह्यायला नको आहे.
हे नाटक मी अनेकवेळा बघितलेले आहे.ते अत्यंत श्रेष्ट दर्जाचे नाटक आहे.अतुल पेठे यांनी रंगावृती एका मोठ्या उंचीवर नेवुन ठेवलेली आहे.गोपु आणि पेठे यांना "समरसतावादी,प्रतिगामी, बामणी", म्हणणे ही कुंजीरांची जात्यंधता आणि कृतघ्नता आहे.मी तिचा निषेध करतो.या नाटकामुळे फुल्यांचे "जातीय अपहरण" रोखले जात आहे.या नाटकातुन पैसे कमावणे हा त्यांचा हेतु नाही. मोफत, अल्पदरात किंवा चेरिटी शो करुन चळवळीतील अनेक संस्थांना पेठेंनी लाखो रुपयांची मदत या नाटकातुन आजवर मिळवुन दिलेली आहे.कुंजीर ईतके लबाड आहेत की त्यांनी सफाईकामगारांचा आपल्याला कळवळा असल्याचे भासवित त्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवुन हे सारे लेखन केलेले आहे.पण  प्रयोगातील त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल ब्र सुद्धा उच्चारलेला नाही.वादासाठी एकवेळ पेठे आणि गोपु तुमचे नाहीत असे मान्य करुया, पण ही सफाई कामगार मंडळी तर तुमची होती ना?मग त्यांना दाद देण्याची तुमची दानत  कुठे गेली? मुळात या वर्गाशी कुंजीरांना काही देणेघेणे असते तर त्यांच्या अपार मेहेनतीवर थुंकण्याचे असले काम त्यांनी केलेच नसते.
"हे नाटक म्हणजे जोतीरावांचे समग्र चरित्र नव्हे.एका मोठ्या माणसाचे अल्पसे दर्शन घडवण्याचा त्यामागे इरादा आहे..फुले पतीपत्नीच्या गौरीशंकराएव्हढ्या कामाचे टेकेडीवजा दर्शन घडवणारा तो एक सत्यशोधक जलशा आहे"असे स्पष्ट आणि स्वच्छ निवेदन नाटकाच्या सुरुवातीलाच गोपुंनी केलेले आहे.नाट्यव्यवहार या विषयातले केवळ वर्तमानपत्री ज्ञान असल्यामुळे अडाणीपणाने या नाटकात "हे का नाही? आणि "ते का नाही?" असले बाष्कळ प्रश्न कुंजीर विचारतात. सगळ्यांची नावे असायला ही संहिता म्हणजे काही  लग्नपत्रिका नाही की वाण्याच्या सामानाची पोतडीही नाही.आजवर फुल्यांवर शंकरराव मोरे यांच्यापासुन  मिरजकरांपर्यंत अनेकांनी नाटके लिहिलेली आहेत. आपापल्यापरिने फुल्यांचा शोध त्यांनी घेतलेला आहे.यातली किती नाटके कुंजीरांनी वाचलीयत किंवा पाहिलीयत याची कल्पना नाही.कारण त्यांचे "फुकट्यांसाठीचे" प्रयोग झालेले नाहीत. एक रटाळ,पाल्हाळिक आणि अत्यंत दुर्बोध लेख खरडणे आणि उत्तम नाटक लिहिणे यात काय फरक असतो,याची प्राथमिक माहिती कुंजीरांनी करुन घ्यायला हरकत नाही.हजारो लोकांना विचार करायला लावणारे,अस्वस्थ करणारे,अनेकांच्या डोळ्यांतुन अश्रु काढणारे हे नाटक म्हणजे फुले-आंबेडकरी चळवळीला ताकद देणारे श्रेष्ट नाटक आहे.आम्ही "सत्यशोधकसाठी" गोपु,पेठे,कामगार युनियन आणि सर्व टीमचे कृतज्ञ आहोत.तुम्ही या कृतघ्नांकडे लक्ष देवु नका. हे नाटक बंद पडावे यासाठीच त्यांचा हा सगळा खटाटोप चालु आहे.त्याला आपण बळी पडता कामा नये.
आजकाल रातोरात प्रसिद्ध होण्याच्या काही क्लुप्त्या पुढे आलेल्या आहेत.ख्यातनाम असलेल्या महात्मा फुले यांच्यासारख्यांची गचांडी धरायची,नळावर धरतात तशा झिंज्या धरणारे वर्दळीवरचे जातीय भांडण गोपु आणि पेठेंशी करीत असल्याचा भास निर्माण करायचा आणि राज्यात जातीय खळबळ माजवुन देत "गाजायचे" ही ट्रिक "पब्लीसिटी स्टंट" म्हणुन कुंजीर वापरित आहेत. पेठे-गोपुंना "बुकलुन" काढताना तुमचा खरा निशाना फुल्यांवर आहे हे आम्हाला कळलेय एव्हढेच आम्ही या नतद्रष्टांना सांगु ईच्छितो.
............................................

22 comments:

  1. Fulenchi badnami karnarya bigredincha jahir nished.....

    ReplyDelete
  2. सध्या संभाजी ब्रिगेड आणि बामसेफ सारख्या विद्वेषी संघट्ननामुळे पुरोगामी महाराष्ट्रातील सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण अतिशय स्फोटक बनत चाललेले आहे.या संघट्नांच्या जातीय विचासरणीमुळे आणि विखारी प्रचार तंत्रामुळे मराठा-बहुजन आणि दलित समाजाची नाहक बदनामी होवून कधीही भरून न येणारे नुकसान होत आहे.यांना वेळीच आवर घातला नाही तर येत्या काळात महाराष्ट्रात जातीय दंगली व्हायला वेळ लागणार नाही.

    ReplyDelete
  3. {BY: Email}..
    "नमस्कार,
    लेख वाचला. आपले वाचन आणि माहिती अफाट आहेच. त्याचा लेखनात उत्तम उपयोग करून सडेतोड उत्तर आपण कुंजीरांना दिले आहे.
    कुंजीरांच्या लेखाचा उद्देश ब्राह्मण-द्वेष आहे कि फुलेंची बदनामी करणे ह्याचा मात्र थांग लागत नाही.
    कारण दोन्ही गोष्टी समाजात पसरवायचे काम अनेक संस्थांकडून कडून चालू आहेच.

    असो, परंतु आपण दिलेले प्रत्युत्तर त्यांना विचार करून चूक सुधारायची बुद्धी देवो."

    --ॐकार केळकर

    ReplyDelete
  4. {BY:EMAIL}
    "सर,

    लेख वाचला. तुम्ही पुराव्या निशी केलेला प्रतिवाद थेट आणि उत्तमच. परवा प्रत्यक्ष भेटलात, तेव्हा तुमची एखाद्या विषयाला भिडण्याची तळमळ आणि पद्धत अनुभवली होती. या ही लेखात त्याचा प्रत्यय आला. लेख मेल केलात त्याबद्दल आभार".

    प्रवीण{PRAVIN DHOPAT}

    ReplyDelete
  5. {FROM:FACEBOOK}
    Shrikant Umrikar:" नरके यांनी एक महत्त्वाच्या चर्चेला तोंड फोडले आहे. केवळ जातीत जन्मलो म्हणून त्याचे फायदे अथवा तोटे दोन्हीची मानसिकता किती दिवस आपण जपणार आहोत? 1950 ला आपण घटना स्विकारली तरी अजून जातीय दृष्टिकोन जात नसेल तर आधुनिक काळात आपला निभाव लागणार कसा? निदान विचारांच्या, कलेच्या, वाङ्‌मयाच्या क्षेत्रात तरी आपल्याला हा जातीय दृष्टिकोन बाजूला ठेवावा लागेल.
    कुंजीरांच्या या दृष्टीकोनाचा जास्त धोका बहुजन समाजालाच आहे. कारण ग्रामिण भागातून जवळपास ब्राह्मण समाज हद्दपार झाला आहे. जिल्ह्याचं, विभागाचं मोठं शहर किंवा परदेशात आता त्याचं वास्तव आहे. आणि स्थलांतर करता यावं इतकी कमी संख्या त्यांची आहे. कुंजीरांना उत्तर द्यायला ब्राह्मण रिकामे नाहीत. फार थोडे ब्राह्मण आता कला, साहित्य, संगित यात शिल्लक आहेत. त्यांना व्यापकपणे समाविष्ट करून घेणं हेच बहुजनांच्या हिताचं आहे. उलट ज्या बहुजनांची बाजू कुंजिर मांडतात त्यांची संख्या इतकी प्रचंड आहे की त्यांना भयाण ग्रामिण वास्तवापासून स्थलांतर करणं जवळपास अशक्य आहे.
    तेंव्हा बहुजनाचे प्रतिनिधी ते स्वत:ला समजत असतील आणि प्रज्ञा दया पवार आपल्या नियतकालिकात त्यांचे लेख छापत असतील तर त्यात सगळ्यात जास्त हानी बहुजन विचारवंतांचीच होणार आहे".
    July 27 at 12:38pm · Unlike · 2
    Leena Mehendale: "एक महत्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्रात OBC साठी जे 19 आरक्षण आहे त्यामधे आरक्षण मिळण्यासाठी इतर नॉन ओबीसी हट्ट धरतात. SC चे आरक्षण आहे त्यांत कधीही कोणताच फायदा मिळाला नाही असे सांगत त्यांच्यापैकी सर्वात मागास राहिलेल्या मांग-मातंग समाजाने आरक्षणांत आरक्षण मागितले आहे -- अशी ही दुफळी चालूच रहाणार. त्यावर किमान महाराष्ट्रापुरती तरी चर्चा व्हायला हवी."
    July 27 at 1:39pm · Like · 1
    Abhijit Kulkarni: "Ha Kunjir Kon aahe ?"
    July 27 at 2:36pm · Like
    Chaman Lal: "globalize the good views. kindly post bilingually at least to understand you beyond Maharashtra".

    ReplyDelete
  6. {FROM:FACEBOOK}
    "उत्तर सडेतोड आहे. तुमच्यासारखे लोकच जातिअंताची चळवळ हाती घेऊ शकतील."
    {AWADHOOT PARALAKAR}

    ReplyDelete
  7. Hrushikesh Arun Donde

    Reply
    to me
    मा. नरके सर,
    आपला 'कुंजीरांनी केलेली फुले बदनामी' हा लेख आवडला. आपण अतिशय सुरेख पद्धतीने कुंजीरांचा बनाव उघडकीस आणला आहे आणि त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. कृपया आपण सा. कलमनामातून 'गांधींनंतरचा सर्वश्रेष्ठ भारतीय कोण?' ह्यावर आपले विचार मांडावेत. दि. २० जुलैच्या अंकातील गांधींना मोठं ठरवणाऱ्या प्रतिक्रियेचा समाचार घेतल्यास आभारी राहीन.
    आपला नम्र,
    हृषीकेश अरुण दोंदे
    [BY:EMAIL}

    ReplyDelete
  8. raja shirguppe:

    Reply
    to me
    Dear Sir
    At least you pointed out the hidden motive.Nice.Thanks
    Rajabhau
    {BY:EMAIL}

    ReplyDelete
  9. Shravan Modak:
    नमस्कार.
    धन्यवाद.
    मला वाटते, तुमच्या प्रतिवादानंतर ही 'चर्चा' पुढे चालू नये. अकारण महत्त्व प्राप्त व्हायचे त्या स्वरूपाच्या मांडणीला.
    ही मंडळी कन्फ्यूज्ड आहेत. ब्राह्मणांच्या अन्याय्य वर्तनावरची टीका आणि त्या अन्याय्य वर्तनाचे परिमार्जन करून घेण्यासाठी ब्राह्मणांचा निःपात या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. दुसरी गोष्ट स्वीकाराह्त नाही. पहिली पूर्ण स्वीकारार्ह आहे आणि म्हणूनच परिमार्जनही झाले पाहिजे. मात्र त्यात शत्रूभावी किंवा वैमनस्यभावी निःपात वगैरे अपेक्षीत असेल तर त्याला काय म्हणणार. "साडेतीन टक्के" संपल्याने भारतीय समाज काही संपुष्टात येत नाही. पण ते तसे संपण्याने जे स्थित होईल, त्याने काय होईल? कल्पना करणे अगदी अशक्य नाही. समाजातील डायनॅमिक्स हे गिव्ह अँड टेक स्वरूपातच होत असते हे ध्यानी घेतले तर असे आणखीही काही समुदाय अशाच कारणांसाठी संपुष्टात आणले जाऊ शकतात. तेव्हा, टीका आणि हे शत्रूभावी किंवा वैमनस्यभावीत्व यातील भिन्नत्त्व त्यांना कळते की नाही माहिती नाही. बहुदा नसावे. त्यामुळेच हिंसेलाही प्रवृत्त करू शकेल असे विखारी प्रचारकी लेखन आपल्या हातून होते आहे हेही त्यांना कळत नसावे. असो.
    मला तुमचा प्रतिवाद आवडला. प्रसिद्ध झाला का?
    {BY:EMAIL}

    ReplyDelete
    Replies
    1. Brahmannani atyachar kele he baryach pramanat khote aahe. Ha samaj kadhihi tevada majboot, shaktiwan nawhata. Tyatil baryach goshty atiranjit wa Engrajanchya divide and rule karita waparalela propaganda hota. Aajcha janma brahman kuthalyahi jatiya atyacharat saamil nasatana tyachya war dukh ka. Aani he kon brahmannana sampawanare. Mughalaicha jamana aahe ka. Brahmannani tarkik vad ghalanya peksha akramk bannon ya samajkantakkaana awaz dila pahije. dilip aloni[joshi] akhil bharatiya brahman sangharsh samiti.

      Delete
  10. Shravan Modak :
    "नमस्कार!
    तो लेख इतक्या सिरियसली घेतला जाईल, असे वाटले नव्हते. कुंजिरांनी डोंगर पोखरला, त्यातून उंदीरच निघाला आहे. पण, डोंगर पोखरण्याचा आवाज इतका मोठा आहे की, त्याचे प्रतिध्वनी बराच काळ उमटत राहतील असे दिसते. आणखी काही काळाने कुंजीर यांचा विचारवंत असा उल्लेख करावा लागणार असे दिसते.
    रोचक आहे हे सारे"
    [BY:EMAIL}.

    ReplyDelete
  11. From: Sudhir Dhamankar
    Subject: Re: GOPU,ATUL PETHE,VIJAY KUNJEER &SATYASHODHAK..HARI NARKE
    To: harinarkee@yahoo.in
    Date: Wednesday, 1 August, 2012, 12:04 AM

    Respected Sir,
    It is a very nice article. You have done a great job to make the people know the realty.
    Please keep it up Sir!
    Kind regards,
    Sudhir Dhamankar, Belgaon....
    [by:email}

    ReplyDelete
  12. आवर्जुन ईमेल पाठविल्याबद्दल आभार.
    कुंजीरांची भाषा शिवराळ आणि मस्तवाल आहेच परंतु त्यांची तात्विक मांडणीही पुरुषी,सरंजामी आण सत्ताधा-यांचे हितसंबंध जोपासणारी "फुलेविरोधी" मांडणी आहे, हे धक्कादयक आहे.
    फुलेवादी असणे म्हणजे दररोज त्यांच्या फोटो किंवा पुतळयाची पुजा करणे किंवा चढ्या सुरात आरत्या गाणे नव्हे, ही भूमिका योग्यच आहे.
    कुंजीर मस्तवालपणे असेही सुचवतात की, "फुले द्रष्टे नव्हतेच, ... फुल्यांना ईतिहासकरणाची जाण नव्हती,फुल्यांना खरी राष्ट्रभकती कळलीच नव्हती," ही विधाने अत्यंत निद्य आहेत.
    या संदर्भात कृपया http://myblog-common-nonsense.blogspot.in/2012/07/blog-post_3743.html हा सुधाकर जाधव (मोबाईल-९४२२१६८१५८, पांढरकवडा, जि.यवतमाळ) यांचा लेख बघावा.
    " पण गांधी - आंबेडकरा नंतर त्यांच्या अनुयायांनी या प्रश्नावर संघर्ष आणि जागरण सोडून दिल्याने जाती व्यवस्था टिकूनच राहिली नाही तर नव्याने मजबूत होवू लागली आहे. आज या प्रश्नावर ना सवर्ण आघाडीवर काम होत आहे ना दलित आघाडीवर"
    "एकीकडे गांधी चळवळ मृतप्राय झाली तर दुसरीकडे आंबेडकर चळवळीला उत्सवी आणि धार्मिक स्वरूप आले आहे. मुलभूत परिवर्तनाकडे लक्ष देण्या ऐवजी दलित तरुण गांधीना लक्ष्य आणि भक्ष्य बनविण्यात पुरुषार्थ मानू लागली आहेत."
    कोणा एका व्यक्तिपुरता हा प्रश्न मर्यादित नाही, असे वाटते.
    "विषमतेचे भौतिक परिणाम आपल्याला सहज दिसतात, पण मानसिक व त्यातून उद्भवणारे सामाजिक परिणाम दिसत नाहीत. ... समाजात विषमता तीव्र होऊ लागली की माणसे स्वतबद्दल अधिकाधिक विचार करतात. इतरांशी आपल्याला काही देणेघेणे नाही, इतरांचा विचार कराल तर फसाल, अशी विचारधारा बळावते. ... समाजात ‘कम्युनिटी’चे महत्त्व कमी होते व ‘प्रॉपर्टी’चे वाढते. प्रत्येक गोष्टीकडे मालमत्ता म्हणून पाहिले जाते, अगदी परस्पर संबंधांनाही." (http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=229160:2012-05-28-15-29-49&catid=402:2012-01-20-09-49-01&Itemid=406)
    "श्रीमंत विरुद्ध गरीब, जागतिकीकरण विरुद्ध चिरंजीवी विकास, धार्मिक मूलतत्त्ववाद या प्रश्नांनी आज साऱ्या जगाला विळखा घातला आहे. हा विळखा जरी सर्वव्यापी असला, तरी त्याचे डंख हे भारतासारख्या विकसनशील देशाला सर्वात अधिक प्रमाणात बसत आहेत. ... भारतीय अर्थव्यवस्थेची कवाडे जगासाठी खुली केल्यानंतर देशातील मध्यमवर्गाची मोठ्या प्रमाणात झालेली वाढ सर्वांत महत्त्वाची आहे. पण या वाढीमुळे सामाजिक आणि सांस्कृतिक द्विधावस्थाही निर्माण झाली."
    (http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15067362.cms)
    सरंजामी आण सत्ताधा-यांचे हितसंबंध जोपासले जाणे ही या परिस्थितीत आर्थिक सामाजिक व्यवस्थेची गरज आहे, आणि ती पुरविणार्‍याला ही व्य्वस्था खतपाणी देणार हे स्पष्ट आहे.
    -राजीव जोशी.
    ============
    {BY:EMAIL}

    ReplyDelete
  13. {BY:FB Messege}
    अत्यंत विखारी, आणि मस्तवाल भाषेतल्या, गरळ ओकणार्‍्या लेखाला हे सणसणीत उत्तर आहे. असहिष्णू होत चाललेल्या समकालीन समाजात अशा वादांना शिंगावर घेऊन समर्पक उत्तर द्यावे लागते. ते इथं दिलं गेलं आहे. त्याबद्दल मराठी वाचक हरी नरके यांचे ऋणी राहातील. Thank you Hari! You have done a noble work.

    4 hours agoGanesh Visputay
    श्रुती आणि गणेश

    ReplyDelete
  14. {BY...EMAIL}
    "सप्रेम नमस्कार.
    महाराष्ट्रातील जुन्या समाजसुधारकांचे विचार कसे असतील हे आपले लेख वाचून नेहमी अनुभवण्यास मिळते.आज सुधा आपल्यासारखे जन आपल्या जाती पलीकडे जाऊन जाती-द्वेष मिटवण्याचे काम निस्वार्थीपणे करत आहेत हे स्वर्गातून पाहताना आंबेडकर,सावरकर,शाहू ,फुले यांना थोडेतरी समाधान लाभत असेल.
    अन्यथा आपण जन्मलो "तो महाराष्ट्र हाच का " असा त्यांना प्रश्न पडला असता अशी आजची परिस्थिती आहे.

    तुमचे लेख अतिशय परखड आणि मुद्देसूद असतात.आणि वक्तृत्व ही.
    IBN लोकमत वर काही वेळा पाहण्याचा योग मिळाला.

    आपला एक प्रतिवाद हे आमच्यासारख्या लाखो जातीव्यवस्था निर्मुलन वादी वाचकांच्या भावनांचे प्रतिबिंब आहे असे आम्ही समजतो.
    हा लढा आपण असाच चालू ठेवण्यास तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !


    वेळ मिळाल्यास " निरीश्वरवाद जातीव्यवस्था उलथून टाकण्यास पूरक आहे का ! " यावर आपले विचार प्रकाशात यावेत अशी इच्छा आहे.

    आभार !"

    अवधूत जोशी (25)

    ReplyDelete
  15. satish S sks.satish@gmail.com
    15:26 (2 hours ago)
    Reply
    to me
    Dr.Satish Shirsath:...

    "Dear Narke sir,
    Thanks for inviting reactions on your article in 'PARIVARTANACHA VATSAROO'. As Marathi software is not available with me, I prefer to write in English.Actually it is very difficult to express my feelings in other than Marathi.Nevertheless, it is a try. I thank & congratulate you for initiating disscussion on an important topic.
    In your article, you have mentioned some features of Phule-ism. If one studies life, writings & work of Mahatma Phule,it is seen clearly that he has evoked to construt an unified society based on equality and human dignity.
    Bitter experiences and observations made him staunch worrier against Brahminism. He condemned brahminism as injustice & exploitation. He did not stop to mere criticism. His contribution for suggesting a new progressive, egalitarian way of life in the name of ''Satyashodhak Samaj "should be appreciated.Though earnings were insufficient, he(along with Savitribai Phule and other associates) started 'Bal Hatya Pratibandhak Griha' for pregnant widows. This innovative and revolutionary institution was sterted mainly for Brahmin women. Mahatma Phule had some bitter experiences of Brahmins. However he welcome and accepted good qualities among them too.One of his dream was to construct happy & unified society in which every person would be assimilated. When we think to follow his teaching, one must welcome the contribution of every one(may be from Brahmin community). No doubt, disguised dominance should be condemned.At the same time dictatorship, exploitation, injustice & other negative tendencies must be discarded.-Satish Shirsath"

    ReplyDelete
  16. ajit abhyankar:
    "प्रिय हरि नरके,
    महाराष्ट्रातील जात्यंतक चळवळी आणि विचारांना नष्ट करण्याची पद्धतशीर मोहीमच चालविली जाते आहे. फुले-शाहू आंबेडकर यांच्या विचारांपासून जनतेला तोडायचे. केवळ जातीय विद्वेषाला आवाहन करायचे.आणि त्यासाठी कोणत्याही थराला जावून कितीही खोटे लिहायचे, अशी मोहीमच गेली काही वर्षे पद्धतशीरपणे राबविली जाते आहे.आणि हे सर्व पुन्हा फुले शाहू आंबेडकरांच्या नावावर खपवायचे. हे सर्व थऱकाप उडविणारे आहे. कुंजीर यांचे लिखाणाचा दुसरा काहीही अर्थ लावणे शक्यच नाही.
    तुमच्या आणि सोनवणी यांच्या लेखाबद्दल पुन्हा एकदा जाती-वर्ग अंतासाठी प्रेरित कार्यकर्त्याकडून धन्यवाद !
    [BY: EMAIL}

    ReplyDelete
  17. "Dear shri Hari Narke


    thanks. tumhi mahatvache kaam nehemi pramane kele ahe.

    anek dhanyavad.

    vidyadhar date"..
    [by :email}

    ReplyDelete
  18. Abhay Shantaram Kulkarni:
    "Hari bintod lekhan aahe. this kind of rational thinking is really a need of the hour".
    abhay.
    {BY:FB MESSEGE}

    ReplyDelete
  19. Sunil Tambe
    प्रिय हरि,
    गो.पु.देशपांडे यांचं नाटक मी वाचलेलं नाही. या नाटकाचा अतुल पेठे दिग्दर्शित प्रयोगही मी पाह्यलेला नाही. त्यावर कुंजीर यांनी लिहिलेला लेखही वाचलेला नाही. त्यामुळे माझी प्रतिक्रिया तुझ्या लिखाणावर आहे.
    वस्तुस्थिती वा फॅक्टस् काय आहेत त्या नीट गोळा करून मगच तू मतप्रदर्शन करतोस. त्यातून म.फुले हा तुझ्या व्यासंगाचाच नाही तर जिव्हाळ्याचा विषय आहे. तरिही वैचारिक शिस्त पाळूनच तू प्रतिवाद करतोस. महाराष्ट्रातील प्रबोधनाची परंपरा आत्मसात करून सुस्पष्ट राजकीय भूमिका घेणारे फारच कमी अभ्यासक महाराष्ट्रात आहेत. त्यात तुझा समावेश होतो.
    राजकीय भूमिका घेताना पुरुषोत्तम खेडेकर यांनी प्रसृत केलेल्या मराठा जातीयवादावर तू अतिशय अचूक शरसंधान निर्भीडपणे करतोस, याचं मला कौतुक वाटतं.
    तुझ्यासारख्या विद्वानाने कुंजीर यांची दखल घेणं हेच थोर आहे. केवळ जोतिराव-सावित्रीबाई यांच्या प्रेमापोटी तू कुंजीरांची हजेरी घेतलेली नाहीस तर फुलेवादाच्या बांधिलकीपोटी तू लेखणी उचलली आहेस, हे त्या मजकूरावरून कळतं.
    कळावे,
    सुनील
    {bY:fb MESSEGE}

    ReplyDelete
  20. 2012/8/6 Kaushik Apte

    Hi All,



    I read all the responses and I feel this is not something that has happened for the first time where some parties with some personal agenda trying to tarnish the facts and in turn trying to change the history for their own favors. What happened to Dadoji Kondev statue at Lal Mahal when it was removed form there and now is at Shri P L Deshpande Park somewhere in the corner counting it's last days before it corrodes! what did we do as a society to stop this coward act? NOTHING!



    Such incidence are going to happen in future too but the fact will always remain the fact. It's for people to decide what they want. This country will suffer as long as we have politicians who have nothing to with their own people or country for that matter and good people don't take interest in joining politics.



    The best way to deal with such incidents is to ignore such stupid people and keep doing good work; eventually the world will take the notice of it. At least I hope so!



    -Kaushik

    ReplyDelete
  21. From: "dilip aloni" View contact details
    To: "Hari Narke"

    DEAR HARIBHAU,
    READ REACTIONS ON YOUR TAKE ON THE UNFAIR CRITICISM OF THE DRAMA. I AM DRAWING YOUR ATTENTION TO THE LETTER OF MR T S BHAL WHICH IS FULL OF HYPERBOLIC HOMILIES ON HINDUISM. BUT THE WRITER IS NOT PRACTICING WHAT HE IS PROFESSING. HIS REACTION TO YOU IS BITTER AND CONDENSEDING. WHERE IS THE CONCEPT OF UNIVERSAL BROTHERHOOD.WHAT IS HE DOING TO FIGHT BACK THE EVIL OF PEOPLE LIKE KHEDEKARS. HINDUISM DOES NOT TEACH TOLERANCE OF COWARDS. IT TEACHES TO DO YOUR DHARMA, WHICH IS FIGHTING AGAINST EVIL AND PUNISHING THOSE WHO ARE ABUSING YOUR ICONS, SAINTS ,GODS ,YOUR MOTHER AND SISTER. LET HIM READ "SHIVARAYANCHYA BADANAMICHI KENDRE "BY KHEDEKAR. IF HE WANTS TO FORGIVE HIM THEN HE DOES NOT BELIEVE IN THE ADVISE GIVEN BY LORD KRISHNA IN GEETA. HE WANTS ARJUN TO FIGHT THE WAR NOT WORRYING ABOUT WINNING OR LOOSING. HE WANTS HIM TO FIGHT THE WAR BECOUSE AS A KHATRIYA WORRIER IT IS HIS DUTY TO FIGHT ENEMIES WHO HAVE DONE WRONG AND WHO ARE NOT REGRETTING NOR SURRENDERING. NOWHERE LORD KRISHNA TALKS OF TOLERANCE AND FORGIVING WHEN THE EVILDOERS ARE CONTINUING THEIR DEEDS,.
    INSTEAD OF QUOTING SANKRIT SHLOKAS MR BHAL SHOULD PRACTICE SIMPLE DHARMA.

    DILIP ALONI

    ReplyDelete